मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
Image Source: Freepik
सदरच्या सुधारित शासन निर्णयामुळे लाखों महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. कारण की, योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
Image Source: Freepik
सदर योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 महिन्यांसाठी वाढविण्यात येत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे.
Image Source: Freepik
लाभार्थी महिलांकडे डोमसाईल सर्टिफिकेट नसल्यास त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड/ मतदार ओळख पत्र/ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/ जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरले जाईल.
Image Source: Freepik
सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
Image Source: Freepik
सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षं इतका होता. आता त्या ऐवजी 21 ते 65 वर्षं लाभार्थी महिलांचा वयोगट करण्यात येत आहे.
Image Source: Depositephotos
2.5 लाख रुपये या उत्पन्नाचा दाखला नसल्यास तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याच्या प्रमानपत्रातून सूट देण्यात येत आहे.
Image Source: Freepik
परराज्यात जन्म झालेल्या महिलांचा महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषा सोबत विवाह झाला असल्यास पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
Image Source: Freepik