Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024: महिन्याला 1500 रुपये, महिला खुश!

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. महिन्याला 1500 रुपये महिलांना मिळणार असल्याने महिला खुश झालेल्या आहेत. दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री श्री. अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोचण्यासहित सर्वांगीण विकासासाठी या योजना जाहीर करण्यात आल्याचे श्री अजित पवार यांनी सांगितले. चला तर मग जाणून घेऊया बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने विषयीची संपूर्ण माहिती.

सामग्री सारणी

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024: मध्यप्रदेश मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिलांसाठी ‘लाडली बहेना’ योजना लागू केलेली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना महाराष्ट्र शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार असून त्यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपये निधी उपलब्ध केला जाईल. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून केली जाणार आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024: योजनेचा उद्देश

1) राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे.

2) महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.

3) राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.

4) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: योजनेचे स्वरूप

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात दरमहा रुपये 1500/- थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) केले जातील. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये 1500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: योजनेचे लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता

1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.

2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

3) किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत.

4) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024
Image Source: Freepik

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: योजनेच्या लाभार्थ्याची अपात्रता

1) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखांपेक्षा अधिक आहे.

2) त्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.

3) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.

4) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.

5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार/ आमदार आहे.

6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कार्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.

7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे.

8) ज्यांच्याकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

Ladki Bahin Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे

सदर योजनेमध्ये लाभ मिळविण्याकरता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:

1) योजनेचे लाभासाठी ऑनलाईन अर्ज.

2) लाभार्थ्याचे आधार कार्ड.

3) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.

4) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य)

5) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

6) पासपोर्ट आकाराचा फोटो.

7) रेशनकार्ड.

8) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

दिनांक 02/07/2024 च्या सुधारित शासन निर्णयानुसार कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:

  • सदर योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 महिन्यांसाठी वाढविण्यात येत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे.
  • लाभार्थी महिलांकडे डोमसाईल सर्टिफिकेट नसल्यास त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड/ मतदार ओळख पत्र/ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/ जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरले जाईल.
  • सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
  • सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षं इतका होता. आता त्या ऐवजी 21 ते 65 वर्षं लाभार्थी महिलांचा वयोगट करण्यात येत आहे.
  • 2.5 लाख रुपये या उत्पन्नाचा दाखला नसल्यास तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याच्या प्रमानपत्रातून सूट देण्यात येत आहे.
  • परराज्यात जन्म झालेल्या महिलांचा महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषा सोबत विवाह झाला असल्यास पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.

Ladki Bahin Yojana 2024: लाभार्थी निवड

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्य सेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/ वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणीत केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल. सक्षम अधिकारी  या कामकाजावर नियंत्रण ठेवतील.

आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील. तसेच आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील.

Ladki Bahin Yojana 2024: अर्ज करण्याची प्रक्रिया

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाईल ॲप द्वारे/सेतू सुविधा केंद्र द्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे.

1) पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

2) ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.

3) वरील बदलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) /सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथा योग्य पोच पावती दिली जाईल.

4) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.

5) अर्जदार महिने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी (E-KYC) करता येईल त्यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.

  • कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
  • स्वतःचे आधार कार्ड.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024
Image Source: Freepik

Ladki Bahin Yojana 2024: तात्पुरता यादीचे प्रकाशन

अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/ॲपवर जाहीर केली जाईल, त्याची प्रत अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत/वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल.

Ladki Bahin Yojana 2024: आक्षेपांची पावती

जाहीर यादीवरील हरकत पोर्टल/ॲपवर  प्राप्त केल्या जातील. याशिवाय अंगणवाडी सेविका/मुख्य सेविका/सेतू सुविधा केंद्र/यांचेमार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत/तक्रार नोंदवता येईल. लेखी (ऑफलाइन) प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टर मध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केले जातील. पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसांपर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana 2024: अंतिम यादीचे प्रकाशन

समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल. सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत/वार्ड स्तरावर/सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल/ॲपवर देखील जाहीर केली जाईल.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: लाभाच्या रकमेचे वितरण

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्राप्त करण्यास सुरवात1 जुलै 2024
अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक15 जुलै 2024
तात्पुरती यादी प्रकाशन16 जुलै 2024
तात्पुरत्या यादीवरील तक्रार/हरकती प्राप्त करण्याचा कालावधी16 जुलै 2024 ते  20  जुलै 2024
तक्रार/हरकती निराकरण करण्याचा कालावधी21 जुलै 2024 ते  30  जुलै 2024
अंतिम यादी प्रकाशन दिनांक01 ऑगस्ट 2024
लाभार्थ्याचे बँकेमद्धे E-KYC करणे10 ऑगस्ट 2024
लाभार्थी निधी हस्तांतरण14 ऑगस्ट 2024
त्यानंतरच्या महिन्यांत देय दिनांकप्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: योजनेचा अधिकृत शासन निर्णय (GR) पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

निष्कर्ष:

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 1 जुलै 2024 पासून सुरू होत आहे.

शैक्षणिक, धार्मिक, नोकरी, इतर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी येथे क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादा किती आहे?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे.

2) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?

किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला पात्र असतील.

3) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत दरमहा किती पैसे मिळणार आहे?

पात्र महिलांना दरमहा रुपये 1500/- मिळणार आहेत.

हेही वाचा: इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरावा?

माहिती पुढे शेअर करा.

Leave a comment