Diploma Information: 10वी नंतर पुढे काय? पॉलिटेक्निक एक उत्तम पर्याय!

Diploma Information: प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासात इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यांची भविष्यातील कारकीर्द बोर्डाच्या परीक्षेत मिळाल्या गुणांवर अवलंबून असते. बोर्डाच्या परीक्षेतील गुणांवर अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होत असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे स्वप्न असते की दहावीनंतर उत्तम शिक्षण घेऊन उत्तम नोकरी किंवा व्यवसाय सुरू करावा. परंतु बऱ्याच वेळा विद्यार्थी व पालकांचा दहावीनंतर उत्तम शाखा निवडताना गोंधळ उडालेला असतो. इंजीनियरिंग डिप्लोमा( पॉलिटेक्निक) चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात. चला तर मग जाणून घेऊया इंजीनियरिंग डिप्लोमा(पॉलिटेक्निक) म्हणजे काय?

Diploma Information
Diploma Information – Image Source: Google

Diploma Information: पॉलिटेक्निक म्हणजे काय?

Diploma Information: पॉलिटेक्निक म्हणजे अनेक तांत्रिक कला किंवा उपयोजित विज्ञानांमधील निर्देशांशी संबंधित व्यावसायिक शिक्षण. दहावीनंतर बहुतांश विद्यार्थी मेडिकल किंवा इंजीनियरिंग अभ्यासक्रमांची निवड करत असतात.

पॉलिटेक्निक मधील विविध डिप्लोमा कोर्सेस दहावीनंतर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाची हमी देतात परिणामी विद्यार्थी एकतर पुढील पदवीचे शिक्षण पूर्ण करू शकतात किंवा नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी त्यांना उपलब्ध असतात. डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक, इत्यादी पदांवर खाजगी अथवा शासकीय कार्यक्षेत्रात नोकरी मिळवू शकतात. व्यवसायाची आवड असणारे विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात.

डिप्लोमा म्हणजेच पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची फी ही कमी असते. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफी, तसेच विविध शिष्यवृत्ती योजना देखील उपलब्ध आहेत.

Diploma Information
Diploma Information – Image Source: MSBTE

Diploma Information: नवीन शैक्षणिक धोरण व सुधारित अभ्यासक्रमामुळे डिप्लोमाचे शिक्षण झाले अधिकच सोपे

Diploma Information: डिप्लोमा म्हटलं की इंग्रजीतील कठीण अभ्यासक्रम, प्रचंड शैक्षणिक फी, नोकरीच्या समस्या असे अनेक नकारात्मक प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर येत असतात. परंतु महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) सोबत संलग्न असलेल्या शासकीय किंवा खाजगी महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणानुसार सुधारित अभ्यासक्रम प्रणाली राबवली जात आहे.

ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भीती असते. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण घेण्याची इच्छा असते परंतु इंग्रजी भाषेच्या भीतीपोटी असे विद्यार्थी मराठी, हिंदी भाषेतील अभ्यासक्रमाचा शोध घेत असतात.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने (MSBTE) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) ची अंमलबजावणी करत डिप्लोमाचा सुधारित अभ्यासक्रम तयार केला आहे. कौशल्यावर आधारित नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे सुप्त गुणांना उत्तेजना देण्यास उपयुक्त ठरत आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध उद्योगांच्या गरजा नुसार MSBTE त्यांच्या अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने सुधारणा करत असते. सर्व अभ्यासक्रम OBE प्रणाली (Outcome Based Education) वर आधारित आहे.

Diploma Information
Diploma Information – Image Source: Google

तंत्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांचा दर्जा उत्तम आणि एकसमान असतो. औद्योगिक क्षेत्रातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून शिक्षकांना औद्योगिक प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांना विषयाचे योग्य आकलन होते. प्रात्यक्षिकांवर आधारित पदविका अभ्यासक्रम रोजगाराची संधी लवकर उपलब्ध करून देतात.

Image Source: Google
Image Source: Google

Diploma Information: उत्कृष्ट शिक्षणाची नवी थीम MSBTE ची “K Scheme”

MSBTE “K Scheme” चे वैशिष्ट्ये

1. K Scheme च्या नवीन अभ्यासक्रमांतर्गत एकूण 40 पेक्षा जास्त अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आहेत. NEP-2020 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि परिपूर्ण विकासासाठी नवीन बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

2. या नवीन अभ्यासक्रमाचे सर्वात उत्तम वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना डिप्लोमा चे शिक्षण आता मातृभाषेतही घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना यापुढे इंग्रजी सोबत मराठी आणि हिंदी भाषेत शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विद्यार्थी यापुढे द्विभाषेमध्ये परीक्षा देऊ शकतील. याचा जास्तीत जास्त फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होऊ शकतो.

3. Multiple Entry and Multiple Exit: K Scheme अभ्यासक्रमाचे हे एक उत्तम महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वर्षाच्या शिक्षणाचे महत्त्व कायम ठेवून त्यांना शिक्षण कोणत्याही वर्षाला थांबवण्याची आणि पुन्हा सुरू करण्याची परवानगी MSBTE मार्फत देण्यात आलेली आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहणार नाही. एखादा विद्यार्थी डिप्लोमा चे शिक्षण अर्धवट सोडून गेल्यास तो पुन्हा परत येऊन अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार आहे.

Diploma Information
Image Source: MSBTE

आता प्रत्येक शैक्षणिक वर्षाला स्वतंत्र महत्व असेल आणि तसे प्रमाणपत्रही मिळेल. विद्यार्थ्यानी प्रथम वर्ष पूर्ण केल्यावर त्यांना Certificate of Vocation चे प्रमाणपत्र मिळेल. जर विद्यार्थ्यानी द्वितीय वर्ष पूर्ण केल्यास Diploma in Vocation आणी विद्यार्थ्यानी तृतीय वर्ष पूर्ण केल्यास Diploma in Engineering चे प्रमाणपत्र मिळणार आहे.

बऱ्याच वेळा काही अडचणींमुळे विद्यार्थी त्यांचे डिप्लोमाचे शिक्षण अर्धवट सोडत होते आणि अर्धवट सोडलेल्या शिक्षणाचा त्यांना कुठलाच फायदा मिळत नव्हता. परंतु या नवीन अभ्यासक्रमानुसार Multiple Exit चा पर्याय विद्यार्थ्यांसमोर असेल.

एखाद्या विद्यार्थ्यांने एका वर्षानंतर त्याचे शिक्षण थांबवले तर त्याला प्रमाणपत्र मिळेल आणि पुन्हा तीन ते चार वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला वाटले की मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे तर तो विद्यार्थी त्याचे डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करू शकतो. Multiple Entry च्या पर्यायामुळे विद्यार्थी त्याचे अपूर्ण शिक्षण कधीही पूर्ण करू शकतो.

4. K Scheme मध्ये भारतीय ज्ञानप्रणालींचा अर्थात Indian Knowledge System चा अंतर्भाव करण्यात आला आहे.

5. या नवीन अभ्यासक्रमात औद्योगिक प्रशिक्षणाचा कालावधी 12 आठवडे केला आहे.

6. नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनाचा विचार करून Self Learning Assessment ची तरतूद करण्यात आलेली आहे.

7. Academic Bank of Credit System च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्राचे क्रेडिट मिळणार आहेत. विद्यार्थी जर एखादी शैक्षणिक संस्था सोडून दुसऱ्या संस्थेत गेला तर त्याचे क्रेडिट हे दुसऱ्या संस्थेत हस्तांतरित केले जातील.

Diploma Information
Image Source: MSBTE

8. या नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या बदलत्या जीवनशैलीचा विचार करून त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी योगासन आणि मेडिटेशन चा नियमित सराव अनिवार्य करण्यात आला आहे.

9. पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक साक्षरता या बाबींचा K Scheme च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे.

10. K Scheme च्या अभ्यासक्रमात लोकशाहीचे मूल्य रुजवण्यासाठी भारतीय संविधानावर आधारित “Essence of Indian Constitution” या विषयाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

Diploma Information: पॉलिटेक्निक मध्ये उपलब्ध कोर्सेस

पॉलिटेक्निक मध्ये विविध डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध असून विद्यार्थी त्यांच्या कौशल्य वा आवडीनुसार डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करू शकतात.

सिव्हिल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, मेकॅनिकल  इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, कॉम्प्युटर इंजीनियरिंग, केमिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग, असे अनेक डिप्लोमा कोर्सेस पॉलीटेक्निक मध्ये उपलब्ध आहेत. बदलत्या काळानुसार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग चा अभ्यासक्रम देखील डिप्लोमा मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर डिप्लोमाच्या काही पदविका अभ्यासक्रमाविषयी माहिती देणारे व्हिडिओ आहेत. सदर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

पदविका अभ्यासक्रमव्हिडिओ लिंक
सिव्हिल इंजीनियरिंगयेथे क्लिक करा
इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगयेथे क्लिक करा
मेकॅनिकल  इंजिनिअरिंगयेथे क्लिक करा
इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंगयेथे क्लिक करा
कॉम्प्युटर इंजीनियरिंगयेथे क्लिक करा

नक्कीच नवीन शैक्षणिक धोरण आणि डिप्लोमाचा नवीन अभ्यासक्रम यामुळे तांत्रिक शिक्षण घेणे अगदी सोपे झालेले आहे. MSBTE च्या उत्कृष्ट अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षण मिळणार असून लाखो विद्यार्थ्यांचे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी  महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) यांच्या वेबसाईटला भेट द्यावी.

Diploma Information
Image Source: MSBTE

हेही वाचा: Hanuman Janmotsav 2024: हनुमान चालीसा की मारुती स्तोत्र?

निष्कर्ष:

10 वी नंतर विद्यार्थ्यांची भविष्यातील कारकीर्द ठरवण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यातील एक म्हणजे पॉलिटेक्निक. इंजीनियरिंग डिप्लोमा (पॉलिटेक्निक) चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

1. अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी पात्रता निकष काय आहे?

उत्तर: डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी, उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा इतर कोणत्याही समकक्ष परीक्षा किमान ३५% गुणांसह (इंग्रजी, विज्ञान आणि गणित विषय असलेल्या सर्वोत्तम पाच विषयांमध्ये) उत्तीर्ण केलेली असावी.

2. डिप्लोमा मातृभाषेत करता येतो का?

उत्तर: होय.

3. डिप्लोमा प्रवेशासाठी कुठली शाखा उत्तम आहे?

उत्तर: डिप्लोमाच्या सुधारित अभ्यासक्रमनुसार उपलब्ध असलेल्या सर्वच शाखा ह्या नोकरी व व्यवसायासाठी उत्तम आहेत. तरीदेखील विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी, सिव्हिल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, मेकॅनिकल  इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, कॉम्प्युटर इंजीनियरिंग, केमिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग ह्या शाखांमध्ये प्रवेश घेण्याकडे असतो.

Leave a comment