International Yoga Day 2024: बदलते तंत्रज्ञान व आधुनिक जीवनशैली यांचा परिणाम हा मानवी जीवनावर होताना दिसत आहे. धावपळीच्या या युगात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपणे खूप महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यौगिक जीवनशैली कशी आचरणात आणायची हे जाणून घेऊया.
सामग्री सारणी
International Yoga Day 2024 – यौगिक जीवनशैली:
International Yoga Day 2024: योग म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचे असल्यास योग म्हणजे “समत्वं योग उच्चते”. याचा अर्थ कुठल्याही परिस्थितीत समभाव ठेवणे म्हणजे योग आहे. आपल्यापैकी अनेक जणांना प्रश्न पडेल की समभाव ठेवायचा म्हणजे नक्की काय करायचं? आपल्या जीवनामध्ये जे द्वंद्व आहे म्हणजे मान – अपमान, जय – पराजय किंवा लाभ – हानी अशा विविध परिस्थितीमध्ये आपल्या मनाची स्थिरता टिकून ठेवणे म्हणजेच योग आहे. या सर्वांमध्ये मनाची स्थिरता टिकून ठेवणे हे अत्यंत अवघड व महत्त्वाचे कार्य आहे.

यौगिक जीवनशैली – उद्देश:
1) आपले आयुष्य सुखी व समाधानी व्हावे.
2) रोग रहित जीवन यापण करता यावे. एखादी व्यक्ती जर अर्धा तास योग करत असेल तर बाकीची तेवीस तास, तीस मिनिटे त्या व्यक्तीची दिनचर्या कशी आहे ते देखील महत्वाचे आहे. वास्तविक योगा अर्धा ते एक तासासाठी मर्यादित नसून तो आपल्या जीवनशैलीचा एक भाग झाला पाहिजे.
अष्टांग योग:
International Yoga Day 2024: यौगिक जीवनशैली आचरण्यात आणण्यासाठी जो प्रचलित योग आहे तो म्हणजे अष्टांग योग. अष्टांग योगात प्रामुख्याने यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे आठ अंग येतात. या आठ अंकांचा आपल्या जीवनशैलीत उपयोग करून घेणे म्हणजे यौगिक जीवनशैली होय. योगाभ्यासाच्या या टप्प्यांमध्ये सामाजिक आणि वैयक्तिक वर्तन सुधारण्याची आणि शरीरातील ऑक्सिजनयुक्त रक्ताचे परिसंचरण सुधारून, इंद्रियांवर नियंत्रण ठेवून आणि मन आणि आत्म्याची शांती आणि स्थिरता निर्माण करून शारीरिक आरोग्याला चालना देण्याची क्षमता आहे.
योगाचा सराव काही मनोवैज्ञानिक रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आणि वैयक्तिक प्रतिकार शक्ती आणि तणावपूर्ण परिस्थिती सहन करण्याची क्षमता सुधारण्यासाठी देखील उपयुक्त असल्याचे आढळले आहे. योगा एक प्रेरक, प्रतिबंधात्मक पुनर्वसन आणि आरोग्याच्या एकूणच वाढीसाठी उपचारात्मक हस्तक्षेप आहे.
आरोग्य सुधारण्यासाठी, रोग टाळण्यासाठी आणि रोग बरा करण्यासाठी योगसाहित्यामध्ये अनेक आसनांचे वर्णन केले आहे. शारीरिक आसनांची योग्य निवड आणि सराव योग्यरीत्या केल्याने रोग प्रतिबंधन, आरोग्य संवर्धन आणि उपचारात्मक उपयोगाचे अनेक फायदे मिळतात.

1) यम:
अहिंसा: दुसऱ्या एखाद्या जीवास पिडा होईल असे वर्तन करू नये.
सत्य: म्हणजे जे स्वयंप्रकाशित आहे. याचा दुसरा अर्थ असा देखील होतो की आपल्या कर्मात एकरूपता हवी. आपल्या मनात काही वेगळे, आपण बोलतो काही वेगळे आणि करतो काही वेगळे असे व्हायला नको.
अस्तेय: अस्तेय म्हणजे चोरी न करणे.
ब्रह्मचर्य: ब्रह्मचर्य म्हणजे रोजच्या रोजचे नियम पाळणे. म्हणजेच जर आपण मंदिरात गेलो तर दर्शनाला जाण्याआधी आपण चपला बाहेर काढतो, जर आपण एखाद्या संस्थेत गेलो किंवा कार्यक्षेत्रात गेलो तर तेथील नियम हे पाळले गेले पाहिजे.
अपरिग्रह: अधिक विचार करू नये व गरजेपेक्षा अधिक गोष्टींचा संचय/संग्रह करू नये.
2) नियम:
शौच: रोज सकाळी उठल्यानंतर आपली शारीरिक शुद्धी केली पाहिजे.
संतोष: न थकता, न हारता सर्व प्रयत्न करून आपन जे काही मिळवत असाल त्यात समाधान मानायचे.
तप: आसने करणे.
स्वाध्याय: रोजच्या रोज काहीतरी वाचने किंवा अभ्यास करणे.
ईश्वर प्रणिधानानी: आपण दिवसभरात जे काही कमवले असेल किंवा शिकले असेल त्याचे श्रेय स्वतःला न घेता ईश्वराला अर्पण करणे.
3) आसन:
प्रत्येक स्वस्थ माणसाने पुढील प्रमाणे आसने करायला हवीत.
– पुढे वाकण्याची आसने
– मागे वाकण्याची आसने
– डाव्या व उजव्या बाजूला वाकण्याची आसने
वरील आसने करताना काही नियम व मर्यादा आहेत.

4) प्राणायाम:
प्रत्येक स्वस्थ माणसाने पुढील प्रमाणे रोज प्राणायाम करायला हवे.
– कपालभाती
– भ्रामरी
– अनुलोम-विलोम
– शीतली, शीतकारी (ग्रीष्म ऋतूत)
– विभागीय श्वासन
5) ध्यान:
प्रत्येक स्वस्थ व्यक्तीने रोज सकाळी उठुन कमीत कमी 15 मिनिटे, अर्धा तास किंवा एक तास जसे शक्य होईल तसे ध्यान केले पाहिजे.

International Yoga Day 2024 – आंतरराष्ट्रीय योग दिवस व त्याचे महत्त्व:
संपूर्ण जगभरात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योग ही शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवर भर देणारी प्राचीन भारतीय प्रथा असून योगाच्या अनेक फायद्यांबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून योगाची लोकप्रियता प्रचंड वाढलेली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, “योग” हा शब्द संस्कृत मूळ “यूज” पासून आला असून, त्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्रित होणे असा होतो. योगशास्त्राच्या मते योगाच्या निमित्त अभ्यासामुळे वैयक्तिक चेतनेचे वैश्विक चेतनेशी एकीकरण होते आणी ते मन आणि शरीर, मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील परिपूर्ण सुसंवाद दर्शवते.
सशक्त आणि लवचिक शरीर, तजलेदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, उत्तम आरोग्य अशा अनेक गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील त्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे.
21 जून या तारखेलाच योग दिवस का साजरा केला जातो?
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की 21 जून या दिवशी उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. जगाच्या अनेक भागांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व असते.
अशी झाली सुरवात योग दिन साजरा करण्याची:
सप्टेंबर 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना आपल्या भाषणादरम्यान वार्षिक आंतरराष्ट्रीय योग दिवस स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी योगाचे कल्याणकारी फायदे सांगितले होते. पंतप्रधान मोदींनी 21 जून ही योग दिवस साजरा करण्यासाठी उत्तम तारीख आहे असे सुचवले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ठरावाला व्यापक जागतिक समर्थन मिळाले होते. 177 राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत या ठरावाला एक मताने पारित केले होते. त्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 रोजी नवी दिल्ली, न्यूयॉर्क, पॅरिस, बीजिंग, बँकॉकसह जगभरात यशस्वीपणे साजरा करण्यात आला होता.
21 जून 2015 रोजी आयुष मंत्रालयाने भारतात आवश्यक ती व्यवस्था केलेली होती. पंतप्रधान मोदी आणि 84 देशातील मान्यवरांसह 35,985 लोकांनी नवी दिल्लीतील राजपद येथे 35 मिनिटांसाठी 21 आसने केली होती.
संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव स्वीकारल्यानंतर भारतातील अध्यात्मिक चळवळीतील अनेक नेत्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला. आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक श्री. रविशंकर यांनी मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक करताना म्हटले होते की, “कोणत्याही तत्त्वज्ञान धर्म किंवा संस्कृतीला राज्याच्या संरक्षणाशिवाय जगणे फार कठीण आहे. योग आतापर्यंत जवळजवळ अनाथाप्रमाणे अस्तित्वात आहे. आता अधिकृत मान्यता मिळाली आहे. यू एन योगाच्या फायद्याचा प्रसार करेल”.
International Yoga Day 2024 – आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम:
संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन एका विशिष्ट थीमनुसार साजरा केला जातो. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा दहावा वर्धापन दिन आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘ स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ अशी आहे.

असे करा प्रतिज्ञा प्रमाणपत्र डाऊनलोड:
21 जून 2024 रोजी भारतासह संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. “स्वयं आणि समाजासाठी योग ” या थीमसह भारत सरकार आपली वचनबद्धता दृढ करण्यासाठी एक विशेष संधी देत आहे.
मागील वर्षांच्या परंपरेचे पालन करून तुम्ही शपथ घेऊ शकता आणि तुमच्या योगासन समर्पणाची स्मरण करण्यासाठी प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता. यावर्षी ही प्रतिज्ञा योग आयुष संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रतिज्ञापत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
निष्कर्ष:
योग हा प्रत्येकासाठी, सर्व जातींसाठी, सर्व धर्म आणि संस्कृतींसाठी आहे. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि भावणीकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी योग महत्वाचा आहे. योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याची आपण सर्व शपथ घेऊया.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1) योगा कोण करू शकतो?
कोणतीही स्वस्थ व्यक्ती योगा करू शकते.
2) रोज योगा करू शकतो का?
जर तुम्ही स्वस्थ असाल आणि तुमचा योगाभ्यास अधिक प्रगत असेल तर तुम्ही रोज योगा करू शकता.
3) योगामुळे चिंता कमी होते का?
योगासन, ध्यान, विश्रांती तंत्रे आणि प्राणायाम यांच्या नित्य सरावाने ताणतणाव व चिंता कमी होण्यास मदत होते.
4) पुढे वाकण्याची आसने कोणती?
ज्या आसनांमध्ये व्यक्तीला कमरेपासून पुढे वाकावे लागते त्या आसनांना पुढे वाकण्याची आसने म्हणतात.
5) मागे वाकण्याची आसने कोणती?
ज्या आसनांमध्ये व्यक्तीला कमरेपासून मागे वाकावे लागते त्या आसनांना पुढे वाकण्याची आसने म्हणतात.
6) ज्या व्यक्तींकडे आसने करण्यासाठी वेळ नसेल तर त्या व्यक्तींनी कोणती योगासने करावीत?
सूर्यनमस्कार.
7) योगाचे महत्त्वाचे फायदे कोणते?
ताण-तणावापासून मुक्तता, उत्तम आरोग्य, रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होणे, ऊर्जा शक्ती वाढते, शरीरात लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते, वजनात घट होते, असे अनेक फायदे आहेत.
हेही वाचा: पावसाळ्यात डासांमुळे पसरतो जीवघेणा आजार, जाणून घ्या डासांविषयी अधिक माहिती.
योगविषयी वरील माहितीसाठी डॉ. रचना आवारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. डॉ. रचना आवारे ह्या उच्च शिक्षित असून योग ह्या विषयामद्धे त्यांनी वैद्यकीय पदवी डॉक्टर ऑफ मेडिसिन (MD) प्राप्त केली आहे. डॉ. रचना आवारे यांचे स्वतःचे Youtube चॅनल देखील असून त्यावर अनेक उपयोगी व्हिडिओ आहेत. Youtube चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती पुढे शेअर करा.