यावर्षी सोमवती अमावस्या सोमवार, 8 एप्रिल 2024 रोजी येत असून अमावस्येला सुरुवात 8 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3:21 वाजता होईल आणि अमावस्या सोमवारी रात्री 11:51 वाजता समाप्त होईल.

सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. या अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकर आणि पितरांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात.

या दिवशी स्नान दानाचा मुहूर्त पहाटे 4:32 ते 5:18 पर्यंत आहे. ब्रह्म मुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने अधिक लाभ होतो. या काळात कोणत्याही पवित्र नदीमध्ये श्रद्धेने स्नान करावे.

विवाहित महिला या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि माता पार्वतीला सौभाग्याचे लेण अर्पण करतात. मौन व्रत पाळल्यास हजारो गोदानाचे फळ मिळते.

या दिवशी विवाहित महिलांनी पिंपळाच्या झाडाची दूध, पाणी, फुले, अक्षदा, चंदन इत्यादींनी पूजा करून झाडाभोवती 108 वेळा प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. यालाच अश्वथ प्रदक्षिणा असे म्हणतात.

कालसर्प दोष, शनीदोष, पितृदोष यापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पाण्यात साखर किंवा गुळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने व दिवा लावल्याने सर्व दोष दूर होतात.

सोमवती अमावस्येला काळ्या तिळाचे दान केल्याने शनीची साडेसाती किंवा शनीशी संबंधित सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात. राहू केतू यांचा प्रभाव दूर होऊन पितृदोषही संपतो.