Karsevak: गेल्या अनेक दिवसांपासून कारसेवक हा शब्द पुन्हा खुप प्रचलित झालेला दिसत आहे. एक मोठे बलिदान ते कारसेवा ह्या घटनेला पुन्हा उजाळा मिळाला आहे आणी त्याचे कारण म्हणजे भारतासह संपुर्ण विश्व ज्याची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा पाहत होते ते प्रभू श्रीराम यांचे अयोध्या मधील राम मंदिर. अयोध्या मध्ये प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दि २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून ह्या ऐतिहासिक क्षणी आठवण येते ती म्हणजे कारसेवकांची. कोण होते कारसेवक आणी त्यांचे अयोध्या राम मंदिर साठी काय योगदान होते हा प्रश्न सर्वाना पडलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया कारसेवा आणी कारसेवक याबद्दल संपूर्ण माहिती.
कारसेवेबद्दल माहिती :
कारसेवा म्हणजे काय?
Karsevak: कारसेवा आणी करसेवा ह्या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ होतो. संस्कृत मध्ये कर ह्या शब्दाचा अर्थ हात असा होतो.स्वतःच्या हाताने आपल्या धर्मासाठी अथवा धर्मातील लोकांच्या रक्षणासाठी केलेली निस्वार्थ सेवा म्हणजेच कारसेवा. अश्या निस्वार्थ सेवेकऱ्यांना कारसेवक असे म्हंटले जाते.
शीख धर्म ग्रथांमध्येही कारसेवक बाबत माहिती मिळते. जालीयन वाला बाग घटनेच्या वेळी उधमसिंग यांनी कारसेवा केली होती असे मानतात.अमृतसरच्या प्रसिद्ध अश्या सुवर्ण मंदिर उभारणीत देखील कारसेवकांचे योगदान दिसून येते.
असे असले तरी कारसेवक ह्या शब्दाचा वापर अयोध्या राममंदिरासाठी जास्त केला जातो.
Karsevak: अयोध्या राममंदिर आणी कारसेवक यांचा संबंध काय?
विश्व हिंदू परिषद व राम जन्मभूमी मुक्तीसमिती च्या माध्यमातून तैयार झालेल्या कारसेवकांचे योगदान न विसरण्या सारखे आहे.१९८४ साली विश्व हिंदू परिषदेकडून स्थापित झालेल्या राम जन्मभूमी मुक्तीसमिती मार्फत सर्व साधू संत व महंतांना एका मंचावर आणण्यात आले. राम जन्म भूमीसाठी लढा उभारा असे आवाहन करण्यात आले आणी त्यातून असंख्य कारसेवक पुढे आले. करसेवाकांमध्ये विविध भागातील व विविध संघटनेतील तरुणांचा समावेश होता.
सर्व कारसेवकांचे प्रमुख मार्गदर्शक होते गोरखपूर चे महंत अवैद्यनाथ. अवैद्यनाथ हे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुरु आहेत.
१९८९ साली खऱ्या अर्थाने कारसेवेला सुरवात झाली. संपूर्ण देशभरात २ लाखांहून अधिक ठिकाणी श्रीराम शीला पुजानाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. बाबरी मशिदीच्या जागीच श्रीराम जन्मभूमीचा शीलान्यास केला जाईल असा कारसेवकांकडून प्रचार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला भावनिक प्रतिसाद देखील मिळत होता.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी बाबरी मशीदीचे दरवाजे उघडून शीलान्याससाठी परवानगी दिली होती आणि येथूनच राम जन्मभूमी आंदोलनाची सुरवात झाली.३० ऑक्टोबर १९९० साली अयोध्या येथे कारसेवा करण्याचा निर्णय जाहीर झाला. सर्व कारसेवकांना अयोध्येत जमण्यास सांगण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात सुरु झालेल्या आडवाणी यांच्या रथ यात्रेमुळे देखील कारसेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता.
तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यांनी कारसेवेला विरोध दर्शवत संपुर्ण उत्तर प्रदेश मध्ये लष्कर जवान व पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला आणी राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या .अयोध्येत तर लष्करी छावनीचे रूप तैयार झाले होते.
तरी देखील लाखो कारसेवक पायी चालून, लपून छपून अयोध्येत दाखल झालेच आणी उत्तर प्रदेशातील गावकऱ्यांनी देखील कारसेवकांना लपण्यासाठी मदत केली. अश्यातच मुलायमसिंग सरकारने कारसेवकांची धरपकड करण्यास सुरवात केली. अनोळखी व्यक्तीला सरळ कारगुहात टाकण्यात येत होते. सर्व कारागृहे गच्च भरली, शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कारागृहे निर्माण केली गेली.
अश्या कडक वातावरणात शेवटी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी अचानक अयोध्येच्या गल्लीतून कारसेवकांचा नारा कानावर आला तो म्हणजे “रामलल्ला हम आये हैं, मंदिर वही बनायेंगे”. बघता बघता सर्व गल्ली बोळातून कारसेवक रस्त्यावर आले. लाखोंच्या संख्येत अचानक इतके कारसेवक जमा झाल्याने सैनिक जवान व पोलीस देखील आश्चर्यचकित झाले. कारसेवकांच्या गर्दीतून विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अशोक सिंघल बाहेर आले, कारसेवकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अशोक सिंघल यांच्या डोक्यावर मार लागल्याने ते जखमी झाले आणी कारसेवक अजून चिडले.
काही कारसेवकांनी पोलिसांच्या गाडीवर ताबा मिळवला व पोलिसांचा बंदोबस्त झूगारत गाडी थेट बाबरी मशीदीकडे नेली. कारसेवक बाबरीच्या घुमटावर चढले आणी तेथे त्यांनी भगवा ध्वज फडकवला.
पोलिसांच्या लाठी हल्ल्यात व गोळीबारीत कलकत्ता शहरातील राम आणी शरद कोठारी ह्या सख्या भावांसह अनेक कारसेवकांचा मृत्यू झाला.शरयू नदीच्या पुलावर चेंगराचेंगरी झाली.
पुन्हा २ नोव्हेंबर रोजी कारसेवक बाबरी मशीदीवर चढले आणी बाबरीचा काही भाग तोडला आणि परत पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. कारसेवकांना हळू हळू अयोध्येबाहेर काढण्यात आले.परंतु याचा परिणाम म्हणून १९९१ साली भाजप चे कल्याण सिंह उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री झाले.
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत पुन्हा एकदा कारसेवा करण्याचा निर्णय झाला. राम जन्म भूमी मुक्ती समितीने अयोध्येत प्रतिकात्मक कारसेवा करणार आहोत असे सरकार ला कळवले त्यानुसार कल्याण सिंह यांनी बाबरी मशिदीचे संरक्षण करण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाकडून प्रतिकात्मक कारसेवा करण्यासाठी परवानगी मिळाली आणी पुन्हा लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झालेत.
भाजप व विश्व हिंदू परिषदेचे चे दिग्गज नेते कारसेवेला उपस्थित झालेले होते.नियोजित कार्यक्रम सुरु असताना अचानक काही कारसेवक युवकांकडून घोषणा कानावर आल्या ” अभी नही तो कभी नही ” आणी “एक धक्का और दो बाबरी ढाचा तोड दो”. बघता बघता परिस्तिथी हाताबाहेर गेली, तरुण कारसेवक बाबरीच्या घुमटावर चढले. जे मिळेल त्याच्या सहाय्याने बाबरीवर घाव घालण्यास सुरवात झाली आणि काही वेळेतच बाबरीचा ढाचा कोसळला.
त्वरित तेथे तात्पुरता मंडप टाकण्यात आला आणी रामलल्ला च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शेकडो कारसेवकांना पोलिसांनी अटक केली, त्यांच्यावर केसेस झाल्या.राम जन्म भूमी आंदोलनाला अजून बळ मिळत गेले.म्हणूनच राम मंदिर अयोध्या साठी कारसेवकांचे बलिदान कोणीच विसरू शकत नाही आणी विसरणार देखील नाही.
कारसेवकांचे स्वप्न पूर्ण झाले
बाबरी मशीद पडल्यानंतर अनेक वर्ष खटला न्यायालयात चालला. सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी ऐतेहासिक निर्णय देत राम मंदिर बांधण्यासाठी मूळ जागा हिंदूना देण्यात यावी असे सांगितले.
लाखो कारसेवकांसह करोडो भारतीयांचे स्वप्न अखेर पुर्ण झाले. मूळ जागेवर भव्य दिव्य असे राम मंदिर उभे झाले आणि २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली गेली. स्वतंत्र भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या नयनरम्य, अतिशय सुंदर अश्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रभू श्रीरामाचा आपल्या प्रत्येकावर आशीर्वाद आहे. 22 जानेवारी 2024 नव्या कालचक्राचा उगम आहे. आजची वेळ सामान्य नाही. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे.”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.या भव्य दिव्य पवित्र सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले शिवमहापुराण कथेतील पशुपतिनाथ व्रत कसे करावे?
निष्कर्ष:
धर्मासाठी अथवा धर्मातील लोकांच्या रक्षणासाठी केलेली निस्वार्थ सेवा म्हणजेच कारसेवा. नक्कीच अश्या निस्वार्थी कारसेवकांचे राम मंदिर उभारणीसाठीचे बलिदान खूप मोठे होते आणि हे बलिदान भारत देश कधीही विसरू शकत नाही.
FAQ:
१.कारसेवक कोण होऊ शकतो?
समाजातील कोणतीही व्यक्ति कारसेवक बनू शकते.
२.कारसेवेचे प्रकार कोणते?
सांस्कृतिक,सामाजिक,पर्यावरणीय आणि धार्मिक कारसेवा.
३.कोठारी बंधु कोण होते?
राम आणि शरद कोठारी हे कारसेवक होते.
४.बाबरी मशीद केंव्हा पाडली?
६ डिसेंबर १९९२ रोजी.
५.बाबरी मशीदीला का पाडले ?
मशीद जिथे होती तिथे प्रथम प्रभू श्रीराम यांचे मंदिर होते. मंदिर उध्वस्त करून मोगल सम्राट बाबर ने १६ व्या शतकात तिथे मशीद उभारली होती.
६.बाबरी मशीदीला कोणी पाडली?
लाखो करसेवकांच्या जमावाने ६ डिसेंबर १९९२ रोजी मशीद पाडली.
माहिती आवडली असल्यास पुढे शेअर करा.