बहुप्रतिक्षित नवीन 5G मोबाईल फोन OnePlus ने शेवटी भारतात लॉन्च केला आहे. Nord CE 4 Lite 5G असे ह्या मोबाईलचे नाव आहे.
Image Source: OnePlus
आकर्षक, अप्रतिम डिसाइन, नवीन रंग आणि उत्कृष्ट फिचर्स असे ह्या वन प्लस च्या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य असून Nord CE 3 च्या तुलनेत हे नवीन मॉडेल अधिक उत्कृष्ट आहे.
Image Source: OnePlus
OnePlus Nord CE 4 Lite क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट ने समर्थीत असून हे Android 14 आधारित OxygenOS 14 सह शिप करते.
Image Source: OnePlus
यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा युनिट असून ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सह 50 मेगापिक्सेल Sony LYT-600 प्राथमिक सेंसर आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेंसर आहे. फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा आहे.
Image Source: OnePlus
Adreno 619 GPU, 8GB RAM आणि 256 GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
Image Source: OnePlus
फास्ट चार्जिंगसाठी 80W वायर्ड SuperVOOC आणि 5W रिव्हर्स चार्जिंगची सोय असून यासाठी 5,500mAh क्षमतेची शक्तिशाली बॅटरी आहे. IP54 रेटेड हँडसेट धूळ प्रतिरोधी आहे.
Image Source: OnePlus
फोनचा आकार 162.9 × 75.6 × 8.1 मिमी असून वजन 191 ग्रॅम आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक, AMOLED स्क्रीन, 6.67 इंच डिस्पलेने हा फोन समर्थित आहे.
Image Source: OnePlus
भारतात हा फोन मेगा ब्लू, सुपर सिल्वर आणि अल्ट्रा ऑरेंज या पर्यांयासोबत येत असून 5G, Wi-Fi 5, GPS, Bluetooth 5.1 असे अनेक फिचर्स उपलब्ध आहेत.
Image Source: OnePlus