Foreign Scholarship 2024: महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षण करण्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024 – 2025 करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सामग्री सारणी
Maharashtra Foreign Scholarship 2024-25
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत असते.
Foreign Scholarship 2024 – योजनेचे नांव:
अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना.
Foreign Scholarship 2024 – योजनेचा उद्देश:
अनुसूचित जातीचा प्रवर्गातील मुला-मुलींना प्रदेशात पदव्युत्तर पदवी पदवी इतर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे.
Foreign Scholarship 2024 – योजनेची व्याप्ती:
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी अद्ययावत QS World University Ranking 200 च्या आतील प्रदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

Foreign Scholarship 2024 – वयोमर्यादा:
जाहिरात प्रसिद्ध झालेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेस पदव्युत्तर पदवीसाठी उमेदवारांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 40 वर्षापेक्षा जास्त नसावी.
Foreign Scholarship 2024 – उत्पन्न मर्यादा:
1) या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या/कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गाने मिळणारे मागील आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखांपेक्षा जास्त नसावे.
2) इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्रधिकारी (तहसीलदार कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
3) विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत अथवा कुटुंबातील इतर सदस्य नोकरी करीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र फॉर्म नंबर 16 व सक्षम प्रधिकारी (तहसीलदार कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
4) विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखांपासून जास्त नसावे.

Foreign Scholarship 2024 – शैक्षणिक अहर्ता:
1) परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 75% गुणासहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
2) पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 75% गुणासहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
Foreign Scholarship 2024 – अभ्यासक्रमाचा कालावधी:
1) पीएचडीसाठी 4 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो.
2) पदव्युत्तर पदवी 2 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी अपेक्षा कमी असेल तो.
3) पदव्युत्तर पदविका 1 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असलेल्या प्रत्यक्ष कालावधी.
4) परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच MBA अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. भारतीय विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.
Foreign Scholarship 2024 – एकाच कुटुंबातील कमाल पात्रता धारक:
1) सदर योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल.
2) एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करून देणे बंधनकारक असेल.
3) सदरची शिष्यवृत्ती एकाच वेळेस मान्य करण्यात येईल. एकापेक्षा जास्त वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही.
Foreign Scholarship 2024 – योजनेच्या अटी व शर्ती:
1) विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2) विद्यार्थ्यांना परदेशातील अद्ययावत QS World University Ranking 200 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेला असावा.
3) परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.
4) Executive पदव्युत्तर पदवी किंवा Executive पदवीत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
5) प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना नमूद केलेल्या विहित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ मान्य केली जाणार नाही.
6) विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना, पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. तसेच त्याने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.
7) सदर योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका विद्यार्थ्यास प्रत्येक एकदाच घेता येईल. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. सदरची शिष्यवृत्ती एकाच वेळेस मान्य करण्यात येईल. एकापेक्षा जास्त वेळ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही.

Foreign Scholarship 2024 – अर्ज करण्यासाठी अनिवार्य अटी:
1) विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2) नोकरीमध्ये असलेल्या उमेदवाराने तो जेथे नोकरी करतो त्या यंत्रणेचे ना हरकत प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.
3) पात्र विद्यार्थ्याने Non Judicial Stamp Paper वर Public Notary समोर विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक असेल.
4) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे स्वास्थ चांगले असले पाहिजे. त्याकरता त्याने नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
5) विद्यार्थी शिक्षणासाठी आवश्यक असलेला कालावधी किंवा शिक्षण त्यापूर्वी पूर्ण झाल्यास जो कालावधी लागेल या दोघांपैकी जो कमी आहे त्या कालावधी पुरतेच परदेशात राहण्याचे बंधपत्र Bond राज्य शासनास तसेच प्रदेशातील भारतीय दूतावासास घेऊन द्यावे लागेल. या आवश्यक कालावधी पेक्षा जास्त कालावधी करिता परदेशात राहण्यास विद्यार्थ्यास परवानगी मिळणार नाही.
6) उमेदवारास/विद्यार्थ्यास शासनाने विहित करून दिलेल्या नमुन्यात Record Release Consent Form हा अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यावर द्यावा लागेल.
7) परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्वतः प्रयत्न करावा लागेल त्यासाठी आवश्यक त्या सर्व पात्रता परीक्षा, आवश्यक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन असल्यास विद्यार्थ्यांनी ते पूर्ण केले असले पाहिजे.
8) नोकरी करणाऱ्या उमेदवाराने सर्व प्रशासकीय बाबी उदाहरणार्थ रजा, वेतन आणि इतर सेवेच्या बाबी या स्वतः प्रत्यक्षपणे निराकारित करावयाच्या आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची सवलत शासनाकडून मिळणार नाही.
9) पासपोर्ट, व्हिसा मिळवण्यासाठी जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल.
10) उमेदवारास/विद्यार्थ्यांना केवळ ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे व शिष्यवृत्ती मिळालेली आहे त्याच कारणासाठी व्हिसा घेणे बंधनकारक राहील.
11) निवड झालेल्या विद्यार्थ्यास मागणी केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे व आवश्यकते करारनामा देणे बंधनकारक असेल.
याव्यतिरिक्त अधिक नियम व अटी जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
Foreign Scholarship 2024 – योजनेतील लाभाचे स्वरूप:
1) परदेशातील शैक्षणिक संस्थेने पत्रामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीपासून लागू केलेली शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गानी इकॉनामी क्लास विमान प्रवास भाडे, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मुळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मुळ तिकीट, मुळ बोर्डिंग पास, परतिच्या प्रवासाचे तिकीट इत्यादी तपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर भारतीय रुपयांमध्ये प्रतिपूर्ती केली जाईल.
2) सर्वसाधारण पदवीधर पदवीसाठी 2 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी 1 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने इकॉनामी क्लास विमान भाडे पट्टीच्या भाड्यासह, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यासह एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी रुपये 30 लाखाच्या मर्यादेत, तर पीएचडीसाठी 4 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्यासाठी प्रतिविद्यार्थी प्रतिवर्षी रुपये 40 लाखाच्या मर्यादेत शाखा/अभ्यासक्रम निहाय मार्गदर्शक तरतुदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल.
3) विद्यार्थ्यास परदेशी शिक्षण संस्थेमार्फत किंवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती इतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ किंवा शिकविण्याबाबतचे मानधन किंवा फेलोशिप किंवा रिसर्च असोसिएट म्हणून मिळणारे ही रक्कम देय होणाऱ्या शिक्षण शुल्क व एकूण देय रक्कमचे मधून कपात करण्यात येईल.
4) विद्यार्थ्यास वरील लाभ मिळण्यासाठी प्रदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून, तसे शैक्षणिक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी तातडीने सादर करणे अनिवार्य आहे.
उमेदवार/विद्यार्थ्यास मिळणाऱ्या लाभाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
हेही वाचा: पावसाळ्यात डासांमुळे पसरतो जीवघेणा आजार, जाणून घ्या डासांविषयी अधिक माहिती.
अर्ज सादर करण्याची पद्धत व अंतिम तारीख:
1) अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी मधील लिंक वर जाऊन भेट द्यावी.
2) सदरील वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 12/07/2024 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे – 411001 येथे सादर करावा.
(सौजन्य: महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले शासन निर्णय)
अधिकृत जाहिरात व अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
निष्कर्ष:
अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी मिळावयाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन सूचनांचे पालन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1) परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविण्याकरता वयोमर्यादा किती आहे?
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा आहे.
2) सदर शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र राज्यापूर्तीच मर्यादित मर्यादित आहे का?
होय.