Okay Fern Jobs 2024: तुम्ही जर कास्टिंग उद्योगात जलद वाढ करणाऱ्या आघाडीच्या कंपनीमध्ये आपले करिअर करू इच्छित असाल तर ओके फर्न (Okay Fern) या कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. तुम्ही जर महत्त्वकांक्षी, ध्येयनिष्ठ आणि अमर्याद वाढीच्या संधीच्या शोधात असाल तर माळेगांव औद्योगिक वसाहत, सिन्नर, नाशिक येथील ओके फर्न मधील ही भरती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण अर्ज प्रक्रिया.
सामग्री सारणी

Okay Fern Jobs 2024 – भरती प्रक्रिया:
ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, सिन्नर, नाशिक येथे खालील रिक्त पदांसाठी भरती होत आहे.
1) प्रोडक्शन इंजिनियर (Production Engineer)
एकुण पदे: 05
शैक्षणिक अहर्ता:
उमेदवारांनी मेकॅनिकल इंजीनियरिंग मधून डिप्लोमा किंवा इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
(Diploma or BE in Mechanical Engineering)
भूमिका:
उत्पादन कार्यक्षमता वाढवणे, उत्पादन प्रक्रिया व्यवस्थापित करणे आणि उच्च दर्जाचे उत्पादन सुनिश्चित करणे.
वेतन:
1) फ्रेशर्स उमेदवारांसाठी दरमहा ₹ 22,000 /- (CTC)
2) अनुभवी उमेदवारांसाठी अनुभव आणि ज्ञानाच्या अनुषंगाने वेतन दिले जाईल.
2) QA इंजिनियर
एकुण पदे: 05
शैक्षणिक अहर्ता:
उमेदवारांनी मेकॅनिकल इंजीनियरिंग मधून डिप्लोमा किंवा इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
(Diploma or BE in Mechanical Engineering)
भूमिका:
उत्पादन मानकांची खात्री करणे, गुणवत्ता हमी प्रक्रियेचे निरीक्षण करणे आणि गुणवत्ता नियंत्रण पद्धती लागू करणे.
वेतन:
1) फ्रेशर्स उमेदवारांसाठी दरमहा ₹ 22,000 /- (CTC)
2) अनुभवी उमेदवारांसाठी अनुभव आणि ज्ञानाच्या अनुषंगाने वेतन दिले जाईल.
3) मशीन ऑपरेटर्स (Machine Operators)
एकुण पदे: 20
शैक्षणिक अहर्ता:
उमेदवारांनी कुठल्याही ट्रेड मधून आयटीआयचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
(ITI in any Trade)
वेतन:
1) फ्रेशर्स उमेदवारांसाठी दरमहा ₹ 18,000 /- (CTC)
2) अनुभवी उमेदवारांसाठी अनुभव आणि ज्ञानाच्या अनुषंगाने वेतन दिले जाईल.
भूमिका:
यंत्रसामग्री चालवणे आणि देखरेख करणे, सुरळीत उत्पादन प्रवाह सुनिश्चित करणे आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे.
4) एक्झिक्यूटिव्ह (Executive) – QA
एकुण पदे: 02
शैक्षणिक अहर्ता:
उमेदवारांनी मेकॅनिकल इंजीनियरिंग मधून डिप्लोमा किंवा इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
(Diploma or BE in Mechanical Engineering)
कामाचा अनुभव:
संबंधित कामाचा 4 ते 6 वर्षांचा अनुभव.
वेतन:
अनुभवी उमेदवारांसाठी अनुभव आणि ज्ञानाच्या अनुषंगाने वेतन दिले जाईल.
भूमिका:
गुणवत्ता आश्वासन उपक्रमांचे नेतृत्व करणे, QA टीम व्यवस्थापित करणे आणि उद्योग मानकांचे पालन सुनिश्चित करणे.
5) इंडक्शन फर्नेस ऑपरेटर्स (Induction Furnace Operators)
एकुण पदे: 10
शैक्षणिक अहर्ता:
उमेदवारांनी कुठल्याही ट्रेड मधून आयटीआयचे शिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा उमेदवार 12 वी पास झालेला असावा.
(ITI in any Trade or 12th Std.)
वेतन:
1) फ्रेशर्स उमेदवारांसाठी दरमहा ₹ 20,000 /- (CTC)
2) अनुभवी उमेदवारांसाठी अनुभव आणि ज्ञानाच्या अनुषंगाने वेतन दिले जाईल.
भूमिका:
धातू वितळवण्यासाठी आणि मिश्रित करण्यासाठी इंडक्शन फर्नेस चालवणे, भट्टीची योग्य देखभाल सुनिश्चित करणे आणि सुरक्षा मानकांचे पालन करणे.
6) लॅब असिस्टंट्स (Lab Assistants)
शैक्षणिक अहर्ता:
रसायनशास्त्रात बीएससी किंवा एमएससी (B.Sc or M.Sc in Chemistry)
भूमिका:
वरिष्ठ प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचा देखरेखेखाली नियमित चाचणी आणि प्रयोग आयोजित करणे. लॅब रेकॉर्ड आणि नमुने व्यवस्थित राखून ठेवणे तसेच अचूकपणे डेटा रेकॉर्ड करणे.
7) अप्रेंटिस
A) डिप्लोमा आणि इंजीनियरिंग अप्रेंटिस
मेकॅनिकल इंजीनियरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग या विभागातील डिप्लोमा किंवा इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले.
(NATS)
B) आयटीआय अप्रेंटिस

Okay Fern Jobs 2024 – अर्ज प्रक्रिया:
1) पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा, अर्ज आणि पदाचे नाव खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवणे.
carrers@okayfern.co.in किंवा
hrd@okayfern.co.in
2) पात्र व इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील अर्ज करू शकतात.
कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Okay Fern Jobs 2024 – अर्ज करण्याची अंतिम तारीख:
ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेसाठी अर्ज करण्याकरिता 30/06/2024 ही अंतिम तारीख आहे.
नोकरीचे ठिकाण:
सिन्नर, नाशिक.
कंपनीचा पत्ता:
ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, सर्वेक्षण क्र. १२६/१, केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मागे,एम. आय. डी. सी. एरिया, माळेगाव, सिन्नर, नाशिक-४२२११३
ओके फर्न कंपनीमध्ये नोकरी का करावी?
योग्य उमेदवारांसाठी करिअरच्या प्रगतीवर कोणतीही मर्यादा न ठेवता उमेदवारांची क्षमता ही कंपनीची प्राथमिकता आहे.
कंपनी विषयी अधिक माहिती
ओके फर्न हे इन्व्हेस्टमेंट कास्टिंग्ज (लॉस्ट वॅक्स प्रोसेस) उत्पादनांच्या भारतातील आघाडीच्या उत्पादकांपैकी एक आहे. आम्ही ऑटोमोबाईल्स, पंप्स आणि व्हॉल्व्ह, फार्म इक्विपमेंट, डिफेन्स, स्विच गियर, जनरल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल पार्ट्स यासारख्या विविध उद्योगांना सेवा देत आहोत. बाजारातील विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आमच्या वनस्पतींनी लवचिकता स्वीकारली आहे. आम्ही या क्षेत्रात आमची क्षमता प्रवीण केली आहे कारण आम्ही यजमान उद्योगांना, क्लिष्ट आकारांसह उत्पादनांच्या मोठ्या श्रेणीचा पुरवठा आणि समाधान देत आहोत. आम्ही विविध उद्योगांसाठी 100+ मिश्रधातूंमध्ये 2,000 पेक्षा जास्त प्रकारचे विविध आकाराचे भाग बनवत आहोत. समान उत्पादन क्षमतेसह वेगवेगळ्या ठिकाणी दोन उत्पादन सुविधा आहेत.
2008 मध्ये स्थापित OKAY FERN ही एक आगामी गुंतवणूक कास्टिंग फाउंड्री आहे, जी स्विच गियर, ऑटोमोबाईल्स, पंप आणि वाल्व्ह, बायो मेडिकल सर्जिकल इम्प्लांट्स, ग्लास इंडस्ट्री यांसारख्या विविध उद्योगांसाठी 400 हून अधिक वेगवेगळ्या भागांचा पुरवठा करते.
कंपनीचे उत्पादने:
पंप आणि वाल्व
ऑटोमोबाईल्स
संरक्षण
गीअर्स स्विच करा
सामान्य
ग्लास फिटिंग
Disclaimer: आम्ही मराठी टीव्ही ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील विविध पदांच्या भरतीसाठी कुठल्याही प्रकारे जबाबदार नसून पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने स्वतः अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा कंपनीचे कुठलेही कर्मचारी भरतीसाठी पैशांची मागणी करत नाहीत.
निष्कर्ष:
कास्टिंग उद्योगात जलद गतीने वाढ करणाऱ्या आघाडीच्या कंपनीमध्ये आपले करिअर करू इच्छिनाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता योग्य पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1) माळेगांव औद्योगिक वसाहत कोठे आहे?
माळेगांव औद्योगिक वसाहत सिन्नर, नाशिक येथे आहे.
2) नाशिक शहरापासून माळेगांव औद्योगिक वसाहतीचे अंतर किती आहे?
नाशिक शहरापासून माळेगांव औद्योगिक वसाहतीचे अंतर हे 22 किलोमीटर इतके आहे.
3) ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे?
ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30/06/2024 आहे.
4) ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करायचा आहे की ऑफलाइन?
ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
5) ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नाशिक व्यतिरिक्त अन्य कोठे शाखा आहे का?
ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नाशिक व्यतिरिक्त पिथमपूर, इंदोर येथे शाखा आहे.
हेही वाचा: यौगिक जीवनशैली आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस.
माहिती पुढे शेअर करा.