Chaitra Navratri 2024: यावर्षी दिनांक 9 एप्रिल 2024 पासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहेत. हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात. चैत्र आणि शारदीय नवरात्र प्रकटपणे साजरी केली जातात आणि या कालावधीत नवदुर्गेची पूजा केली जाते. उर्वरित दोन नवरात्र सिद्धी प्राप्त करण्यासाठी गुप्तपणे साजरी केली जातात.
सामग्री सारणी
हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र मानला जातो. संपूर्ण देशभरात हा सण धुमधडाक्यात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. चैत्रप्रतीपदेला दुर्गादेवी प्रकट झाली होती आणि दुर्गादेवीच्या सूचनेनुसार ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली होती. या दिवशी हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा देखील साजरा केला जातो.
चैत्र नवरात्रीच्या शेवटी रामनवमी येते. रामनवमीला भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता. चैत्र नवरात्रीमध्ये कठोर ध्यान आणि कठोर उपवासाचे महत्त्व आहे. यावर्षी तब्बल 30 वर्षानंतर हिंदू नववर्षाची सुरवात शुभ राजयोगात होत आहे.
![Chaitra Navratri 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/04/Durga-Mata-image-from-X-859x1024.jpg)
Chaitra Navratri 2024: घटस्थापनेचा मुहूर्त
यावर्षी चैत्र नवरात्रीसाठी घटस्थापना दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 वाजून 11 मिनिटांपासून ते 10 वाजून 23 मिनिटांपर्यंत करू शकतात.
हेही वाचा: रामनवमी का साजरी करतात?
Chaitra Navratri 2024: दुर्गा मातेचे नऊ रुपे
नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये रंगांनाही एक वेगळेच महत्व आहे.
![Chaitra Navratri 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/05/Durga-Devi.jpg)
चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस
9 एप्रिलला नवरात्रीचा पहिला दिवस असून या दिवशी माता दुर्गेच्या शैलपुत्रीच्या रूपाची पूजा केली जाते. माता शैलपुत्रीला हिमालयाची कन्या असे म्हणतात. माता शैलपुत्रीचा आवडता रंग पिवळा असल्याने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते.
चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस
10 एप्रिलला नवरात्रीचा दुसरा दिवस असून या दिवशी ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्मदेवाने सांगितलेले आचरण पाळणारी. जीवनात यश मिळवण्यासाठी शिस्त अत्यंत गरजेची आहे. म्हणूनच जीवनात विकास आणि यश मिळावे यासाठी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. माता ब्रह्मचारिणीला हिरवा रंग प्रिय असल्याने या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालावेत.
चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस
11 एप्रिलला चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस असून या दिवशी चंद्रघंटा मातेची उपासना केली जाते. चंद्रघंटा माता ही समाधानाची देवी मानली जात असल्याने, जीवनात कल्याण आणि समाधान मिळवण्यासाठी चंद्रघंटा मातेची पूजा करतात. माता चंद्रघंटाचा आवडता रंग तपकिरी असल्याने चैत्र नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तपकिरी रंगाचे कपडे घालणे शुभ असते.
Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा
चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस
12 एप्रिलला चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस असून या दिवशी दुर्गा मातेच्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते. ही माता मनातील भीती दूर करते. माता कुष्मांडाचा आवडता रंग केशरी असल्याने चैत्र नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केशरी रंगाचे कपडे घालणे शुभ असते. भीती नाहीशी करण्यासाठी भाविक कुष्मांडा मातेची उपासना करतात.
चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस
13 एप्रिलला चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस असून या दिवशी दुर्गा मातेच्या स्कंदमातेच्या रूपाची पूजा करतात. स्कंदमाता शक्ती देणारी मानली जाते. स्कंदमातेची उपासना केल्याने भाविकांना त्यांच्या कार्यात यशस्वी होण्याची शक्ती मिळते. स्कंदमातेला पांढरा रंग प्रिय आहे. चैत्र नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते.
चैत्र नवरात्रीचा सहावा दिवस
14 एप्रिलला चैत्र नवरात्रीचा सहावा दिवस असून या दिवशी दुर्गा मातेच्या कांत्यायणी रूपाची पूजा केली जाते. कांत्यायणी माता आरोग्याची देवता आहे. आरोग्य निरोगी राहण्यासाठी व शरीर सुदृढ करण्यासाठी कांत्यायणी मातेची उपासना केली जाते. कांत्यायणी मातेला लाल रंग आवडतो. चैत्र नवरात्रीच्या सहाव्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे.
चैत्र नवरात्रीचा सातवा दिवस
15 एप्रिलला चैत्र नवरात्रीचा सातवा दिवस असून या दिवशी दुर्गामातेच्या कालरात्री रूपाची उपासना केली जाते. काल म्हणजे वेळ आणि रात्री म्हणजे रात्र. सिद्धी प्राप्त करण्यासाठी रात्रीच्या वेळी कालरात्री मातेची उपासना करावी. माता कालरात्रीला निळा रंग प्रिय आहे. म्हणून चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत.
चैत्र नवरात्रीचा आठवा दिवस
16 एप्रिलला चैत्र नवरात्रीचा आठवा दिवस असून या दिवशी दुर्गामातेच्या महागौरी रूपाची उपासना केली जाते. भाविक पापांपासून मुक्त होण्यासाठी आणि अंतर्मन स्वच्छ करण्यासाठी महागौरी मातेची उपासना करतात. महागौरी मातेला गुलाबी रंग खूप आवडतो. म्हणून चैत्र नवरात्रीच्या आठव्या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करावेत.
Chaitra Navratri 2024: अष्टमीला कन्या पूजनाचे महत्त्व
नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन केले जाते. हिंदू धर्मात कन्या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू धर्मात कन्याला देवी दुर्गेचे रूप मानले जाते. काही लोक अष्टमी तिथीला तर काही लोक नवमी तिथीला कन्या पूजन करतात. कन्या पूजनादरम्यान गोडधोड जेवण आणि भेटवस्तू दिल्या जातात. कन्या पूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकटे दूर होतात व त्याला सुख-समृद्धी प्राप्त होते.
![Chaitra Navratri 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/05/Durga-Maa.jpg)
Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीला ह्या चुका टाळा
चैत्र नवरात्रीचा तुम्ही जर उपवास करत असणार, उपवास कालावधीत मद्य किंवा इतर व्यसने करू नयेत. उपवास नसणाऱ्या व्यक्तींनी शाकाहार करावा. मनात तामसी विचार आणू नयेत. शक्य झाल्यास कांदा, लसूण खाणे नवरात्रीच्या दिवसात टाळावे. या दिवसात कोणाबद्दल वाईट विचार करू नये, कुठलेही चुकीचे काम करू नये.
Chaitra Navratri 2024: रामनवमी धुमधडाक्यात साजरी होणार
चैत्र नवरात्रीच्या शेवटी रामनवमी येते.हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या नवमी तिथीला श्रीराम नवमी साजरी केली जाते. यंदा 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमी साजरी केली जाईल. प्रभू श्रीराम हे विष्णूंचे सातवे अवतार असून हिंदू धर्मात रामनवमी या सणाला विशेष महत्त्व आहे.
Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा
रामाचा जन्मोत्सव भारतात ठिकठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात असतो. कारण प्रभू श्रीरामाच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण मानव जातीला मार्गदर्शन लाभलेले आहे. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक, तसेच राजकीय मर्यादेत राहूनही पुरुष उत्तम कसा होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम रामाचे जीवन आपल्याला समजावते.
ह्या वर्षी रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी सर्व भारतवासीयांमद्धे वेगळाच उत्साह आहे कारण प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथील राम जन्मभूमी मधील मंदिरात करण्यात आलेली आहे.
![Chaitra Navratri 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/05/Maa.jpg)
Chaitra Navratri 2024: दुर्गा चालीसा
नमो नमो दुर्गे सुख करनी ।
नमो नमो अम्बे दुःख हरनी ॥
निरंकार है ज्योति तुम्हारी ।
तिहूँ लोक फैली उजियारी ॥
शशि ललाट मुख महाविशाला ।
नेत्र लाल भृकुटी बिकराला ॥
रूप मातु को अधिक सुहावे ।
दरश करत जन अति सुख पावे ॥
तुम संसार शक्ति लय कीना ।
पालन हेतु अन्न धन दीना ॥
अन्नपूर्णा तुम जग पाला ।
तुम ही आदि सुन्दरी बाला ॥
प्रलयकाल सब नाशनहारी ।
तुम गौरी शिवशंकर प्यारी ॥
शिव योगी तुम्हरे गुन गावें ।
ब्रह्मा विष्णु तुम्हें नित ध्यावें ॥
रूप सरस्वती का तुम धारा ।
दे सुबुधि ऋषि-मुनिन उबारा ॥
धर्यो रूप नरसिंह को अम्बा ।
परगट भईं फाड़ कर खम्बा ॥
रक्षा करि प्रहलाद बचायो ।
हिरनाकुश को स्वर्ग पठायो ॥
लक्ष्मी रूप धरो जग जानी ।
श्री नारायण अंग समानी ॥
क्षीरसिन्धु में करत बिलासा ।
दयासिन्धु दीजै मन आसा ॥
हिंगलाज में तुम्हीं भवानी ।
महिमा अमित न जात बखानी ॥
मातंगी धूमावति माता ।
भुवनेश्वरि बगला सुखदाता ॥
श्री भैरव तारा जग-तारिणि ।
छिन्न-भाल भव-दुःख निवारिणि ॥
केहरि वाहन सोह भवानी ।
लांगुर वीर चलत अगवानी ॥
कर में खप्पर-खड्ग बिराजै ।
जाको देख काल डर भाजै ॥
सोहै अस्त्र विविध त्रिशूला ।
जाते उठत शत्रु हिय शूला ॥
नगरकोट में तुम्हीं बिराजत ।
तिहूँ लोक में डंका बाजत ॥
शुम्भ निशुम्भ दैत्य तुम मारे ।
रक्तबीज-संखन संहारे ॥
महिषासुर दानव अभिमानी ।
जेहि अघ भार मही अकुलानी ॥
रूप कराल कालिका धारा ।
सेन सहित तुम तेहि संहारा ॥
परी गाढ़ सन्तन पर जब-जब ।
भई सहाय मातु तुम तब तब ॥
अमर पुरी अरू बासव लोका ।
तव महिमा सब रहें अशोका ॥
ज्वाला में है ज्योति तुम्हारी ।
तुम्हें सदा पूजें नर-नारी ॥
प्रेम भक्ति से जो यश गावै ।
दुख-दारिद्र निकट नहिं आवै ॥
ध्यावे तुम्हें जो नर मन लाई ।
जन्म-मरण ता कौ छुटि जाई ॥
योगी सुर-मुनि कहत पुकारी ।
योग न हो बिन शक्ति तुम्हारी ॥
शंकर आचारज तप कीनो ।
काम-क्रोध जीति तिन लीनो ॥
निशिदिन ध्यान धरो शंकर को ।
अति श्रद्धा नहिं सुमिरो तुमको ॥
शक्ति रूप को मरम न पायो ।
शक्ति गई तब मन पछितायो ॥
शरणागत ह्वै कीर्ति बखानी ।
जय जय जय जगदम्ब भवानी ॥
भई प्रसन्न आदि जगदम्बा ।
दई शक्ति नहिं कीन विलम्बा ॥
मोको मातु कष्ट अति घेरो ।
तुम बिन कौन हरे दुख मेरो ॥
आशा तृष्णा निपट सतावैं ।
मोह-मदादिक सब बिनसावैं ॥
शत्रु नाश कीजै महरानी ।
सुमिरौं इकचित तुम्हें भवानी ॥
करहु कृपा हे मातु दयाला ।
ऋद्धि-सिद्धि दै करहु निहाला ॥
जब लग जिओं दया फल पावौं ।
तुम्हरो यश मैं सदा सुनावौं ॥
दुर्गा चालीसा जो कोई गावै ।
सब सुख भोग परमपद पावै ॥
देवीदास शरण निज जानी ।
करहु कृपा जगदम्ब भवानी ॥
॥इति श्रीदुर्गा चालीसा समाप्त ॥