Republic Day 2024:प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिन यांच्यात नेमका फरक काय?

Republic Day 2024: १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन असो की २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात देशभक्तीमय व उत्साहाचे वातावरण असते कारण हे देशाचे राष्ट्रीय उत्सव आहेत. शाळेतील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना ह्या दोन दिवसांची प्रतीक्षा असते. या दोन्ही दिवशी देशभरात देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच प्रत्येक नागरिकाला भारतीय असल्याचा गर्व अनुभवायला मिळतो.

प्रजासत्ताक दिनी, देशाच्या विविध भागात ध्वजारोहण समारंभ आणि सशस्त्र दल आणि शाळकरी मुलांद्वारे परेड आयोजित केली जातात. यातील सर्वात भव्य आणि महत्त्वाची परेड नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे आयोजित केली जाते, जी देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि लष्करी पराक्रमाची बहुआयामी प्रतिमा दर्शवते.

देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. देशभक्तीची भावना आणि देशाप्रतीचे आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमापासून परेड पर्यंत अनेक गोष्टींचे आयोजन देशातील विविध भागात दिसते. संपूर्ण देश या दिवशी भक्तीमय झालेला असतो परंतु बऱ्याच लोकांना स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या मधला फरक माहित नसतो किंवा गोंधळ होत असतो. आज आपण जाणून घेऊया स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिना मध्ये काय फरक असतो.

Republic Day


महत्वाचे मुद्दे

स्वातंत्र्य दिन (Independence Day) आणि प्रजासत्ताक दिन (Republic Day) यांचा इतिहास:

१५  ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणून हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले. संविधान अमलात आल्यानंतर भारत एक सार्वभौम राष्ट्र बनला आणि याचा परिणाम असा झाला की इतर कोणत्याही देशाचे निर्णय आणि नियम पाळण्यास आपला भारत देश बांधील राहिला नाही. भारत हा प्रजासत्ताक देश  झाला. म्हणूनच २६ जानेवारी या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो.

India

ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातला फरक काय?(difference between flag hoisting and flag unfurling):

Flag hoisting ध्वजारोहण म्हणजे काय?

आपला राष्ट्रध्वज तिरंगा गौरवाचे प्रतीक आहे.१५ ऑगस्ट १९४७ पासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात.१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो जो ब्रिटिश राजवटी पासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे प्रतीक आहे.१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा डौलाने फडकवण्यात आला होता.

Indian Flag

स्वातंत्र्यदिनी तिरंगा खांबाच्या तळाशी बांधला जातो जो दोरीच्या साह्याने वर खेचून फडकवला जातो. ध्वजारोहण हे नवीन राष्ट्राच्या उदयाचे प्रतीक मानले जाते. हे भारताचा उदय आणि ब्रिटिश राजवटीचा अंत म्हणून देखील ओळखले जाते. म्हणून लक्षात असू द्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात.

PM Modi

Flag unfurling ध्वज फडकवण्याचा अर्थ काय?

२६ जानेवारी १९५० रोजी भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले आणि याच दिवशी प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी देशाचे राष्ट्रपती राजधानी दिल्लीत असलेल्या राजपथ वर तिरंगा फडकवतात. या दिवशी ध्वज खांबाच्या वरच्या बाजूला आधीच बांधलेला असतो जो दोरीच्या साह्याने खेचून राष्ट्रपती उघडतात. यालाच ध्वज फडकवणे असे म्हणतात. म्हणून लक्षात असू द्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर राष्ट्रपती ध्वज फडकवतात.

Celebration

जागेचा फरक

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण तर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवला जातो. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात तर राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावरून  तिरंगा फडकवतात.

प्रजासत्ताक दिनी कुठले कार्यक्रम होतात?

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी लष्कर, निमलष्करी दल आणि पोलीस दलाची परेड होते. सर्व राज्यांचे चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. लष्कर वायुदल आणि नौदल आपल्या शक्ती आणि संस्कृतीचे प्रदर्शन करतात.

celebration

प्रसिद्ध देशभक्तीपर गीते

१.ये देश है वीर जवानो का: सदर गीत हे १९५७ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट “नया दौर” मधील आहे.

२.मेरे देश की धरती सोना उगले: सदर गीत है १९६७ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट “उपकार” मधील आहे.

३.अब तुम्हारे हवाले वतन साथियो: सदर गीत हे १९६४ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट “हकीकत” मधील आहे.

४.ए मेरे वतन के लोगो:१९६२ च्या भारत चीन युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या आठवणीसाठी सदर गीत हे स्वर्गीय लता मंगेशकर यांनी २७ जानेवारी १९६३ रोजी दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले होते.

५. दिल दिया है जान भी देंगे: सदर गीत हे १९८६ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट “कर्मा” मधील आहे.

६.है प्रीत जहां की रीत सदा: सदर गीत हे हिंदी चित्रपट “पूरब और पश्चिम” मधील आहे.

७. मां तुझे सलाम: सदर गीत हे ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केले होते व गायले देखील होते.

तसेच या व्यतिरिक्त हिंदी चित्रपट बॉर्डर मधील संदेसे आते हैं, परदेस चित्रपटातील आय लव माय इंडिया, दिलजले चित्रपटातील  मेरा मुल्क मेरा देश, रंग दे बसंती, सुनो गौर से दुनियावालो, ऐसा देस है मेरा अनेक देशभक्तीपर गीते भारतीयांच्या मनात जागा करून आहेत.

हेही वाचा: कारसेवक म्हणजे काय?

निष्कर्ष:

१५  ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणून हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले. भारत हा प्रजासत्ताक देश झाला. म्हणूनच २६ जानेवारी या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो.

FAQ

१.भारत देश कधी स्वातंत्र्य झाला?

– १५ ऑगस्ट १९४७

२.प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो?

– २६ जानेवारी

३.भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

– पंडित जवाहरलाल नेहरू

४.भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

– डॉ. राजेंद्र प्रसाद

५.भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?

– सौ प्रतिभाताई पाटील

६.भारताची राष्ट्रभाषा कोणती?

– हिंदी

७.भारताची राजधानी कोणती?

– दिल्ली

८.आपले राष्ट्रीय सण कोणते?

– स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन

९.राष्ट्रध्वजातील निळा व केशरी रंग कशाचे प्रतीक आहे?

– समानता, त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे

१०.राष्ट्रध्वजातील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे?

– समृद्धीचे

११.राष्ट्रध्वजातील पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे?

– शांततेचे

१२.ध्वज अर्ध्यावर फडकवणे म्हणजे काय?

– शोक म्हणून ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. राष्ट्रपती उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांच्या निधनानंतर देशभरात ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. लोकसभेचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, आणि केंद्रीय मंत्री यांच्यासाठी नवी दिल्ली आणि त्यांच्या मूळ राज्यांमध्ये तो अर्धवट फडकवला जातो. राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या मृत्यूनंतर संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो.

१३.स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करतात?

– पंतप्रधान

१४.प्रजासत्ताक दिनी ध्वज कोण फडकवतात?

– राष्ट्रपती

१५.प्रजासत्ताक दिन परेड पास 2024 कसा मिळवायचा?

– तुम्ही ही तिकिटे निमंत्रण व्यवस्थापन प्रणाली किंवा संरक्षण मंत्रालयाच्या Amantran ऑनलाइन पोर्टलद्वारे ऑनलाइन मिळवू शकता. वैकल्पिकरित्या, नवी दिल्लीतील इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ट्रॅव्हल काउंटरसह विविध ठिकाणांहूनही तिकिटे ऑफलाइन उपलब्ध आहेत.

१६.प्रजासत्ताक दिन परेड 2024 ची वेळ काय आहे?

– प्रजासत्ताक दिनाची परेड 26 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता विजय चौक ते कर्तव्यपथ मार्गे निघणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सुमारे 77,000 लोकांची बसण्याची सोय असेल, त्यापैकी 42,000 लोकांसाठी राखीव आहेत.

१७.प्रजासत्ताक दिन 2024 बीटिंग रिट्रीट सोहळा कधी आहे?

– बीटिंग रिट्रीट सोहळा 29 जानेवारी (सोमवार) साठी सेट केला आहे, तिकिटांची किंमत प्रत्येकी 100 रुपये आहे. या कार्यक्रमासाठी 1,200 तिकिटांची मर्यादित उपलब्धता आहे. ज्यांना स्वारस्य आहे ते समर्पित पोर्टल http://www.aaamantran.mod.gov.in किंवा MSeva मोबाइल ॲपद्वारे तिकिटे खरेदी करू शकतात, जे Google Play Store वर उपलब्ध आहे.

माहिती आवडल्यास पुढे शेअर करा.

Leave a comment