Earth Hour Day 2024: 23 मार्च 2024 रोजी रात्री 8:30 ते 9:30 दरम्यान जगभरात अर्थ अवर (Earth Hour) साजरा केला जाणार आहे. हवामान बदलाविषयी जागरूकता वाढवणे आणि ऊर्जा संवर्धनाला प्रोत्साहन देणे हे या जागतिक कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असते.
संपूर्ण जगभरातून 150 पेक्षा अधिक देश आणि प्रदेशातील लोकांनी घरातील विद्युत दिवे व विद्युत उपकरणे बंद करून या उपक्रमात (Earth Hour Day 2024) भाग घेणे अपेक्षित आहे. वर्ड वाईल्ड लाईफ फंड द्वारे सुरू केलेला आणि आयोजित केलेला हा कार्यक्रम संपूर्ण जगभरातील लोकांना एक तासासाठी विद्युत दिवे आणि विद्युत उपकरणे बंद करण्यास प्रोत्साहन करीत असतो.
शनिवार 23 मार्च 2024 रोजी रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत जगभरात अर्थ अवर साजरा केला जाणार आहे. संपूर्ण जगभरातील लोक आप आपल्या घरात किंवा महत्त्वाचे स्मारके, सरकारी इमारती, शैक्षणिक संस्था, कार्यालये इत्यादी ठिकाणी एक तासासाठी वीज पुरवठा बंद करून ऊर्जा वाचवण्याची शपथ घेतात. सर्वप्रथम 2007 मध्ये सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे अर्थ अवर सुरू झाला होता आणि तेव्हापासून जगभरात ही चळवळ लोकप्रिय झालेली आहे.
सामग्री सारणी

Earth Hour Day 2024: अर्थ अवर कसा साजरा करायचा?
-23 मार्च 2024 रोजी रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत घर, दुकाने, खाजगी अथवा सरकारी कार्यालये, प्रमुख ठिकाणे येथील वीज पुरवठा एक तासासाठी बंद करावा.
-Earth Hour मध्ये सहभागी होण्यासाठी कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळी यांना प्रोत्साहित करा.
-Earth Hour मध्ये सहभागी होण्याचे अनेक मार्ग आहेत.
– मेणबत्ती, सौर उर्जेवर चालणारे दिवे, असे इत्यादी प्रकारचे दिवे एक तासासाठी विजेचा वापर न करता लावू शकता.
– सोशल मीडियावर Earth Hour मोहिमेचा प्रचार करा.- नेहमी ऊर्जा कार्यक्षम उपकरणेच वापरावे.
हेही वाचा: होळी का साजरी करतात?
Earth Hour Day 2024 – अर्थ अवर, एक जागतिक चळवळ:
Earth Hour Day 2024: वाढती लोकसंख्या, बदलते तंत्रज्ञान यामुळे विजेची मागणी दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललेली आहे. पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांना देखील मर्यादा आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि त्याच्या वापरल्यामुळे निसर्गावर देखील परिणाम होत आहे. अर्थ तास एका क्षणापेक्षा जास्त आहे. ही अशी एक लोकप्रिय चळवळ आहे की जी गेल्या 18 वर्षांपासून जागतिक स्तरांवर लोकांना प्रेरणा आणि एकत्रीकरण करत आहे आणि आपल्या ग्रहासाठी अधिक आशादायक आणि लवचिक भविष्य निर्माण करण्याच्या आपल्या सामूहिक जबाबदारीचे आठवण करून देत आहे.
अर्थ अवर ही जागतिक वन्यजीव निधी द्वारे आयोजित केलेली चळवळ आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आपल्या ग्रहाची बांधिलकीचे प्रतीक म्हणून ही जागतिक चळवळ 2007 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे सुरु झाली. या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट हवामान बदलामुळे पृथ्वीला वाचवणे.
Earth Hour Day 2024 – रंजक इतिहास:
31 मार्च 2007 रोजी सिडनी ऑस्ट्रेलिया येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता मोठ्या प्रमाणावर स्विच ऑफचा कार्यक्रम आयोजित केला होता. ऑक्टोबर 2007 मध्ये सॅन फ्रान्सिसकोने सिडनी अर्थ अवरद्वारे प्रेरित स्वतःचा लाईट्स आऊट कार्यक्रम चालवला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर पहिला वर्धापन दिन 29 मार्च 2008 रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री आठ ते नऊ या वेळेत अर्थ अवर 2008 आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आला होता. जगभरातील 35 देशांनी अधिकृत प्रमुख शहरे म्हणून भाग घेतला आणि 400 हून अधिक शहरांनीही पाठिंबा दिला. आपल्या पृथ्वीचे संरक्षणासाठी जगभरातील महत्त्वाच्या ठिकाण आणि त्यांची अनावश्यक प्रकाश योजना बंद केली होती. गुगलने ही आपला सहभाग नोंदवत मुख्य पृष्ठ त्यादिवशी अंधकारमय केले होते.
विविध देशांनी नोंदवलेल्या सहभागामुळे 1 तासात विजेच्या वापरात लक्षणीय घट झाली होती आणि मोठ्या प्रमाणात विजेची बचत झाली होती.
2009 मध्ये स्थानिक वेळेनुसार 28 मार्च 2009 रोजी साडेआठ ते रात्री साडेनऊ पर्यंत अर्थ अवर साजरा केला गेला. 2009 च्या मोहिमेला व्होट अर्थ असे शीर्षक देण्यात आले होते. 2009 साली जळवपास 88 देश आणि 4159 शहरांनी चळवळीत भाग घेतला होता. 2009 मध्ये सहभागी झालेल्यांमध्ये पहिल्यांदाच, न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय होते.
27 मार्च 2010 रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री साडेआठ ते साडेनऊ पर्यंत अर्थ अवर आयोजित केला गेला होता. अर्थ अवर या चळवळीमध्ये 2010 मध्ये 126 देशांनी भाग घेतला.
Beyond the Hour या टॅग लाईनने अर्थ अवर 2011 ची मोहीम राबविण्यात आली होती. अर्थवर 2011 सर्व सात खंडांवरील 135 देश आणि प्रदेशांमध्ये विक्रमी 5251 शहरांमध्ये साजरा करण्यात आला. भारतात अर्थ अवर हा 26 मार्च 2011 रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊच्या वेळी साजरा करण्यात आला. तत्कालीन दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि अर्थ अवर 2011 राजदूत व तसेच बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन यांनी झेंडा दाखविला होता.
31 मार्च 2012 रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2012 आयोजित करण्यात आलेला होता. या मोहिमेत तब्बल 152 देश आणि प्रदेशांमधील 7000 हून अधिक शहरे सामील झाले होते.
23 मार्च 2013 रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2013 आयोजित करण्यात आलेला होता. 2013 मध्ये युगांडामध्ये जगातील पहिले अर्थ अवर फॉरेस्ट सुरू झाले.
शनिवार दिनांक 29 मार्च 2014 रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2014 आयोजित करण्यात आलेला होता. अर्थवर ब्ल्यू हे ग्रहासाठी जागतिक क्राउड फंडिंग आणि क्राउड सोर्सिंग प्लॅटफॉर्म म्हणून लाँच केले गेले. 2014 च्या मोहिमेत जगभरातील 162 देश आणि प्रदेशांनी सहभाग नोंदविला होता.
2015 मध्ये शनिवार दिनांक 28 मार्च यादिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2015 आयोजित करण्यात आलेला होता. यावर्षी जागतिक मोहिमेची टॅगलाईन ही हवामान बदला बदला होती.
2016 मध्ये दिनांक 26 मार्च यादिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2016 आयोजित करण्यात आलेला होता.
2017 मध्ये शनिवार दिनांक 25 मार्च यादिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2017 आयोजित करण्यात आलेला होता.
2018 मध्ये दिनांक 24 मार्च यादिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2018 आयोजित करण्यात आलेला होता.
2019 मध्ये दिनांक 30 मार्च यादिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2019 आयोजित करण्यात आलेला होता. अर्थ अवर 2019 मध्ये एकूण 188 देशांनी भाग घेतला होता. ” ऊर्जा वाचवा, पृथ्वी वाचवा – ऊर्जा बचत पृथ्वी संरक्षण” हा संदेश पसरविण्यात आला.
2020 मध्ये शनिवार दिनांक 28 मार्च यादिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2020 कोविड – 19 साथीच्या आजारामुळे डिजिटल पद्धतीने साजरा करण्यात आला. या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी 190 देश आणि प्रदेश एकत्र आले.
2021 मध्ये शनिवार दिनांक 27 मार्च यादिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2021 आयोजित करण्यात आलेला होता.
2022 मध्ये शनिवार दिनांक 26 मार्च यादिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2022 आयोजित करण्यात आलेला होता.
2023 मध्ये शनिवार दिनांक 25 मार्च यादिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत अर्थ अवर 2023 आयोजित करण्यात आलेला होता. “पृथ्वीवरील सर्वात मोठा तास” असे यावर्षी अर्थ अवरला नाव देण्यात आलेले होते.
निष्कर्ष:
अर्थ अवर ही जागतिक वन्यजीव निधी द्वारे आयोजित केलेली चळवळ आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आपल्या ग्रहाची बांधिलकीचे प्रतीक म्हणून ही जागतिक चळवळ 2007 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे सुरु झाली. या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट हवामान बदलामुळे पृथ्वीला वाचवणे.