लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला वेगवेगळी फळे खायला आवडत असतात. उन्हाळा सुरू झाल्यावर हिरवी आणि लाल द्राक्ष अनेकांचे आकर्षण असतात.
द्राक्षांमध्ये फायबर, प्रथिने, तांबे, लोह, व्हिटॅमिन्स इत्यादी आरोग्यास उपयुक्त घटक असतात. उन्हाळ्यात द्राक्ष खाणे आरोग्यास खूप फायदेशीर असते.
द्राक्षांमध्ये असलेले मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, तांबे आणि व्हिटॅमिन्स यांच्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते व थकवा दूर होतो.
द्राक्षांमध्ये असलेला व्हिटॅमिन्सचा खजिना आणि इतर पोषक घटके हे रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी मदत करतात.
द्राक्षांमध्ये असलेले विविध अँटिऑक्सिडंट डोळ्या संबंधित मॅक्युलर डीजेनेरेशन, जळजळ आणि मोतीबिंदू अशा समस्या दूर करण्यास मदत करतात.
द्राक्षांमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊ शकते आणि द्राक्षांचा ग्लायसेमीक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळू शकते.
द्राक्षांमधील अँटिऑक्सिडंट रक्तवाहिन्यांच्या निरोगी कार्यास प्रोत्साहन देऊन हृदयाची कार्यक्षमता वाढवते.
द्राक्षांमध्ये असलेल्या उपयुक्त घटकांमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म आढळून येतात ज्याच्यामुळे कर्करोग वाढीस प्रतिबंध होऊ शकतो.