HSC Result 2024|आज जाहीर होणार बारावीचा निकाल!

HSC Result 2024: इयत्ता बारावीचे विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 21/05/2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. सोशल मीडियावर निकालाबाबत अक्षरशः अफवांचा पाऊस पडलेला होता. यावर्षी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.12 टक्क्याने वाढ झालेली आहे.

HSC Result 2024: 21/05/2024 रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. यावर्षी महाराष्ट्र राज्यातून परीक्षेसाठी तब्बल 14 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

यावर्षी परीक्षेला 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यंदा निकालात कोकण विभाग आघाडीवर असून मुंबई विभागाचा शेवटचा क्रमांक लागला आहे. बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण 95.44 टक्के, तर मुलांचे प्रमाण 91.60 टक्के आहे.

कोकण विभागाचा निकाल 97.51 टक्के, नाशिक विभागाचा निकाल 94.71 टक्के, पुणे विभागाचा निकाल 94.44 टक्के, कोल्हापूर विभागाचा निकाल 94.24 टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 94.08 टक्के, अमरावती विभागाचा निकाल 93 टक्के, लातूर विभागाचा निकाल 92.36 टक्के, नागपुर विभागाचा निकाल 92.12 टक्के आणि मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 91.95 टक्के लागला.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 8782 विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण मिळाले तर 1 लाख 90 हजार 570 विद्यार्थ्यांना 75 टक्के गुण मिळाले. 4,80,631 विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण मिळाले तर पाच लाख 26 हजार 425 विद्यार्थ्यांना 45 टक्के गुण मिळाले. 35 ते 45 टक्के गुण मिळवणारे तब्बल 1 लाख 32 हजार 58 विद्यार्थी आहेत.

HSC Result 2024

HSC Result 2024: निकालासाठी अधिकृत संकेतस्थळ

1maharesult.nic.in
2http://hscresult.mkcl.org
3www.mahahscsscboard.in
4https://results.digilocker.gov.in
5www.tv9marathi.com
6http://results.targetpublications.org

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपलब्ध संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे  Digilocker app मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

HSC Result 2024

www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकाला सोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahscsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होतील.

HSC Result 2024: असा पहा निकाल

1) प्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

2) संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर होम पेजवर HSC Examination Feb – 2024 Result या टॅब वर क्लिक करा.

3) दिलेल्या सूचनांचे पालन करून परीक्षेचा आसन क्रमांक (सीट नंबर), जन्मतारीख व आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.

4) यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

5) यानंतर निकालाची प्रिंट आऊट काढून घ्या.

हेही वाचा: हे आहेत नाशिक मधील सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजेस

HSC Result 2024: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

1) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://vetification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक 22/05/2024 ते बुधवार, दिनांक 05/06/2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील. त्यासोबतच ऑनलाइन पद्धतीने शुल्क Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking याद्वारे भरता येतील.

HSC Result 2024

2) फेब्रुवारी – मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेच्या उत्तर पत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तर पत्रिकेची प्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील.

3) फेब्रुवारी – मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै – ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी – मार्च 2025) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

4) जुलै – ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षा व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक 27/05/2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

हेही वाचा: ITI प्रवेशासाठी विदयार्थ्यांची पसंती! जाणून घ्या ITI ची संपूर्ण माहिती

मागील वर्षाचा (2023) निकालाचा आढावा:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा 2023 चा निकाल 91.25 टक्के लागला होता. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.01 टक्के लागला होता. 2023 च्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली होती. मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला होता तर मुलांचा निकाल 81 टक्के लागला होता.

2023 साली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 1428194 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती त्यापैकी 416371 परीक्षेसाठी बसले होते, 1292468 विद्यार्थी पास झाले होते. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 774155 मुले होते तर 654039 मुली होत्या. प्रत्यक्षात परीक्षेसाठी बसलेल्या मुलांची संख्या 767386 होती तर मुलींची संख्या 648985 इतकी होती.

पुणे विभागाचा निकाल 93.34 टक्के, नागपूर विभागाचा निकाल 90.35 टक्के, छत्रपती संभाजी नगर विभागाचा निकाल 91.85 टक्के, मुंबई विभागाचा निकाल 88.13 टक्के, कोल्हापूर विभागाचा निकाल 93.28 टक्के, अमरावती विभागाचा निकाल 92.75 टक्के, नाशिक विभागाचा निकाल 91.66 टक्के, लातूर विभागाचा निकाल 90.37 टक्के आणि कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला होता.

2023 साली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या सायन्स शाखेचा निकाल 96.09 टक्के, आर्ट्स शाखेचा निकाल 84.05 टक्के आणि वाणिज्य शाखेचा निकाल 90.42 टक्के लागला होता.

2023 साली राज्यात शंभर टक्के निकाल लागलेली 2369 महाविद्यालये होती. या महाविद्यालयांमधील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेले होते. 2023 साली कॉपी विरोधातील मोहीमेत 11 गुन्हे दाखल झाले होते.

HSC Result 2024 – निष्कर्ष:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 21/05/2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला असून विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच निकाल हा फक्त अधिकृत संकेतस्थळावरच पहावा.

HSC Result 2024 वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

1) Maharashtra HSC Result 2024 ची तारीख व वेळ काय आहे?

Maharashtra HSC Result 2024 ची तारीख 21/05/2024 व वेळ दुपारी 1 वाजता आहे.

2) इयत्ता बारावीचा निकाल हा ऑनलाईन की ऑफलाईन जाहीर होणार?

इयत्ता बारावीचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार.

हेही वाचा: लाखोंचे पॅकेज देणारे पुण्यातील सर्वोत्तम इंजिनियरिंग कॉलेजेस

Leave a comment