Maharashtra Budget 2024: महाराष्ट्र राज्याचा अंतरीम अर्थसंकल्प सादर

Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

Maharashtra Budget 2024

Maharashtra Budget 2024: राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसूली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसूली खर्च दाखवण्यात आला आहे. महसूली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

Maharashtra Budget 2024

Maharashtra Budget 2024 ठळक मुद्दे:

1) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेअंतर्गत 8 लाख 50 हजार नवीन सौरकृषी पंप.

2) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या 350व्या जयंतीनिमित्त छत्रपतींच्या 11 किल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला आहे.

3) जुलै 2022 पासून शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 12 हजार 769 कोटी रूपये मदत देण्यात आली.

4) 25 वर्षांपेक्षा जुन्या 155 प्रकल्पांची दुरूस्ती आणि 75 अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात येतील यातून 3 लाख 55 हजार हेक्टर सिंचन क्षमता आणि 23.37 टीएमसी पाणीसाठा निर्माण होईल.

5) नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च 2025 ला कार्यान्वित होईल.

6) श्रीनगर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 77 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

7) राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांची 14 हजार रिक्त पदे भरण्यात आली आहेत. इतर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

8) कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

9) महिला सक्षमीकरणासाठी दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा योजना प्रस्तावित आहे.

10) मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवी योजना 1 एप्रिलपासून सुरू केली जाणार आहे. यात 18 वर्षांपर्यंत टप्याटप्याने एकूण 1 लाख 1 हजार रूपये मिळतील.

11) उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वाशिम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

12) महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेचे संवर्धन करणाऱ्या मराठी मंडळांना अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर गोवा, दिल्ली, बेळगाव, कर्नाटक याठिकाणी मराठी भाषा उपकेंद्र स्थापन केले जाईल.

13) राज्यात नवीन 10 अतिरिक्त कुटुंब न्यायालये, 5 जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालये आणि 5 दिवाणी न्यायालयांना स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

14) महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-2 अंतर्गत 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे केली जातील.

15) वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत आणि विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा ठाणे शहरापर्यंत विस्तार केला जाणार आहे.

16) छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी 578 कोटी 45 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल.

17) कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु करण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली जाईल.

18) कोकण विभागातील पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गडकिल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन केले जाणार. पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखलं जाईल.

19) मातंग समाजासाठी “अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था- आर्टीची स्थापना करण्यात आली.

20) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे “लेदर पार्क”, कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली जाईल.

21) प्रत्येक महसुली विभागात ‘उत्कृष्टता केंद्रांची’ स्थापना, गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येईल.

22) वार्षिक योजना एक लाख 92 हजार कोटी रुपये, अनुसुचीत जाती उपयोजना 15 हजार 893 कोटी रुपये आणि आदिवासी विकास उपयोजना 15 हजार 360 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

23) सर्व जिल्ह्यांमध्‍ये 15 खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर सुरू करणार, 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांत डायलिसीस सेवा केंद्र सुरू करणार त्याचबरोबर रुग्ण मृत्यू पावल्यास मृतदेह रुग्णालयातून नेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका सुरू केली जाणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले.

24) नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये.

Maharashtra Budget 2024

Image Source: http://mls.org.in/

Maharashtra Budget 2024 – अर्थसंकल्पावर राज्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया:

श्री. एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया:

राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हंटले की, हा (Maharashtra Budget 2024) अर्थसंकल्प चार महिन्यांचा असला तरी सुद्धा सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत या संकल्पनेला एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक, महिला, शेतकरी, कामगार, तरुण, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहेत. मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसाठी निधी ठेवलेला आहे.

श्री. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया:

शिंदे फडणवीस सरकारने आहे तीच परिस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) हा पुढच्या चार महिन्यांसाठी व्होट आणि अकाउंट साठी असतो. पण राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री यांनी दिलेले सर्व पायंडे मोडून आज अंतिम अर्थसंकल्पाचे नावाखाली पूर्ण बजेट मांडला.

श्री. उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया:

महायुती सरकारचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) म्हणजे यांचे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा आहे. कारण अंगणवाडी सेविकांनी अशा सेविका या संपावर आहेत सरकार त्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नाही शासकीय रुग्णालयात रुग्ण हे डॉक्टर, औषध आणि उपचाराविना आहेत. यामुळे गेल्या वर्षभरात मृत्यू झाले त्याकडे लक्ष दिले गेले नाही. पण नवीन शासकीय विद्यालय आणि रुग्णालय, नवीन रस्त्यांच्या घोषणा करत आहे. परंतु पहिल्या योजनांचा पाठपुरावा कुठेच दिसत नाही. नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाच्या पाठला करायला लावायचे.

श्री. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया:

स्मारकांसाठी निधी देऊन मत मिळवण्यासाठी जो फंडा वापरला जातो तो योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक स्वतः पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करून पूर्ण करू शकले नाही. या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारची पाठ थोपटून लोकसभेला मतं मिळवता कशी येतील अशा पद्धतीचा एकूण प्रावधान दिसते. या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2024) बेरोजगारी दूर करण्यासाठी कुठेही काही ठोस तरतूद दिसत नाही.

श्री. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया:

राज्यातील वंचित घटकांचा विचार करून बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ व मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टीची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याने हा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) राज्यातील प्रत्येक घटकाला सामावून घेणारा अर्थसंकल्प असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

श्री. नाना पटोले यांची प्रतिक्रिया:

महायुती सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2024) निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाज घटकाला खुश करण्यासाठी केवळ घोषणा केल्या आहेत. राजकीय तोड फोड, महागाई, बेरोजगारी, पेपर फुटी, समाजा समाजात भांडणे लावण्याचे सरकारने केलेले प्रकार यामुळे राज्यातील जनतेमध्ये या ट्रिपल इंजिन सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. लोकसभा निवडणुकीत जनता या महायुतीचा हिशोब करणार आहे.  सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे सरकारचे हे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यातील शेतकरी आज मोठ्या संकटात आहे पण सरकार त्यांना मदत करत नाही मागील काळात जाहीर केलेली मदतही अद्याप मिळालेली नाही राज्यातील तरुण रस्त्यावर आहेत नोकरी भरती होत नाही स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळे होत आहे. पेपर फुटण्याचे प्रकार वाढले आहे. सरकारने तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही महिला सक्षमीकरण बद्दल अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केल्या पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकी किती सुरक्षित आहे हे सर्वांना माहिती आहे.

निष्कर्ष:

राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला.

हेही वाचा: बहुचर्चित संदेशखळी प्रकरण काय आहे?

Leave a comment