Holi 2024: होळी का साजरी केली जाते?

Holi 2024: फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. यावर्षी होळी म्हणजेच होलीका दहन 24 मार्च 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा ही 24 मार्च 2024 रोजी सकाळी 9:54 वाजता सुरू होईल आणि 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल.

हिंदू धर्मात प्रत्येक सणाला स्वतःच वेगळ महत्व असते आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही धार्मिक आणि वैज्ञानिक कारण देखील असते. होळी हा सण भारतासह अन्न देशात देखील उत्साहात साजरा केला जातो. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला होळी सणाची आतुरता असते. काही लोक पुरणपोळी खाण्यासाठी होळी सणाची वाट पाहत असतात तर काही मंडळी रंग खेळण्यासाठी होळी सणाची वाट पाहत असतात. चला तर मग आज जाणून घेऊया होळी हा सण का आणि कसा साजरा केला जातो.

Holi 2024

Holi 2024: जीवनात नवीन रंग भरूया…

Holi 2024: होलिका दहनाची कथा

Holi 2024: एका प्राचीन आख्यायिकेनुसार हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य राजा होता. हिरण्यकश्यपू स्वतःला अधिक बलवान समजायचा आणि स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांना नेहमी त्रास देत असे. त्याला भगवान विष्णूचे नाव ऐकणे आवडत नव्हते. हिरण्यकश्यपू स्वतःला देव समजत होता.

हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. आपल्या मुलाने आपल्यालाच देव मानावे व भगवान विष्णूचे नाव कधीच घेऊ नये यासाठी हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला विविध प्रकारे घाबरवत होता. परंतु भक्त प्रल्हाद न घाबरता भगवान विष्णूंची उपासना करतच राहिला. हिरण्यकश्यपू ने प्रल्हादाला दंडीत करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या होत्या परंतु त्यांचा कुठलाही परिणाम प्रल्हादावर झाला नाही.

हिरण्यकश्यपूला होलीका नावाची बहीण होती जिला वरदान मिळाले होते कि होलीका अग्नीवर विजय प्राप्त करू शकते म्हणजेच अग्नी तिला जाळू शकणार नाही. दैत्य राजाने एक योजना आखली आणि त्यानुसार आपली बहीण होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. भक्त प्रल्हाद न घाबरता आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला.

Holi 2024
Holi 2024: Image Source(Facebook)

एक आकाशवाणी झाली आणि त्यानुसार होलिकेला आठवले की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. होलीकेने तिच्या वरदानाचा दुरुपयोग केला होता, होलीका जळायला लागली, भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झालेल्या भक्त प्रल्हादाला अग्नी काही करू शकली नाही मात्र हिरण्यकश्यपूची बहीण होलिका जळून राख झाली. संपूर्ण घटना घडली तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. अशाप्रकारे त्यादिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होलिका दहन किंवा होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला.

Holi 2024
Holi 2024: Image Source(Facebook)

Holi 2024: जीवनातील अहंकार जाळूया!

वर्तमान काळात होलीका दहनाचे महत्त्व काय?

होलिका दहन हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील अहंकार, नकारात्मकता, दृष्ट प्रवृत्ती, अमंगल विचार यांचा नाश करून चांगले विचार, चांगली वृत्ती, सकारात्मकता अंगी बाळगावी हा या सणातील प्रमुख उद्देश आहे.

Holi 2024: होलिका दहणाची तारीख

होलीका दहन हा सण हुताशनी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन महिन्याची पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 24 मार्च 2024 रोजी आहे. 24 मार्च 2024 रोजी होलिका दहन हा सण साजरा केला जाणार आहे.

Holi 2024: होलिका दहणाची पूजा आणि पद्धत

Holi 2024: होलिका दहनाच्या दिवशी लाकडांची किंवा शेणाच्या गौऱ्यांची प्रतिकात्मक होळी तयार केली जाते. या दिवशी घरातील सर्व मंडळी स्वच्छ कपडे घालून होलिका दहनाच्या पूजेची तयारी करतात. होलीकेची मांडणी केल्यानंतर होलीका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन केले जाते. होलीके  जवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलीकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्चा धाग्याने बांधण्यात येते.

Holi 2024
Holi 2024: Image Source(Facebook)

शुद्ध पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गुळ, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची होलीकेस आहुती देण्यात येते. त्याचप्रमाणे नवीन धान्यांचा अंश जसे की गहू, चणे इत्यादी देखील होलीकेस आहुती म्हणून देण्यात येतात.

होलीकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. असे म्हणतात की होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो असे देखील मान्यता आहे.

हेही वाचा: महाशिवरात्री का साजरी करतात?

Holi 2024: होलिका दहनाचे वैज्ञानिक कारण

Holi 2024: फाल्गुन महिन्यात येणारा होळी हा सण म्हणजे हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची वेळ असते. होळी सणाच्या दरम्यान वसंत ऋतूचा प्रारंभ देखील होत असतो.

वसंत ऋतु सुरू होण्याआधी थंडीच्या दिवसात आपले शरीर हे थंडीने सुस्त झालेले असते. या सुस्तीमुळे शरीरात थकवा जाणवत असतो. वसंत ऋतुच्या आगमनामुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होत असते. होलिका दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो.

Holi 2024
Holi 2024: Image Source(Facebook)

थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला उष्णता व ऊर्जा मिळण्यासाठी आणि नैसर्गिक बदल मानवाने स्वीकारण्यासाठी होलिका दहन केले जाते.

Holi 2024: धुलीवंदन आणि रंगपंचमी यातील फरक काय?

महाराष्ट्र सह संपूर्ण भारतात तेथील परंपरेनुसार होळीचा सण साजरा केला जात असतो. काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी सात दिवसांचा होळीचा सण उत्साहाने साजरा केला जातो.

होळी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडांची किंवा शेणाच्या गौऱ्यांची मांडणी करून तिची विधिवत पूजा केली जाते. होलीकेस पुरणपोळीचा नैवेद्य देखील अर्पण केला जातो. पूजा केल्यानंतर होलीकेस पेटवले जाते आणि त्याला होळी असे म्हणतात.

होळीच्या किंवा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे धुलीवंदन. धुलीवंदन म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाणारी होळीची कर. खरंतर पारंपरिक प्रथेनुसार या दिवशी होळी जाळून उरलेली राख एकमेकांवर उधळली जाते. परंतु राख न उधळता हल्ली रासायनिक रंगांचा वापर केला जातो.

हेही वाचा: गणेश जयंती आणी गणेश चतुर्थी मध्ये काय फरक आहे?

काही ठिकाणी या दिवशी संध्याकाळी गावातील प्रमुख भागात विविध वेशभूषा करून मुलं, तरुण जमतात आणि त्यांची मिरवणूक काढली जाते यालाच वीर मिरवणे असे देखील म्हणतात.

होळी किंवा होलिका दहनाच्या नंतर पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे रंगपंचमी होय. या दिवशी परस्परांमधील मतभेद दूर करून सामाजिक सलोखा जपण्यासाठी एकमेकांना रंग लावण्याची प्रथा आहे. भारतातील काही भागातच रंगपंचमी साजरी केली जाते.

Holi 2024

रंगपंचमी हा रंगांचा सण आहे. हिंदू मान्यतेनुसार विश्व हे सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेले आहे. रंगपंचमी म्हणजे रज तमाचा विजय. पूर्वी पारंपारिक पद्धतीने बनविलेले नैसर्गिक रंग वापरले जात होते. यामध्ये प्रामुख्याने फुले आणि औषधी वनस्पतींचा वापर होत असे.

असे म्हणतात की शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा प्रारंभ होत असतो. निसर्ग आपली कुस बदलत असतो. शांत वातावरण दाहकतेकडे झुकते. या दिवसात उन्हाची तीव्रता वाढत असते. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी रंगपंचमीला पाण्याचा वापर केला जातो. एकमेकांच्या अंगावर पाण्याचा मारा केल्यामुळे त्वचेला आणि शरीराला थंडावा मिळतो.

Holi 2024

Holi 2024: रंगपंचमी आणी राधा व कृष्णाची कथा

रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमी किंवा धुळवड साजरी करण्यामागे एक आख्यायिका देखील आहे. असे म्हणतात की जेव्हा कृष्णाला एका राक्षसीने विषारी दूध पाजलं होतं तेव्हा कृष्णाचा रंग निळा पडला होता. आपल्या रंगाला पाहिलं तेव्हा त्याला शंका आली की आपल्या अशा दिसण्यामुळे राधा आणि इतर गोपिका आपल्याशी बोलणार नाही आणि ही शंका कृष्णाने यशोदा माते जवळ व्यक्त केली होती.

Holi 2024
Holi 2024: Image Source(Google)

त्यावेळी यशोदा मातेने कृष्णाला सांगितलं असं कर तुला जो रंग आवडतो तो राधाला लावून ये आणि त्यानंतर कृष्णाने मातेचे बोलणे ऐकून राधेला खरंच रंग लावला आणि तेव्हापासूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली असे म्हणतात. या घटनेनंतर रंगांचा हा उत्सव साजरा होऊ लागला असे म्हंटले जाते.

हेही वाचा: मृत्युंजय मंत्राचे फायदे!

Holi 2024: होळी व रंगपंचमी साजरी करताना कोणती काळजी घ्यावी?

होळी हा सण जरी अत्यंत महत्त्वाचा असला तरी होलिका दहन करण्यासाठी कमीत कमी लाकडांचा वापर करावा. कारण मानवी लोकवस्ती वाढल्यामुळे जंगलांचे व झाडांचे दिवसेंदिवस प्रमाण कमी होत चालले आहे. होळी साजरी करण्यासाठी झाडांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

Holi 2024
Holi 2024: Image Source(Google)

बाजारात आजकाल विविध प्रकारचे रासायनिक रंग उपलब्ध आहेत. अशा रंगांमुळे शरीराला इजा पोहोचू शकते. शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करावा.

होळी सणाचे मराठी व हिंदी गीते

Holi 2024: जीवनातील अहंकार जाळूया!

निष्कर्ष:

होळी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडांची किंवा शेणाच्या गौऱ्यांची मांडणी करून तिची विधिवत पूजा केली जाते. होलीकेस पुरणपोळीचा नैवेद्य देखील अर्पण केला जातो. पूजा केल्यानंतर होलीकेस पेटवले जाते आणि त्याला होळी असे म्हणतात. होळीच्या किंवा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे धुलीवंदन.

FAQ Holi 2024:

1.होळी कधी आहे?

होलिका दहन म्हणजेच होळी 24 मार्च 2024 रोजी आहे.

2.फाल्गुन पौर्णिमा कधी आहे?

फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा 24 मार्च 2024 रोजी सकाळी 9:54 वाजता सुरू होईल आणि 25 मार्च 2024 रोजी दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल.

3.धुलीवंदन कधी आहे?

यावर्षी धुलीवंदन 25 मार्च 2024 रोजी आहे.

4.रंगपंचमी कधी आहे?

रंगपंचमी ही होळी नंतर पाच दिवसांनी 30 मार्च 2024 रोजी आहे.

5.होळी या सणाला कृषी संस्कृती बद्दल काय महत्त्व आहे?

पौराणिक कथेनुसार या सणाचे आणि कृष्ण बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा केली जाते. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे.

6.होळीचे विविध प्रांतातील नावे कोणकोणती आहेत?

होळी या सणाला होलिका दहन, किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागून, दोलायात्रा, कामदहन अशी विविध नावे आहेत.

7.शिमगा म्हणजे काय?

फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जाणारा सण म्हणजे शिमगा(होळी). कोकणात होळीचा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. मनातील राग होळीच्या दिवशी बोंबा मारून, आरोळ्या ठोकून, एखाद्याच्या नावाने शिमगा करण्याची प्रथा देखील आहे. कोकणात हा सण सुमारे पंधरा दिवस साजरा केला जातो. शिमगा उत्सव साजरा करण्याच्या विविध प्रथा आणि परंपरा आहेत. वेगवेगळे सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करतात, काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुष मंडळींनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल जवाब, शंकासुर, आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा विविध स्पर्धा होतात.

हेही वाचा: उन्हाळ्यात ताक पिण्याचे हे आहेत चमत्कारिक फायदे

माहिती आवडली असल्यास पुढे शेअर करा.

Leave a comment