Maharashtra Scholarship: इयत्ता ५ वी आणि ८ वी च्या विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. महाराष्ट्र राज्यपरीक्षा परिषदेने नुकतेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले आहे.
महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी इयत्ता ५ वी आणि ८ वी करीता शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. गुणवंत व मेरिट मध्ये येणाऱ्या अनेक विदर्थ्यांना शासनामार्फत अनेक प्रकारे मदत केली जाते. ०३ जुलै २०२३च्या शासन निर्णयाप्रमाणे शिष्यवृत्ती मध्ये भरीव वाढ करणायात आली आहे.
दि.१८ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) घेण्यात येणार आहे.
परीक्षेसाठी बसणाऱ्या विदयार्थ्यांनी आपल्या शाळेसोबत संपर्क साधून दिलेल्या वेळेत,सूचनांचे पालन करून परीक्षेसाठी उपस्थित रहावे.
इयत्ता ५ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप:
- इयत्ता ५ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षेचे एकूण 2 पेपर असतील. शिष्यवृत्ती परीक्षेचे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात.
- इयत्ता ५ वी साठी पेपर 1 मध्ये प्रथम भाषा व गणित या विषयांचा समावेश असतो. पेपर 2 मध्ये तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश असतो.
- इयत्ता ५ वी साठी पेपर 1 मध्ये प्रथम भाषेकरीता एकूण 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातील आणि गणित विषयासाठी एकूण 50 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातील. पेपर 1 साठी दोन्ही विषय मिळून एकूण 75 प्रश्न 150 गुणांसाठी विचारले जातील. प्रथम भाषा व गणित या दोन्ही विषयांसाठी एकूण 1 तास 30 मिनिटे वेळ मिळणार आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता५वी)
पेपर | विषय | प्रश्न संख्या | गुण | वेळ |
1 | प्रथम भाषा | 25 | 50 | 1 तास 30 मिनिटे |
गणित | 50 | 100 | ||
एकूण | 75 | 150 | ||
2 | तृतीय भाषा | 25 | 50 | 1 तास 30 मिनिटे |
बुद्धिमत्ता चाचणी | 50 | 100 | ||
एकूण | 75 | 150 |
प्रश्नांची काठिण्य पातळी:
1) सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30%
2) मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40%
3) कठीण स्वरूपाचे प्रश्न 40%
इयत्ता ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप:
- इयत्ता ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षेचे एकूण 2 पेपर असतील. शिष्यवृत्ती परीक्षेचे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतील.
- इयत्ता ८ वी साठी पेपर 1 मध्ये प्रथम भाषा व गणित या विषयांचा समावेश असतो. पेपर 2 मध्ये तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश असतो.
- इयत्ता ८ वी साठी पेपर 1 मध्ये प्रथम भाषेकरीता एकूण 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातील आणि गणित विषयासाठी एकूण 50 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातील. पेपर 1 साठी दोन्ही विषय मिळून एकूण 75 प्रश्न 150 गुणांसाठी विचारले जातील. प्रथम भाषा व गणित या दोन्ही विषयांसाठी एकूण 1 तास 30 मिनिटे वेळ मिळणार आहे.
- इयत्ता ८ वी साठी पेपर 2 मध्ये तृतीय भाषेकरीता एकूण 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातील आणि बुद्धिमत्ता चाचणी विषयासाठी एकूण 50 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातील. पेपर 2 साठी दोन्ही विषय मिळून एकूण 75 प्रश्न 150 गुणांसाठी विचारले जातील. तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या दोन्ही विषयांसाठी एकूण 1 तास 30 मिनिटे वेळ मिळणार आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)
पेपर | विषय | प्रश्न संख्या | गुण | वेळ |
1 | प्रथम भाषा | 25 | 50 | 1 तास 30 मिनिटे |
गणित | 50 | 100 | ||
एकूण | 75 | 150 | ||
2 | तृतीय भाषा | 25 | 50 | 1 तास 30 मिनिटे |
बुद्धिमत्ता चाचणी | 50 | 100 | ||
एकूण | 75 | 150 |
प्रश्नांची काठिण्य पातळी:
1) सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30%
2) मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40%
3) कठीण स्वरूपाचे प्रश्न 40%
Maharashtra Scholarship: पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता८ वी) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील, ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.शिष्यवृत्ती परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अशा डाउनलोड करा:
Maharashtra Scholarship: महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे मार्फत दरवर्षी इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सदर परीक्षेला लाखो विद्यार्थी बसत असून परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रश्नपत्रिका A, B, C आणि D अशा संचामध्ये विद्यार्थ्याना दिल्या जातात.- सर्वप्रथम फोन अथवा संगणकातील इंटरनेटचे ब्राऊजर उघडून त्यात सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे यांच्या वेबसाइटचे संकेतस्थळ टाईप करा.
- महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे यांच्या वेबसाइटचे संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे: www.mscepune.in
- Maharashtra Scholarship बद्दल सर्व प्रकारची माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Maharashtra Scholarship) 2024 च्या परीक्षार्थ्यांसाठी सूचना:
1) परीक्षार्थ्यांनी सकाळी दहा वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहावे.2) परीक्षार्थ्यांने प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर परीक्षा गृहात प्रवेश पत्रासह उपस्थित रहावे.3) उत्तरे नोंदविण्यास सुरुवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर आणि प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.4) परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपरच्या वेळी उत्तर पत्रिका आणि स्वाक्षरीपटावर विहित ठिकाणी स्वाक्षरी करावी.5) पेपर चालू असताना प्रश्नपत्रिका तील कोणत्याही प्रश्नाबाबत इतर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, केंद्र संचालक यांच्याशी चर्चा करू नये.6) कॅल्क्युलेटर, मोबाईल, पुस्तके, टॅब, पेजर व तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा गृहात आणण्यास सक्त मनाई आहे.7) उत्तरे नोंदविण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाहीच्या बॉलपेनचाच वापर करावा.8) परीक्षार्थ्याने पेपर संपल्यानंतर कार्बनलेस उत्तर पत्रिकेची मूळ प्रत पर्यवेक्षकाकडे जमा करावी तसेच उमेदवाराची प्रत व प्रश्नपत्रिका आपल्या सोबत घेऊन जावी.9) उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिका संच कोड अचूक नोंदवून त्याबाबतचे अचूक वर्तुळ रंगविणे आवश्यक आहे.10) उत्तर पत्रिका संगणकावर तपासली जाणार असल्याने ती फाटणार नाही अथवा चुरगळणार नाही याची दक्षता घ्यावी.11) उत्तर पत्रिका फाटल्यामुळे उत्तर पत्रिकेवर रंगवलेले पर्याय दिसत नसल्यास त्या प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत.पतंग का उडवितात? संपूर्ण माहिती येथे पहा.
Maharashtra Scholarship परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक येथे पहा.
फेब्रुवारी २०२३ च्या परीक्षा प्रश्नपत्रिका येथे पहा
जुलै २०२२ च्या परीक्षा प्रश्नपत्रिका येथे पहा