West Bengal Sandeshkhali News | बहुचर्चित संदेशखळी प्रकरण काय आहे?

West Bengal Sandeshkhali News: पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी गावाची सर्वत्र खूप चर्चा सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून येथे प्रचंड गोंधळ सुरू आहे. संदेशखळीच्या अनेक महिलांनी स्थानिक टीएमसी नेत्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अखेर हे संपूर्ण प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.

West Bengal Sandeshkhali News | काय आहे नेमकं संदेशखळीचे प्रकरण?

West Bengal Sandeshkhali News: कोट्यवधी रुपयांच्या रेशन घोटाळ्याशी संबंधित तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या घरावर या वर्षी जानेवारी महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने छापा टाकला होता. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान शाहजहान शेखच्या समर्थकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना त्याच्या घरात जाण्यापासून रोखले आणि पथकातील सदस्यांनाही मारहाण करण्यात आली याचवेळी माध्यमांच्या ताफ्यावरही हल्ला झाला असे सांगण्यात आले. यानंतर संदेशखळी गावातील महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. शाहजहान शेख आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी जबरदस्तीने त्यांच्या जमिनीवर कब्जा केल्याचा महिलांचा आरोप आहे. तसेच तेथील महिलांचा लैंगिक छळही होत होता असा आरोप महिलानी केला.

West Bengal Sandeshkhali News
Image Source: Google

दरम्यान आरोप करताना महिला म्हणाल्या की तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतात, एखादी सुंदर स्त्री किंवा मुलगी असेल तर ते उचलून पक्ष कार्यालयात आणतात. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांचा येथे छळ सुरू होता. सदर घटनेनंतर शाहजहान शेख फरार झाला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की त्याचा अजूनदेखील संदेशखळी गावात दबदबा आहे. शाहजहान शेख फरार झाल्यामुळे महिलांवर होत असलेल्या छळाविरोधात आवाज उठवण्याची हिंमत त्यांना मिळाली, असे महिलांनी सांगितले.

या गुन्ह्यात केवळ शहाजहानच नाही तर त्याचे कथित साथीदार आणि तृणमूलचे इतर नेते यांचाही सहभाग असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. शहाजहान शेख आणि शिवप्रसाद हजारा यांना अटक करावी, अशी महिलांची मागणी आहे. महिला काठ्या, झाडू घेऊन आंदोलन करत आहेत.

West Bengal Sandeshkhali News

West Bengal Sandeshkhali News
West Bengal Sandeshkhali News- Image Cource: Google

महिलांनी तीन पोल्ट्री फार्मला आग लावून टाकली कारण महिलांचे म्हणणे आहे की गावकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने ताबा मिळवत पोल्ट्री फार्मचे बांधकाम करण्यात आले होते.

पश्चिम बंगालच्या विरोधी पक्षांनी शहाजहान शेख आणि त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. भाजपसह अन्य विरोधी पक्षाने तृणमूल काँग्रेसवर शाहजहान शेख आणि त्याच्या साथीदारांना संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत विरोधी पक्षांनी शाहजहान शेखला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आल्याचा दावा तृणमूलच्या नेत्यांनी केला आहे.

संदेशखळी गावातील महिलांचा विरोध पाहता राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी संदेशखळी येथे जाऊन संपूर्ण परिस्थिती पाहिली. सदर घटनेचा अहवाल राज्यपाल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला आहे.

West Bengal Sandeshkhali News

संदेशखळी प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, जे कोणी घटनेला जबाबदार होते त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून राज्य महिला आयोगाच्या पथकाने संदेशखळी येथे जाऊन महिलांशी चर्चा केली. राज्य प्रशासनाने तपासासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यीय पथक तयार केले आहे.

West Bengal Sandeshkhali News

हा आता एक राजकीय मुद्दा बनलेला असून भाजपाने या विषयाला खतपाणी घातल्याचा आणि हिंसा भडकवल्याचा आरोप, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तर राज्य सरकारने घटनास्थळी भेट देण्याची परवानगी नाकारल्याचा आरोप, विरोधकांनी केला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडबल्यु) अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सोमवारी सांगितले की, संदेशखाली येथील महिलांकडून आतापर्यंत १८ तक्रारी आल्या आहेत, यापैकी दोन तक्रारी बलात्काराच्या आहेत. १२ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आरोप केला की, टीएमसी कार्यकर्त्यांकडून खालच्या जातीतील हिंदू महिलांचा नियमित लैंगिक छळ केला जात आहे.

West Bengal Sandeshkhali News | कोण आहे शाहजहान शेख?

West Bengal Sandeshkhali News
West Bengal Sandeshkhali News- Image Source :Google

कथित रेशन घोटाळ्यात मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांना अटक झाली ज्योतिप्रिया मल्लिक यांचे उत्तर २४ परगणा भागात वर्चस्व होते आणि त्यांनीच संदेशखालीसाठी शेख शाहजहान तसेच मिनाखान इतर नेत्यांची नियुक्ती केली होती.

उत्तर 24 परगणा येथील संदेशखळी भागातील शाहजहान या TMC च्या नेत्यावर ED वर हल्ला, महिलांचा लैंगिक छळ आणि रेशन घोटाळ्यात सहभाग असे गंभीर आरोप आहेत. शाहजहान शेखवर महिलांचे सौंदर्य पाहून त्रास दिल्याचा आरोप आहे.

Shahjahan Sheikh- Image Source: Google

राज्यात टीएमसीचे सरकार येईपर्यंत ४२ वर्षीय शाहजहान शेख सीपीएमसोबत होते. एकेकाळी मजूर असलेल्या शाहजहान शेखने या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय प्रभावाची मदत घेतली. ते सुरुवातीला मत्स्यपालनाचे काम करत होते. उदरनिर्वाहासाठी त्यांनी काही काळ वीटभट्टीवर कामही केले.

पश्चिम बंगालमध्ये २४ उत्तर परगणा जिल्ह्यात संदेशखळी पडण्यावरून राजकारण तापले आहे, भाजप आणि टीएमसी या मुद्द्यावर आमने-सामने आले आहेत. संदेशखळीत कायदा व सुव्यवस्था संपुष्टात आली आहे व कार्यकर्त्यांचा छळ होत असल्याचा भाजपचा आरोप आहे.

हेही वाचा: बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांची की पालकांची?

अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या शाहजहान शेख यांची राजकीय कारकीर्द 2006 पासून चालू झाली. 2011 मध्ये, जेव्हा राज्यात सत्ता बदल झाली तेव्हाही शाहजहान डाव्यांच्या बाजूने होता. 2013 मध्ये शाहजहानने अमोल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून ते माजी मंत्री ज्योतिप्रियो मल्लिक यांच्या जवळचे झाले. 2019 मध्ये भाजप टीएमसीच्या संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची शाहजहान चे नाव जरी जोडले गेले असले तरीही हे केवळ आपली प्रतिमा खराब करण्यासाठी असल्याचे शाहजहानने म्हंटले होते.

West Bengal Sandeshkhali News

स्थानिक रहिवाशांच्या मते शाहजहान 2006 पासून विविध बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेला होता. परंतु त्याने नेहमी स्वतःला शक्तिशाली लोकांच्या जवळ ठेवले होते कोणीही त्याच्यावर आरोप करू शकत नव्हते.

TMC बद्दल थोडक्यात

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसतृणमूल काँग्रेस हा भारतातील राजकीय पक्ष असून प्रामुख्याने पश्चिम बंगाल राज्यात प्रभावशील आहे. ममता बॅनर्जी यांनी एक जानेवारी 1998 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून फुटलेला गट म्हणून त्याची स्थापना केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रसिद्धी मिळवली.2011 च्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने 34 वर्षांच्या प्रदीर्घ डाव्या आघाडीच्या शासनाचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला.

पश्चिम बंगाल हे भारताच्या पूर्व भागात स्थित एक राज्य आहे. नेपाळ, सिक्कीम, भूतान, आसाम, बांगलादेश, ओडिशा, झारखंड आणि बिहार हे त्याच्या शेजारी आहेत. एकूण 23 जिल्हे असलेल्या पश्चिम बंगाल राज्याची कोलकाता ही राजधानी आहे. मुख्य भाषा ही बंगाली आहे.

हेही वाचा: ‘पीएम सूर्य घर’ योजनेअंतर्गत दरमहा मिळणार 300 युनिट पर्यंत मोफत वीज.

संदेशखळीची कथा भाजपने लिहिली?

संदेशखळीची संपूर्ण घटना पूर्वनियोजित असून याची कथा भाजपने लिहिली आहे असे तृणमूल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोप केला. सत्तेच्या लालसेपोटी आणि आमच्या राज्याला बदनाम करण्यासाठी भाजपने असे केले आहे असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.  

1) तृणमूल काँग्रेस पक्षाच्या शेतकरी शाखेचे नाव काय?

 तृणमूल किसान खेत मजदूर काँग्रेस.

2) तृणमूल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत?

ममता बॅनर्जी.

3) पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण आहेत?

ममता बॅनर्जी.

4) पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

दक्षिण 24 परगणा हा पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा जिल्हा आहे.

5) पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता?

दक्षिण 24 परगणा हा पश्चिम बंगालमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

6) पश्चिम बंगालमधील सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे का प्रसिद्ध आहे.

पश्चिम बंगालमधील सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे रॉयल बंगाल टायगर साठी प्रसिद्ध आहे.

हेही वाचा: समान नागरी कायदा उत्तराखंडमध्ये लागू.

Leave a comment