MHT CET आणि JEE या परीक्षांमध्ये काय फरक आहे? | Difference between MHT CET and JEE Examinations 2024

Difference between MHT CET and JEE Examinations

Difference between MHT CET and JEE Examinations
Difference between MHT CET and JEE Examinations

MHT CET व JEE या परीक्षांमधला फरक: MHT CET ही महाराष्ट्र राज्यातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कृषी, कायदा, वैद्यकीय, आयुष आणि ललित कला यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे.

Difference between MHT CET and JEE Examinations
Difference between MHT CET and JEE Examinations

JEE ही भारतातील राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आहे जी प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी (IIT) सह देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते.

JEE दोन भागांमध्ये विभागली गेली आहे, JEE Mains आणि  JEE Advanced.दोन्ही परीक्षांमधला मुख्य फरक जर बघितला तर MHT CET महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयांसाठी प्रवेश परीक्षा असून JEE ही राष्ट्रीय स्तरावर IIT, NIT व अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी प्रवेश परीक्षा आहे.

Difference between MHT CET and JEE Examinations
Difference between MHT CET and JEE Examinations

MHT CETJEE दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 3 तासांचा कालावधी असतो. MHT CET ही परीक्षा राज्य स्तरावर असल्याने तुलनेने कमी स्पर्धा असते या उलट JEE परीक्षेसाठी उच्चस्तरीय स्पर्धा असते.
MHT CET परीक्षेसाठी प्रश्न राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात व JEE परीक्षेसाठी प्रश्न NCERT पुस्तकांवर आधारित असल्याने अधिक संकल्पनात्मक असल्याने अडचणीची पातळी जास्त असते.

MHT CET म्हणजे काय?

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था ( प्रवेश व शुल्काचे नियमन ) अधिनियम, 2015 च्या कलम 10 नुसार राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना केली आहे.सीईटी सेल भारतातील महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेश परीक्षा घेते.

अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कृषी, कायदा, वैद्यकीय, आयुष आणि ललित कला यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे.

Difference between MHT CET and JEE Examinations

JEE म्हणजे काय?

संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच JEE ही भारतातील विविध राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आहे जी प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी(IIT) सह देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते.

Difference between MHT CET and JEE Examinations
Difference between MHT CET and JEE Examinations

JEE दोन भागांमध्ये विभागली गेली आहे, JEE Mains आणि JEE Advanced. संयुक्त जागावाटप प्रधिकरण (JoSSA) एकूण 23 भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs), 31 राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NITs), 25 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIITs) कॅम्पस आणि इतर सरकारी अनुदानित तांत्रिक संस्थांसाठी संयुक्त प्रवेश प्रक्रिया आयोजित करते.

JEE Main व JEE Advanced मध्ये काय फरक आहे? Difference between JEE Mains and JEE Advanced

JEE Mains:

जेईई-मेन नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केली जाते. जेईई-मेन चे दोन पेपर असतात. दोन्ही पेपर मध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. पेपर-1 हा BE/BTech अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आहे आणि तो संगणक आधारित चाचणी पद्धतीने घेतला जातो.

Difference between MHT CET and JEE Examinations

पेपर-2 B.Arch आणि  B. Planning अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आहे आणि एक पेपर वगळता संगणक आधारित चाचणी मोडमध्ये देखील आयोजित केला जातो. जानेवारी 2020 पासून बी प्लॅनिंग अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्रपणे अतिरिक्त पेपर 3 सुरू करण्यात येत आहे.

JEE Advanced:

JEE Advanced ही IIT, IISC, IIST, IIPE, ईसर्स सारख्या इतर काही समान प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी आयोजित केली जाते दरवर्षी दोन लाखांहून अधिक विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी पात्र होत असतात. JEE Main चे टॉप 250,000 विद्यार्थी JEE Advanced परीक्षेला बसण्यास पात्र आहेत.

Difference between MHT CET and JEE Examinations

JEE ही UPSC च्या परीक्षेनंतर भारतातील सर्वात कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक मानली जाते. JEE Advanced पूर्वी IIT-JEE म्हणून ओळखली जात होती. JEE Advanced ची सुरवात 1961 मध्ये झाली होती. JEE Advanced मध्ये एका वर्षात जास्तीत जास्त दोन प्रयत्न करण्याची परवानगी दिली जाते. JEE Advanced परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. JEE Mains ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

NEET आणि IIT JEE मध्ये फरक काय?

अखिल भारतीय प्री मेडिकल टेस्ट (AIPMT), पूर्वी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) म्हणून ओळखली जात होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) वारे प्रशासित संपूर्ण भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी ही एकमेव प्रवेश परीक्षा आहे.

IIT JEE आणि NEET या दोन्ही राष्ट्रीय स्तरीय प्रवेश परीक्षा आहे. JEE ही परीक्षा अभियांत्रिकीच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आहे तर NEET ही परीक्षा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आहे. JEE परीक्षेत गणिताला जास्त महत्व दिले जाते तर NEET परीक्षेमध्ये जीवशास्त्राला महत्त्व दिलेले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रातील टॉप 7 इंजिनीअरिंग कॉलेज जेथे विद्यार्थ्याना मिळते लाखो, करोडोचे पॅकेज

FAQ:

१. MHT CET व JEE चा फुल फॉर्म काय? (Full Form of MHT CET and JEE Examination)

MHT CET चा अर्थ हा महाराष्ट्र आरोग्य आणि तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच Maharashtra Health and Technical Common Entrance Test आहे.

JEE चा अर्थ संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच Joint Entrance Examination आहे.

२. MHT CET व JEE ही परीक्षा एकत्र असते का?

नाही. दोन्ही परीक्षा स्वतंत्र घेतल्या’जातात.

३. IIT मध्ये १० वी नंतर प्रवेश मिळू शकतो का?

नाही.

४. JEE Mains चा निकाल कोठे पहावा?

JEE Mains चा निकाल ह्या वेब साईट वर पहावा – https://www.nta.ac.in/

५. MHT CET चा निकाल कोठे पहावा?

MHT CET चा निकाल ह्या वेब साईट वर पहावा – https://cetcell.mahacet.org/

६. MHT CET व JEE दोन्ही परीक्षा एकच आहेत का?

नाही.

७. JEE आणि NEET या परीक्षा समान आहेत का?

JEE ही परीक्षा अभियांत्रिकीच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आहे तर NEET ही परीक्षा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आहे.

८. NEET प्रवेश परीक्षेसाठी वयोमर्यादा किती आहे?

NTA ने अधिसूचित केल्यानुसार NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही आहे.

९. NEET ची प्रवेश परीक्षा ऑनलाइन घेतली जाते का?

नाही. ही परीक्षा एक पेन आणि पेपर यावर आधारित आहे.

१०. NEET च्या प्रश्नपत्रिकेचे माध्यम कोणते असते?

ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा निवडली असेल त्यांना इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका मिळेल. ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी ही प्रादेशिक भाषा निवडली असेल त्यांना द्विभाषिक प्रश्नपत्रिका मिळेल. ज्यामध्ये हिंदी प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी दोन्ही समाविष्ट असतील.

११. NEET ची परीक्षा पास झाल्यानंतर पुढे काय करावे?

NEET ची परीक्षा पास झाल्यानंतर अनेक पर्याय उपलब्ध असतात. विद्यार्थी NEET परीक्षा पात्र झाल्यानंतर BDS, MBBS किंवा आयुष अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.

Leave a comment