IPL Playoffs: भारतासह संपूर्ण विश्वाला क्रिकेटचे वेड लावणाऱ्या IPL अर्थात इंडियन प्रीमियर लीगचा 2024 मधील 17व्या हंगामासाठी स्पर्धा चालू आहे. इंडियन प्रीमियर लीग ज्याला आयपीएल म्हणून ओळखले जाते ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) द्वारे चालवली जाणारी T20 क्रिकेट स्पर्धा आहे. आयपीएलची पहिली स्पर्धा 2008 मध्ये खेळवण्यात आली होती. या स्पर्धेचे स्वरूप दुहेरी राऊंड रॉबिन लीग आणि प्लेऑफ असे असते. 2008 पासून ते 2024 पर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ सर्वात यशस्वी संघ राहिले आहे. बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार आयपीएलच्या हंगामात देखील बरेचसे बदल करण्यात आले. चला तर मग जाणून घेऊया 2008 पासून सेमी फायनल आणि प्लेऑफ मध्ये कोणते संघ खेळले होते? कोण विजयी झाले होते?
सामग्री सारणी
IPL Playoffs: 2008 चा पहिला हंगाम
2008 च्या हंगामातील पहिली सेमी फायनल राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन संघांमध्ये 30 मे 2008 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आली होती. पहिली सेमी फायनल राजस्थान रॉयल्स या संघाने 105 धावांनी जिंकली होती. शेन वॉटसन याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
सेमी फायनल 1: IPL 2008
2008 च्या हंगामातील पहिली सेमी फायनल राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन संघांमध्ये 30 मे 2008 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आली होती. पहिली सेमी फायनल राजस्थान रॉयल्स या संघाने 105 धावांनी जिंकली होती. शेन वॉटसन याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2008
राजस्थान रॉयल्स – 192/9 (20)
दिल्ली डेअरडेव्हिल्स – 87/10 (16.1)
सेमी फायनल 2: IPL 2008
दुसरी सेमी फायनल ही किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 31 मे 2008 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आली होती. सदरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नऊ गडी राखून किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला होता. या सामन्यात मखाया न्टिनी याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2008
किंग्ज इलेव्हन पंजाब – 112/8 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 116/1 (14.5)
फायनल: IPL 2008
2008 आयपीएलच्या पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये 01 जून 2008 रोजी डी वाय पाटील स्टेडियमवर फायनल सामना खेळवला गेला होता. पहिला आयपीएल चषक हा राजस्थान रॉयल्स 3 विकेट्सने जिंकला होता. युसुफ पठाण याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2008
चेन्नई सुपर किंग्ज – 163/5 (20)
राजस्थान रॉयल्स – 164/7 (20)

IPL Playoffs: 2009 चा दुसरा हंगाम
2009 च्या आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात डेक्कन चार्जर्स या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
सेमी फायनल 1: IPL 2009
2009 च्या हंगामातील पहिली सेमी फायनल डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये 22 मे 2009 रोजी सेंचुरीयनच्या स्टेडियमवर खेळवण्यात आली होती. पहिली सेमी फायनल डेक्कन चार्जर्स या संघाने 6 गडी राखून जिंकली होती. ॲडम गिलख्रिस्ट याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2009
डेक्कन चार्जर्स – 154/4 (17.4)
दिल्ली कॅपिटल्स – 153/8 (20)
सेमी फायनल 2: IPL 2009
दुसरी सेमी फायनल ही रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 23 मे 2009 रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात आली होती. सदरच्या सामन्यात रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरने सहा गडी राखून चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवला होता. या सामन्यात मनीष पांडे याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2009
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 149/4 (18.5)
चेन्नई सुपर किंग्ज – 146/5 (20)
फायनल: IPL 2009
2009 आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि डेक्कन चार्जर्स या दोन संघांमध्ये 24 मे 2009 रोजी जोहान्सबर्ग येथे फायनल सामना खेळवला गेला होता. दुसरा आयपीएल चषक हा डेक्कन चार्जर्सने 6 धावांनी जिंकला होता. अनिल कुंबळे याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2009
डेक्कन चार्जर्स – 143/6 (20)
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 137/9 (20)

IPL Playoffs: 2010 चा तिसरा हंगाम
2010 च्या आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
सेमी फायनल 1: IPL 2010
2010 च्या हंगामातील पहिली सेमी फायनल मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये 21 एप्रिल 2010 रोजी डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आली होती. पहिली सेमी फायनल मुंबई इंडियन्स या संघाने 35 धावांनी जिंकली होती. कायरन पोलार्ड याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2010
मुंबई इंडियन्स – 184/5 (20)
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 149/9 (20)
सेमी फायनल 2: IPL 2010
दुसरी सेमी फायनल ही डेक्कन चार्जर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 22 एप्रिल 2010 रोजी डी वाय पाटील स्टेडियम येथे खेळवण्यात आली होती. सदरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 38 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात डग बोलींगर याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2010
डेक्कन चार्जर्स – 104/10 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 142/7 (19.2)
3रे स्थान प्लेऑफ: IPL 2010
2010 च्या हंगामातील तिसरा प्लेऑफ सामना डेक्कन चार्जर्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघात 24 एप्रिल 2010 रोजी डी वाय पाटील स्टेडियम येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरने 9 गडी राखून डेक्कन चार्जर्सवर विजय मिळवला होता. या सामन्यात अनिल कुंबळे याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2010
डेक्कन चार्जर्स – 82/10 (20)
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 86/1 (13.5)
फायनल: IPL 2010
2010 आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये 25 एप्रिल 2010 रोजी डी वाय पाटील स्टेडियम येथे फायनल सामना खेळवला गेला होता. तिसरा आयपीएल चषक हा चेन्नई सुपर किंग्जने 22 धावांनी जिंकला होता. सुरेश रैना याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2010
चेन्नई सुपर किंग्ज – 168/5 (20)
मुंबई इंडियन्स – 146/9 (20)

IPL Playoffs: 2011 चा चौथा हंगाम
2011 च्या आयपीएलच्या चौथ्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2011
2011 च्या हंगामातील पहिली सेमी फायनल चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये 24 मे 2011 रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आली होती. पहिली सेमी फायनल चेन्नई सुपर किंग्ज या संघाने 6 गडी राखून जिंकली होती. सुरेश रैना याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2011
चेन्नई सुपर किंग्ज – 177/4 (19.4)
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 175/4 (20)
एलिमिनेशन फायनल: IPL 2011
2011 च्या हंगामातील एलिमिनेशन फायनल हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात 25 मे 2011 रोजी वानखेडे स्टेडियम येथे खेळवण्यात आली होती. सदरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 4 गडी राखून कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला होता. या सामन्यात मुनाफ पटेल याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2011
मुंबई इंडियन्स – 148/6 (19.2)
कोलकाता नाईट रायडर्स – 147/7 (20)
पात्रता सामना 2: IPL Playoffs 2011
दुसरी सेमी फायनल ही रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये 27 मे 2011 रोजी चेन्नई येथे खेळवण्यात आली होती. सदरच्या सामन्यात रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरने 43 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात ख्रिस गेल याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2011
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 185/4 (20)
मुंबई इंडियन्स – 142/8 (20)
फायनल: IPL 2011
2011 आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये 28 मे 2011 रोजी चेन्नई येथे फायनल सामना खेळवला गेला होता. चौथा आयपीएल चषक हा चेन्नई सुपर किंग्जने 58 धावांनी जिंकला होता. मुरली विजय याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2011
चेन्नई सुपर किंग्ज – 205/5 (20)
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 147/8 (20)

IPL Playoffs: 2012 चा पाचवा हंगाम
2012 च्या आयपीएलच्या पाचव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2012
2012 च्या हंगामातील पहिली सेमी फायनल कोलकाता नाईट रायडर्स आणि डेक्कन चार्जर्स या दोन संघांमध्ये 22 मे 2012 रोजी पुणे येथे खेळवण्यात आली होती. पहिली सेमी फायनल कोलकाता नाईट रायडर्स या संघाने 18 धावांनी जिंकली होती. युसूफ पठाण याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2012
कोलकाता नाईट रायडर्स – 162/4 (20)
डेक्कन चार्जर्स – 144/8 (20)
एलिमिनेशन फायनल: IPL 2012
2012 च्या हंगामातील एलिमिनेशन फायनल हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात 23 मे 2012 रोजी बेंगळूरू येथे खेळवण्यात आली होती. सदरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 38 धावांनी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला होता. या सामन्यात एम एस धोनी याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2012
चेन्नई सुपर किंग्ज – 187/5 (20)
मुंबई इंडियन्स – 149/9 (20)
पात्रता सामना 2: IPL 2012
दुसरा पात्रता सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि डेक्कन चार्जर्स या दोन संघांमध्ये 25 मे 2012 रोजी चेन्नई येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 86 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात मुरली विजय याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2012
चेन्नई सुपर किंग्ज – 222/5 (20)
डेक्कन चार्जर्स – 136/10 (16.5)
फायनल: IPL 2012
2012 आयपीएलच्या पाचव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये 27 मे 2012 रोजी चेन्नई येथे फायनल सामना खेळवला गेला होता. चौथा आयपीएल चषक हा कोलकाता नाईट रायडर्सने 5 गडी राखून जिंकला होता. मनबिंदर बिसला याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2012
चेन्नई सुपर किंग्ज – 190/3 (20)
कोलकाता नाईट रायडर्स – 192/5 (19.4)

IPL Playoffs: 2013 चा सहावा हंगाम
2013 च्या आयपीएलच्या पाचव्या हंगामात मुंबई इंडियन्स या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2013
2013 च्या हंगामातील पहिला पात्रता सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये 21 मे 2013 रोजी दिल्ली येथे खेळवण्यात आला होता. पहिला पात्रता सामना हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाने 48 धावांनी जिंकला होता. मायकेल हसी याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2013
मुंबई इंडियन्स – 144/10 (18.4)
चेन्नई सुपर किंग्ज – 192/1 (20)
एलिमिनेटर: IPL 2013
2013 च्या हंगामातील एलिमिनेटर हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात 22 मे 2013 रोजी दिल्ली येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 4 गडी राखून सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला होता. या सामन्यात ब्रॅड हॉज याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2013
सनरायझर्स हैदराबाद – 132/7 (20)
राजस्थान रॉयल्स – 135/6 (19.2)
पात्रता सामना 2: IPL 2013
दुसरा पात्रता सामना हा राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये 24 मे 2013 रोजी ईडन गार्डन्स येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 4 गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात हरभजन सिंग याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2013
राजस्थान रॉयल्स – 165/6 (20)
मुंबई इंडियन्स – 169/6 (19.5)
फायनल: IPL 2013
2013 च्या हंगामातील अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये 26 मे 2013 रोजी ईडन गार्डन्स येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स या संघाने 23 धावांनी जिंकला होता. किरॉन पोलार्ड याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2013
मुंबई इंडियन्स – 148/9 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 125/9 (20)

IPL Playoffs: 2014 चा सातवा हंगाम
2014 च्या आयपीएलच्या सातव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2014
2014 च्या हंगामातील पहिला पात्रता सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांमध्ये 30 मे 2014 रोजी मुंबई येथे खेळवण्यात आला होता. पहिला पात्रता सामना हा कोलकाता नाईट रायडर्स या संघाने 28 धावांनी जिंकला होता. उमेश यादव याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2014
कोलकाता नाईट रायडर्स – 163/8 (20)
किंग्ज इलेव्हन पंजाब – 135/8 (20)
एलिमिनेटर : IPL 2014
2014 च्या हंगामातील एलिमिनेटर हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात 28 मे 2014 रोजी ब्रेबॉर्न येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 7 गडी राखून मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला होता. या सामन्यात सुरेश रैना याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2014
मुंबई इंडियन्स – 173/8 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 176/3 (18.4)
पात्रता सामना 2: IPL 2014
दुसरा पात्रता सामना हा किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 30 मे 2014 रोजी मुंबई येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने 24 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात वीरेंद्र सेहवाग याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2014
किंग्ज इलेव्हन पंजाब – 226/6 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 202/7 (20)
फायनल: IPL 2014
2014 च्या हंगामातील अंतिम सामना हा किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये 01 जून 2014 रोजी बेंगळूरू येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामना हा कोलकाता नाईट रायडर्स या संघाने 3 गडी राखून जिंकला होता. मनीष पांडे याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2014
किंग्ज इलेव्हन पंजाब – 199/4 (20)
कोलकाता नाईट रायडर्स – 200/7 (19.3)

IPL Playoffs: 2015 चा आठवा हंगाम
2015 च्या आयपीएलच्या आठव्या हंगामात मुंबई इंडियन्स या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2015
2015 च्या हंगामातील पहिला पात्रता सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 19 मे 2015 रोजी मुंबई येथे खेळवण्यात आला होता. पहिला पात्रता सामना हा मुंबई इंडियन्स या संघाने 25 धावांनी जिंकला होता. किरॉन पोलार्ड याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2015
मुंबई इंडियन्स – 187/6 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 162/10 (19)
एलिमिनेटर : IPL 2015
2015 च्या हंगामातील एलिमिनेटर हा रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात 20 मे 2015 रोजी पुणे येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरने 71 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात एबी डिव्हिलियर्स याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2015
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 180/4 (20)
राजस्थान रॉयल्स – 109/10 (19)
पात्रता सामना 2: IPL 2015
2015 च्या हंगामातील दुसरा पात्रता सामना हा रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 22 मे 2015 रोजी रांची येथे खेळवण्यात आला होता. दुसरा पात्रता सामना हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाने 3 गडी राखून जिंकला होता. आशिष नेहरा याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2015
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 139/8 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 140/7 (19.5)
फायनल: IPL 2015
2015 च्या हंगामातील अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 24 मे 2015 रोजी ईडन गार्डन्स येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स या संघाने 41 धावांनी जिंकला होता. रोहित शर्मा याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2015
मुंबई इंडियन्स – 202/5 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 161/8 (20)

IPL Playoffs: 2016 चा नववा हंगाम
2016 च्या आयपीएलच्या नवव्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2016
2016 च्या हंगामातील पहिला पात्रता सामना हा गुजरात लायन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये 24 मे 2016 रोजी बेंगळूरू येथे खेळवण्यात आला होता. पहिला पात्रता सामना हा रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या संघाने 4 गडी राखून जिंकला होता. एबी डिव्हिलियर्स याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2016
गुजरात लायन्स – 158/10 (20)
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 159/6 (18.2)
एलिमिनेटर : IPL 2016
2016 च्या हंगामातील एलिमिनेटर हा कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात 25 मे 2016 रोजी दिल्ली येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 22 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात मोईसेस हेन्रीक्स याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2016
सनरायझर्स हैदराबाद – 162/8 (20)
कोलकाता नाईट रायडर्स – 140/8 (20)
पात्रता सामना 2: IPL 2016
2016 च्या हंगामातील दुसरा पात्रता सामना हा गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये 27 मे 2016 रोजी दिल्ली येथे खेळवण्यात आला होता. दुसरा पात्रता सामना हा सनरायझर्स हैदराबाद या संघाने 4 गडी राखून जिंकला होता. डेव्हिड वॉर्नर याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2016
गुजरात लायन्स – 162/7 (20)
सनरायझर्स हैदराबाद – 163/6 (19.2)
फायनल: IPL 2016
2016 च्या हंगामातील अंतिम सामना हा सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये 29 मे 2016 रोजी बेंगरूळू येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामना हा सनरायझर्स हैदराबाद या संघाने 8 धावांनी जिंकला होता. बेन कटिंग याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2016
सनरायझर्स हैदराबाद – 208/7 (20)
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 200/7 (20)

IPL Playoffs: 2017 चा दहावा हंगाम
2017 च्या आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्स या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2017
2017 च्या हंगामातील पहिला पात्रता सामना हा रायझिंग पुणे सुपरजायंट आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये 16 मे 2017 रोजी मुंबई येथे खेळवण्यात आला होता. पहिला पात्रता सामना हा रायझिंग पुणे सुपरजायंट या संघाने 20 धावांनी जिंकला होता. वॉशिंग्टन सुंदर याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2017
रायझिंग पुणे सुपरजायंट – 128/6 (20)
मुंबई इंडियन्स – 129/8 (20)
एलिमिनेटर : IPL 2017
2017 च्या हंगामातील एलिमिनेटर हा कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात 17 मे 2017 रोजी बेंगळूरू येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 7 गडी राखून D/L पद्धतीने विजय मिळवला होता. या सामन्यात न्याथन कूलटर नाईल याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2017
सनरायझर्स हैदराबाद – 128/7 (20)
कोलकाता नाईट रायडर्स – 48/3 (5.5/6)
पात्रता सामना 2: IPL 2017
2017 च्या हंगामातील दुसरा पात्रता सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये 19 मे 2017 रोजी बेंगळूरू येथे खेळवण्यात आला होता. दुसरा पात्रता सामना हा मुंबई इंडियन्स या संघाने 6 गडी राखून जिंकला होता. कर्ण शर्मा याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2017
कोलकाता नाईट रायडर्स – 107/10 (20)
मुंबई इंडियन्स – 111/4 (14.3)
फायनल: IPL 2017
2017 च्या हंगामातील अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या दोन संघांमध्ये 21 मे 2017 रोजी हैदराबाद येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स या संघाने 1 धावेने जिंकला होता. कृणाल पंड्या याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2017
मुंबई इंडियन्स – 129/8 (20)
रायझिंग पुणे सुपरजायंट – 128/6 (20)

IPL Playoffs: 2018 चा अकरावा हंगाम
2018 च्या आयपीएलच्या अकराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2018
2018 च्या हंगामातील पहिला पात्रता सामना हा सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 22 मे 2018 रोजी मुंबई येथे खेळवण्यात आला होता. पहिला पात्रता सामना हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाने 2 गडी राखून जिंकला होता. फाफ डु प्लेसिस याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2018
सनरायझर्स हैदराबाद – 139/7 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 140/8 (19.1)
एलिमिनेटर : IPL 2018
2018 च्या हंगामातील एलिमिनेटर हा कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात 23 मे 2018 रोजी ईडन गार्डन्स येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 25 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात आंद्रे रसेल याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2018
कोलकाता नाईट रायडर्स – 169/7 (20)
राजस्थान रॉयल्स – 144/4 (20)
पात्रता सामना 2: IPL 2018
2018 च्या हंगामातील दुसरा पात्रता सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये 25 मे 2018 रोजी ईडन गार्डन्स येथे खेळवण्यात आला होता. दुसरा पात्रता सामना हा सनरायझर्स हैदराबाद या संघाने 14 धावांनी जिंकला होता. राशिद खान याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2018
कोलकाता नाईट रायडर्स – 160/9 (20)
सनरायझर्स हैदराबाद – 174/7 (20)
फायनल: IPL 2018
2018 च्या हंगामातील अंतिम सामना हा सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 27 मे 2018 रोजी मुंबई येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाने 8 गडी राखून जिंकला होता. शेन वॉटसन याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2018
सनरायझर्स हैदराबाद – 178/6 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 181/2 (18.3)

IPL Playoffs: 2019 चा बारावा हंगाम
2019 च्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्स या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2019
2019 च्या हंगामातील पहिला पात्रता सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये 7 मे 2019 रोजी चेन्नई येथे खेळवण्यात आला होता. पहिला पात्रता सामना हा मुंबई या संघाने 6 गडी राखून जिंकला होता. सूर्यकुमार यादव याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2019
मुंबई इंडियन्स – 132/4 (18.3)
चेन्नई सुपर किंग्ज – 131/4 (20)
एलिमिनेटर : IPL 2019
2019 च्या हंगामातील एलिमिनेटर हा सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये 8 मे 2019 रोजी विशाखापट्टणम येथे खेळण्यात आला होता. सदरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 2 गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात वृषभ पंत याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2019
सनरायझर्स हैदराबाद – 162/8 (20)
दिल्ली कॅपिटल्स – 165/8 (19.5)
पात्रता सामना 2: IPL 2019
2019 च्या हंगामातील दुसरा पात्रता सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 10 मे 2019 रोजी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला होता. दुसरा पात्रता सामना हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाने 6 गडी राखून जिंकला होता. फाफ डु प्लेसिस याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2019
दिल्ली कॅपिटल्स – 147/9 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 151/4 (19)
फायनल: IPL 2019
2019 च्या हंगामातील अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 12 मे 2019 रोजी हैदराबाद येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स या संघाने 1 धावेने जिंकला होता. जसप्रीत बुमराह याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2019
मुंबई इंडियन्स – 149/8 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 148/7 (20)

IPL Playoffs: 2020 चा तेरावा हंगाम
2020 च्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्स या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2020
2020 च्या हंगामातील पहिला पात्रता सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये 05 नोव्हेंबर 2020 रोजी दुबई येथे खेळवण्यात आला होता. पहिला पात्रता सामना हा मुंबई इंडियन्स या संघाने 57 धावांनी जिंकला होता. जसप्रीत बुमराह याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2020
दिल्ली कॅपिटल्स – 143/8 (20)
मुंबई इंडियन्स – 200/5 (20)
एलिमिनेटर : IPL 2020
2020 च्या हंगामातील एलिमिनेटर हा रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात 06 नोव्हेंबर 2020 रोजी दुबई येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 6 गडी राखून रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरवर विजय मिळवला होता. या सामन्यात केन विल्यमसन याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2020
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 131/7 (20)
सनरायझर्स हैदराबाद – 132/4 (19.4)
पात्रता सामना 2: IPL 2020
दुसरा पात्रता सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये 08 नोव्हेंबर 2020 रोजी अबू धाबी येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 17 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात मार्कस स्टॉइयनीस याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2020
दिल्ली कॅपिटल्स – 189/3 (20)
सनरायझर्स हैदराबाद – 172/8 (20)
फायनल: IPL 2020
2020 च्या हंगामातील अंतिम सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये 10 नोव्हेंबर 2020 रोजी दुबई येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स या संघाने 5 गडी राखून जिंकला होता. ट्रेंट बोल्ट याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2020
दिल्ली कॅपिटल्स – 156/7 (20)
मुंबई इंडियन्स – 157/5 (18.4)

IPL Playoffs: 2021 चा चौदावा हंगाम
2021 च्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2021
2021 च्या हंगामातील पहिला पात्रता सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये 10 ऑक्टोबर 2021 रोजी दुबई येथे खेळवण्यात आला होता. पहिला पात्रता सामना हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाने 4 गडी राखून जिंकला होता. ऋतुराज गायकवाड याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2021
दिल्ली कॅपिटल्स – 172/5 (20)
चेन्नई सुपर किंग्ज – 173/6 (19.4)
एलिमिनेटर : IPL 2021
2021 च्या हंगामातील एलिमिनेटर हा रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात 11 ऑक्टोबर 2021 रोजी शारजाह येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 4 गडी राखून रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरवर विजय मिळवला होता. या सामन्यात सुनील नारायण याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2021
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 138/7 (20)
कोलकाता नाईट रायडर्स – 139/6 (19.4)
पात्रता सामना 2: IPL Playoffs 2021
दुसरा पात्रता सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये 13 ऑक्टोबर 2021 रोजी शारजाह येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 3 गडी राखून दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला होता. या सामन्यात व्यंकटेश अय्यर याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2021
दिल्ली कॅपिटल्स – 135/5 (20)
कोलकाता नाईट रायडर्स – 136/7 (19.5)
फायनल: IPL 2021
2021 च्या हंगामातील अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये 13 ऑक्टोबर 2021 रोजी दुबई येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाने 27 धावांनी जिंकला होता. फाफ डु प्लेसिस याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2021
चेन्नई सुपर किंग्ज – 192/3 (20)
कोलकाता नाईट रायडर्स – 165/9 (20)

IPL Playoffs: 2022 चा पंधरावा हंगाम
2022 च्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात टायटन्स या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2022
2022 च्या हंगामातील पहिला पात्रता सामना हा राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये 24 मे 2022 रोजी ईडन गार्डन्स येथे खेळवण्यात आला होता. पहिला पात्रता सामना हा गुजरात टायटन्स या संघाने 7 गडी राखून जिंकला होता. डेव्हिड मिलर याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2022
राजस्थान रॉयल्स – 188/6 (20)
गुजरात टायटन्स – 191/3 (19.3)
एलिमिनेटर: IPL 2022
2022 च्या हंगामातील एलिमिनेटर हा रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट या दोन संघात 25 मे 2022 रोजी ईडन गार्डन्स येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरने 14 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात रजत पाटीदार याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2022
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 207/4 (20)
लखनऊ सुपर जायंट – 193/6 (20)
पात्रता सामना 2: IPL Playoffs 2022
दुसरा पात्रता सामना हा रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये 27 मे 2022 रोजी अहमदाबाद येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 7 गडी राखून रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरवर विजय मिळवला होता. या सामन्यात जोस बटलर याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2022
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर – 157/8 (20)
राजस्थान रॉयल्स – 161/3 (18.1)
फायनल: IPL 2022
2022 च्या हंगामातील अंतिम सामना हा राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये 29 मे 2022 रोजी अहमदाबाद येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामना हा गुजरात टायटन्स या संघाने 7 गडी राखून जिंकला होता. हार्दिक पांड्या याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2022
राजस्थान रॉयल्स – 130/9 (20)
गुजरात टायटन्स – 133/3 (18.1)

IPL Playoffs: 2023 चा सोळावा हंगाम
2023 च्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज या संघाने आयपीएलचा चषक पटकावला होता.
पात्रता सामना 1: IPL Playoffs 2023
2023 च्या हंगामातील पहिला पात्रता सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये 23 मे 2023 रोजी चेन्नई येथे खेळवण्यात आला होता. पहिला पात्रता सामना हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाने 15 धावांनी जिंकला होता. रुतुराज गायकवाड याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2023
चेन्नई सुपर किंग्ज – 172/7 (20)
गुजरात टायटन्स – 157/10 (20)
एलिमिनेटर: IPL 2023
2023 च्या हंगामातील एलिमिनेटर हा मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट या दोन संघात 24 मे 2023 रोजी चेन्नई येथे खेळवण्यात आला होता. सदरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 81 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात आकाश मधवाल याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2023
मुंबई इंडियन्स – 182/8 (20)
लखनऊ सुपर जायंट – 101/20 (16.3)
पात्रता सामना 2: IPL Playoffs 2023
दुसरा पात्रता सामना हा मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये 26 मे 2023 रोजी अहमदाबाद येथे खेळवण्यात आला होता. हा सामना गुजरात टायटन्सने 62 धावांनी जिंकला होता. या सामन्यात शुभमन गिल याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2023
गुजरात टायटन्स – 233/3 (20)
मुंबई इंडियन्स – 171/10 (18.2)
फायनल: IPL 2023
2023 च्या हंगामातील अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये 28 – 29 मे 2023 रोजी अहमदाबाद येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाने 5 गडी राखून DLS पद्धतीने जिंकला होता. डेव्होन कॉन्वे याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
स्कोअरकार्ड: IPL 2023
चेन्नई सुपर किंग्ज – 171/5 (15)
गुजरात टायटन्स – 214/4 (20)

प्लेऑफ आणि उपांत्य फेरीतला फरक:
जगभरात प्रसिद्ध असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नवीन नियम लागू झाले आहेत. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, स्ट्रॅटेजिक टाइम आउट, इत्यादी नवीन नियम लागू झाले आहेत. आयपीएलच्या 2021 च्या चौथ्या हंगामात उपांत्य फेरीच्या ऐवजी प्लेऑफ चा नियम लागू झाला.
आयपीएल मध्ये साखळी फेरीनंतर प्लेऑफ सामने खेळले जातात. ग्रुप स्टेज मध्ये पहिल्या चार मध्ये स्थान मिळवणारे संघ प्लेऑफ साठी पात्र ठरतात. प्लेऑफ मध्ये तीन टप्प्यात सामने खेळवले जातात. क्वालिफायर 1 म्हणजेच पात्रता सामना 1, हा ग्रुप स्टेज मधील नंबर एक आणि नंबर दोन संघांमध्ये खेळला जातो. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करतो. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळायला जातो. एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघाला क्वालिफायर 1 मधील पराभूत संघासोबत क्वालिफायर 2 मध्ये सामना करावा लागतो. क्वालिफायर 2 मध्ये विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो.
उपांत्य फेरी 1 मध्ये (सेमी फायनल 1) पहिल्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना चौथा स्थानावरील संघाशी तर उपांत्य फेरी 2 मध्ये दुसऱ्या स्थानावरील संघाचा सामना तिसऱ्या स्थानावरील संघाशी होत असतो. दोन्ही उपांत्य फेरीतील विजय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
निष्कर्ष:
क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 चे विजयी संघ अंतिम सामना खेळत असतात. 2008 ते 2023 पर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएल चा चषक जिंकला आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1) IPL ची सुरवात कधी झाली?
IPL ची सुरवात ही 2008 मध्ये झाली.
2) IPL चा पहिला अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला होता?
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये IPL चा पहिला अंतिम सामना झाला होता.
3) पहिला आयपीएल चा अंतिम सामना कोणी जिंकला होता?
राजस्थान रॉयल्स या संघाने पहिला आयपीएल चा अंतिम सामना जिंकला होता.
हेही वाचा: खरंच Dream 11 ने करोडपती होता येते का?