Pashupatinath Vrat: श्री प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा वाचनामुळे भारतातल्या असंख्य लोकाना शिवभक्तीचे वेड लागले असून महादेवाच्या मंदिरात प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध शिवभक्त शिवमंदिरात जाताना दिसत आहेत.
पशुपतिनाथ व्रत महादेवाला अत्यंत प्रिय आहे. या व्रताबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या व्रताचा महिमा फार मोठा आहे. शास्त्रानुसार पशुपतिनाथ व्रत केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. हे व्रत केल्याने जीवनातील सर्वात मोठ्या समस्या दूर होतात. पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा वाचन दरम्यान ते भाविकांनी पाठवलेले पत्र नेहमी वाचत असतात. प्राप्त झालेल्या शेकडो पत्रांमध्ये पशुपतिनाथ व्रतामुळे झालेले चमत्कारिक फायदे भाविक सांगत असतात.
पशुपतिनाथ व्रताची माहिती
प्रसिद्ध शिवमहापुराण कथा वाचक श्री प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले पशुपतिनाथ व्रत (Pashupatinath Vrat)कसे करावे हे आपण जाणून घेऊया. पशुपतिनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत. तुम्ही जर हे व्रत मनापासून व श्रद्धेने केले तर तुम्हाला व्रताचे फळ नक्की मिळते. ह्या व्रतामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात तसेच गंभीर आजारापासून सुटका मिळू शकते. तुम्हाला जर व्रत करायचे असेल तर व्रत करण्याचा योग्य मार्ग जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
(Pashupatinath Vrat)पशुपतिनाथ व्रत करण्यासाठी लागणारे साहित्य:
पूजेचे ताट, कुंकू, अष्टगंध, लाल चंदन,पिवळे चंदन, अक्षदा, बेलाची पाने, धोत्र्याचे फुल, तांब्याचा तांबा, अगरबत्ती, शुद्ध पाणी, दूध, नारळ, कापूर आणि दिवा.
(Pashupatinath Vrat)पशुपतिनाथ व्रत कधीपासून सुरू करावे:
पशुपतिनाथ व्रत (Pashupatinath Vrat) करण्याकरिता कुठल्याही मुहूर्ताची गरज नाही. तुम्ही व्रत कुठल्याही महिन्यात कोणत्याही सोमवारी करू शकता.
पशुपतिनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी? संपूर्ण विधी:
सर्वप्रथम सोमवारी पहाटे ब्रह्म मुहूर्ता मध्ये अंघोळ करून पूजेचे ताट तयार करावे. पूजेच्या ताटामध्ये एखादे साहित्य कमी असले तरी हरकत नाही भगवंताला तुमची श्रद्धा व भाव महत्त्वाचा आहे.महादेवाच्या मंदिरात जाण्यापूर्वी असे मंदिर निवडावे की मंदिर तुमच्या घराच्या जवळ असेल, मंदिरात व्रताची पूजा करण्यासाठी मनाई नसेल आणि लक्षात ठेवा पाचही सोमवार तुम्हाला त्याच मंदिरात जायचे आहे.
मंदिरात गेल्यानंतर प्रथम शिवलिंगाला नमस्कार करायचा आहे, तुमच्या उपवासाचा संकल्प करायचा आहे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ नसेल तर स्वच्छ करून घेणे. शिवलिंगाचा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा व अभिषेक केलेले थोडेसे जल एका वाटीमध्ये घ्यावे. पूजा करताना कोणतीही घाई करू नये, मंदिरात इतर भाविक असतील, गर्दी असेल तर कोणाशी वाद घालू नये.
शिवलिंगाला सोबत आणलेले गुलाल किंवा कुंकू, अष्टगंध, लाल चंदन, पिवळे चंदन व्यवस्थित लावावे. पूजा करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शिवलिंगावर बेलाची पाने, धोत्र्याचे फुल किंवा अन्य दुसरी फुले अर्पण करावी त्यानंतर शिवलिंगावर अक्षदा टाकाव्यात व पुजा झाल्यानंतर घरी जाऊन पूजेचा ताट देवघराजवळ झाकून ठेवावा.
पशुपतिनाथ व्रताची (Pashupatinath Vrat) सायंकाळची पूजा कशी करावी? संपूर्ण विधी:
सर्वप्रथम कनकीचे सहा दिवे बनवून घ्यावे आणि गोड नैवेद्य बनवून घ्यावा. सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात सायंकाळची पूजा करायची आहे. मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगाची पूजा केल्यावर सोबत आणलेले सहा कणकेचे दिवे समोर ठेवावे. सहा दिव्यांपैकी पाच दिवे प्रज्वलित करावे व उर्वरित राहिलेला एक दिवा तुमच्यासोबत ठेवावा. महादेवाला आणलेल्या गोड नैवेद्याचे तीन हिस्से करून देवासमोर ठेवावे व मनातील इच्छा महादेवाला सांगावी. त्यानंतर नैवेद्याची दोन हिस्से देवासमोरच राहू द्यावे आणि एक हिस्सा सोबत घरी घेऊन यावा.
घरी आल्यानंतर घरात येण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या दिशेला सोबत आणलेला दिवा प्रज्वलित करावा व त्यानंतर घरात प्रवेश करावा. उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद कोणालाही न देता स्वतः ग्रहण करावा व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता. अशाच पद्धतीने उर्वरित चारही सोमवारी पूजा करून घ्यावी.
पशुपतिनाथ व्रत (Pashupatinath Vrat) करण्याचे नियम:
- पाच सोमवार एकाच मंदिरात व्रत करावा.
- व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल अथवा बूट घालू नये.
- पशुपतिनाथ व्रत करताना जर सोमवारी एकादशी आली तर त्या सोमवारी व्रत करू नये. एक सोमवार जास्त करून व्रताचे पाच सोमवार पूर्ण करावे.
- सकाळी व सायंकाळी पूजेचे एकच ताट वापरावे.
- व्रत नवरा बायको जोडीने करत असतील जाते वेळेस दोघांचे पूजेचे ताट वेगवेगळे असावे.
- व्रत करताना महिलांना मासिक पाळी आली तर त्या सोमवारी व्रत करू नये. एक सोमवार जास्त करून व्रताचे पाच सोमवार पूर्ण करावे.
- सायंकाळच्या पूजेला कणकेचे दिवे तुपाचे असावेत.
- मनात कुठलेही वाईट विचार आणू नये.
- पूजा करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा.
पशुपतिनाथ व्रताचे उद्यापन कसे करावे?
व्रताचे उद्यापन हे पाचव्या सोमवारी करता येते. उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 40 मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर 40 मिनिटांनी करू शकतो.
उद्यापण करताना एक नारळ व अकरा रुपये किंवा 21 रुपये किंवा 51 रुपये अर्पण करावे. तसेच 108 बेल पान किंवा तांदूळ किंवा गहू अर्पण करावे व देवाला आपली मनोकामना सांगावी.
(Pashupatinath Vrat)व्रत कोणी करावे व कोणी करू नये?
हे व्रत पुरुष किंवा महिला दोघेही करू शकतात. जर महिला गर्भवती असेल किंवा एखादी व्यक्ती वयस्कर असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांनी हे व्रत करू नये.
व्रत करताना मनात येणारे काही स्वाभाविक प्रश्न :
व्रत करताना मांसाहार केला तर चालतो का?
हे व्रत करताना तुम्हाला संपूर्णपणे मांसाहार बंद करावा लागतो. (Pashupatinath Vrat) व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत मांसाहार बंद करावा व तसेच घरात देखील अन्य व्यक्तींनी मांसाहार बंद करावा.
घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालेल का?
(Pashupatinath Vrat) व्रत हे घरातील शिवलिंगाची पूजा करून करता येत नाही कारण मंदिरातील शिवलिंग हे स्थापित केलेले असते ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येत नाही याउलट घरातील महादेवाची पिंड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येते त्यामुळे हे व्रत घरी करता येत नाही.
घरी आणलेल्या दिव्याचे काय करावे?
मंदिरातून एक दिवा मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा आणि दिवा मावळल्यानंतर तो दिवा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडू शकता.
नैवेद्य हा गोड असावा की तिखट ?
व्रतासाठी जो नैवेद्य तुम्ही सोमवारी मंदिरात घेऊन जाणार आहात तो गोड असावा त्यात मीठ असू नये.
उद्यापनाच्या दिवशी एकादशी आली तर काय करावे?
उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी आली असेल तर त्या दिवशी पशुपतिनाथ व्रत करू नये व तुम्हाला उद्यापन देखील करता येणार नाही. पुढील सोमवारी व्रत करून उद्यापन करावे.
मंदिरात पाच दिवे कोठे लावावे?
मंदिरात घेऊन गेलेले सहा दिवे हे आपल्याला शिवलिंग समोर ठेवायचे असून त्यातील पाच दिवे प्रज्वलित करावे. दिवे हे ताटात ठेवून पूजा करू नये. आरती करण्याकरिता पूजेच्या ताटामध्ये एक स्वतंत्र दिवा न्यावा.
मंदिरात कोणत्या दिशेने चेहरा करून बसावे?
शिवलिंगावर जल अर्पण करताना चेहरा उत्तरेकडे असावा व पाठ ही दक्षिणेकडे असावी. जल अर्पण केल्यानंतर उर्वरित पूजा पूर्वेला किंवा पश्चिमेला बसून देखील करू शकता.
कुठली आरती म्हणावी ?
गणपतीची किंवा महादेवाची आरती म्हणू शकतात.
गणपती आरती YouTube वर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
शंकराची आरती YouTube वर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
निष्कर्ष:
पशुपतिनाथ व्रताचा महिमा हा अपार आहे. हे व्रत श्रद्धेने व मनोभावे केल्यास त्याचे योग्य फळ नक्की मिळते.
Frequently Asked Questions (FAQ) :
१. पशुपतिनाथ व्रत (Pashupatinath Vrat) का करतात ?
शिवमहापुराण कथेनुसार पशुपतिनाथ व्रत जर मनोभावाने, श्रद्धेने व विधी प्रमाणे केल्यास गंभीर आजार नष्ट होतात. रखडलेली कामे व मनातील इच्छा पूर्ण होतात.
२ . पशुपतिनाथ व्रत पुरुष करू शकतात का ?
होय.