Best Engineering Colleges in Pune for 2024: विद्यार्थी मित्रांनो 2024 साठी पुणे येथे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वोत्तम कॉलेज निवडण्याकरिता ह्या ब्लॉग मधील माहिती तुम्हाला उपयोगी पडेल.शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात शेकडो इंजिनियरिंग कॉलेज आहेत, काही अत्यंत जुनी तर काही एकदमच नवी. येथील शिक्षणाचा अप्रतिम दर्जा आणि नोकरीच्या संधी यांमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की, पुण्यातील कॉलेजला प्रवेश घ्यावा. परंतु उपलब्ध असलेल्या शेकडो कॉलेजमधून योग्य कॉलेज कसे निवडावे यासाठी विद्यार्थी व पालकांना मोठी कसरत करावी लागते.
बऱ्याच कॉलेजच्या इमारती तर भव्य असतात परंतु तेथे उत्कृष्ट शिक्षणाचा अभाव जाणवतो आणि परिणामी तेथे एडमिशन होत नाहीत. मग अश्या वेळी कॉलेज एडमिशन करण्यासाठी खोटे प्रलोभने विद्यार्थ्याना दाखवतात, खोट्या जाहिराती करतात आणि विद्यार्थी तेथेच फसतात. चला तर मग जाणून घेऊया पुण्यातील सर्वोत्तम इंजिनियरिंग कॉलेजेस बद्दल (Best Engineering Colleges in Pune for 2024).
सामग्री सारणी
Best Engineering Colleges in Pune for 2024: 5 सर्वोत्तम इंजिनियरिंग कॉलेजेस
1) COEP Technological University
![Best Engineering Colleges in Pune for 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/05/COEP.jpg)
कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे (COEP) टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हे महाराष्ट्र सरकारचे एकात्मक सार्वजनिक विद्यापीठ आहे. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, गिंडी आणि IIT रूरकी नंतर 1854 मध्ये स्थापित ही भारतातील 3री सर्वात जुनी संस्था आहे. हे कॉलेज COEP नावानेच प्रचलित आहे.
36 एकर मध्ये पसरलेला भव्य असा कॉलेज कॅम्पस, गुणवत्तापूर्वक दर्जेदार शिक्षण, मजबूत आणि व्यापक माजी विद्यार्थी नेटवर्क, उद्योगांचा पाठिंबा, उत्कृष्ठ निकाल आणि विश्वसनीय कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. इंजिनियरिंगला प्रवेश घेण्याकरिता कायम विद्यार्थ्यांची पहिली पसंत म्हणजे COEP.
23 जून 2022 रोजी, महाराष्ट्र सरकारने महाविद्यालयाचे स्वतंत्र तंत्रज्ञान विद्यापीठात रूपांतर करण्याबाबत अधिसूचना जारी केली. आमच्या Best Engineering Colleges in Pune for 2024 च्या यादीत COEP ह्या कॉलेजला आम्ही प्रथम क्रमांकाचे स्थान देत आहोत.
स्थापना वर्ष | 1954 |
कॉलेज प्रकार | स्वायत्त, महाराष्ट्र शासन तंत्रज्ञान विद्यापीठ |
अभ्यासक्रम | Computer Engineering Electronics and Telecommunication Civil Engineering Mechanical Engineering Electrical Engineering Robotics & Artificial Intelligence Instrumentation & Control Manufacturing Science & Engineering Metallurgy & Material Technology |
कॅम्पस प्लेसमेंटची सोय | उपलब्ध |
NIRF रँकिंग | 73 (2023-24 ची रँकिंग) |
प्रमुख वैशिष्ट्ये | 1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, क्रीडा सुविधा, इनोव्हेशन सेंटर, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ठ निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे मान्यताप्राप्त 4) NBA द्वारे मान्यताप्राप्त |
पत्ता | शिवाजी नगर, पुणे-411005 |
फोन | 020-255507000 |
इमेल | ao@coep.ac.in |
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
2) Defence Institute of Advanced Technology
![Best Engineering Colleges in Pune for 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/05/DIAT.jpg)
डीफेन्स इस्टीट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेकनॉलॉजी, DIAT म्हणून प्रसिद्ध आहे. 1952 मध्ये CME म्हणून अस्तित्वात आलेल्या ह्या कॉलेजचे नाव 1967 मध्ये IAT करण्यात आले होते. 2000 मध्ये संस्थेने Deemed विद्यापीठाचा दर्जा प्राप्त केला. 2006 पासून IAT चे नाव DIAT असे करण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षा आणि आत्मनिर्भरता बळकट करण्याच्या उद्देशाने प्रगत तंत्रज्ञानतील शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उत्कृष्ट केंद्र बनण्याचा दृष्टिकोण, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, सर्व सोयींनी परिपूर्ण असा भव्य कॉलेज परिसर, दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ठ निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
DIAT ही संरक्षण संशोधन आणि विकास विभाग, संरक्षण मंत्रालय आणि भारत सरकार अंतर्गत प्रमुख अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था आहे. भारताच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने DIAT ला श्रेणी ‘A’ Deemed विद्यापीठात ठेवले आहे. आमच्या Best Engineering Colleges in Pune for 2024 च्या यादीत DIAT ह्या कॉलेजला आम्ही दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देत आहोत.
स्थापना वर्ष | 1952 |
कॉलेज प्रकार | Deemed, संरक्षण मंत्रालय |
अभ्यासक्रम – MTech | Computer Science Engineering Electronics Engineering Aerospace Engineering Sensor Technology Mechanical Engineering Modeling & Simulation Materials Engineering Data Science Quantum Computing Technology Management School of Robotics Nano Science & Technology Cyber Security Renewable Energy Green Technology |
कॅम्पस प्लेसमेंटची सोय | उपलब्ध |
NIRF रँकिंग | 57 (2023-24 ची रँकिंग) |
प्रमुख वैशिष्ट्ये | 1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, क्रीडा सुविधा, इनोव्हेशन सेंटर, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ठ निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे मान्यताप्राप्त 4) NBA द्वारे मान्यताप्राप्त |
पत्ता | गिरीनगर, पुणे |
फोन | 020-24604410/24604411 |
इमेल | coa@diat.ac.in |
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
3) MIT World Peace University
![Best Engineering Colleges in Pune for 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/05/MIT.jpg)
MIT नावाने पुण्यातील ही संस्था भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. 1983 मध्ये संस्थेची स्थापना झाली असून सुरवातीला महाराष्ट्र इस्टीट्यूट ऑफ टेकनॉलॉजी (MIT) नावाने हे विद्यापीठ ओळखले जात होते. निसर्गरम्य असा भव्य विद्यापीठ परिसर, दर्जेदार शिक्षण, आत्याधुनिक प्रयोगशाळा, 1 लाखांहून अधिक जागतिक माजी विद्यार्थ्यांचे अप्रतिम नेटवर्क, उत्कृष्ठ निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज आमच्या Best Engineering Colleges in Pune for 2024 च्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
स्थापना वर्ष | 1983 |
कॉलेज प्रकार | खाजगी, स्वायत्त विद्यापीठ |
अभ्यासक्रम | 1.Bioengineering 2.Chemical Engineering 3.Civil Engineering (Smart Infrastructure & Construction) 4.Computer Science & Engineering 5.Computer Science & Engineering (Artificial Intelligence & Data Science) 6.Electrical & Computer Engineering 7.Electronics and Communication 8.Electronics and Communication (Artificial Intelligence & Machine Learning) 9.Computer Science & Engineering (Cyber Security & Forensics) 10.Material Science & Engineering 11.Mechanical Engineering 12.Mechanical Engineering (Robotics & Automation) 13.Petrolium Engineering 14.Civil Engineering |
कॅम्पस प्लेसमेंटची सोय | उपलब्ध |
प्रमुख वैशिष्ट्ये | 1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, क्रीडा सुविधा, इनोव्हेशन सेंटर, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ठ निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे मान्यताप्राप्त 4) NBA द्वारे मान्यताप्राप्त |
पत्ता | कोथरूड, पुणे |
फोन | 020-71177104/71177105 |
इमेल | admissions@mitwpu.edu.in |
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
हेही वाचा: महाराष्ट्रातील टॉप 7 इंजिनीअरिंग कॉलेज जेथे विद्यार्थ्याना मिळते लाखो, करोडोचे पॅकेज
4) Army Institute of Technology
![Best Engineering Colleges in Pune for 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/05/AIT-1024x384.jpg)
AIT या नावाने ही संस्था पुण्यामध्ये प्रसिद्ध असून, संस्थेची स्थापना 1994 मध्ये झाली होती. या संस्थेमध्ये फक्त लष्करी जवानांच्या मुलांनाच प्रवेश दिला जातो. AIT चे संचालन आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी द्वारे केले जाते आणि भारतीय सैन्य दलाचे प्रमुख हे तिच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष आहेत.
सर्व सोयीयुक्त असा कॉलेज परिसर, उत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज आमच्या Best Engineering Colleges in Pune for 2024 च्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
स्थापना वर्ष | 1994 |
कॉलेज प्रकार | खाजगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न |
अभ्यासक्रम | Computer Engineering Electronics and Telecommunication Mechanical Engineering Information Technology Automation & Robotics Engineering |
कॅम्पस प्लेसमेंटची सोय | उपलब्ध |
प्रमुख वैशिष्ट्ये | 1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, क्रीडा सुविधा, इनोव्हेशन सेंटर, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ठ निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे मान्यताप्राप्त 4) NBA द्वारे मान्यताप्राप्त |
पत्ता | आळंदी रोड, पुणे |
फोन | 7249250184/7249250185 |
इमेल | ait@aitpune.edu.in |
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
5) Vishwakarma Institute of Technology
![Best Engineering Colleges in Pune for 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/05/VIT.jpg)
VIT या नावाने ही संस्था पुण्यामध्ये प्रसिद्ध असून, संस्थेची स्थापना 1983 मध्ये झाली होती. ISO प्रमाणित भव्य कॉलेज परिसर, सुसज्ज प्रयोगशाळा, दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट यामुळे हे कॉलेज आमच्या Best Engineering Colleges in Pune for 2024 च्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
स्थापना वर्ष | 1999 |
कॉलेज प्रकार | खाजगी, स्वायत्त |
अभ्यासक्रम | 1.Chemical Engineering 2.Computer Engineering 3.Information Technology 4.Instrumentation & Control Engineering 5.Mechanical Engineering 6.Computer Sciences & Engineering (Artificial Intelligence) 7.Instrumentation & Control Engineering 8.Artificial Intelligence & Data Science 9.Computer Sciences & Engineering (Artificial Intelligence & Machine Learning) |
कॅम्पस प्लेसमेंटची सोय | उपलब्ध |
प्रमुख वैशिष्ट्ये | 1) वसतिगृहाची सुविधा, कॅम्पस सुविधा, आरोग्य सुविधा, क्रीडा सुविधा, इनोव्हेशन सेंटर, इत्यादी. 2) तज्ञ शिक्षक, उत्कृष्ठ निकालाची परंपरा 3) NAAC द्वारे मान्यताप्राप्त 4) NBA द्वारे मान्यताप्राप्त |
पत्ता | बिबवेवाडी, पुणे |
फोन | 7058432258/8793428634 |
इमेल | admissions@vit.edu. |
कॉलेज वेबसाईट व अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
Disclaimer: वरील कॉलेजेसची माहिती व क्रमवारी ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, मागील वर्षाचे निकाल, उपलब्ध सुविधा, कॅम्पस प्लेसमेंट, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, इत्यादि अनेक महत्वाच्या बाबी तपासून बनविण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यानी प्रवेश घेण्यापूर्वी प्रत्यक्ष कॉलेजला भेट द्यावी.
- सर्व माहिती तपासून घ्यावी.
- पुण्यामध्ये अन्य देखील उत्कृष्ट कॉलेज आहेत, प्रत्यक्ष कॉलेजला भेट देऊन खात्री करावी.
निष्कर्ष:
पुण्यामध्ये शेकडो इंजिनियरिंग कॉलेज आहेत आणि त्यातून उत्कृष्ट कॉलेजची निवड करणे देखील तितकेच अवघड वाटते. म्हणून आम्ही विविध बाबी तपासून पुण्यातील 5 सर्वोत्तम कॉलेजेसची यादी तयार केली ती विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल.
Best Engineering Colleges in Pune for 2024FAQ:
1) NIRF म्हणजे काय?
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) ला MHRD ने मंजूरी दिली आणि 29 सप्टेंबर 2015 रोजी माननीय मानव संसाधन विकास मंत्री यांनी लॉन्च केले.
या आराखड्यात देशभरातील संस्थांची क्रमवारी लावण्याची पद्धत आहे. विविध विद्यापीठे आणि संस्थांच्या रँकिंगसाठी व्यापक मापदंड ओळखण्यासाठी MHRD द्वारे स्थापन केलेल्या कोअर कमिटीद्वारे प्राप्त झालेल्या एकूण शिफारशींमधून ही कार्यपद्धती घेण्यात आली आहे. पॅरामीटर्समध्ये “शिक्षण, शिक्षण आणि संसाधने,” “संशोधन आणि व्यावसायिक पद्धती,” “पदवी परिणाम,” “आउटरीच आणि सर्वसमावेशकता” आणि “परसेप्शन” यांचा समावेश होतो.
2) स्वायत्त संस्था म्हणजे काय?
स्वायत्त संस्था स्वतःचा अभ्यासक्रम, शैक्षणिक दिनदर्शिका, परीक्षा आयोजित करू शकते आणि निकाल जाहीर करू शकते.
हेही वाचा: हे आहेत नाशिक मधील सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजेस
माहिती पुढे शेअर करा.