महादेवांचे परमभक्त मार्कंडेय ऋषी यांनी शिव उपासना व महामृत्युंजय मंत्राच्या सहाय्याने अल्पायुष्यावर मात करून दीर्घायुष्य प्राप्त केले होते.

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌ उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्

महामृत्युंजय मंत्र

भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक अत्यंत प्रभावी महानमंत्र आहे. या पवित्र मंत्राचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत

या मंत्राचा मनोभावे नियमित जप केल्याने अकाली मृत्यूचे संकट टळते व मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते.

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गंभीर आजार अपघात किंवा अकाली मृत्यूची शक्यता असल्यास या मंत्राचा जप केल्यास हा योग टाळता येतो.

झोपेत भीतीदायक स्वप्न येणे, अचानक दचकून जाग येणे, भीती वाटणे अश्या समस्यांवर महामृत्युंजय मंत्र हा अत्यंत प्रभावी उपाय आहे.

या मंत्राचा जप केल्याने कर्म शुद्ध होऊन दीर्घ आयुष्य आणि कीर्ती प्राप्त होते आणि रोगांपासून मुक्ती मिळते.

असे म्हणतात की मृत्युंजय मंत्र सोमवार किंवा प्रदोष काळी जपावा. हे दोन्ही दिवस भगवान शंकराचे असून या दिवशी मंत्र जप केल्याने विशेष फायदा होतो.