Diploma Jobs 2024: ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, नाशिक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

Diploma Jobs 2024: जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या फार्मास्युटिकल्स कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी नाशिक मध्ये उपलब्ध झालेली आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण D.Pharm/DME/DEE या डिप्लोमाच्या शाखांमध्ये झालेले आहे आणि उत्कृष्ट अशा नोकरीच्या शोधात आहे त्यांनी आजच या जॉबसाठी अर्ज करावा. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण अर्जप्रक्रिया.

Diploma Jobs 2024
Image Source: Glenmark


सामग्री सारणी

Diploma Jobs 2024 in Glenmark – पद:

प्रशिक्षणार्थी/ कनिष्ठ अधिकारी – उत्पादन (Production)

Diploma Jobs 2024 – एकूण जागा:

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, नाशिक येथील प्लांटसाठी प्रशिक्षणार्थी/ कनिष्ठ अधिकारी – उत्पादन या पदासाठी एकूण 10 रिक्त पदे आहेत.

Diploma Jobs 2024 in Glenmark – शैक्षणिक पात्रता:

प्रशिक्षणार्थी/ कनिष्ठ अधिकारी – उत्पादन या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे डिप्लोमा इन फार्मसी/ डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग असायला हवे.

वय:

प्रशिक्षणार्थी/ कनिष्ठ अधिकारी – उत्पादन या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराच्या वयाबद्दल जाहिरातीत माहिती उपलब्ध नाही.

वेतन:

प्रशिक्षणार्थी/ कनिष्ठ अधिकारी – उत्पादन या पदासाठी किती वेतन मिळणार याबाबत जाहिरातीत माहिती उपलब्ध नाही.

नोकरीचा तपशील:

उदयोग प्रकार – फार्मास्युटिकल्स आणि लाइफ सायन्सेस

नोकरी विभाग – उत्पादन, उत्पादन आंभियांत्रिकी

भूमिका – असेंब्ली लाइन ऑपरेटर

भूमिका श्रेणी – ऑपेरेशन्स, मेंन्टेनन्स आणि सपोर्ट

नोकरीचा प्रकार – खाजगी, पूर्ण वेळ, कायम

Diploma Jobs 2024

मुख्य कौशल्ये:

उत्पादन विभागात कामाचा अनुभव.

कामाचे स्वरूप (भूमिका आणि जबाबदाऱ्या):

1) मलम, द्रव आणि इतर बाह्य तयारी यासारख्या विविध डोस फॉर्मचे उत्पादन आणि पॅकिंग क्रियाकलाप हाताळण्यासाठी.

2) विभागात cGMP आणि SOP अनुपालनाचे पालन करणे आणि उत्पादन आणि पॅकिंग ऑपरेशन दरम्यान उत्पादनाची सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे.

3) इच्छित उत्पादन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, अपव्यय नियंत्रण आणि प्रक्रिया ऑपरेशन दरम्यान उत्पन्न सुधारणा.

4) कोणत्याही उत्पादन/पॅकिंग ऑपरेशन दरम्यान आढळल्यास कोणत्याही असामान्यता नोंदवणे आणि उत्पादनाचे मिश्रण टाळणे आणि योग्य उत्पादन आणि बॅचचे विभाजन करणे.

5) उत्पादन योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी भागधारकांशी समन्वय साधणे आणि मासिक वचनबद्ध योजनेनुसार उत्पादन लक्ष्य साध्य करणे.

हेही वाचा: लाखोंचे पॅकेज देणारे पुण्यातील सर्वोत्तम इंजीनियरिंग कॉलेजेस

पसंतीचे उमेदवार प्रोफाइल:

उमेदवाराचे शिक्षण हे डिप्लोमा इन फार्मसी (D.Pharm) / डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग (DMM) किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग (DEE) यामध्ये झालेले असावे. तसेच विविध डोस फॉर्म जसे की मलम, लिक्विड आणि इतर बाह्य तयारी तयार करण्याचा अनुभव असायला हवा.

अर्ज शुल्क:

प्रशिक्षणार्थी/ कनिष्ठ अधिकारी – उत्पादन या पदासाठी अर्ज करण्यासाठी कुठलेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

Diploma Jobs 2024

Diploma Jobs 2024 in Glenmark अर्ज प्रक्रिया:

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, नाशिक येथे प्रशिक्षणार्थी/ कनिष्ठ अधिकारी – उत्पादन या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना Naukri च्या अधिकृत पोर्टलवर म्हणजेच Naukri.Com वर अर्ज करावा लागणार आहे. यासाठी उमेदवाराची Naukri.Com वर प्रोफाइल असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांची प्रोफाइल Naukri.Com वर नसेल त्यांना अर्ज करता येणार नाही. Naukri वर प्रोफाईल बनवणे अगदी सोपे आहे. आपली प्रोफाईल अपडेट करूनच उमेदवारांनी अर्ज करावा.

1) प्रथम Naukri.Com या संकेतस्थळाला भेट द्या.

2) ज्या उमेदवारांची प्रोफाइल Naukri वर आहे त्यांनी योग्य माहिती भरून लॉगिन करा.

3) त्यानंतर Search jobs here येथे क्लिक करा.

4) Designation, skill and company या रिक्त जागी Glenmark टाईप करा. Experience च्या ठिकाणी कुठलीही माहिती प्रविष्ट करू नका. Location च्या ठिकाणी Nashik असे टाईप करा.

5) त्यानंतर search results मध्ये Glenmark च्या अनेक जाहिराती दिसतील. त्यापैकी खालील जाहिरात निवडावी.

Trainee / Junior Officer -Production

Nashik, 1-4 Yrs

6) वरील जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती वाचावी व Apply बटनावर क्लिक करावे.

उमेदवाराची प्रोफाइल ही योग्य व अचूक असल्यास कंपनीकडून पुढील निवड प्रक्रियेसाठी कॉल किंवा ई-मेल च्या माध्यमातून उमेदवारांशी संपर्क केला जाऊ शकतो

हेही वाचा: हे आहेत नाशिक मधील सर्वोत्तम इंजीनियरिंग कॉलेजेस

Diploma Jobs 2024 in Glenmark: अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा.

Diploma Jobs 2024 in Glenmark – महत्त्वाची सूचना:

Naukri.Com वर अर्ज करताना कुठलेही पैसे भरण्याची गरज नाही. उमेदवार नोकरीसाठी मोफत अर्ज करू शकतात. खरे नियोक्ते मुलाखती शेड्यूल करण्यासाठी किंवा नोकरी ऑफर करण्यासाठी पैसे मागत नाहीत. तुम्हाला असे कॉल किंवा ईमेल येत असल्यास, सावध रहा कारण हा नोकरीचा घोटाळा असू शकतो.

हेही वाचा: सेमी फायनल ते प्लेऑफ, जाणून घ्या 2008 ते 2023 च्या आयपीएलचा इतिहास

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी विषयी थोडक्यात माहिती:

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (ग्लेनमार्क) ही भारत आधारित वाढणारी फार्मास्युटिकल्स कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. कंपनीची स्थापना ही 1977 मध्ये झाली होती. ही कंपनी भारतात तसेच जागतिक स्तरावर फॉर्मुलेशनचे उत्पादने आणि सक्रिय फार्मास्युटिकल घटक च्या निर्मिती आणि विपणनावावर लक्ष केंद्रित करते, तसेच नियंत्रित आणि विकसनशील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वैविध्यपूर्ण आणि वाढत्या उपस्थितीचा आनंद घेते. गेल्या पाच वर्षात कंपनीने अत्याधुनिक न्यू केमिकल एंटीटी संशोधनासह समर्पित संशोधन आणि विकासातील गुंतवणुकी द्वारे आपली वाढ देखील उत्तप्रेरित केली आहे.

Naukri.Com या नोकरीच्या पोर्टलवर सुमारे अडीच हजाराहून अधिक लोकांनी आपली प्रतिक्रिया ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनी विषयी नोंदवलेली असून या कंपनीला 4 Star रेटिंग देण्यात आलेली आहे.

हेही वाचा: ग्रॅच्युइटीचे नियम

शैक्षणिक, नोकरी, धार्मिक, इत्यादी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपण आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉईन व्हावे ही विनंती.

निष्कर्ष:

जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी नाशिक मध्ये उपलब्ध झालेली असून संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही Naukri.Com च्या अधिकृत पोर्टल मार्फत राबवली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी कुठलेही अर्ज शुल्क भरायचे नाही आहे. उमेदवारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

Diploma Jobs 2024 वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

1) ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही खाजगी कंपनी आहे की सरकारी?

 ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही खाजगी कंपनी आहे.

2) ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीच्या भारतासह इतर अनेक देशांमध्ये देखील शाखा आहेत का?

होय.

3) ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, नाशिक येथे प्रशिक्षणार्थी/ कनिष्ठ अधिकारी – उत्पादन या पदासाठी अर्ज करण्यासाठी किती अर्ज शुल्क भरायचे आहे?

 कुठलेही अर्ज शुल्क भरायचे नाही आहे.

4) जाहिरातीत नमूद केलेल्या D. Pharm चा पुर्ण अर्थ काय?

D. Pharm चा पुर्ण अर्थ हा Diploma in Pharmacy आहे.

5) उमेदवार, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, नाशिक येथे प्रत्यक्ष जाऊन अर्ज करू शकतात का?

नाही. अर्ज हा फक्त Naukri.Com च्या अधिकृत पोर्टलवरूनच करता येईल.

6) Naukri.Com वरून अर्ज करण्यासाठी किती फी भरावी लागते?

Naukri.Com वर प्रोफाईल बनवणे आणि नोकरीसाठी अर्ज करणे हे अगदी मोफत आहे.

7) उमेदवार मोबाईलच्या सहाय्याने Naukri.Com वरून अर्ज करू शकतात का?

होय.

8) ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, नाशिक येथे प्रशिक्षणार्थी/ कनिष्ठ अधिकारी – उत्पादन या पदासाठी अर्ज करण्यासाठी व मदतीसाठी संपर्क क्रमांक दिलेला आहे का?

नाही.

9) ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, नाशिक च्या इतर अनेक उपलब्ध असलेल्या जाहिरातींसाठी उमेदवार Naukri.Com वर अर्ज करू शकतात का?

होय. उमेदवाराची शैक्षणिक अहर्ता, अनुभव इत्यादी गोष्टी जाहिरातीला अनुसरून असतील तर उमेदवार अर्ज करू शकतात.

10) ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, नाशिक येथे प्रशिक्षणार्थी/ कनिष्ठ अधिकारी – उत्पादन या पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?

Naukri.Com वर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दिलेली नसून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

माहिती पुढे शेअर करा.

Leave a comment