
AI Technology: आजच्या अतिशय वेगवान अशा विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या डिजिटल युगात दिवसेंदिवस नवीन शोध लागत आहे. असेच एक नवीन तंत्रज्ञान जगभरात चर्चेचा विषय ठरलेले आहे आणि ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI).शिक्षण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये AI Technology चा वापर वाढला आहे. आज आपण अशाच तंत्रज्ञानाशी निगडित Google Bard आणी ChatGPT यांच्या बद्दल जाणून घेऊया.
सामग्री सारणी
ChatGPT म्हणजे काय?
ChatGPT हे OpenAI ने विकसित केलेले मशीन लर्निंग वर आधारित AI टूल आहे. सार्वजनिक उपलब्ध माहिती यामध्ये प्रविष्ट केलेली आहे. उपलब्ध माहिती म्हणजेच फेड डेटा नुसार कुठल्याही प्रश्नाचे उत्तर अगदी सहजरीत्या हे टूल देऊ शकते.यालाच चॅटबॉट असे देखील म्हणतात.
ChatGPT (Chat Generative Pretrained Transformer) हे GPT मॉडेल द्वारे सुरू झाले आहे. GPT मॉडेल्स त्यांना मिळालेल्या इनपुट च्या आधारे मानवासारखा मजकूर समजून घेण्यासाठी आणि तयार करण्यासाठी डिझाईन केलेले आहे.
ChatGPT विशेषतः संभाषणात्मक संदर्भांसाठी चांगले ट्यून केलेले आहे ज्यामुळे ते चॅटबॉट आणि आभासी मित्र तयार करण्यासाठी एक उत्कृष्ट साधन बनते. ChatGPT हे प्रामुख्याने इंटरनेटवरील टेक्स्ट डेटावर डिझाईन केलेले आहे. हे टूल फ्री आणि पेड फॉर्म मध्ये उपलब्ध आहे.

ChatGPT काय काम करतं?
ChatGPT हे तुम्हाला हव्या त्या प्रश्नांचे उत्तर अगदी सहजरीत्या देते. तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार एखादी कथा लिहायची असेल तर ChatGPT काही सेकंदात तुम्हाला कथा लिहून देईल. कविता, भाषण, निबंध असो किंवा शाळा, महाविद्यालय यांच्या अभ्यासक्रमातील कठीण गणिते असू दया ChatGPT तुम्हाला काही सेकंदात माहिती पुरवू शकते.
तुम्ही जर कुठल्या एखाद्या विषयावर संशोधन करत असाल हे टूल तुम्हाला संशोधनात माहिती पुरवण्यास देखील मदत करू शकते. म्हणूनच शिक्षण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, व्यवसाय व वैद्यकीय क्षेत्रात ChatGPT चा वापर प्रचंड प्रमाणात होताना दिसत आहे.
Gemini, Bard किंवा Google Bard म्हणजे काय?
Gemini म्हणजेच Google Bard हा संभाषणात्मक AI चॅटबॉट आहे जो वापर करताच्या सूचना समजून घेण्यासाठी आणि मजकूर प्रतिसाद देण्यासाठी मशीन लर्निंग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि जनरेटिव्ह एआय वापरतो.
बार्ड ला सुरवातीला Google LaMDA नावाच्या मोठ्या भाषा मॉडेल सह प्रशिक्षित केले गेले. जेव्हा वापर करते बार्ड शी संवाद साधतात तेव्हा गुगल त्यांची संभाषणे, स्थान आणि वापर मेट्रिक्स संकलित करते आणि प्रतिसादांसाठी पर्यायी प्रतिक्रिया मागवते.
AI Technology
गुगलच्या मते हा डेटा चॅटबॉटची अचूकता, उपयुक्तता सुधारण्यासाठी वापरला जातो. ह्या AI चॅटबॉटमध्ये 40 हून अधिक भाषांचा समावेश केला आहे. मराठी भाषेसह हिंदी, तामिळ, तेलुगु, गुजराती, कन्नड, इंग्रजी इतर भाषांसोबत Bard शी संवाद साधू शकता.

Gemini (Google Bard) काय काम करतं?
ChatGPT प्रमाणेच Gemini (Google Bard) हे वापरकर्त्यांच्या प्रश्नाला अचूक उत्तर देते. ChatGPT तुम्हाला समाविष्ट केलेल्या माहितीच्या आधारे उत्तर देते तर गुगलचे AI टूल Gemini (Bard) तुम्हाला वेबवर म्हणजेच इंटरनेटवर उपलब्ध नवीन माहितीनुसार प्रश्नांची उत्तम उत्तरे देऊ शकते. म्हणूनच Bard ने दिलेल्या उत्तरांची अचूकता ही ChatGPT पेक्षा अधिक आहे.
तुम्ही जे काही काम ChatGPT वर करू शकता ते सर्व काम तुम्ही Gemini म्हणजेच Google Bard वर देखील करू शकता. Google Bard हे ChatGPT च्या एक पाऊल पुढे आहे कारण ते चालू घडामोडी वर तुम्हाला माहिती देऊ शकते. ChatGPT च्या फ्री व्हर्जन मध्ये ही सुविधा नाही.
तुम्ही Bard ला एखादा सॉफ्टवेअरचा कोड पण लिहायला सांगू शकता किंवा एखाद्या कोड मध्ये असलेली चूक शोधायला सांगू शकता. युट्युब ची स्क्रिप्ट असो किंवा कोड, लेख, कविता, निबंध, शोधनिबंध अशी असंख्य माहिती Bard लिहू शकतो.

ChatGPT आणि Gemini (Google Bard) चे फायदे व तोटे:
ChatGPT व Gemini (Google Bard) हे AI टेक्नॉलॉजी वर चालणारे चॅटबॉट असून त्यांचे अनेक फायदे आणि आव्हाने देखील आहेत.
ChatGPT आणि Gemini चे फायदे:
१. ChatGPT व Gemini (Google Bard) हे 24 तास ग्राहक समर्थन पुरवते, वापरकर्त्यांचा अनुभव वाढवते आणि चौकशीचे त्वरित निराकरण करते.
२.ChatGPT व Gemini (Google Bard) हे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर देणे, कामाचा भार कमी करणे यांसारखी कामे स्वयंचलित करत असल्याने ते अधिक कार्यक्षम आहेत.
३.दोन्ही टूल ChatGPT व Gemini (Google Bard) अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याची आणि प्रशिक्षण देण्याची गरज कमी करते परिणामी खर्चात बचत होते. म्हणूनच औद्योगिक क्षेत्रात या दोन्ही टूलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे.
AI Technology
४.ChatGPT व Gemini (Google Bard) हे अनेक प्रश्न एकाच वेळी हाताळू शकते.
५.जगातील विविध भाषांमध्ये ChatGPT व Gemini (Google Bard) सोबत संवाद साधला जाऊ शकतो.
६.ChatGPT व Gemini (Google Bard) हे मजकूर निर्मितीच्या मुख्य वैशिष्ट्ये द्वारे वैशिष्ट्यकृत आहे बातम्या, लेख, पत्रे, ब्लॉग पोस्ट, निबंध, ई-मेल संदेश आणि सर्जनशील लेखन यासारख्या विविध शैली आणि स्वरूपांमध्ये मजकूर तयार करण्याची क्षमता आहे.
७.Gemini (Google Bard) मध्ये विविध प्रोग्रामिंग भाषांमध्ये कोड तयार करण्याची तसेच डिबगिंग करण्याची क्षमता आहे.
८.हल्ली आजारी रजा, सुट्टी साठी अर्ज व असे अनेक प्रकारचे इंग्रजी भाषेमधील अर्ज ChatGPT व Gemini (Google Bard) यांचेकडून काही सेकंदात लिहून घेतले जात आहेत.
ChatGPT आणि Gemini चे तोटे:
१.काही वेळा प्रश्नांचे संदर्भ न समजता असंदर्भित उत्तर दिले जाते.
२.प्रदान केलेल्या माहितीचा स्त्रोताचा संदर्भ मिळत नाही.
३.भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव.
४.संवेदनशील डेटा हाताळणे, गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या समस्या वाढवते.
५.ChatGPT व Gemini (Google Bard) यांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने मानवी संवाद कमी होऊ शकतो.
६.AI चॅटबॉट मुळे नोकरीचे विस्थापन आणि आर्थिक असमानता वाढू शकते.

ChatGPT व Gemini (Google Bard) कसे वापरावे?
असे वापरा ChatGPT:
ChatGPT हे वापरण्यास अगदी सोपे आहे त्यासाठी तुम्हाला प्रथम OpenAI वर खाते तयार करणे आवश्यक आहे.
१.प्रथम OpenAI वर साइन अप करा.
२.OpenAI वर खाते तयार करण्यासाठी खालील साईटला भेट द्या.
https://chat.openai.com/auth/login
३.ChatGPT वर खाते तयार करा.
४.तुम्ही OpenAI वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर खालील पेज दिसेल. साइन अप पर्यायावर क्लिक करा.

५.आपले खाते पडताळा.
६.तुम्ही ChatGPT साठी यशस्वीरित्या साइन अप केल्यानंतर पुढील पायरी म्हणजे तुमचे खाते सत्यापित करणे.
७.ChatGPT वापरा
८.तुम्ही ChatGPT वर यशस्वीरित्या खाते तयार केले आहे तुम्ही ते वापरण्यास सुरुवात करू शकता. तुम्हाला जे काही प्रश्न असतील किंवा एखादी माहिती जाणून घ्यायची असेल तर सर्च बॉक्स मध्ये तुमची क्वेरी टाईप करा.


असे वापरा Gemini (Google Bard):
१.Gemini वेबसाईटवर जा –
वेबसाइट- https://gemini.google.com
२.तुमच्या वैयक्तिक Google खात्याने साइन इन करा. त्यानंतर तुम्हाला Gemini मुख्यपृष्ठावर परत आणले जाईल.
३.Gemini ला प्रश्न विचारण्यासाठी तुमचा प्रॉम्ट मजकूर बॉक्समध्ये टाका.

निष्कर्ष:
AI Technology च्या वापरामुळे हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग आणि ग्राहक सेवा यासारख्या उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल होत आहे, ज्यामुळे कामगार आणि ग्राहक दोघांनाही उच्च दर्जाचे अनुभव मिळत आहे. ChatGPT आणि Google Bard या दोन्ही टुल्स चा वापर अगदी समजदारीने करणे अपेक्षित आहे.
AI Technology FAQ:
१.ChatGPT ला किती प्रश्न विचारू शकतो?
ChatGPT ला प्रश्न विचारण्यासाठी कुठलीही मर्यादा घातलेली नाही. तुम्हाला हवे तितके प्रश्न तुम्ही विचारू शकता.
२.ChatGPT कशासाठी वापरतात?
सामग्री तयार करणे,प्रश्नांची उत्तरे देणे, संभाषणांमध्ये गुंतणे आणि स्पष्टीकरण प्रदान करणे.
AI Technology
३.ChatGPT कोणाच्या मालकीची आहे?
Open AI
४.Gemini(Bard) कोणाच्या मालकीची आहे?
५.Gemini किंवा Google Bard हे एकच आहे का?
होय.