Maharashtra Domicile Certificate: असे काढा घरबसल्या डोमासाईल सर्टिफिकेट

Maharashtra Domicile Certificate: महाराष्ट्र संपूर्ण देशभरात विविध शाखांसाठी कॉलेजमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना लागणारे महत्त्वाचे प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. त्याचप्रमाणे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अर्ज करण्याकरिता किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र गरजेचे असते. नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट गरजेचे होते. डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी महिलांची विविध शासकीय कार्यालयांमध्ये तुडुंब गर्दी झालेली होती. परंतु आता डोमासाईल सर्टिफिकेटची अट या योजनेसाठी शिथिल करण्यात आलेली आहे.

म्हणूनच कॉलेज प्रवेश, स्पर्धा परीक्षा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट गरजेचे आहे. परंतु बऱ्याच लोकांना माहीत नसते की डोमासाईल सर्टिफिकेट घरी बसून देखील ऑनलाइन पद्धतीने काढता येते. चला तर मग जाणून घेऊया घरी बसून महाराष्ट्राचे डोमासाईल सर्टिफिकेट (Maharashtra Domicile Certificate) सोप्या पद्धतीने कसे काढता येते?

महाराष्ट्राचे ऑनलाइन डोमासाईल सर्टिफिकेट कसे काढायचे | How to Get Online Domicile Certificate of Maharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू होताच डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सेतू कार्यालये, महा ई-सेवा केंद्रे, इत्यादी कार्यालयांमध्ये महिलांची तुफान गर्दी झाली होती. यातच विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सेतू कार्यालयात गर्दी असल्यामुळे धावपळ होत होती. परंतु डोमासाईल सर्टिफिकेट हे घरी बसून ऑनलाइन पद्धतीने देखील सहजरीत्या काढता येते. खाली दिलेल्या सोप्या चरणांचे अनुसरण करून डोमासाईल सर्टिफिकेट सहजरीत्या काढा:

Maharashtra Domicile Certificate

Maharashtra Domicile Certificate

पायरी 1: शासनाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या

डोमासाईल सर्टिफिकेट व्यतिरिक्त इतर कोणतेही महत्त्वाचे कागदपत्रे काढायचे असल्यास आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या वेब पोर्टलवर यावे लागते.

आपले सरकार वेब पोर्टल भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

पायरी 2: आपले सरकार संकेतस्थळावर नोंदणी करणे

आपले सरकार या वेब पोर्टल द्वारे विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आणि युजर प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे. वेब पोर्टलवर आल्यानंतर युजर प्रोफाईल तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे चरणांचे अनुसरण करा:

  • या वेब पोर्टलवर तुम्हाला ‘नवीन युजर? येथे नोंदणी करा’ या नावाची टॅब दिसेल.
  • टॅब वर क्लिक केल्यानंतर युजर प्रोफाईल तयार करण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिसतील.
  • पर्याय क्रं.1: आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी द्वारे पडताळणी करून युजर आयडी आणि पासवर्ड बनवा.
  • पर्याय क्रं.2: स्वतःची पूर्ण माहिती तसेच फोटो ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अपलोड करून आणि आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी द्वारे पडताळणी करून एकदाच स्वतःचे युजर प्रोफाईल बनवा.

वरील दिलेल्या दोन्ही पर्यायांपैकी तुम्हाला जो पर्याय योग्य वाटत असेल त्या पर्यायाने स्वतःचे युजर प्रोफाइल तयार करा. पर्याय क्रमांक 1 चा वापर करताना दिलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल, स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकून OTP प्रविष्ट करावा लागेल. ज्या व्यक्तीचे डोमासाईल सर्टिफिकेट काढायचे आहे त्या व्यक्तीचे युजरनेम बनवावे लागेल. त्या व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्मतारीख, वय आणि पासवर्ड टाकून युजर प्रोफाईल बनवू शकतात.

पायरी 3: पोर्टलवर लॉग इन करणे

आपले सरकार पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तयार झालेला यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करणे.

पायरी 4: डॅशबोर्ड वरील योग्य विभाग निवडणे

लॉग इन केल्यानंतर प्रथम तुम्हाला Revenue Department – महसूल विभाग नावाचा पर्याय शोधायचा आहे. त्यानंतर Revenue Department वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर Sub Department मध्ये Revenue Services शोधायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर विविध पर्याय दिसतील आणि त्यापैकी वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (Age, Nationality and Domicile Certificate) या पर्यायावर क्लिक करून Proceed नावाच्या बटनावर क्लिक करायचे आहे.

पायरी 5: वैयक्तिक माहिती भरणे

ज्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Maharashtra Domicile Certificate) काढायचे आहे त्या व्यक्तीचे नाव, वडिलांचे नाव, महिला जर विवाह विवाहित असेल तर विवाहाची माहिती, आधार क्रमांक, शैक्षणिक तपशील, इतर माहिती न चुकता प्रविष्ट करायची आहे. एकदा भरलेली माहिती पुन्हा बदलता येणार नाही. त्यामुळे Save बटनावर क्लिक करण्याआधी संपूर्ण माहिती एकदा काळजीपूर्वक तपासून घ्या.

पायरी 6: कागदपत्रे अपलोड करणे

ज्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Maharashtra Domicile Certificate) काढायचे आहे त्या व्यक्तीची खालील प्रमाणे कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागतील.

Maharashtra Domicile Certificate

डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1) फोटो अपलोड करणे

– छायाचित्राचा आकार किमान 5 केबी आणि कमाल 20 केबी इतका असावा.

– छायाचित्र जेपीईजी स्वरूपात असावा.

– छायाचित्राची रुंदी 160 पिक्सेल इतकी असावी.

– छायाचित्राची उंची 200 ते 212 पिक्सेल इतकी असावी.

ज्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Maharashtra Domicile Certificate) काढायचे आहे त्या व्यक्तीच्या फोटोची रुंदी व उंची जर दिलेल्या माहितीप्रमाणे नसेल तर ती व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने फोटोची साईज बदलू शकते. ऑनलाइन पद्धतीने फोटोची लांबी व रुंदी व्यवस्थित करण्यासाठी येथे क्लिक करा.

2) ओळखपत्राचा पुरावा अपलोड करणे (Proof of Identity)

ज्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Maharashtra Domicile Certificate) काढायचे आहे त्यांनी ओळखीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने अपलोड करायचे आहे. कागदपत्रे जेपीईजी/पीडीएफ स्वरूपातच असावेत. कागदपत्राचा आकार किमान 75 केबी आणि कमाल 500 केबी इतका असावा.

पारपत्र/पॅन कार्ड/आधार कार्ड/मतदाता ओळखपत्र/अर्जदाराचा फोटो/ निमशासकीय ओळखपत्र/ आर एस बी वाय कार्ड/ वाहन चालक अनुज्ञप्ती/ मोटर वाहन चालक अनुज्ञप्ती.

3) पत्त्याचा पुरावा अपलोड करणे (Proof of Address)

ज्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Maharashtra Domicile Certificate) काढायचे आहे त्यांनी पत्त्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने अपलोड करायचे आहे. कागदपत्रे जेपीईजी/पीडीएफ स्वरूपातच असावेत. कागदपत्राचा आकार किमान 75 केबी आणि कमाल 500 केबी इतका असावा.

पारपत्र/ विज देयक/भाडे पावती/शिधापत्रिका/दूरध्वनी देयक/पाणीपट्टी पावती/मालमत्ता कर पावती/वाहन चालक अनुज्ञप्ती/मालमत्ता नोंदणी उतारा/सात बारा आणि 8अ चा उतारा.

4) इतर दस्तऐवज

महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Maharashtra Domicile Certificate) काढायचे आहे त्यांनी खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने अपलोड करायचे आहे. कागदपत्रे जेपीईजी/पीडीएफ स्वरूपातच असावेत. कागदपत्राचा आकार किमान 75 केबी आणि कमाल 500 केबी इतका असावा.

विज देयक/भाडेपावती/शिधापत्रिका/दूरध्वनी देयक/विवाहाचा दाखला/पाणीपट्टी पावती/मालमत्ता कर पावती/मतदार यादीचा उतारा/मालमत्ता नोंदणी उतारा.

5) वयाचा पुरावा

महाराष्ट्र राज्याचे डोमासाईल सर्टिफिकेट (Maharashtra Domicile Certificate) काढण्यासाठी खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने अपलोड करायचे आहे. कागदपत्रे जेपीईजी/पीडीएफ स्वरूपातच असावेत. कागदपत्राचा आकार किमान 75 केबी आणि कमाल 500 केबी इतका असावा.

जन्माचा दाखला/बोनाफाईड प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र/प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा/प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा.

6) रहिवासाचा पुरावा

महाराष्ट्र राज्याचे डोमासाईल सर्टिफिकेट (Maharashtra Domicile Certificate) काढण्यासाठी खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने अपलोड करायचे आहे. कागदपत्रे जेपीईजी/पीडीएफ स्वरूपातच असावेत. कागदपत्राचा आकार किमान 75 केबी आणि कमाल 500 केबी इतका असावा.

रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला दाखला/ रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला/ रहिवास पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला.

7) अनिवार्य कागदपत्रे

महाराष्ट्र राज्याचे डोमासाईल सर्टिफिकेट (Maharashtra Domicile Certificate) काढण्यासाठी खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने अपलोड करायचे आहे. कागदपत्रे जेपीईजी/पीडीएफ स्वरूपातच असावेत. कागदपत्राचा आकार किमान 75 केबी आणि कमाल 500 केबी इतका असावा.

स्वयंघोषणापत्र – स्वयंघोषणापत्राचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा: महिन्याला 1500 रुपये, महिला खुश!

पायरी 7: ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरणे

महाराष्ट्र राज्याचे डोमासाईल सर्टिफिकेट (Maharashtra Domicile Certificate) काढण्यासाठी खालीलपैकी कुठल्याही एका पर्यायाने तुम्ही शासनाची फी भरू शकतात.

नेट बँकिंग/क्रेडिट किंवा डेबिट कार्ड/आय एम पी एस /यु पी आय.

ऑनलाइन पद्धतीने फी भरल्यानंतर पैसे भरण्याची तुम्हाला पावती दिली जाईल. पैसे भरल्याच्या पावतीची तुम्ही प्रिंट आउट काढू शकता.

अशा पद्धतीने सहजरीत्या तुम्ही घरी बसून महाराष्ट्र राज्याचे डोमासाईल सर्टिफिकेट (Maharashtra Domicile Certificate) ऑनलाइन पद्धतीने काढू शकता.

निष्कर्ष

महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या पोर्टलचा लाभ घेऊन अगदी सहजरीत्या घरी बसून ऑनलाइन पद्धतीने डोमासाईल सर्टिफिकेट काढणे शक्य आहे.

शैक्षणिक, धार्मिक, नोकरी, इतर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी येथे क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे काय?

एखादी व्यक्ती संबंधित ठिकाणची स्थानिक रहिवासी आहे असं अधिकृतरित्या प्रमाणित करणाऱ्या शासकीय दाखल्याला अधिवास प्रमाणपत्र/डोमासाईल सर्टिफिकेट असे म्हणतात.

2) डोमासाईल सर्टिफिकेट तलाठी यांच्याकडून मिळू शकतो का?

नाही. तलाठी यांच्याकडून मिळणारा रहिवासाचा पुरावा आणि डोमासाईल सर्टिफिकेट यामध्ये फरक आहे.

Leave a comment