उसाचा रस! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उसाचा रस प्यायला आवडतो. उसाचा रस प्यायल्याने शरीराला बरेच फायदे होत असतात.
उन्हाळ्यात, उष्णतेमुळे आपण लवकर थकतो आणि डिहायड्रेट होतो. उसाचा रस प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि शरीर हायड्रेट राहते.
उसाच्या रसात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
Image Source: Facebook
उसाचा रस मूत्रपिंडांसाठी फायदेशीर आहे, शरीरातील घातक पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होते आणि मूत्रपिंडातील खडे होण्यापासून बचाव होतो.
उसाच्या रसात नैसर्गिकरित्या साखर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
उसाच्या रसात असलेले नैसर्गिक एन्झाइम्स त्वचेला आतून पोषण देतात आणि त्वचेची चमक वाढवतात.
Image Source: Facebook
उसाच्या रसात असलेले पोटॅशियम हृदयासाठी फायदेशीर आहे आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
उसाच्या रसात असलेले कॅल्शियम व फायबर यांमुळे दात व हाडे होतात.