Rajuri Steel Vacancy 2024: सिव्हिल इंजिनियर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी

Rajuri Steel Vacancy: मित्रांनो तुम्ही जर सिव्हिल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा किंवा इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले असेल आणि नामांकित कंपनीमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. डिप्लोमा, डिग्री फ्रेशर्स साठी ही एक उत्तम नोकरीची संधी आहे. राजुरी स्टील या प्रसिद्ध कंपनीमध्ये सिव्हिल इंजिनियर्स साठी मोठी भरती होत आहे. चला तर मग जाणून घेऊया राजुरी स्टीलमध्ये नोकरी करण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया.

सामग्री सारणी

Rajuri Steel Vacancy – पद:

टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (Technical Marketing Executive)

Rajuri Steel Vacancy – एकूण जागा:

65 पदे

Rajuri Steel Vacancy – शैक्षणिक पात्रता:

टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे सिव्हिल इंजीनियरिंग मधून डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झालेले असावे.

(ME/M.Tech, BE/B.Tech and Diplom in Civil Engineering)

Rajuri Steel Vacancy – वयोमर्यादा:

टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज करण्याकरिता जाहिरातीमध्ये वयोमर्यादा दिलेली नाही आहे.

Rajuri Steel Vacancy – कामाचा अनुभव:

1) मार्केटिंग आणि सेल्समध्ये एक ते दोन वर्षाचा अनुभव असलेले.

2) कन्स्ट्रक्शन साईटचे इंजिनिअर देखील अर्ज करू शकतात.

3) फ्रेशर्स म्हणजेच नुकतेच पास झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

Rajuri Steel Vacancy

नोकरीचा तपशील:

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

एकूण रिक्त पदे: 65

भरती प्रक्रिया: प्रत्यक्ष मुलाखत

मुलाखतीचा दिनांक (Walk In Interview Date):

राजुरी स्टील येथे टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी प्रत्यक्ष मुलाखत गुरुवार दिनांक 13 जून 2024 रोजी आहे.

मुलाखतीची वेळ (Time):

सकाळी 10 वाजेच्या पुढे.

मुलाखतीचा पत्ता (Venue):

सी-14, प्रोझोन ट्रेड सेंटर, प्रोझोन मॉल, चिखलठाणा एमआयडीसी क्षेत्र, छत्रपती संभाजी नगर – 431001

अर्ज शुल्क:

राजुरी स्टील टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदाच्या भरतीसाठी कुठलेही अर्ज शुल्क नाही.

महत्त्वाची नोंद:

उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह आणि सॅलरी स्लिप सह, वैध ओळखपत्रासह मुलाखतीला उपस्थित रहावे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Rajuri Steel Vacancy

असा भरा ऑनलाइन अर्ज:

राजुरी स्टील येथे टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या माहितीचा उपयोग करा.

1) इच्छुक उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करावे.

2) त्यानंतर उपलब्ध असलेला फॉर्म भरावा.

3) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना खालील माहिती भरणे आवश्यक आहे –

  • संपूर्ण नाव.
  • राज्य.
  • शहर.
  • ई-मेल.
  • संपर्क क्रमांक.

4) वरील माहिती अचूक भरल्यानंतर उमेदवारांनी आपला रिझ्युम (Resume) अपलोड करायचा आहे.

5) त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावे.

शैक्षणिक, धार्मिक, नोकरी, इतर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी येथे क्लिक करा.

राजुरी स्टील्स विषयी:

राजुरी स्टील्स अँड टीएमटी बार्स प्रायव्हेट लिमिटेड दर्जेदार गंज-प्रतिरोधक टीएमटी स्टीलच्या निर्मितीमध्ये बाजारपेठेतील अग्रणी आहे. आमच्या एकात्मिक प्लांटमध्ये कठोर गुणवत्ता तपासणी प्रक्रियेचे हे प्रमाण आहे. राजुरी स्टील्सने व्यावसायिक क्रियाकलाप टिकवून ठेवण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी आधारशिला मूल्ये ओळखली आणि तयार केली आहेत.

कॅलिबर: उच्च पातळीवरील संघ व्यावसायिकता राखणे.

खंड: बाजारपेठेतील हिस्सा वाढवणे आणि विविध उत्पादन श्रेणी ऑफर करणे.

नेटवर्कचा प्रसार: अधिक राज्यांमध्ये अधिक जिल्हे, मजबूत वितरण आधार.

वचनबद्धता: स्थिर वाढ आणि कठोर गुणवत्ता तपासणी दशके.

समुदाय: पर्यावरणाबाबत जागरूक, आणि सामाजिक उपक्रमांसाठी नियमित अजेंडा.

राजुरी 500 बार त्यांच्या अद्वितीय लवचिकता आणि गंज-प्रतिरोधक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. उत्पादन प्रक्रियेत जर्मनीतील एचएसई थर्मेक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने, त्यात वाढीव मूल्ये आहेत जी त्यास उत्कृष्ट वाकण्याचे गुणधर्म देतात.

बार जोरदारपणे गंज-प्रतिरोधक असतात कारण सामान्यतः गंज निर्माण करणारे कार्बाइड नियंत्रित पाण्याच्या थंडीमुळे तयार होत नाहीत. सुधारित गंज प्रतिकार देखील थंड वळण प्रक्रियेतून पृष्ठभागावरील ताण नसल्याचा परिणाम आहे. जाणकार ग्राहकांना राजुरी 500 बार्सबद्दल कौतुक वाटणारे अनेक गुणधर्म आहेत.

Disclaimer: आम्ही मराठी टीव्ही राजुरी स्टील टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदाच्या नोकरी संदर्भात कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाही. इच्छुक उमेदवारांनी स्वतः अधिकृत संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. राजुरी स्टील टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी कुठलेही अर्ज शुल्क नाही, तसेच उमेदवारांनी कोणालाही नोकरीसाठी पैसे देऊ नये.

निष्कर्ष:

Diploma/BE/B.Tech/ME/M.Tech सिव्हिल इंजिनियर्स, ज्यांना मार्केटिंग व सेल्सचा अनुभव आहे किंवा नुकतेच सिव्हिल इंजीनियरिंग मधून पास झालेल्या उमेदवारांसाठी राजुरी स्टील्सने नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या असून छत्रपती संभाजी नगर येथे 13 जून 2024 रोजी प्रत्यक्ष मुलाखत आहे.

हेही वाचा: पावसाळ्यात डासांमुळे पसरतो जीवघेणा आजार, जाणून घ्या डासांविषयी अधिक माहिती.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

1) राजुरी स्टील येथे टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे सिव्हिल इंजीनियरिंग मधून डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झालेले असावे.

2) राजुरी स्टील, टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी मुलाखत कोणत्या तारखेला होणार आहे?

मुलाखत गुरुवार दिनांक 13 जून 2024 रोजी होणार आहे.

3) राजुरी स्टील, टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी नोकरीचे ठिकाण कोठे आहे?

राजुरी स्टील, टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे.

4) राजुरी स्टील, टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने?

राजुरी स्टील, टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

5) राजुरी स्टील, टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या किती जागांसाठी भरती होणार आहे?

राजुरी स्टील, टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 65 रिक्त जागांची भरती होणार आहे.

6) राजुरी स्टील, टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी कामाचा अनुभव नसलेले सिव्हिल इंजिनियर्स अर्ज करू शकतात का?

होय. फ्रेशर्स म्हणजेच नुकतेच पास झालेले सिव्हिल इंजिनियर्स अर्ज करू शकतात.

7) टीएमटी बार म्हणजे काय?

टीएमटी म्हणजे थर्मो मेकॅनिकली ट्रीटेड बार आहेत ते उच्च-शक्तीचे मजबुतीकरण बार आहेत ज्यांचा बाह्य कोर आणि मऊ आतील गाभा असतो. राजुरी स्टील टीएमटी बार अपवादात्मक ताकद, टिकाऊपणा, वाकण्याची क्षमता, वेल्डेबिलिटी, लवचिकता, भूकंप-प्रतिरोधकता, गंज-प्रतिरोधकता आणि आग-प्रतिरोधक गुणधर्मांसाठी ओळखले जातात. टीएमटी बार कोणत्याही काँक्रीटच्या संरचनेला अधिक चांगले मजबुतीकरण देतात आणि सर्व प्रकारच्या बांधकामांसाठी आदर्श आहेत

8) टीएमटी बार कसे तयार केले जातात?

थर्मो मेकॅनिकल ट्रीटमेंटच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये हे समाविष्ट आहे:

1. लोह खनिजाचे बिलेटमध्ये रूपांतरण

2. बिलेट्सचे स्टीलमध्ये रूपांतरण

3. थर्मो मेकॅनिकल उपचार: यात तीन उप-चरणांचा समावेश आहे क्वेंचिंग, सेल्फ टेम्परिंग, ॲटमॉस्फेरिक कूलिंग

9) राजुरी स्टीलमध्ये कोणते ग्रेड आणि आकार उपलब्ध आहेत?

राजुरी स्टील टीएमटी बार वेगवेगळ्या ग्रेडमध्ये येतात: Fe500, Fe500D, आणि Fe550 6 मिमी ते 40 मिमी आकारात.

10) राजुरी स्टील टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी आजचा शुल्क किती आहे?

राजुरी स्टील टेक्निकल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदाच्या भरतीसाठी कुठलेही अर्ज शुल्क नाही.

माहिती पुढे शेअर करा.