यावर्षी दि. 20 मार्च 2024 रोजी विषुवदिन साजरा केला जाणार आहे. मार्च महिन्यात सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतो आणि हे दरवर्षी 19, 20 किंवा 21 मार्च रोजी होते.
दरवर्षी 19, 20 किंवा 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या तारखेला दिवस आणि रात्र प्रत्येकी 12 तासांचे म्हणजे सारखे असतात आणि यालाच विषुवदिन असं म्हणतात.
विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते. विषुवदिनी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण दोन्ही ध्रुव सूर्यापासून सारख्या अंतरावर असतात.
दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, मध्य आफ्रिका व इंडोनेशियन द्वीप समूहात जमिनीवरुन, तर अन्यत्र समुद्रातून विषुववृत्त गेलेले आहे.
उत्तर गोलार्धात ह्या दिवसापासून वसंत ऋतुची सुरवात होते असे मानतात तर दक्षिण गोलार्धात शरद ऋतुची सुरवात होते असे म्हंटले जाते. सप्टेंबर महिन्यातील विषुवदिनी याउलट क्रिया होते.
इक्विनॉक्स हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ समान रात्र असा होतो. या दोन दिवशी प्रकाश वृत्त बरोबर दोन्ही ध्रुवातून जाते आणि प्रत्येक अक्षवृत्ताला बरोबर निम्म्यावर छेदते.
पृथ्वी त्याच्या अक्षांवर फिरत असते त्यामुळे ती 23.5 डिग्रीवर झुकलेली आहे. पृथ्वीला एक गोल पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो.
पृथ्वीचा जो गोलार्ध सूर्याकडे कलतो त्या गोलार्धात दिवस 12 तासापेक्षा मोठा आणि रात्र 12 तासापेक्षा लहान असते.
20 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो त्यामुळे दिवस आणि रात्र समसमान असते. या दोन दिवसांना इक्विनॉक्स असे देखील म्हणतात.