New Criminal Law: भारतात नवीन फौजदारी कायदे लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती

New Criminal Law: गुन्हेगारी न्यायव्यवस्थेची संपूर्ण फेरबदल करण्याच्या दृष्टीने संपूर्ण भारतात 3 नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) आणि भारतीय पुरावा कायदा (IEA) या कायद्यांच्या जागी आता नवीन कायदे असतील. चला तर मग जाणून घेऊया नवीन कायद्यात नेमके काय बदल करण्यात आले आहेत?

New Criminal Law: नवीन गुन्हेगारी कायद्याचे उद्दिष्ट

21 डिसेंबर 2023 रोजी तीन नवीन कायद्यांना संसदेची मंजुरी मिळाली. 25 डिसेंबर 2023 रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन कायद्यांना संमती दिली. समकालीन काळ आणि प्रचलित तंत्रज्ञानाला अनुसरून तीन नवीन फौजदारी कायद्यांमध्ये अनेक नवीन तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे.

अधिसूचनेनुसार हे तिन्ही नवीन कायदे (New Criminal Law) शिक्षेऐवजी न्यायावर भर देतील. सर्व मार्गाने जलद न्याय प्रदान करणे, न्यायिक आणि न्यायालयीन व्यवस्थापन प्रणाली मजबूत करणे, सर्वांना न्याय मिळणे यावर जोर देणे हे नवीन कायद्यांचे उद्दिष्ट आहे.

29 जून रोजी तीन नवीन कायद्यांबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की भारतीय न्यायव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारे ब्रिटिश काळातील तीन कायदे जलद न्याय देण्याच्या संकल्पनेवर बदलण्यात आले आहेत.

New Criminal Law
Image Source: Pexels

New Criminal Law: नवीन कायद्यांचे नावे

कायद्याचे जुने नावकायद्याचे नवीन नाव
भारतीय दंड संहिता 1860 (IPC)भारतीय न्याय संहिता 2023 (BNS)
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (CrPC)भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 (BNSS)
भारतीय पुरावा कायदा 1872 (IEA)भारतीय साक्ष अधिनियम 2023 (BSA)

New Criminal Law: महत्वपूर्ण बदल

  • भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत 531 विभाग असतील. याआधी फौजदारी प्रक्रिया संहितेत 484 विभाग होते.
  • नवीन विधेयकात एकूण 177 तरतुदी बदलण्यात आल्या असून त्यात नवनवीन कलमे तसेच 39 नवीन उपविभाग जोडण्यात आले आहेत.
  • भारतीय न्याय संहितामध्ये 357 कलम असतील. या आधी भारतीय दंड संहितेमध्ये (IPC) 511 कलम होते.
  • 35 विभागांमध्ये टाईम लाईन जोडण्यात आली आहे आणि 35 ठिकाणी ऑडिओ व्हिडिओ तरतूद जोडण्यात आली आहे.
  • संहितेत एकूण 14 कलमे रद्द करून काढण्यात आली आहेत.
  • भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या 35 विभागांमध्ये टाइमलाइन जोडण्यात आली आहे ज्यामुळे न्याय जलद वितरण शक्य होईल.
  • नवीन विधेयकात फौजदारी कारवाई, अटक, तपास, आरोपपत्र, दंडाधिकार्‍यांसमोर कार्यवाही, संज्ञापन, आरोप, सहाय्यक सरकारी वकिलांची नियुक्ती, खटला, जामीन, निकाल, शिक्षा आणि दया याचिका यासाठी कालमर्यादा निर्धारित केलेली आहे.
  • भारतीय साक्ष अधिनियम मध्ये 170 तरतुदी असतील. या आधीच्या भारतीय पुरावा कायद्यामध्ये 167 कलम होती. नव्या भारतीय साक्ष अधिनियम कायद्यामध्ये सहा कलम रद्द करण्यात आली असून दोन नवीन कलम आणि सहा उपकलम जोडण्यात आले आहेत.
  • साक्षीदारांच्या संरक्षणाची तरतूद या नवीन कायद्यामध्ये आहे. कागदपत्रांप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक पुरावे ही न्यायालयात वैध असतील. ई-मेल, मोबाईल फोन, इंटरनेट, इत्यादी द्वारे मिळालेल्या पुराव्यांना वैध मानले जाईल.
  • नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या संपूर्ण अंमलबजावणीमुळे तारीख पे तारीख युग संपुष्टात येईल.
  • एफ आय आर नोंदवल्यानंतर 90 दिवसांच्या आत मध्ये आरोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाला 60 दिवसांच्या आत आरोप निश्चित करावे लागतील.
  • नवीन गुन्हेगारी कायद्याच्या (New Criminal Law) तरतुदीनुसार कोणत्याही गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त शिक्षा भोगलेला कैद्यांना खाजगी जात उचलक्यावर सोडण्याची तरतूद आहे.
  • एखादा गुन्हा घडल्यानंतर व्यक्ती कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये झिरो एफ आय आर दाखल करू शकते. पंधरा दिवसांच्या आत गुन्हा घडलेल्या क्षेत्रांमध्ये एफ आय आर पाठवावी लागेल.
  • एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतलेले असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ऑनलाइन, ऑफलाइन आणि लेखी स्वरूपात माहिती द्यावी लागेल.
  • 2027 पूर्वी देशातील सर्व न्यायालय संगणकीकृत होतील.
  • महिला आणि लहान मुलांची संबंधित प्रकरणी कलम 63 ते कलम 99 पर्यंत ठेवण्यात आली आहेत.
  • बलात्काराच्या प्रकरणासाठी कलम 63 असणार असून दुष्कृत्यासाठी कलम 64, सामूहिक बलात्कार प्रकरणासाठी कलम 70, तर लैंगिक छळ प्रकरणासाठी कलम 74 अंतर्गत शिक्षा ठोठावण्यात येईल.
  • अल्पवयीन मुलीवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार प्रकरणात मृत्य दंडाची शिक्षा होऊ शकते.

New Criminal Law
Image Source: X(Twitter)

शैक्षणिक, धार्मिक, नोकरी, इतर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी येथे क्लिक करा.

New Criminal Law 2024: नवीन कलमांची चेकलिस्ट

भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तिन्ही कायद्यांमद्धे (New Criminal Law) विविध कलमे असून त्यांचा शिक्षेचा कालावधी, शिक्षेचा प्रकार हा वेगवेगळा आहे.

भारतीय साक्ष अधिनियम 2023 या कायद्यामधील 07 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असणारे कलमांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.

अ.नं.  गुन्ह्यांचे स्वरूप नवीन कलमे जुनी कलमे
1खुनाबद्दल शिक्षा103(1)302
2हुंडाबळी80(2)304(B)
3अपराध करण्यासाठी एखाद्या बालकाला भाड्याने घेणे कामावर ठेवणे किंवा त्यात गुंतवणे95तरतूद नाही
4खून करण्यासाठी किंवा खंडणी इत्यादी मागण्यासाठी अपनयन/अपहरण करणे140(4)367
5आत्महत्येला अपप्रेरणा देणे108306
65 किंवा अधिक व्यक्ती एकत्रितपणे वंश जात जमात लिंग जन्माचे ठिकाण भाषा वैयक्तिक विश्वास किंवा इतर कोणत्याही तत्सम कारणास्तव खून करीन (Mob Lynching)189(5)151
7खुनाचा प्रयत्न करणे109(1)307
8सदोष मनुष्य वध करण्याचा प्रयत्न करणे110308
9जबरी चोरी309(4)392
10जबरी चोरी करताना किंवा करण्याच्या प्रयत्न इच्छापूर्वक दुखापत करणे309(6)394
11दरोडा310(2)395
12खुनासह दरोडा310(3)396
13ठकवणूक (फसवणूक)318(4)420
14मूल्यवान रोखा मृत्युपत्रे इत्यादी बनावटीकरण338467
15संघटित गुन्हेगारी सदस्य असणे111(4)तरतूद नाही
16एखाद्या पुरुषाने कायदेशीर विवाह झाल्याचा समज लबाडीने निर्माण करून दांपत्य भावाने सहवास घडवून आणणे81493
17स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भपात घडवून आणणे89313
18बालकास किंवा मनोविकल इसमास आत्महत्या करण्याकरिता चिथावणी देणे107305
19खून या सदरात न मोडणाऱ्या सदोष मनुष्यावधाबद्दल शिक्षा105304
200 ते 16 वर्षाखालील स्त्रीवरील बलात्कारासाठी शिक्षा65(2)376(AB)
21लग्नाची खोटे वचन किंवा इतर फसवे मार्ग (नोकरीचे /पदोन्नतीचे / प्रलोक्षण /ओळख लपवून इत्यादी मार्गाचा वापर करून लैंगिक समागम करणे.)69तरतूद नाही
22अठरा वर्षाखालील एखाद्या मुलीवर सामूहिक बलात्कार70(2)376(DA)
23पती किंवा पत्नी हयात असतानाच्या काळात पूर्वीच्या विवाहाची वस्तुस्थिती लपून पुनर्विवाह करणे82(2)495
24विवाह इत्यादीची सक्ती करण्यासाठी एखाद्या स्त्रीचे अपनयन किंवा अपहरण करणे87366
25अज्ञात बालक अनैतिक कृत्यासाठी मिळवणे96366(A)
26खंडणी वगैरे करिता चोरून नेणे140(2)363(A)
27फारकतीच्या कालावधीमध्ये पतीने पत्नीशी लैंगिक समागम करणे67376(B)
28स्त्रीला विवस्त्र करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे  76354(B)    
29चोरून अश्लील चित्रण करणे77354(C)
30स्त्रीचा छुपा पाठलाग78354(D)
31स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव किंवा कृती करणे79509
32पालकाने किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीने बारा वर्षाखालील बालकाला उघड्यावर टाकणे आणि त्याग करणे93317
33ॲसिड इत्यादी वापर करून इच्छापूर्वक जबर दुखापत करणे124(1)326(A)
34नोंदणीकृत डॉक्टरांनी निष्काळजीपणाने /हयगयीने /हलगर्जी पणाने मृत्यू घडविणे106(1)तरतूद नव्हती
35दंगा करणे191(1)146
36प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे191(3)148
37दंगा घडवून आणण्याचे उद्देशाने बेछुटपणे प्रक्षोभन भाषण करणे192153
38राष्ट्रीय एकात्मतेस बाधक असे आरोप/निवेदने करणे 197153(B)
39राहते घर किंवा वाहतुकीची साधने किंवा उपासना स्थळ इत्यादी मधील चोरी305380
40निष्काळजीपणाने/हयगयीने/हलगर्जीपणाने मृत्यू घडविणे (अपघात घडविणाऱ्या व्यक्तीने पोलीस ठाणे अथवा न्यायालयात माहिती देणे बंधनकारक आहे व तशी माहिती न दिल्यास शिक्षा)  106(2)तरतूद नव्हती
41सार्वजनिक रस्त्यावर बेदरकार वाहन हाकणे किंवा सवारी करणे281279
42मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार314403
43चोरी303(2)379

हेही वाचा: झिका व्हायरस म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

निष्कर्ष

भारतीय न्याय संहिता 2023 (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 (BNSS) आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 (BSA) या नवीन 03 कायद्यांचे (New Criminal Law) प्रमुख उदिष्ट हे सर्व मार्गाने जलद न्याय प्रदान करणे, न्यायिक आणि न्यायालयीन व्यवस्थापन प्रणाली मजबूत करणे, सर्वांना न्याय मिळणे असल्याने हे तिन्ही नवीन कायदे शिक्षेऐवजी न्यायावर भर देतील.

हेही वाचा: असे काढा घरबसल्या डोमसाइल सर्टिफिकेट.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) भारतीय दंड संहिता 1860 (IPC) या कायद्याचे नवीन नाव काय?

भारतीय न्याय संहिता 2023 (BNS).

2) फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (CrPC) या कायद्याचे नवीन नाव काय?

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 (BNSS).

3) भारतीय पुरावा कायदा 1872 (IEA) या कायद्याचे नवीन नाव काय?

भारतीय साक्ष अधिनियम 2023 (BSA).

माहिती पुढे शेअर करा.

Leave a comment