ITI Admission 2024|ITI साठी विदयार्थ्यांची पसंती

ITI Admission 2024: जागतिकीकरण आणि संगणकीकरणामुळे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे व मानवी व्यवहारातही मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या भवितव्याची वाटचाल सोयीस्कर होण्याकरिता पुढील शिक्षणाच्या विविध पर्यायांचा शोध घेत असतात. काही विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सचा पर्याय निवडतात तर काही विद्यार्थी इंजीनियरिंग डिप्लोमाचा पर्याय निवडतात. झटपट नोकरी मिळवण्याच्या हिशोबाने हल्ली ग्रामीण भागासोबत शहरी भागातील विद्यार्थ्यांचा कल हा ITI ला प्रवेश घेण्याकडे वाढत आहे.

भविष्यातील स्वप्ने साकार होण्यासाठी भविष्यकाळात रोजगार उपयोगी ठरणारे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. सध्याचा परिस्थितीत पारंपारिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्याचबरोबर तांत्रिक व्यवसायिक शिक्षण महागडे सुद्धा झालेले असून अशा परिस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विविध व्यवसायांचे कौशल्य शिकविणारे प्रशिक्षण हे रोजगार व स्वयंरोजगारासाठी वरदानच ठरत आहे. चला तर मग जाणून घेऊया ITI म्हणजे काय? ITI प्रवेश प्रक्रिया व उपलब्ध असलेले अभ्यासक्रम, रोजगाराच्या संधी इत्यादी.

ITI Admission 2024: ITI म्हणजे काय?

ITI चा फुल फॉर्म Industrial Training Institute म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था असा होतो. ही शासनाची किंवा शासनाची मान्यता असलेली शिल्पकारागीर प्रशिक्षण देणारी संस्था होय. कुशल कामगार तयार करणे व विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट असते.

महाराष्ट्र राज्यात 400 हून अधिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Government ITI) आणि 350 हून अधिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Private ITI) आहेत. या संस्थांमध्ये शंभरहून अधिक प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ITI ला प्रवेश घेतात.

वाढत्या औद्योगीकरणामुळे केवळ देशातच नव्हे तर जगभरात विविध स्वरूपातील तंत्रज्ञाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा अभाव सर्वत्र जाणवत आहे. उद्योग क्षेत्रातील मनुष्यबळाची वस्तुस्थिती अशी असताना महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आलेली आहे.

औद्योगिक क्षेत्रासाठी कुशल कामगार उपलब्ध करून देणे हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. उद्योग धंदांच्या मागणीनुसार प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ पुरवण्यावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था भर देतात.

ITI Admission 2024: ITI अभ्यासक्रम

शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेची ठळक वैशिष्ट्ये

राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एकूण 83 प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात अभियांत्रिकी गटातील एक वर्ष कालावधीचे एकूण 18 व्यवसाय अभ्यासक्रम, दोन वर्ष कालावधीचे एकूण 37 व्यवसाय अभ्यासक्रम तसेच बिगर अभियांत्रिकी गटात एक वर्ष कालावधीचे 28 व्यवसाय अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

ITI Admission 2024
ITI Admission 2024

प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांनी निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांच्याकडून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेचे (NCVT) राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (National Trade Certificate-NTC) दिले जाते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिक (Practical) भाग 70 टक्के व सैद्धांतिक भाग 30 टक्के आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर रोजगार व स्वयंरोजगार बरोबर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश दिला जातो.

राज्यातील सर्व समाज घटकांना व्यवसाय शिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे वर्गीकरण खालील प्रमाणे आहे.

ITI Admission 2024
ITI Admission 2024

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्रकार
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
सर्वसाधारण औद्योगिक प्रशिक्षण संस्था307
आदिवासी उमेदवारांसाठी61
फक्त महिलांसाठी15
आदिवासी आश्रम शाळांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था28
अनुसूचित जाती व नवबौद्ध उमेदवारांसाठी4
अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी2
अतिरेकी कारवाईग्रस्त जिल्ह्यातील युवकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था2
ITI Admission 2024

शिकाऊ उमेदवारी योजना

युवकास आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर उद्योगात असणाऱ्या प्रक्रियांमध्ये लागणारी यंत्रसामग्री तसेच नवीन व आधुनिक तंत्रज्ञानानुसार औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारे यंत्रसामग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करून सर्वदृष्टीने पूर्ण कुशल बनवण्यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आली आहे.

देशातील खाजगी निमशासकीय व शासकीय उद्योग धंद्यानच्या गरजांप्रमाणे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने उद्योगधंद्यांमध्ये इंजिनिअरिंग, केमिकल, प्रिंटिंग, केटरिंग इत्यादी 39 गटात वर्गीकरण केले असून 258 व्यवसाय निर्देशित केले आहेत. महाराष्ट्र राज्यातील एकूण 181 व्यवसायात प्रशिक्षण देण्यात येते.

व्यवसायाचे नावव्यवसायाचा प्रकारकालावधी
ड्रेस मेकिंगबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजीबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
सुईंग टेक्नॉलॉजीबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
सरफेस ऑरनामेंटेशन टेक्निक्स (भारतकाम)बिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
मेकॅनिक एग्रीकल्चर मशीनरीअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंगअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअरअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
मेकॅनिक डिझेलअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
मेकॅनिक मोटर वेहिकलअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
मेकॅनिक ट्रॅक्टरअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
मेकॅनिक टू व्हीलर अँड थ्री व्हीलरअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
पंप ऑपरेटर कम मेकॅनिकअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
बेसिक कॉस्मोटोलॉजीअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
प्रशितन व वातानुकूलित टेक्निशियनअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
वैमानिकी रचना व उपकरणे संधाताअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
ड्राफ्ट्समन मेकॅनिकलअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
जोडारीअभियांत्रिकी मशीन गट2 वर्ष
फौंड्रीमन अभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
यंत्र कारागीरअभियांत्रिकी मशीन गट2 वर्ष
यंत्र कारागीर घर्षकअभियांत्रिकी मशीन गट2 वर्ष
मरीन फिटर  अभियांत्रिकी मशीन गट2 वर्ष
मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्सअभियांत्रिकी मशीन गट2 वर्ष
ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टूल्सअभियांत्रिकी मशीन गट2 वर्ष
पत्रे कारागीरअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्सअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
टेक्सटाइल्स मेकॅट्रॉनिक्सअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
टूल अँड डायमेकर (डाईझ अँड मोल्ड)अभियांत्रिकी मशीन गट2 वर्ष
टूल अँड डायमेकर (प्रेस टूल्स, जिग्ज अँड फिक्चर)अभियांत्रिकी मशीन गट2 वर्ष
कातारीअभियांत्रिकी मशीन गट2 वर्ष
संधाताअभियांत्रिकी मशीन गट1 वर्ष
संधाता (GMAW & GTAW)अभियांत्रिकी मशीन गट1 वर्ष
अटेंडन्ट ऑपरेटर (केमिकल प्लांट)अभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
इलेक्ट्रोप्लेटरअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)अभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट)अभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटरअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
आर्किटेक्चरल ड्रॉफ्समनअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
सुतारकामअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
ड्रफ्समन सिव्हिलअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशनअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
गवंडीअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
रंगारीअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
सर्व्हेअरअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षकबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
मेकॅनिक कंझुमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
टेक्निशिअन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम्सअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
टेक्निशिअन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
बेकर अँड कन्फेक्शनरबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
फूड प्रोडक्शनबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंगबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
डेंटल लॅबोरेटरी इक्विपमेंट टेक्निशियनबिगर अभियांत्रिकी गट2 वर्ष
हेल्थ सॅनेटरी इन्स्पेक्टर बिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
फिजिओथेरपी टेक्निशियनबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्सबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटरबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्सअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
आय ओ टी टेक्निशियनबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
मल्टीमीडिया ॲनिमेशन अँड स्पेशल इफेक्टबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
डिजिटल फोटोग्राफरबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
फोटोग्राफरबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
सेक्रेटरियल प्रॅक्टिसबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
स्टेनोग्राफर सेक्रेटरीयल असिस्टंटबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
नळ कारागीरअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
विजतंत्रीअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
लिफ्ट अँड एस्कलेटर मेकॅनिकअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
तारतंत्रीअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
रबर टेक्निशियनअभियांत्रिकी बिगर मशीन गट1 वर्ष
फायर टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंटबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
स्पिनिंग टेक्निशियनअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
टेक्सटाईल्स वेट प्रोसेसिंग टेक्निशियनअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
विव्हींग टेक्निशियनअभियांत्रिकी बिगर मशीन गट2 वर्ष
फूड अँड बेव्हरेज सर्विस असिस्टंटबिगर अभियांत्रिकी गट2 वर्ष
फ्रंट ऑफिस असिस्टंटबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
हॉस्पिटल हाउसकीपिंगबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
हाउसकीपरबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर दिव्यांगबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
GEO Informatics Assistantबिगर अभियांत्रिकी गट1 वर्ष
Solar Technician Electricalअभियांत्रिकी गट1 वर्ष
ITI Admission 2024

ITI Admission 2024 प्रवेश पात्रता:

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 14 ते 40 वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

आयटीआय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता निवडलेल्या अभ्यासक्रमानुसार बदलते. इयत्ता आठवी ते बारावी पास/नापास विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

व्यवसायाचे नावप्रवेशासाठी पात्रता
ड्रेस मेकिंगइ.10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजीइ.10वी उत्तीर्ण
सुईंग टेक्नॉलॉजीइ.10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
सरफेस ऑरनामेंटेशन टेक्निक्स (भरतकाम)इ.10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
मेकॅनिक एग्रीकल्चर मशीनरीइ.10वी उत्तीर्ण
मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंगइ.10वी उत्तीर्ण
मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअरइ.10वी उत्तीर्ण
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सइ.10वी उत्तीर्ण
मेकॅनिक डिझेलइ.10वी उत्तीर्ण
मेकॅनिक मोटर वेहिकलइ.10वी उत्तीर्ण
मेकॅनिक ट्रॅक्टरइ.10वी उत्तीर्ण
मेकॅनिक टू व्हीलर अँड थ्री व्हीलरइ.10वी उत्तीर्ण
पंप ऑपरेटर कम मेकॅनिकइ.10वी उत्तीर्ण
बेसिक कॉस्मोटोलॉजीइ.10वी उत्तीर्ण
प्रशितन व वातानुकूलित टेक्निशियनइ.10वी उत्तीर्ण
वैमानिकी रचना व उपकरणे संधाताइ.10वी उत्तीर्ण
ड्राफ्ट्समन मेकॅनिकलइ.10वी उत्तीर्ण
जोडारीइ.10वी उत्तीर्ण
फौंड्रीमन इ.10वी उत्तीर्ण
यंत्र कारागीरइ.10वी उत्तीर्ण
यंत्र कारागीर घर्षकइ.10वी उत्तीर्ण
मरीन फिटर  इ.10वी उत्तीर्ण
मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्सइ.10वी उत्तीर्ण
ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टूल्सइ.10वी उत्तीर्ण
पत्रे कारागीरइ.10वी उत्तीर्ण
टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्सइ.10वी उत्तीर्ण
टेक्सटाइल्स मेकॅट्रॉनिक्सइ.10वी उत्तीर्ण
टूल अँड डायमेकर (डाईझ अँड मोल्ड)इ.10वी उत्तीर्ण
टूल अँड डायमेकर (प्रेस टूल्स, जिग्ज अँड फिक्चर)इ.10वी उत्तीर्ण
कातारीइ.10वी उत्तीर्ण
संधाताइ.10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
संधाता (GMAW & GTAW)इ.10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
अटेंडन्ट ऑपरेटर (केमिकल प्लांट)इ.10वी उत्तीर्ण
इलेक्ट्रोप्लेटरइ.10वी उत्तीर्ण
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)इ.10वी उत्तीर्ण
मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट)इ.10वी उत्तीर्ण
प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटरइ.10वी उत्तीर्ण
आर्किटेक्चरल ड्रॉफ्समनइ.10वी उत्तीर्ण
सुतारकामइ.10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
ड्रफ्समन सिव्हिलइ.10वी उत्तीर्ण
इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशनइ.10वी उत्तीर्ण
गवंडीइ.10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
रंगारीइ.10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
सर्व्हेअरइ.10वी उत्तीर्ण
बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षकइ.10वी उत्तीर्ण
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकइ.10वी उत्तीर्ण
मेकॅनिक कंझुमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सइ.10वी उत्तीर्ण
टेक्निशिअन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम्सइ.10वी उत्तीर्ण
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकइ.10वी उत्तीर्ण
टेक्निशिअन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स इ.10वी उत्तीर्ण
बेकर अँड कन्फेक्शनरइ.10वी उत्तीर्ण
फूड प्रोडक्शनइ.10वी उत्तीर्ण
फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंगइ.10वी उत्तीर्ण
डेंटल लॅबोरेटरी इक्विपमेंट टेक्निशियनइ.10वी उत्तीर्ण
हेल्थ सॅनेटरी इन्स्पेक्टर इ.10वी उत्तीर्ण
फिजिओथेरपी टेक्निशियनइ.10वी उत्तीर्ण
कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्सइ.10वी उत्तीर्ण
कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटइ.10वी उत्तीर्ण
डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटरइ.10वी उत्तीर्ण
इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्सइ.10वी उत्तीर्ण
आय ओ टी टेक्निशियनइ.10वी उत्तीर्ण
मल्टीमीडिया ॲनिमेशन अँड स्पेशल इफेक्टइ.10वी उत्तीर्ण
डिजिटल फोटोग्राफरइ.10वी उत्तीर्ण
फोटोग्राफरइ.10वी उत्तीर्ण
सेक्रेटरियल प्रॅक्टिसइ.10वी उत्तीर्ण
स्टेनोग्राफर सेक्रेटरीयल असिस्टंटइ.10वी उत्तीर्ण
नळ कारागीरइ.10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
विजतंत्रीइ.10वी उत्तीर्ण
लिफ्ट अँड एस्कलेटर मेकॅनिकइ.10वी उत्तीर्ण
तारतंत्रीइ.10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
रबर टेक्निशियनइ.10वी उत्तीर्ण
फायर टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंटइ.10वी उत्तीर्ण
स्पिनिंग टेक्निशियनइ.10वी उत्तीर्ण
टेक्सटाईल्स वेट प्रोसेसिंग टेक्निशियनइ.10वी उत्तीर्ण
विव्हींग टेक्निशियनइ.10वी उत्तीर्ण
फूड अँड बेव्हरेज सर्विस असिस्टंटइ.10वी उत्तीर्ण
फ्रंट ऑफिस असिस्टंटइ.10वी उत्तीर्ण
हॉस्पिटल हाउसकीपिंगइ.10वी उत्तीर्ण
हाउसकीपरइ.10वी उत्तीर्ण
डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर दिव्यांगइ.10वी उत्तीर्ण
GEO Informatics Assistantइ.10वी उत्तीर्ण
Solar Technician Electricalइ.10वी उत्तीर्ण
ITI Admission 2024

हेही वाचा: खरंच Dream 11 ने करोडपती होता येते का?

ITI Admission 2024 – प्रवेश प्रक्रिया:

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होते. विद्यार्थ्यानी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळावर आपला अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

ITI Admission 2024
ITI Admission 2024

ITI Admission 2024 – ITI प्रशिक्षणाचे फायदे:

1) ITI प्रशिक्षित तरुणांसाठी सरकारी क्षेत्रात जसे की रेल्वे, लष्कर, नौदल, हवाईदल, पीडब्ल्यूडी, पाटबंधारे, व्यवसायिक शिक्षण विभाग, तंत्र शिक्षण विभाग, इत्यादींमध्ये रोजगाराच्या संधी असतात.

2) BHEL, UPPCL, HAL, ONGC, इत्यादी निम -सरकारी/कॉर्पोरेशन/परिषद क्षेत्रांमध्ये आयटीआय प्रशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात.

3) टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, हुंडाई, रिलायन्स, आदित्य बिर्ला, होंडा, महिंद्रा अँड महिंद्रा, इत्यादींसारख्या अनेक प्रतिष्ठित खाजगी संस्थांमध्ये आयटीआय प्रशिक्षित मुला-मुलींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात.

4) ITI चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वयंरोजगाराच्या देखील अनेक संधी उपलब्ध आहेत.

5) ITI चे प्रशिक्षण पूर्ण पदविका अभ्यासक्रमाच्या (Diploma) द्वितीय वर्षात थेट प्रवेश मिळतो.

ITI Admission 2024 – निष्कर्ष:

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) चा सोपा अभ्यासक्रम, प्रात्यक्षिकांवर भर, सरकारी व खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या उपलब्ध असलेल्या अनेक संधी, अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांचा कल हा ITI मध्ये प्रवेश घेण्याकडे वाढत आहे. तुम्हाला ह्या ब्लॉग मधील माहिती नक्कीच उपयोगी पडेल.

नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी येथे क्लिक करा.

ITI Admission 2024 – FAQ:

1) औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) म्हणजे काय?

औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या अथवा शासन मान्यताप्राप्त खाजगी संस्थाद्वारे शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत येणाऱ्या व्यवसायांमद्धे प्रशिक्षण देणाऱ्या, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद अथवा राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेची संलग्नता प्राप्त असलेल्या राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र अथवा राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेचे प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या संस्था.

2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे काय?

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

3) एनसिव्हिटी (NCVT) व्यवसाय म्हणजे काय?

एनसिव्हिटी (NCVT) व्यवसाय म्हणजे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेची संलग्नता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकविले जाणारे व्यवसाय अभ्यासक्रम.

4) एससिव्हिटी (SCVT) व्यवसाय म्हणजे काय?

एससिव्हिटी (SCVT) व्यवसाय म्हणजे राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेची संलग्नता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकविले जाणारे व्यवसाय अभ्यासक्रम.

हेही वाचा: 10वी नंतर पुढे काय? पॉलिटेक्निक एक उत्तम पर्याय!

ITI Admission 2024
ITI Admission 2024

माहिती पुढे शेअर करा.

Leave a comment