ITR 2024: इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरावा? येथे वाचा संपूर्ण माहिती

ITR 2024: जून महिना संपत आला की इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return – ITR) हे शब्द वारंवार कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कानावर सतत पडत असतात. संपूर्ण देशभरात आर्थिक वर्ष 2023 24 आणि मूल्यांकन वर्ष 2024 25 साठी आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी प्रक्रिया जोरात चालू झालेली आहे. परंतु नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींना इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय हे माहीत नसते? चला तर मग जाणून घेऊया ITR म्हणजे काय? इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाइन कसा भरावा (How to file Income Tax Online), इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे काय?

ITR 2024: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजे काय?

इन्कम टॅक्स रिटर्न हा एक फॉर्म आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या उत्पन्नाची आणि त्यावरील कराची माहिती आयकर विभागाकडे (Income Tax Department) दाखल केली जाते. आयकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी एकूण 7 फॉर्म अधिसूचित केले आहेत. भारतातील प्रत्येक करदात्यांनी देय तारखेला किंवा देय तारखेच्या पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला पाहिजे. ITR हा कमावलेल्या उत्पन्नाची रक्कम, उत्पन्नाचे स्त्रोत आणि करदात्याची श्रेणी जसे की व्यक्ती, कंपनी, इत्यादी गोष्टींवर अवलंबून आहे.

ITR 2024: इन्कम टॅक्स रिटर्न का दाखल करावा?

खालीलपैकी कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनी कायद्यानुसार आर्थिक वर्षात त्यांचे आयकर रिटर्न भरले पाहिजे.

1) ज्या व्यक्तींना आयकर परतावा मागायचा आहे.

2) ज्यांना उत्पन्नाच्या शीर्षकाखाली तोटा पुढे करायचा आहे.

3) वित्तीय वर्षात तुमचे उत्पन्न किंवा तोटा असला तरीही कंपन्या किंवा फर्म.

4) ज्या व्यक्तींचे एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादा पेक्षा जास्त आहे.

5) जर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात परकीय मालमत्तेमधून कमाई केली असेल किंवा त्यात गुंतवणूक केली असेल.

6) जर एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी किंवा व्हिसासाठी अर्ज करायचा असेल.

ITR 2024: इन्कम टॅक्स रिटर्न चा कुठला फॉर्म भरावा?

ITR 2024: प्रत्येक आयकर रिटर्न फॉर्म कर निर्धारकांच्या एका विशिष्ट विभागाला लागू होतो. जे पात्र कर निर्धारक फॉर्म दाखल करतात त्यांच्याच फॉर्मवर भारताच्या आयकर विभागाकडून प्रक्रिया केली जाते. त्यामुळे प्रत्येक बाबतीत कोणता विशिष्ट प्रकार योग्य आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. आयकर रिटर्न फॉर्म हे उत्पन्नाच्या स्त्रोताच्या निकषांवर आणि करनिर्धारणाच्या श्रेणीनुसार बदलत असतात.

1) ITR-1 किंवा सहज

भारतीय नागरिकांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याकरीता ITR-1 हा एक महत्त्वपूर्ण फॉर्म आहे. ज्या व्यक्तींनी आर्थिक वर्षासाठी त्यांचे उत्पन्न खालील माध्यमातून मिळवलेले असेल, असे व्यक्ती ITR-1 फॉर्म भरण्यास पात्र आहेत.

  • पगार किंवा पेन्शन द्वारे.
  • लॉटरी, रेस हॉर्सेस, कायदेशीर जुगार, FD चे व्याज, जोडीदार पेन्शन, इत्यादी.
  • एका घराच्या मालमत्तेद्वारे.

2) ITR-2

ITR-2 आमचा उपयोग खालील उत्पन्नाच्या साधनांसाठीच लागू होतो. हा फॉर्म व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी उपलब्ध आहे.

  • पगार किंवा पेन्शन द्वारे उत्पन्न मिळवणे.
  • घराच्या मालमत्तेद्वारे उत्पन्न मिळवणे.
  • भांडवली नफ्याद्वारे उत्पन्न मिळवणे.
  • कायदेशीर जुगार, घोड्यांवरील पैज, लॉटरी, इत्यादी.
ITR 2024

3) ITR-3

ITR-3 फॉर्म विशेषतः व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना (HUF) ज्यांना मुख्य नफा किंवा व्यवसाय किंवा व्यवसायातील नफा आहे आणि जे ITR-1, ITR-2 किंवा ITR-4 भरण्यासाठी पात्र नाहीत त्यांना लागू होतो.

  • फर्म मध्ये भागीदार असलेले व्यक्ती.
  • व्यवसाय किंवा व्यवसायातील नफा किंवा नफाद्वारे उत्पन्न मिळवणारे.
  • भागीदार म्हणून व्याज, पगार, बोनस, कमिशन मोबदला याद्वारे उत्पन्न मिळवणारे.

4) ITR-4

ITR-4 व्यक्ती, HUF, भागीदारी फार्म यांना लागू होतो चे रहिवासी आहेत आणि ज्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये खालील प्रमाणे घटक समाविष्ट आहेत.

  • कलम 44AD किंवा 44AE अंतर्गत अनुमानित उत्पन्न योजनेनुसार व्यवसाय उत्पन्न.
  • कलम 44ADA अंतर्गत अनुमानित उत्पन्न योजनेनुसार व्यवसायिक उत्पन्न.
  • पगार किंवा पेन्शन मधून 50 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न.

5) ITR-5

ITR-5 फॉर्म हा मर्यादित दायित्व भागीदारी (LLPs), फर्म्स, व्यक्तींची संघटना (AOPs), व्यक्तींची संस्था (BOIs), मृत व्यक्तीची संपत्ती, दिवाळखोरांची संपत्ती, बिजनेस ट्रस्ट आणि गुंतवणूक निधीसाठी लागू आहे.

6) ITR-6

धर्मदाय किंवा धार्मिक हेतूंसाठी ठेवलेल्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न या अंतर्गत सूट मिळण्याचा दावा करणाऱ्या कंपन्या व्यतिरिक्त इतर कंपन्यांसाठी ITR-6 हा फॉर्म कलम 11 अंतर्गत लागू आहे.

7) ITR-7

ITR-7 हा फॉर्म कलम 139(4A), 139(4B), 139(4C), 139(4D), 139(4E) किंवा 139(4F) अंतर्गत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक असलेल्या कंपन्यांसह व्यक्तींसाठी लागू आहे.

ITR 2024

हेही वाचा: पावसाळ्यात डासांमुळे पसरतो जीवघेणा आजार, जाणून घ्या डासांविषयी अधिक माहिती.

ITR 2024: ITR भरण्याचे फायदे

1) सहज कर्ज मिळते

कोणतेही कर्ज सहज मिळविण्याकरिता बँका किंवा पतसंस्था उत्पन्नाचा पुरावा मागत असतात. तुम्ही जर नियमित इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर बँकेकडून कर्ज मिळन्यास सुलभता होते.

2) उत्पन्नाचा पुरावा

नियमित इन्कम टॅक्स रिटर्न भरलेल्या करदात्यांना प्रमाणपत्र मिळत असते. हे प्रमाणपत्र सरकारी पुरावा म्हणून व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दर्शविते. 

3) व्हिसा मिळवण्यासाठी मदत होते

एखाद्या व्यक्तीने व्हिसा मिळवण्यासाठी जर अर्ज केला असेल तर व्हिसा अधिकारी इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याचा पुरावा त्या व्यक्तीकडे मागतात.

4) कर परतावा मिळण्यास मदत होते

जर एखाद्या व्यक्तीचा काही कारणास्तव जास्त टीडीएस कापला गेला असेल किंवा एखादी व्यक्ती उत्पन्न स्लॅब कराच्या कक्षेत येत नसेल तरीही काही कारणास्तव टीडीएस कापला गेला असेल तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला परतावा मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे महत्त्वाचे आहे.

5) नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न आवश्यक

सरकारी विभागात कंत्राट घेण्यासाठी गेल्या पाच वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न आवश्यक असतो.

6) विमा संरक्षणात फायदा

उत्पन्नाचा स्त्रोत आणि परतफेडची स्थिती तपासण्यासाठी विमा कंपन्या इन्कम टॅक्स रिटर्न चा पुरावा मागत असतात.

ITR 2024

शैक्षणिक, धार्मिक, नोकरी, इतर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी येथे क्लिक करा.

ITR 2024: असा भरा ऑनलाइन पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न

ITR 2024: प्राप्तिकर कायदा 1961 नुसार भारतातील करदात्याला आयकर रिटर्न भरणे अनिवार्य आहे. अपेक्षित उत्पन्न नसतानाही इन्कम टॅक्स रिटर्न भरणे कधीही चांगले आणि त्याचे अनेक करणे देखील असू शकतात, आयकर परतावा दावा करणे, व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करणे, बँकेकडून कर्ज काढणे, इत्यादी.

भारतात आयकर विभाग इन्कम टॅक्स रिटर्न ई-फाईल करण्याची सुविधा प्रदान करत असतो. ई फाइलिंग म्हणजे इंटरनेटचा वापर करून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) ऑनलाइन भरणे. सरकारच्या अधिकृत आयकर विभागाच्या पोर्टलवर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाइन भरण्यासाठी लागणाऱ्या महत्वपूर्ण गोष्टी

1) करदात्याचे पॅन आणि आधार.

2) फॉर्म 16.

3) करदात्याचे बँकेचे स्टेटमेंट.

4) आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीचे पैसे भरल्याचा पुरावा.

5) करदात्यांनी देणगी दिलेली असेल तर देणगीच्या पावत्या.

6) गृहकर्जाचा तपशील.

7) आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांक

भारताच्या अधिकृत आयकर विभागाच्या पोर्टलवर अशा पद्धतीने फाइल करा ITR

खालील गोष्टींची पूर्तता करणारे करदाते ऑनलाइन पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR 2024) करू शकतात:

1) वैध वापर करता आयडी आणि पासवर्ड सह ई-फायलींग पोर्टलवर नोंदणीकृत वापर करते.

2) पॅनची स्थिती सक्रिय असणारे वापर करते.

3) पॅन आणि आधार लिंक केलेले आहेत.

4) निवासी स्थिती निवासी असणे गरजेचे आहे.

पायरी 1: ई-फायलींग पोर्टलवर लॉगिन करणे

1) करदात्यांनी अधिकृत आयकर विभागाच्या ई-फायलींग वेबसाईटला भेट द्यावी.

आयकर विभागाच्या अधिकृत ई-फायलिंग पोर्टलला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

2) करदात्यांनी त्यांचा पॅन क्रमांक प्रविष्ट करून Continue या बटनावर क्लिक करावे.

3) दिलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही लॉग इन होऊ शकतात.

पायरी 2: फाइल इन्कम टॅक्स रिटर्न वर जाण्यासाठी

1) लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड वर ई – फाइल टॅब दिसेल.

2) ई – फाइल टॅबवर क्लिक करा.

3) इन्कम टॅक्स रिटर्न टॅबवर क्लिक करा.

4) फाइल इन्कम टॅक्स रिटर्न.

पायरी 3: मूल्यांकन वर्ष निवडणे

आर्थिक वर्ष 2023-24 साठी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी ‘AY 2024-25’ मूल्यांकन वर्ष निवडा.

पायरी 4: स्थिती निवडणे

करदात्यांनी त्यांना लागू असलेली फायलिंग ची योग्य स्थिती निवडणे जसे की वैयक्तिक, किंवा इतर.

पायरी 5: ITR चा योग्य प्रकार निवडणे

करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी कुठला ITR फॉर्म भरला पाहिजे हे प्रथम निश्चित करणे महत्त्वाचे आहे. ITR-1 ते ITR-7 असे एकूण 7 फॉर्म उपलब्ध आहेत.

पायरी 6: ITR भरण्याचे योग्य कारण निवडा

दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून ITR 2024 भरण्याचे योग्य कारण निश्चित करणे.

पायरी 7: माहिती सत्यापित करणे

करदात्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती, बँकेचा तपशील अचूक भरलेला आहे की नाही याची खात्री करावी. टप्प्याटप्प्याने पुढे जाताना तुमच्या परताव्याच्या सारांशाची पुष्टी करा, तपशील सत्यापित करा आणि शिल्लक कर भरणे असल्यास योग्य क्रिया करा.

तुम्हाला तुमच्या रिटर्न मध्ये त्रुटींची यादी दाखवली असल्यास तुम्हाला चुका दुरुस्त करण्यासाठी फॉर्मवर परत जावे लागेल जर काही त्रुटी नसतील तर तुम्ही पडताळणीसाठी पुढे जा यावर क्लिक करून तुमचे रिटर्न व्हेरिफाय करण्यासाठी पुढे जाऊ शकता.

पायरी 8: ई-व्हेरिफाय पेजवर तुम्हाला रिटर्न ई-व्हेरिफाय करायचा आहे तो पर्याय निवडा आणि Continue वर क्लिक करा.

विहित नमुन्यात आणि विहित रितीने सत्यापित ITRV सामान्य किंवा स्पीड पोस्टद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीने फक्त खालील पत्त्यावर 30 दिवसांच्या आत पाठवणे गरजेचे आहे.

केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र, आयकर विभाग बेंगळुरू – 560500, कर्नाटक.

निष्कर्ष

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR 2024) वेळेवर भरण्याचे अनेक फायदे असून करदाते सहजरीत्या ऑनलाइन पद्धतीने आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर त्यांचा आयटीआर फाइल करू शकतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख किती आहे?

31 जुलै 2024 ही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे.

2) नवीन कर व्यवस्था ही डिफॉल्ट व्यवस्था आहे का?

होय. AY 2024-25 पासून नवीन कर व्यवस्था डिफॉल्ट पर्याय असेल. प्रत्येक वर्षी तुम्ही या विशिष्ट मूल्यांकन वर्षासाठी जुन्या आणि नवीन कर प्रणालींमध्ये निवड करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: खरंच Dream 11 ने करोडपती होता येते का?

Leave a comment