अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी यांचा जन्म 17 जुलै 1955 रोजी अहमदनगर जिल्ह्यात झाला होता. त्यांना पाच मुले असून त्यांचे पुतणे सचिन अहिर हे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री होते.

Image Source: Times Now

1955 च्या दशकात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने अरुण गवळी यांनी 5वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील परळ, चिंचपोकळी, भायखळा, इ. भागात असलेल्या कापड गिरण्यांमध्ये काम केले.

Image Source: Google

1980च्या दशकात मुंबईत कापड गिरण्या बंद पडत होत्या आणि परिणामी अनेक तरुणांनी (अरुण गवळीसह) गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला. मटका, जुगार, हप्ता वसुली यासारखा पैसे कमवण्याचा शॉर्टकट त्यांना सापडला.

Image Source: Google

अरुण गवळी व त्यांचा भाऊ किशोर यांनी मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये प्रवेश केला आणि ते भायखळा गॅंग मध्ये सामील झाले. रामा नाईक आणि बाबू रेशीम हे त्यावेळेस भायखळा गॅंग चालवत होते.

Image Source: Google

बीआरए गॅंग म्हणून ओळखली जाणारी भायखळा कंपनी एकेकाळी दहशत पसरवत असे. रामा नाईक आणि इतर साथीदारांच्या मृत्यूनंतर अरुण गवळी यांनी गॅंगचा ताबा घेतला आणि दगडी चाळ येथून गुन्हेगारी कारवायांचे जाळे पसरवले.

Image Source: Google

पुढे दाऊद इब्राहिमच्या टोळी सोबत त्यांचा संघर्ष सुरू होता. मुंबई बॉम्ब स्फोटानंतर दाऊद व त्याचे साथीदार दुबईला पळून गेले आणि त्याकाळी अरुण गवळी एकमेव डॉन मुंबईचा कारभार पाहत होते.

Image Source: Google

1980च्या दशकात डॅडीला राजकीय आश्रय मिळाला जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अरुण गवळी आणि सई बनसोड यांसारख्या हिंदू गुंडांवर कठोर कारवाई केल्याबद्दल मुंबई पोलिसांवर टीका केली होती.

Image Source: Google

अखिल भारतीय सेना हा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करत 2004 मध्ये चिंचपोकळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. भीतीपोटी कुठलाच साक्षीदार त्यांच्याविरुद्ध साक्ष द्यायला तयार होत नव्हता.

Image Source: Google

अखेर ऑगस्ट 2012 मध्ये न्यायालयाने शिवसेना नेते कमलाकर जामसंदेकर यांच्या हत्याप्रकरणी अरुण गवळी यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा दिली. सध्या त्यांच्या मुदतपूर्व सुटकेच्या चर्चेला उधाण आलेले आहे.

Image Source: Google