AAI Recruitment 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 490 पदांसाठी भरती

AAI Recruitment 2024
AAI Recruitment 2024

AAI Recruitment 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने GATE 2024 परीक्षेच्या आधारे रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. सदर भरतीसाठी आर्किटेक्चर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतील विद्यार्थी पात्र असतील.

सामग्री सारणी

AAI Recruitment 2024 through GATE

पदाचे नावएकूण रिक्त पदे
कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर)03
कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी सिव्हिल )90
कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल)106
कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रॉनिक्स )278
कनिष्ठ कार्यकारी ( माहिती तंत्रज्ञान )13

AAI Recruitment 2024 वेतन श्रेणी:

भारतीय विमानतळ प्राधिकरण कनिष्ठ कार्यकारी 2024 वेतनमान E-1 स्तर आहे.

₹ 40,000 – 3% – ₹ 140000 /-

Airports Authority of India Recruitment 2024

वयोमर्यादा :

– उमेदवाराचे 01 मे 2024 रोजीचे कमाल वय 27 वर्षे असायला हवे.

– वय शिथिलता – SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे, PwBD साठी 10 वर्षे.

हेही वाचा : महाशिवरात्री का साजरी करतात?

AAI Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता:

कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर): BE/B.Tech अभियांत्रिकी पदवीधर आर्किटेक्चर आणि कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर मध्ये नोंदणीकृत.

कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी सिव्हिल): BE/B.Tech अभियांत्रिकी/ तंत्रज्ञानात पदवी.

कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल): BE/B.Tech अभियांत्रिकी/ तंत्रज्ञानात पदवी.

कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स): BE/B.Tech अभियांत्रिकी/ तंत्रज्ञानात पदवी.

कनिष्ठ कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान): BE/B.Tech अभियांत्रिकी/ तंत्रज्ञानात पदवी.

इतर पात्रता:

सर्व पात्र उमेदवारांकडे संबंधित शाखेतील GATE 2024 परीक्षेमध्ये वैध स्कोर असणे आवश्यक आहे.

AAI Recruitment 2024

AAI Recruitment 2024, कनिष्ठ कार्यकारी निवड प्रक्रिया:

– GATE 2024 परीक्षेच्या स्कोरच्या आधारे अर्ज पडताळणी

– मुलाखत

– कागदपत्रांची पडताळणी

AAI Recruitment 2024, कनिष्ठ कार्यकारी अर्ज शुल्क:

General/ OBC – ₹ 300/-

SC/ST/PWBD – फी नाही

पात्र उमेदवार अर्जाचे शुल्क इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड च्या द्वारे भरू शकतात.

AAI कनिष्ठ कार्यकारी भरती 2024 अर्ज कसा करावा:

– सर्व पात्र उमेदवार Airports Authority of India Recruitment 2024 साठी GATE 2024 द्वारे Airports Authority of India च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

– उमेदवारांनी सर्व माहिती दिलेल्या सूचनेनुसार प्रविष्ट करावी.

– उमेदवारांनी त्यांचा योग्य GATE-2024 चा नोंदणी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

– उमेदवारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य पद्धतीने अर्ज न चुकता भरावा.

AAI कनिष्ठ कार्यकारी भरती 2024 महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्राप्त करण्याची व उघडण्याची तारीख: 02/04/2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 01/05/2024

AAI कनिष्ठ कार्यकारी भरती 2024 महत्त्वाच्या लिंक्स:

अधिकृत अधिसूचनाPDF फाईल डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरा.

AAI Recruitment 2024 FAQ:

1. AAI चा फुल फॉर्म काय?

AAI चा फुल फॉर्म हा Airports Authority of India (भारतीय विमानतळ प्राधिकरण) आहे.

2. AAI ही सरकारी कंपनी आहे की खाजगी कंपनी?

AAI ही एक मिनीरत्न – श्रेणी – 1 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच Public Sector Enterprises कंपनी आहे.

3. AAI बद्दल थोडक्यात माहिती मिळू शकेल का?

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ची स्थापना संसदेच्या कायद्याद्वारे करण्यात आली आणि 1 एप्रिल 1995 रोजी पूर्वीचे राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण आणि भारतीय आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यांचे विलीनीकरण करून अस्तित्वात आले. विलीनीकरणामुळे देशातील जमिनीवर आणि हवाई क्षेत्रात नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे, अपग्रेड करणे, देखरेख करणे आणि व्यवस्थापित करणे ही जबाबदारी सोपविण्यात आलेली एकच संस्था अस्तित्वात आली.

AAI एकूण 137 विमानतळांचे व्यवस्थापन करते ज्यात 24 आंतरराष्ट्रीय विमानतळ (3 सिव्हिल एन्क्लेव्ह), 10 कस्टम विमानतळ (4 सिव्हिल एन्क्लेव्ह) आणि 103 देशांतर्गत विमानतळ (23 सिव्हिल एन्क्लेव्ह) समाविष्ट आहेत. AAI 2.8 दशलक्ष स्क्वेअर नॉटिकल मैल पेक्षा जास्त हवाई नेव्हिगेशन सेवा पुरवते. 2019-20 या वर्षात, AAI ने 1314.23 हजार [आंतरराष्ट्रीय 156.0 आणि देशांतर्गत 1158.23] विमानांची हालचाल हाताळली, प्रवाशांनी 159.59 दशलक्ष [आंतरराष्ट्रीय 22.26 आणि देशांतर्गत 137.33] आणि कार हाताळली. मेस्टिक 456.85]. पुढे, सर्व भारतीय विमानतळांनी एकत्रितपणे 2587.05 हजार [आंतरराष्ट्रीय 431.85 आणि देशांतर्गत 2155.20] विमानांची हालचाल हाताळली आहे, 341.05 दशलक्ष प्रवाशांनी हाताळली आहे [आंतरराष्ट्रीय 66.54 आणि देशांतर्गत 274.51] आणि 320 हजार 320 मेट्रिक टन कार हाताळल्या आहेत. देशांतर्गत 1325.51].

AAI ची कार्ये खालीलप्रमाणे आहेत:

-आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ आणि नागरी एन्क्लेव्हची रचना, विकास, संचालन आणि देखभाल.

-ICAO ने मान्य केल्याप्रमाणे, देशाच्या प्रादेशिक मर्यादेपलीकडे विस्तारलेल्या भारतीय हवाई क्षेत्राचे नियंत्रण आणि व्यवस्थापन.

-प्रवासी टर्मिनलचे बांधकाम, बदल आणि व्यवस्थापन.

-आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांवर कार्गो टर्मिनल्सचा विकास आणि व्यवस्थापन.

-विमानतळावरील प्रवासी टर्मिनल्सवर प्रवासी सुविधा आणि माहिती प्रणालीची तरतूद.

-ऑपरेशन क्षेत्राचा विस्तार आणि बळकटीकरण, उदा. धावपट्टी, ऍप्रन, टॅक्सीवे इ.

(माहिती स्त्रोत: भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या अधिकृत संकेतस्थळ)

हेही वाचा : SSC Recruitment 2024, स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती.

4. भारतात किती आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत?

2020 च्या प्रदर्शित माहितीनुसार भारतात एकूण 29 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.

5. Public Sector आणि Private Sector मध्ये नेमका काय फरक आहे?

Public Sector आणि Private Sector दोघांमधला मुख्य फरक हा आहे की सरकार Public Sector ची मालकी, नियंत्रण आणि व्यवस्थापन करते. Private Sector हे व्यक्ती, गट किंवा व्यावसायिक संस्थांच्या मालकीची, नियंत्रित आणि व्यवस्थापित केले जाते.

6. GATE चा फुल फॉर्म काय?

Graduate Aptitude Test in Engineering हा GATE चा फुल फॉर्म आहे.

7. GATE परीक्षा काय आहे?

ग्रॅज्युएट एपटीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग तथा GATE ही भारतातील नामांकित परीक्षा आहे. या परीक्षांमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी आणि विज्ञान विषयक ज्ञानाची चाचणी होते. या परीक्षेचा निकाल पदवीधर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकऱ्यांसाठी वापरला जातो.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही पहिली पब्लिक सेक्टर कंपनी होती जिने GATE परीक्षेचा वापर भरती प्रक्रियेसाठी सुरू केला होता.

8. GATE परीक्षा देण्याचे फायदे काय?

1) Phd/M. Tech/मे अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी GATE परीक्षा वापरले जाते.

2) BPCL, HPCL, IOCL, इत्यादी नामांकित पब्लिक सेक्टर कंपन्यांमध्ये GATE स्कोअरला खूप महत्त्व आहे.

3) DRDO, BARC, ISRO इत्यादी अनेक सरकारी संस्थांमध्ये प्रदान केलेल्या विविध फिलोशीप साठी अर्ज करण्याकरिता.

4) नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा इत्यादी नामांकित कंपन्यांनी भरती प्रक्रियेसाठी GATE स्कोअरला खूप महत्त्व दिले आहे.

9. भारतीय विमानतळ प्राधिकरण कनिष्ठ कार्यकारी या पदांच्या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा किती आहे?

उमेदवाराचे 1 मे 2024 रोजी ची कमाल वेळ 27 वर्षे असायला हवे.

10. भारतीय विमानतळ प्राधिकरण कनिष्ठ कार्यकारी या पदांची भरती GATE परीक्षेच्या स्कोअरवर  आधारित असेल का?

होय.

11. भारतीय विमानतळ प्राधिकरण कनिष्ठ कार्यकारी या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराने GATE परीक्षा देणे अनिवार्य आहे का?

होय.

12. भारतीय विमानतळ प्राधिकरण कनिष्ठ कार्यकारी या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 01/05/2024 आहे.

13. GATE परीक्षा व IIT JEE परीक्षेचा अभ्यासक्रम हा सारखा असतो का?

नाही. दोन्ही परीक्षा ह्या वेगवेगळ्या आहेत.

14. भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये कनिष्ठ कार्यकारीच्या किती पदांसाठी भरती केली जाणार आहे?

भारतीय विमानतळ प्राधिकरण 490 कनिष्ठ कार्यकारीच्या पदांसाठी भरती करणार आहे.

Leave a comment