Best Engineering Colleges in Nashik for 2024: हे आहेत नाशिक मधील सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजेस

Best Engineering Colleges in Nashik for 2024: विद्यार्थी मित्रांनो 2024 साठी नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वोत्तम कॉलेज निवडण्याकरिता ह्या ब्लॉग मधील माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. नाशिक मध्ये 15 हून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस असून उज्ज्वल भविष्याच्या हिशोबाने कुठले इंजिनिअरिंग कॉलेज निवडावे याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला असतो. विविध माध्यमातून येणाऱ्या कॉलेजेसच्या आकर्षक जाहिराती विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतात. बऱ्याच वेळा असे दिसून येते की जाहिरातीत दिलेली माहिती संपूर्ण नसते. बरेच कॉलेजेस ॲडमिशनकरिता खोट्या जाहिराती देऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असतात. चला तर मग जाणून घेऊया नाशिक मधील सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजेस बद्दल (Best Engineering Colleges in Nashik for 2024).

Best Engineering Colleges in Nashik for 2024: 7 सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजेस

1) K. K. Wagh Institute of Engineering and Research

Best Engineering Colleges in Nashik for 2024
Best Engineering Colleges in Nashik for 2024

के. के. वाघ या नावाने प्रचलित असणारी नाशिकमधील ही शैक्षणिक संस्था सर्वात जुनी शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेची स्थापना 1984 मध्ये झाली होती. सर्व सोयींनी परिपूर्ण असा भव्य कॉलेज परिसर, दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज हे शैक्षणिक वर्ष 2022 पासून स्वायत्त (Autonomous) झालेले आहे. संस्था आता स्वतःचा अभ्यासक्रम, शैक्षणिक दिनदर्शिका, परीक्षा आयोजित करू शकते आणि निकाल जाहीर करू शकते. विद्यार्थ्यांना अंतिम पदवी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिली जाते. या संस्थेचे उद्दिष्ट असे आहे की, उद्योगासाठी एक मौल्यवान संपत्ती असू शकणारे आणि देशाच्या तांत्रिक आणि सामाजिक आर्थिक विकासात योगदान देऊ शकणारे अभियंते (इंजिनीअर्स)  निर्माण करणे.

स्थापना वर्ष    1984
कॉलेज प्रकार  खाजगी स्वायत्त
अभ्यासक्रमComputer Engineering Electronics and Telecommunication Civil Engineering Mechanical Engineering Electrical Engineering Chemical Engineering Information Technology Robotics & Automation Engineering Artificial Intelligence & Data Science Computer Science & Design
कॅम्पस प्लेसमेंटची सोयउपलब्ध
कॅम्पस प्लेसमेंटची आकडेवारी2021-22 च्या उपलब्ध माहितीनुसार 740 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली होती
प्रमुख वैशिष्ट्ये1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा, क्रीडा सुविधा, इनोव्हेशन सेंटर, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ट निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे “A” ग्रेडसह मान्यताप्राप्त 4) NBA द्वारे 7 अभ्यासक्रमांना मान्यता
पत्तामुंबई आग्रा रोड, पंचवटी, नाशिक.
फोन                0253-2512876, 0253-2512867
इमेल               kkwieer@kkwagh.edu.in
kkwe_office@dataone.in
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

2) Sanjivani College of Engineering, Kopargaon.

टीप: हे इंजिनिअरिंग कॉलेज अहमदनगर जिल्ह्यातील असले तरी नाशिक पासून 90 किलोमीटर अंतरावर आहे.

Best Engineering Colleges in Nashik for 2024
Best Engineering Colleges in Nashik for 2024

संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज हे कोपरगांव, अहमदनगर जिल्ह्यातील असून नाशिक पासून फक्त 90 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. कॉलेजच्या गुणवत्तेमुळे आम्ही आमच्या यादीत या कॉलेजला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान दिले आहे. संस्थेची स्थापना 1983 मध्ये झाली होती. देशातील प्रमुख स्वायत्त संस्थांपैकी एक असलेली संस्था म्हणून संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्रसिद्ध आहे. सर्व सोयींनी परिपूर्ण असा भव्य कॉलेज परिसर, दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही एक स्वायत्त संस्था ( Autonomous) असल्यामुळे स्वतःचा अभ्यासक्रम, शैक्षणिक दिनदर्शिका, परीक्षा आयोजित करू शकते आणि निकाल जाहीर करू शकते. दर्जेदार शिक्षणाद्वारे जागतिक दर्जाचे व्यावसायिक विकसित करणे ही संस्थेचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. त्यामुळेच Best Engineering Colleges in Nashik for 2024 च्या यादीत आम्ही या कॉलेजला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देत आहोत.

स्थापना वर्ष    1983
कॉलेज प्रकार  खाजगी स्वायत्त
अभ्यासक्रमComputer Engineering Electronics & Computer Engineering Electrical Engineering Information Technology Mechanical Engineering Structural Engineering Mechatronics Engineering
कॅम्पस प्लेसमेंटची सोयउपलब्ध
कॅम्पस प्लेसमेंटची आकडेवारी1) 2023-24 साठी 304+ (प्लेसमेंट चालू आहे) 2) 2022-23 च्या उपलब्ध माहितीनुसार 758 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली होती.
प्रमुख वैशिष्ट्ये1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा, क्रीडा सुविधा, इनोव्हेशन सेंटर, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ट निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे “A” ग्रेडसह मान्यताप्राप्त 4) NBA द्वारे मान्यताप्राप्त
पत्तातालुका कोपरगांव, जिल्हा अहमदनगर.
फोन               9130191301
इमेल               principalcoe@sanjivani.org.in
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

3) MET Institute of Engineering

Best Engineering Colleges in Nashik for 2024
Best Engineering Colleges in Nashik for 2024

MET किंवा भुजबळ नॉलेज सीटी या नावाने ही संस्था नाशिकमध्ये प्रसिद्ध असून, संस्थेची स्थापना 2006 मध्ये झाली होती. निसर्गरम्य असा भव्य कॉलेज परिसर, दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज आमच्या Best Engineering Colleges in Nashik for 2024 च्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

MET इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ही नाशिकमधील विद्यार्थ्यांचे आकर्षण असलेल्या संस्थेपैकी एक प्रमुख संस्था असून ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.

स्थापना वर्ष    2006
कॉलेज प्रकार  खाजगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न
अभ्यासक्रमComputer Engineering Electronics and Telecommunication Electrical Engineering Information Technology Mechanical Engineering Civil Engineering Artificial Intelligence & Data Science
कॅम्पस प्लेसमेंटची सोयउपलब्ध
प्रमुख वैशिष्ट्ये1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा, क्रीडा सुविधा, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ट निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे “A++” ग्रेडसह मान्यताप्राप्त 4) NBA द्वारे मान्यताप्राप्त
पत्ताआडगाव, नाशिक
फोन               0253-2303611
इमेल               enquiries@bkc.met.edu
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

हेही वाचा: MHT CET आणि JEE या परीक्षांमध्ये काय फरक आहे?

4) SNJB’s Late Sau. Kantabai Bhavarlalji Jain College of Engineering

Best Engineering Colleges in Nashik for 2024
Best Engineering Colleges in Nashik for 2024

SNJB या नावाने ही संस्था नाशिकमध्ये प्रसिद्ध असून, संस्थेची स्थापना 2004 मध्ये झाली होती. निसर्गरम्य असा भव्य कॉलेज परिसर, दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज आमच्या Best Engineering Colleges in Nashik for 2024 च्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

नाशिकपासून 65 किमी अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात चांदवड येथे असलेली ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.

स्थापना वर्ष    2004
कॉलेज प्रकार  खाजगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न
अभ्यासक्रमComputer Engineering Electronics and Telecommunication Mechanical Engineering Civil Engineering Artificial Intelligence & Data Science
कॅम्पस प्लेसमेंटची सोयउपलब्ध
प्रमुख वैशिष्ट्ये1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा, क्रीडा सुविधा, वाय फाय, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ट निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे “A+” ग्रेडसह मान्यताप्राप्त
पत्ताचांदवड, नाशिक
फोन               02556-253750
इमेल               principalcoe@snjb.org
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

5) Karmaveer Adv. Baburao Ganpatrao Thakare College of Engineering

Best Engineering Colleges in Nashik for 2024
Best Engineering Colleges in Nashik for 2024

KBTCOE या नावाने ही संस्था नाशिकमध्ये प्रसिद्ध असून, संस्थेची स्थापना 1999 मध्ये झाली होती. नाशिक शहराच्या मध्यभागी असा भव्य कॉलेज परिसर, सुसज्ज प्रयोगशाळा, दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज आमच्या Best Engineering Colleges in Nashik for 2024 च्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. नाशिक सीबीएस पासून 2 किमी अंतरावर, 7.5 एकर क्षेत्रफळ असलेली ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.

स्थापना वर्ष    1999
कॉलेज प्रकार  खाजगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न
अभ्यासक्रमComputer Engineering Electronics and Telecommunication Mechanical Engineering Civil Engineering Instrumentation & Control Engineering Artificial Intelligence & Data Science
कॅम्पस प्लेसमेंटची सोयउपलब्ध
प्रमुख वैशिष्ट्ये1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा, क्रीडा सुविधा, वाय फाय, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ट निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे “A++” ग्रेडसह मान्यताप्राप्त 4) NBA द्वारे 5 अभ्यासक्रमांना मान्यता
पत्तागंगापूर रोड, नाशिक
फोन               0253-2571439, 0253-2582891  
इमेल               principal@kbtcoe.org
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

6) Matoshri College of Engineering & Research Centre

Best Engineering Colleges in Nashik for 2024
Best Engineering Colleges in Nashik for 2024

मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना 2008 मध्ये झाली होती. संस्थेचे मुख्य उदिष्ट समाजाचे जीवनमान उंचवण्यासाठी दर्जेदार तांत्रिक शिक्षण देणे हे आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर स्वायत्त होणार आहे. सर्वसोयीयुक्त कॉलेज परिसर, दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज आमच्या Best Engineering Colleges in Nashik for 2024 च्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

स्थापना वर्ष    2008  
कॉलेज प्रकार  खाजगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न. 2024-25 पासून स्वायत्त होणार.
अभ्यासक्रमComputer Engineering Electronics & Telecommunication Electronics & Computer Engineering Electrical Engineering Information Technology Mechanical Engineering Civil Engineering Artificial Intelligence & Data Science
कॅम्पस प्लेसमेंटची सोयउपलब्ध
प्रमुख वैशिष्ट्ये1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा, क्रीडा सुविधा, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ट निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे मान्यताप्राप्त 4) NBA द्वारे मान्यताप्राप्त
पत्ताएकलहरे, ओढा गावाजवळ, नाशिक
फोन               0253-2406600  
इमेल               info@matoshri.edu.in
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

7) Sandip Institute of Technology & Research Centre

Best Engineering Colleges in Nashik for 2024
Best Engineering Colleges in Nashik for 2024

संदीप इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर (SITRC) ची  स्थापना 2008 मध्ये झाली होती. संस्थेचे मुख्य उदिष्ट सखोल तांत्रिक शिक्षण देणे, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे. सौंदर्याने नटलेल्या आणि देखण्या इमारती, भव्य हिरवळ, दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज आमच्या Best Engineering Colleges in Nashik for 2024 च्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.

स्थापना वर्ष    2008 
कॉलेज प्रकार  खाजगी, स्वायत्त  
अभ्यासक्रमComputer Engineering Electronics & Telecommunication Automation & Robotics Electrical Engineering Information Technology Mechanical Engineering Civil Engineering Artificial Intelligence & Data Science
कॅम्पस प्लेसमेंटची सोयउपलब्ध
प्रमुख वैशिष्ट्ये1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा, क्रीडा सुविधा, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ट निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे मान्यताप्राप्त 4) NBA द्वारे मान्यताप्राप्त
पत्तात्र्यंबक रोड, नाशिक
फोन               18002332714
इमेल               info@sandipfoundation.org
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

Best Engineering Colleges in Nashik for 2024 Disclaimer: वरील कॉलेजेसची माहिती व क्रमवारी ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, मागील वर्षाचे निकाल, उपलब्ध सुविधा, कॅम्पस प्लेसमेंट, तज्ञ प्राध्यापक, इत्यादि अनेक महत्वाच्या बाबी तपासून बनविण्यात आली आहे.

  • विद्यार्थ्यानी प्रवेश घेण्यापूर्वी प्रत्यक्ष कॉलेजला भेट द्यावी.
  • सर्व माहिती तपासून घ्यावी.
  • नाशिकमध्ये अन्य देखील उत्कृष्ट कॉलेज असू शकतात, प्रत्यक्ष कॉलेजला भेट देऊन खात्री करावी. 

निष्कर्ष:

2024 साठी नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वोत्तम कॉलेज निवडण्याकरिता 1) K. K. Wagh Institute of Engineering and Research, 2) Sanjivani College of Engineering, 3) MET Institute of Engineering, 4) SNJB’s Late Sau. Kantabai Bhavarlalji Jain College of Engineering, 5) Karmaveer Adv. Baburao Ganpatrao Thakare College of Engineering, 6) Matoshri College of Engineering & Research Centre आणि 7) Sandip Institute of Technology & Research Centre यांची आम्ही निवड करीत आहोत.

हेही वाचा: महाराष्ट्रातील टॉप 7 इंजिनीअरिंग कॉलेज जेथे विद्यार्थ्याना मिळते लाखो, करोडोचे पॅकेज

FAQ:

1) भारतात इंजिनिअरिंग कॉलेजची रँकिंग कोण ठरवते?

नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF).

2) NIRF काय आहे?

नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) ला MHRD ने मंजूरी दिली आणि 29 सप्टेंबर 2015 रोजी माननीय मानव संसाधन विकास मंत्री यांनी लॉन्च केले. या आराखड्यात देशभरातील संस्थांची क्रमवारी लावण्याची पद्धत आहे. विविध विद्यापीठे आणि संस्थांच्या रँकिंगसाठी व्यापक मापदंड ओळखण्यासाठी MHRD द्वारे स्थापन केलेल्या कोअर कमिटीद्वारे प्राप्त झालेल्या एकूण शिफारशींमधून ही कार्यपद्धती घेण्यात आली आहे. पॅरामीटर्समध्ये “शिक्षण, शिक्षण आणि संसाधने,” “संशोधन आणि व्यावसायिक पद्धती,” “पदवी परिणाम,” “आउटरीच आणि सर्वसमावेशकता” आणि “परसेप्शन” यांचा समावेश होतो.

माहिती पुढे शेअर करा.

Leave a comment