Lal Krishna Advani: भारतीय जनता पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी महत्त्वाचे सदस्य असलेले लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे आणि याची अधिकृत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. लालकृष्ण अडवाणी यांची संघर्षमय राजकीय कारकीर्द सर्वांना प्रेरणा देणारी आहे. जनसंघ ते राम मंदिर चळवळ यात मोलाचा वाटा असणारे लालकृष्ण अडवाणी यांचा जीवन परिचय आपण जाणून घेऊया.
![Lal Krishna Advani](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/02/Lal-Krishna-Advani-with-Narendra-Modi.jpg)
भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांचा जीवन परिचय
![Lal Krishna Advani](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/02/lalkrishna-advani-image-1024x576.jpg)
Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म व शिक्षण
Lal Krishna Advani: सध्या पाकिस्तान मध्ये असलेल्या सिंध प्रांतात कराची येथे लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण सेंट पॅट्रिक हायस्कूल कराची व महाविद्यालयीन शिक्षण डीजी नॅशनल कॉलेज कराची येथे झाले होते.भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात दाखल झालं. मुंबईतून त्यांनी सरकारी कॉलेजमधून कायद्याची पदवी पूर्ण केली.
Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांचा राजकीय प्रवास
Lal Krishna Advani: देशभक्तीच्या प्रेरणेने १९४२ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि कराची शाखेचे प्रचारक बनले आणि तेथे विविध शाखा देखील विकसित केल्या. भारत पाकिस्तान फाळणी नंतर ते आपल्या कुटुंबासह भारतात स्थलांतरित झाले आणि मुंबईत स्थायिक झाले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर १९५१ मध्ये लालकृष्ण अडवाणी या पक्षात सामील झाले. त्यांची राजस्थान मधील भंडारी यांच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. संसदीय कामकाज पाहण्यासाठी त्यांना दिल्लीत पाठवण्यात आले आणि लवकरच ते सरचिटणीस आणि नंतर जनसंघाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष बनले.
![Lal Krishna Advani](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/02/rathyatra-1024x591.jpg)
१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारने लादलेल्या आणीबाणीला विरोध करणारे नेते आणि पक्ष यांच्या विलीनीकरणातून जनता पक्षाची स्थापना झाली. आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीमध्ये जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आणि आणि तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. १९७७ ते १९७९ या काळात भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री राहिले.
१९८० मध्ये सर्व नेत्यांनी जनता पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्षात सामील झाले. भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर १९८६ पर्यंत ते पक्षाचे सरचिटणीस पदी होते. त्यानंतर १९८६ ते १९९१ पर्यंत त्यांनी अध्यक्ष पदही सांभाळले होते. १९८९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.भारतीय जनता पार्टी पक्ष्याच्या तब्बल दहा वर्ष अध्यक्षपदी लालकृष्ण अडवाणी राहिले होते.
१९९८ ते २००४ या काळात ते भारताचे गृहमंत्री होते. २००२ ते २००४ या काळात ते भारताचे उपपंतप्रधान होते.
अटलबिहारी वाजपेयी यांना भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे मोलाचे योगदान होते.
Lal Krishna Advani: रामजन्मभूमी आंदोलन आणि रथयात्रा
Lal Krishna Advani: विश्व हिंदू परिषदेने १९८०च्या दशकात बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. १९९० च्या दशकात ते रामजन्मभूमी आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून उदयास आले.लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये गुजरात मधील सोमनाथ ते उत्तर प्रदेश मधील अयोध्येपर्यंत राम रथयात्रा सुरू केली. रथयात्रेचा उद्देश कार सेवक आणि स्वयंसेवकांना एकत्र करणे व राम मंदिर उभारणीच्या मोहिमेला पाठिंबा मिळवून देणे हा होता. ही रथयात्रा विविध कारणांनी वादग्रस्त ठरली.
![Lal Krishna Advani](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/02/lalkrishna-advani.jpg)
हेही वाचा: कारसेवक म्हणजे काय?
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत झालेल्या कारसेवा दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भारतीय जनता पार्टी व विश्व हिंदू परिषदेचे दिग्गज नेते उपस्थित होते. याच दिवशी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला होता.
त्यानंतर भारतीय जनता पार्टीला या आंदोलनाचा राजकारणामध्ये आणि सत्ता स्थापनेमध्ये प्रचंड प्रमाणात फायदा झाला. १९८० च्या दशकात भारतीय जनता पार्टीचे लोकसभेत फक्त २ खासदार होते. राम मंदिर आंदोलन आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेमुळे भारतीय जनता पार्टी पक्ष घराघरात पोहोचला.
![Lal Krishna Advani](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/02/ramjanmbhumi-aandolan.jpg)
Lal Krishna Advani: १९९६ मधील शिवाजी पार्क येथील सभा
१९९६ मध्ये देशातील लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. मुंबईतली शिवाजी पार्क हे सभा मैदान शिवसेना आणि भाजप यांचे कार्यकर्त्यांनी खच्चून भरलेले होते. या सभेला लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. याच सभेत लालकृष्ण अडवाणी यांनी भावी पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा केली. राजकारणाची समीकरणे बदलत केली आणि १९९६ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये भाजप ने सरकार स्थापन केले.
Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिलेली काही पुस्तके
अ प्रिझनर्स स्क्रॅप बुक, मेरा देश मेरा जीवन, जसे मी ते पाहतो, माय टेक
लालकृष्ण अडवाणी यांना मिळालेले पुरस्कार
लालकृष्ण अडवाणी यांना १९९९ मध्ये भारतीय संसदीय गटाने उत्कृष्ट संसद पटू पुरस्काराने सन्मानित केले. २०१५ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले.
निष्कर्ष:
नक्कीच आज भारतीय जनता पार्टी देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे. भाजपला राजकारणात सर्वोच्च स्थानात नेण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे योगदान आहे आणि ते भारत कधीही विसरू शकणार नाही.
FAQ:
१.RSS चा फुल फॉर्म काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
२.RSS ची स्थापना कोणी केली?
केशव हेडगेवार.
३.RSS चे मुख्यालय कोठे आहे?
नागपूर.
४.लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी जाहीर झाला?
२०२४.
५.भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो?
कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ दिला जातो.
६.भारतरत्न पुरस्कारासाठी कोण शिफारस करतं?
भारतरत्न पुरस्कारासाठी नावांची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात. यामध्ये राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व पदक दिले जाते. पुरस्कारासोबत पैसे दिले जात नाहीत. 1954 मध्ये हा सन्मान फक्त जिवंत व्यक्तींनाच दिला जात होता, मात्र 1955 मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. हा सन्मान प्रजासत्ताक दिनी दिला जातो.
७.भारतरत्न पुरस्कार प्राप्त केलेल्या व्यक्तिनां कुठल्या सुविधा मिळतात?
भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला देशात व्हीआयपीचा दर्जा मिळतो. प्रोटोकॉलनुसार, भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीची गणना देशातील सर्वोच्च पदांवर असलेल्या लोकांसोबत केली जाते. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते यांच्यानंतर हे पद दिले जाते.
भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तिनां मिळतात या सुविधा:
- भारतरत्न प्राप्त करणार्या व्यक्तीला कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष व्हीआयपी दर्जा दिला जातो.
- आयकर न भरल्यास सूट देखील उपलब्ध आहे.
- भारतरत्न प्राप्त व्यक्ती संसदेच्या बैठका आणि अधिवेशनांना उपस्थित राहू शकतात.
- देशाचे राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी होऊ शकतात.
- भारतरत्न प्राप्तकर्ते विमान, ट्रेन आणि बसने मोफत प्रवास करू शकतात.
- राज्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांना राज्य पाहुण्याचा दर्जा मिळतो.
- या पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तीला सरकार वॉरंट ऑफ प्रेसिडेंसीमध्ये स्थान देते, ज्याचा उपयोग सरकारी कार्यक्रमांमध्ये प्राधान्य देण्यासाठी केला जातो.
- भारतरत्न मिळवणाऱ्या लोकांना राज्य सरकार सुविधा पुरवतात.
८.भारतरत्न पुरस्कार देण्याची सुरवात कोणत्या साली झाली?
१९५४ सालापासून भारतरत्न पुरस्कार देण्याची सुरवात झाली.
९.सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला होता?
भारतरत्न पुरस्कार देण्याची सुरवात ही २ जानेवारी १९५४ सालापासून करण्यात आली होती. देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा सर्वप्रथम ३ व्यक्तिनां देण्यात आला होता. गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सीव्ही वेंकटरामन यांना सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
माहिती आवडली असल्यास पुढे शेअर करा.