Leap Year Meaning in Marathi: मित्रांनो ह्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस आहेत. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असतात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस कसे? त्याचे कारण म्हणजे दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस येतात. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अतिरिक्त दिवस जोडलेला असतो. यामुळे फेब्रुवारी चा महिना २९ दिवसांचा होतो. मग लीप वर्ष किंवा लीप इयर म्हणजे काय? फेब्रुवारी महिन्यातच २९ दिवस का असतात? अशा बऱ्याच प्रश्नांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Leap Year Information
What is the meaning of Leap year? लीप वर्ष म्हणजे काय?
आपल्या सर्वांना माहित आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. एक फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात. परंतु हा कालावधी ३६५.२४२ दिवसांचा असतो. ०.२४२ हा कालावधी आपण व्यवहारात मोजत नाही. म्हणजेच वर्षातील अतिरिक्त सहा तास आपण मोजत नाहीत. प्रत्येक वर्षातील अतिरिक्त सहा तास मिळून चार वर्षांनी २४ तास होतात. आपल्याला माहीतच आहे की २४ तासांचा एक दिवस होतो. हा अतिरिक्त दिवस वर्षात जोडला की वर्षाचे ३६६ दिवस होतात आणि त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात.

आज २९ फेब्रुवारी २०२४ रोजी गुगलकडून खास डूडल शेअर करण्यात आलं आहे. या डूडलच्या माध्यमातून गुगलने लीप डे एका खास पद्धतीने साजरा केला आहे. सहसा गुगलचे डूडल सामान्यतः एखाद्या व्यक्ती, कार्यक्रम किंवा विशिष्ट देशाशी संबंधित असल्या कार्यक्रमाबद्दल असतात. परंतु लीप ईयर सेलिब्रेशनचे डूडल सर्व देशांशी संबंधित आहे.

Leap Year-लीप वर्ष कसं सुरू झालं?
ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात आणि ते लीप वर्ष आहे असे मानण्यात आले.
लीप वर्षाची सुरुवात कधी झाली?
प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मानंतर चार वर्षांनी पहिलं लीप वर्ष होतं. त्यानंतर दर चार वर्षांनी लीप वर्ष येत असतं.
How to calculate Leap Year-लीप वर्ष कसे ओळखतात? लीप वर्ष ओळखण्याचे नियम काय आहेत?
ग्रेगरियन दिनदर्शिकानुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. लीप वर्ष दर चार वर्षांनी येत असते. लीप वर्ष ठरविण्यासाठी जाणून घेऊयात खालील तीन मजेशीर नियम-
१. जर एखाद्या वर्षाच्या आकड्यातील शेवटच्या दोन अंकांना चार ने पूर्णतः भाग गेला तर ते लीप वर्ष असते.
उदाहरण- १९७२,१९७६,१९८०,२०२०,२०२४,इत्यादी.
२. जर वर्षातील शेवटचे दोन आकडे ०० असे असतील तर ते वर्ष लीप वर्ष नसते.
उदाहरण-१००,९००,१९००,इत्यादी.
३. तसेच अशा शतकी वर्षाच्या शेवटून तिसऱ्या व चौथ्या आकड्यांनी होणारी संख्या चार ने पूर्णतः भागता आली तर ते वर्ष लीप वर्ष असते.
उदाहरण-८००,१२००,१६००,२०००,इत्यादी.

लीप दिवस म्हणजे काय?
चार वर्षातून फेब्रुवारी महिन्यात आलेला अधिकचा दिवस म्हणजेच लीप दिवस. २९ फेब्रुवारी या दिवसाला लीप दिवस असे म्हणतात.
फेब्रुवारी महिन्यातच अतिरिक्त दिवस का जोडला जातो?
फेब्रुवारी महिन्यातच अतिरिक्त दिवस जोडण्याबाबत अनेक मतं आहेत. असे म्हणतात फेब्रुवारी महिन्यात अतिरिक्त दिवस जोडणे हा ग्रेगरियन कॅलेंडर पद्धतीचा एक भाग आहे. मूळ रोमन कॅलेंडर ज्यावर ग्रेगरियन कॅलेंडर आधारित होते त्यात एकूण ३०४ दिवस होते त्यात वर्षाची सुरुवात मार्च महिन्याने होत असे आणि फेब्रुवारी हा वर्षाचा शेवटचा महिना होता. फेब्रुवारी महिन्याला अशुभ महिना मानत होते म्हणून त्या महिन्याला सर्वात कमी दिवस नियुक्त केले गेलेले होते. जेव्हा कॅलेंडरमध्ये सुधारणा झाली व कॅलेंडरला सौर वर्षासोबत अधिक जुळवून संरेखित करण्यात आले तर त्यात एकूण ३६५.२४२ इतके दिवस होते. म्हणून अतिरिक्त दिवस प्राप्त करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याची निवड करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यामध्ये अतिरिक्त दिवस जोडून कॅलेंडर इतर महिन्यांसाठी तुलनेने नियमित २८ दिवसांचे चक्र राखू शकते.

Fun facts about Leap Year- लीप वर्षा बाबत काही गमतीशीर गोष्टी-
१. लीप वर्षाच्या बाळांना लिपर्स किंवा लीपलिंग म्हणतात.
२. जगात चार दशलक्षाहून अधिक लोक लीप डे बेबी आहेत.
३. २९ फेब्रुवारी रोजी काही प्रसिद्ध लोकांचा जन्म झाला होता.
४. ४ ने भाग जाणारे प्रत्येक वर्ष हे लीप वर्ष असते.
५. लीप वर्षात लग्न करणे हे ग्रीस मध्ये दुर्दैवी मानले जाते.
६. काही संस्कृती २९ फेब्रुवारी हा दिवस अशुभ मानतात.
७. २९ फेब्रुवारी रोजी बरेच लोक विनामूल्य काम करतात.
८. 29 फेब्रुवारी लीप डेच्या दिवशी आयर्लंड मध्ये हा दिवस बॅचलर डे किंवा लेडीज प्रिव्हिलेज म्हणून ओळखला जातो. या दिवसाची खास परंपरा अशी आहे की या दिवशी स्त्रिया पुरुषांना प्रपोज करू शकतात. काही महिला पुरुषांना फक्त होकार्थी उत्तर देण्याची परवानगी असल्याचा दावा करतात तर काही महिला पुरुषांना नकार देण्यासाठी मान्यता देतात. परंतु त्यांच्या चाहताल्या भेटवस्तू खरेदी करणे आवश्यक आहे.
९. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये एका कुटुंबाचे नाव आहे ज्यामध्ये 29 फेब्रुवारी रोजी सलग तीन पिढ्यांचा जन्म झाला होता. पीटर अँथनी यांचा जन्म 1940 मध्ये आयर्लंडमध्ये झाला होता. त्यांचा मुलगा, पीटर एरिक, 1964 मध्ये लीफ डे रोजी जन्मला आणि त्यांची नात, बेथनी वेल्थी, 29 फेब्रुवारी 1996 रोजी जन्मली.

लीप डे नसता तर काय झालं असतं?
२९ फेब्रुवारी हा दिवस कॅलेंडर आणि पृथ्वीच्या कक्षेत संतुलन निर्माण करण्यास मदत करणारा दिवस आहे. जर हा लीप डे नसता तर मे जून मध्ये येणारे उष्णता नोव्हेंबर महिन्यात येण्यास सुरुवात झाली असती. २९ फेब्रुवारीच्या आगमनाने सर्व ऋतू दरवर्षी योग्य महिन्यात येतात यामुळे कॅलेंडरमध्ये संतुलन राखले जाते.
निष्कर्ष:
ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात आणि ते लीप वर्ष आहे असे मानण्यात आले. 2९ फेब्रुवारी हा दिवस कॅलेंडर आणि पृथ्वीच्या कक्षेत संतुलन निर्माण करण्यास मदत करणारा दिवस आहे.
FAQ about Leap Year:
१. लीप वर्ष म्हणजे काय?
ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात व त्यामुळे वर्षाचे ३६६ दिवस होतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात.
२. लीप वर्ष कसे काढायचे?
लीप वर्ष दर चार वर्षांनी येते. जर एखाद्या वर्षाच्या आकड्यातील शेवटच्या दोन अंकांना चार ने पूर्णतः भाग गेला तर ते वर्ष लीप वर्ष असते.
३. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात?
लीप वर्षात ३६६ दिवस असतात.
४. लीप दिन कशाला म्हणतात?
२९ फेब्रुवारी या दिवसाला लीप दिन असे म्हणतात.
५ . लीप डे ला धार्मिक विधी केला तर चालतो का?
होय. लीप डे ला धार्मिक विधी करण्यास कुठलीही अडचण नाही. लीप इयर चा मानवी जीवनावर कुठलाही परिणाम होत नाही.
तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास पुढे शेअर करा.