Maharashtra Scholarship Result 2024: महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा 2024 चा निकाल जाहीर!

Maharashtra Scholarship Result 2024: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल मंगळवार, दि. 30 एप्रिल 2024 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. सर्व शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांचे लॉगिन मधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचे निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

विद्यार्थ्यांना पुन्हा गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिन मध्ये दिनांक 30/04/2024 ते 10/05/2024 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपर करिता रु. 50/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

Maharashtra Scholarship Result 2024

विद्यार्थ्याचे नाव आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव इत्यादी मध्ये दुरुस्तीसाठी दिनांक 10/05/2024 पर्यंत संबंधित शाळेचा लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्न कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरुस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दिनांक 10/05/2024 रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.

Maharashtra Scholarship Result 2024
Maharashtra Scholarship Result 2024

विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुण पडताळणीचा  निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले  गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्राप्त केली जाईल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने दि. 27/04/2024 अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध केलेली होती. या अंतिम उत्तर सूचीच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. शासन निर्णय क्र. एफई डी – 4014/643/प्र. क्र.4/एसडी-5, दि. 15/11/2016 अन्वये फेब्रवारी 2017 पासून शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ऐवजी पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात आलेले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत पात्रता पेपर मध्ये किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. तथापि 39.5000 ते 39,9999 या दरम्यान शेकडा कोणी मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्या विषयासाठी 40% गुण गृहीत धरुण पात्र घोषित करण्यात आले आहे.

Maharashtra Scholarship Result 2024: शिष्यवृत्ती परीक्षा 2024 चा निकाल असा पहा

Maharashtra Scholarship Result 2024: विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE) यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) निकाल 2024 तपासण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या चरणांचे अनुसरण करावे:

1) विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

2) www.mscepune.in किंवा https://www.mscepuppss.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

3) संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व इ.८ वी ही टॅब दिसेल, टॅबवर क्लिक करा.

4) त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा – 2024 या टॅबवर क्लिक करा.

5) त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी 2024 अंतरिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी) या टॅबवर क्लिक करा.

6) विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश पत्रावर दिलेला अकरा अंकी आसन क्रमांक टाकावा आणि Submit या बटन वर क्लिक करा.

Maharashtra Scholarship Result 2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी लवकरच जाहीर केली जाईल. संबंधित अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

निकाल जाहीर झाल्याची तारीख30 एप्रिल 2024
पुन्हा गुणपडताळणी करण्याची अंतिम तारीख10/05/2024
निकाल पाहण्याचे अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
मागील वर्षाचा निकाल (2023) पाहण्याचे अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
Maharashtra Scholarship Result 2024

Maharashtra Scholarship Result 2024: शासनाने केली शिष्यवृत्तीमध्ये वाढ केल्याने विद्यार्थी आनंदी!

शिष्यवृत्ती परीक्षा 2023 च्या निकालाचा आढावा:

12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी) परीक्षा झाली होती. त्या संदर्भातील 29 एप्रिल 2023 रोजी तात्पुरता निकाल जाहीर करण्यात आला होता; परंतु 9 मे 2023 पर्यंत गुण पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले गेले होते. या सर्व अर्जांचा विचार करत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निकाल जाहीर केला होता.

जाहीर केलेल्या या निकालामध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा 22 टक्के इतका निकाल लागलेला होता. इयत्ता पाचवी करिता एकूण 5 लाख 32 हजार 876 विद्यार्थ्यांनी नाव नोंदवले होते. प्रत्यक्षात 5 लाख 14 हजार 131 उपस्थित राहिले. परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी 1 लाख 14 हजार 710 आणि त्यामधून प्रत्यक्ष उत्तीर्ण झाले. शिष्यवृत्तीला पात्र झालेले 16,537 इतके विद्यार्थी आहेत. 22 टक्के एवढा निकाल इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा 2023 च्या परीक्षेत लागला होता.

इयत्ता आठवीसाठी एकूण नाव नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 67 हजार 802 होती. त्यापैकी उपस्थित राहिलेले विद्यार्थी 3 लाख 56 हजार 31 आणि त्यापैकी पात्र परीक्षेसाठी विद्यार्थी 5558 होते. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 14 हजार 714 इतकी आहे. म्हणजेच 15 टक्के इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा हा निकाल लागलेला होता. पाचवी आणि आठवी मिळून एकूण 9 लाख 678 विद्यार्थ्यांनी नाव नोंदवले. प्रत्यक्षात 8 लाख 70 हजार 162 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी परीक्षेसाठी पात्र झालेले 1 लाख 70 हजार 268 त्यातून उत्तीर्ण झालेले होते. पात्र विद्यार्थी संख्येनुसार शेकडा निकाल 19.56 टक्के इतका लागला होता.

शिष्यवृत्ती परीक्षा 2023 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आकडेवारी:

इयत्ता पाचवी करिता शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ग्रामीण भागातून (संच E) 340 विद्यार्थी होते. तर ग्रामीण सर्वसाधारण भागातून (संच J) 8014 विद्यार्थी तर शहरी भागातून सर्वसाधारण मुलांमधून (संच K) 7829 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ग्रामीण आणि शहरी म्हणून सर्वसाधारण मुले-मुली (संच F) मिळून 240 तर सर्वसाधारण मुलींमधून (संच G) 17 मुली होत्या. मागासवर्गीय मुले आणि मुली मिळून (संच H) 87 विद्यार्थी तर (संच I) मागासवर्गीय मुलींमधून 10 मुली होत्या.

इयत्ता आठवी करिता शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ग्रामीण भागातून (संच E) 340 विद्यार्थी होते. तर ग्रामीण सर्वसाधारण भागातून (संच J) 6331 विद्यार्थी तर शहरी भागातून सर्वसाधारण मुलांमधून (संच K) 6393 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ग्रामीण आणि शहरी म्हणून सर्वसाधारण मुले-मुली (संच F) मिळून 123 तर सर्वसाधारण मुलींमधून (संच G) 15 मुली होत्या. मागासवर्गीय मुले आणि मुली मिळून (संच H) 9 विद्यार्थी तर (संच I) मागासवर्गीय मुलींमधून 3 मुली होत्या.

तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांची संख्या:तालुका स्तरावरील यामध्ये 130 सर्वसाधारण मुले-मुली आहेत तर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीमधून 211 तर ग्रामीण भागातील भूमीहीन शेतमजुरांचे पाल्य 216 आहेत. ग्रामीण आदिवासी भागातील 43 विद्यार्थी यामध्ये आहे. एकूण शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या पाचवीमध्ये 16 हजार 537 तर इयत्ता आठवीमध्ये 14 हजार 714 इतकी संख्या आहे. एकूण शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 31 हजार 251 इतकी आहे.

हेही वाचा: 10वी नंतर पुढे काय? पॉलिटेक्निक एक उत्तम पर्याय!

Maharashtra Scholarship Result 2024 FAQ:

1) शिष्यवृत्ती परीक्षा पास/पात्र होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता असते?

शिष्यवृत्ती परीक्षेत पेपरमध्ये पास/पात्र होण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये  किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.

Maharashtra Scholarship Result 2024

2) शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश होत नाही?

शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत खालील विद्यार्थ्यांचा समावेश होत नाही:

  • शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी.
  • मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून परीक्षेस बसलेले विद्यार्थी.
  • विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी.
  • परीक्षेतिल गैरप्रकारात समाविष्ठ विद्यार्थी.
  • आवेदनपत्र न भरता परीक्षेस एनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी.  

हेही वाचा: उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचे फायदे!

Leave a comment