International Workers Day 2024: 1880 च्या दशकात अमेरिकेतील लाखो कामगारांनी केलेल्या उठावामुळे कामगारांना त्यांचे हक्क मिळाले. कुठल्याही देशाच्या विकासात तेथील कामगारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कामगारांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हा जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. पूर्वी भारतात देखील शंभराहून अधिक कायदे कामगारांसाठी होते.
श्रमसहिता अधिनियम 2019 अंतर्गत या सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून नवीन चार कायदे आणण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार भारतात सप्टेंबर 2020 मध्ये भारतात कोड ऑफ वेजेस, द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी, द इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड ही विधेयके दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आली होती.
आज जवळपास नोकरी करणाऱ्या सर्वांनाच कामाचे तास आणि सुट्टी, कामाच्या ठिकाणी लैंगिक समानता, महिला आणि बाळंतपण, कर्मचारी भविष्य निधी, विमा, ग्रॅच्युइटी, इत्यादी नियमांविषयी माहिती असते. परंतु ग्रॅच्युइटी बद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम असतो. ग्रॅच्युइटी कधी मिळते, ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते, ग्रॅच्युइटीचे नियम व कायदे काय, ग्रॅच्युइटीसाठी कोण पात्र असते, इत्यादी अनेक प्रश्न नेहमी वारंवार विचारले जात असतात. चला तर मग जाणून घेऊया कामगार दिनानिमित्त ग्रॅच्युइटीचे नियम.
ग्रॅच्युइटी
International Workers Day 2024: ग्रॅच्युइटी चा अर्थ
नोकरी करणारी प्रत्येक व्यक्ति मग सरकारी असो किंवा खाजगी नोकरी, प्रत्येकाला असे वाटते की आपल्याला केलेल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा. अनेक वर्ष प्रामाणिकपणे नोकरी केल्याने दरमहा पगार तर मिळतोच परंतु नोकरी सोडताना तुम्हाला एक विशिष्ट रक्कम दिली जाते आणि त्यालाच ग्रॅच्युइटी असे म्हणतात.
थोडक्यात ग्रॅच्युइटी म्हणजे दीर्घकाळ नोकरी केल्याबद्दल बक्षीस म्हणून दिलेली रक्कम आहे. ग्रॅच्युएटीची रक्कम ही एका ठराविक सूत्रानुसार दिली जाते परंतु जर कंपनीची इच्छा असेल तर कंपनी कर्मचाऱ्यांना निश्चित सूत्रापेक्षा जास्त रक्कम देखील देऊ शकते. यासाठी कर्मचाऱ्याकडून कोणतेही योगदान घेतले जात नाही.
International Workers Day 2024: ग्रॅच्युइटीचा कायदा
भारतात पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी कायदा 1972 मध्ये अंमलात आलेला आहे. या कायद्याअंतर्गत सरकारी किंवा खाजगी कंपनीत 10 किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करत असतील तर त्या कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीचा लाभ द्यावा. कंपनी व्यतिरिक्त दुकाने, बंदरे, कारखाने, खाणी या कायद्याअंतर्गत येतात. ग्रॅच्युइटी चा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याने कंपनीत सलग 5 वर्षे काम करणे अनिवार्य आहे.
International Workers Day 2024: ग्रॅच्युइटी कधी व किती मिळते?
ग्रॅच्युइटीसाठी पात्र होण्यासाठी कर्मचाऱ्याने काही निकष पूर्ण केले पाहिजेत. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा 1972 नुसार कर्मचाऱ्याने जर निकष पूर्ण केलेले असतील तर त्याला ग्रॅच्युइटीची रक्कम मिळते.
ग्रॅच्युइटी पात्रतेचे निकष
1) नोकरीचा कालावधी
ग्रॅच्युइटीचा लाभ घेण्यासाठी कर्मचार्याने कमीत कमी 5 वर्ष एकाच कंपनीत सतत नोकरी केलेली असावी. एकाच कंपनीत सलग 5 वर्षे काम करत असताना कर्मचाऱ्यास कुठल्याही प्रकारचा ब्रेक दिलेला नसावा. तथापि कर्मचाऱ्याचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या बाबतीत ही अट शिथिल केली जाऊ शकते.
2) कर्मचारी सेवानिवृत्तीसाठी पात्र असला पाहिजे. म्हणजेच कंपनीने निश्चित केलेले सेवेचे/नोकरीचे कमाल वय कर्मचाऱ्यांनी गाठलेले हवे.
3) कर्मचाऱ्याने एकाच कंपनीमध्ये सतत 5 वर्षे नोकरी केल्यानंतर स्वेच्छानिवृत्तीचा राजीनामा दिलेला असावा.
ग्रॅच्युइटीची रक्कम मोजण्याचे सूत्र (ग्रॅच्युइटी फॉर्मुला)
ग्रॅच्युइटी = (A × B × 15) / 26
येथे,
A = कर्मचाऱ्यांने पूर्ण केलेला सेवा कालावधी
B = कर्मचाऱ्याचा शेवटचा मूळ पगार + महागाई भत्ता
महिन्यातील चार दिवस आठवड्याची सुट्टी असल्याने, महिन्याची 26 दिवस मोजले जातात आणि 15 दिवसांच्या आधारे ग्रॅच्युइटी मोजली जाते.
उदाहरणार्थ, सचिन नावाच्या व्यक्तीने XYZ कंपनीत 8 वर्षे नोकरी केली आणि सचिनने राजीनामा दिला. राजीनामा देतेवेळी त्याचा शेवटच्या महिन्याचा पगार ( मूळ पगार + महागाई भत्ता ) हा रु. 45,000 होता.
ग्रॅच्युइटीची रक्कम = (शेवटचा काढलेला पगार × कामाचा कालावधी × 15) / 26
ग्रॅच्युइटीची रक्कम = ( 45000 × 8 × 15) / 26
ग्रॅच्युइटीची रक्कम = रु. 207,692.308
एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ग्रॅच्युईटीची रक्कम त्या कर्मचाऱ्याच्या सेवा अटींच्या आधारे मोजली जाते.
एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत 4 वर्षे 8 महिने काम केले असेल तर त्याची नोकरी पूर्ण 5 वर्षे मानली जाईल आणि त्याला ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जाईल.
नोटीस कालावधी देखील ग्रॅच्युइटीच्या कालावधीत गणला जातो.
International Workers Day 2024
जर कर्मचाऱ्याची कंपनी ग्रॅच्युइटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत नसेल तर कर्मचारी ग्रॅच्युइटी कायद्याअंतर्गत येत नाही. अशा परिस्थितीत ग्रॅच्युइटी देणे किंवा न देणे हे कंपनीच्या हातात असते. अशा परिस्थितीत जर कंपनीला एखाद्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी द्यायची असेल तर ग्रॅच्युइटीची रक्कम प्रत्येक वर्षाच्या अर्ध्या महिन्याच्या पगाराच्या बरोबरीची असेल. परंतु एका महिन्यातील कामकाजाच्या दिवसांची संख्या 26 नसून 30 दिवस मोजली जाईल.
कुठलीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 20 लाख रुपये पर्यंत ग्रॅच्युइटी देऊ शकते. ग्रॅच्युइटीची मीळणारी रक्कम ही करमुक्त आहे.
International Workers Day 2024: ग्रॅच्युइटीची जप्ती
एखाद्या कर्मचाऱ्यांनी 5 वर्ष सतत नोकरी केलेली असेल तरी देखील संबंधित कंपनीला ग्रॅच्युइटी जप्त करण्याचा अधिकार आहे. परंतु ही परिस्थिती केवळ तेव्हाच कार्य करू शकते जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या गैरवर्तनामुळे कामावरून काढून टाकले असेल.
नक्कीच ग्रॅच्युइटीची एक रकमी मिळणारी रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. जर एखादा कर्मचारी नोकरी करून नियमानुसार सेवानिवृत्त झाला तर त्याला मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेची कर्मचाऱ्यांनी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. हल्लीच्या धकाधकीच्या काळात अनपेक्षित खर्च कधीही येऊ शकतो, त्यामुळे अशा अनपेक्षित खर्चासाठी आवश्यक ती तरतूद करून ठेवायला हवी.
International Workers Day 2024
ग्रॅच्युइटीची रक्कम ही कर्ज फेडण्यासाठी, रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, इत्यादी अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी वापरू शकतात.
निष्कर्ष:
ग्रॅच्युइटी म्हणजे दीर्घकाळ नोकरी केल्याबद्दल बक्षीस म्हणून कंपनीने/संस्थेने दिलेली रक्कम आहे. ग्रॅच्युएटीची रक्कम ही एका ठराविक सूत्रानुसार दिली जाते. एखाद्या कंपनीत 10 किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करत असतील तर त्या कंपनीचे सर्व कर्मचारी ग्रॅच्युइटी साठी पात्र आहेत.
हेही वाचा: महाराष्ट्र दिन, शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देणारा ऐतिहासिक दिवस!
International Workers Day 2024 FAQ:
1) ग्रॅच्युइटी म्हणजे काय?
ग्रॅच्युइटी म्हणजे दीर्घकाळ नोकरी केल्याबद्दल बक्षीस म्हणून कंपनीने/संस्थेने दिलेली रक्कम आहे.
2) ग्रॅच्युइटीसाठी कोण पात्र आहेत?
एखाद्या कंपनीत 10 किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करत असतील तर त्या कंपनीचे सर्व कर्मचारी ग्रॅच्युइटी साठी पात्र आहेत. ग्रॅच्युइटीचा लाभ घेण्यासाठी कर्मचार्याने कमीत कमी 5 वर्ष एकाच कंपनीत सतत नोकरी केलेली असावी.
3) ग्रॅच्युइटी सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होते की खाजगी कर्मचाऱ्यांना?
ग्रॅच्युइटी ही सरकारी आणि खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होते.
हेही वाचा: म्हणून 1 मे ला साजरा करतात कामगार दिन!
4) ग्रॅच्युइटी रक्कम करमुक्त (टॅक्स फ्री) असते का?
ग्रॅच्युइटीची 20 लाखापर्यंतची रक्कम ही करमुक्त असते.
5) कर्मचारी ग्रॅच्युइटीचा दावा कधी करू शकतात?
कर्मचारी निवृत्तीच्या वेळी त्यांच्या कंपनीकडून ग्रॅच्युइटीच्या रकमेवर हक्क सांगू शकतात. एखादया कर्मचाऱ्याचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास किमान पाच वर्षे सेवा चालू ठेवणे वैध राहणार नाही.
International Workers Day 2024
6) कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी कोणत्या कायद्याअंतर्गत मिळते?
भारतात पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा 1972 या कायद्याअंतर्गत सरकारी किंवा खाजगी कंपनीत 10 किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करत असतील तर त्या कंपनीनीतील सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.
7) कंपनीच्या दिवाळखोरीच्या काळात कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते का?
कंपनीच्या दिवाळखोरीच्या परिस्थितीतही, कंपनी कायदेशीररित्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देण्यास बांधील आहे.
8) एखाद्या कंत्राटी कर्मचाऱ्याने 5 वर्ष नोकरी करून राजीनामा दिल्यास त्याला ग्रॅच्युइटी मिळते का?
जर कर्मचारी कंपनी पेरोलवर काम करत असेल आणि कंपनीचा कर्मचारी मानला जात असेल तसेच कर्मचाऱ्याने 5 वर्ष नियमित नोकरी केलेली असेल तर त्याला ग्रॅच्युइटी मिळते.
9) ग्रॅच्युइटीसाठी नोटीस कालावधी ग्राह्य धरला जातो का?
होय. ग्रॅच्युइटीसाठी नोटीस कालावधी ग्राह्य धरला जातो.
10) एखाद्या कर्मचार्याने 5 वर्ष नोकरी न करता राजीनामा दिल्यास त्याला ग्रॅच्युइटी मिळते का?
ग्रॅच्युइटी कायद्यानुसार, कर्मचाऱ्याने नोकरीचे 5 वर्षे पूर्ण केल्यानंतरच त्याला ग्रॅच्युइटी मिळू शकते. जर 5 वर्षांच्या नोकरीच्या आधी राजीनामा दिल्यास ग्रॅच्युइटी मिळत नाही.
11) ग्रॅच्युइटी व पीएफची रक्कम दोघांचा अर्थ एकच होतो का?
नाही. पीएफ म्हणजे भविष्य निर्वाह निधी. भविष्य निर्वाह निधी हा भारतातील बचत आणि सेवानिवृत्ती निधी आहे जो सामान्यतः पगारदार कर्मचारी आणि त्यांच्या नियुक्तांद्वारे स्थापित केला जातो आणि त्यात योगदान देखील दिले जाते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वर्षांमध्ये आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा सरकार समर्थित उपक्रम आहे. कर्मचाऱ्यांनी नियुक्ती दोघेही निधीमधे नियमित योगदान देतात. ग्रॅच्युइटी म्हणजे दीर्घकाळ नोकरी केल्याबद्दल बक्षीस म्हणून कंपनीने/संस्थेने दिलेली रक्कम आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास सर्व नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेअर करा.