Mukhyamantri Teerth Darshan Yojana: राज्यातील सर्व ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा

Mukhyamantri Teerth Darshan Yojana: राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची सुवर्णसंधी आहे. भारत देशात हिंदू धर्मात चार धाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांची ही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांमुळे तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) नेमकी आहे तरी काय?

सामग्री सारणी

Mukhyamantri Teerth Darshan Yojana

Mukhyamantri Teerth Darshan Yojana: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची माहिती

महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मांमधील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन योजनेची घोषणा केलेली आहे. भारत देशात विविध धर्मांचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात. आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना देखील आपल्या देवदेवतांचे/भगवंताचे नामस्मरण, चिंतन करीत आयुष्य जगत असतात. राज्यातील सर्व धर्मीयांमध्ये ज्येष्ठ नागरिक जे सात वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे उद्दिष्ट, व्याप्ती आणि लाभार्थी

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) योजनेचे उद्दिष्ट राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हे आहे.

सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशामधील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील. सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एकाच स्थळाच्या यात्रे करता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रुपये  30,000 इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश राहील.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय व त्यावरील सर्व धर्मांमधील जेष्ठ नागरिक पात्र असतील.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता व अपात्रता

पात्रता:

1) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

2) वय वर्ष 60 व त्यावरील जेष्ठ नागरिक.

3) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.

अपात्रता:

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) लाभ खालील दिलेले निकष लागू होणारे जेष्ठ नागरिक घेऊ शकणार नाहीत.

1) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत.

2) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि रुपये 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील

3) त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार /आमदार आहे.

4) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कार्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/ संचालक/सदस्य आहेत.

5) ज्यांच्याकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

6) प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी.

7) अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिक दृष्ट निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (सदर प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे)

8) जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही.

9) जर असे आढळून आले की अर्जदार/प्रवाशांनी खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्य लपवून अर्ज केला आहे आणि ज्यामुळे तो/तिला प्रवासासाठी अपात्र ठरते तर त्याला/तिला कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवता येईल.

सदर योजनेच्या (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

2) लाभार्थ्याचे आधार कार्ड/रेशन कार्ड.

3) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.

(लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.)

4) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखांपर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे/केशरी रेशन कार्ड.

5) वैद्यकीय प्रमाणपत्र.

6) पासपोर्ट आकाराचा फोटो.

7) जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक.

8) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करणे बाबतची हमीपत्र.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल.

1) प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हा निहाय कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे (लॉट्सचे संगणीकृत ड्रॉ) प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल.

2) निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास, प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल.

3) निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमाद्वारे प्रसारित केली जाईल.

4) फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो/ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही.

5) जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरी निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरी निवड झाली नसेल तर आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना प्रवास प्रक्रिया

1) जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल.

2) निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी/एजन्सीला देण्यात येईल.

3) नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी/एजन्सी टूर वरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल.

4) प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात यावा याचा निर्णय राज्य शासन घेईल.

5) सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल.

6) हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल. सदर गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण/एजन्सीद्वारे निश्चित केले जातील. शासनाने विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास सुरू होईल.

7) या योजनेअंतर्गत (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल. इतर कोणतेही नातेवाईक किंवा लहान मुलं इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही.

8) कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या निकष/सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहील.

हेही वाचा: भारतात नवीन फौजदारी कायदे लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी प्रवाशांकडून अपेक्षा

1) प्रवाशांना कोणतेही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील.

2) राज्याची/देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठानुसार वागावे.

3) प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी/व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील.

4) वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल.

5) प्रवाशांना विभागाच्या विहित प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोणताही प्रवासी इतर प्रवाशांची गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही.

6) साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील. विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात.

मूळ अर्जदारासह जीवनसाथी/सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी

1) 75 वर्षांवरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल.   परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की, त्याचा जीवनसाथी/सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे.

2) 75 वर्षांवरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल.

3) प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल. अर्जदाराचे वय 75 वर्षांपेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही.

4) सोबत प्रवास करताना जोडीदारांसोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती-पत्नीचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठविला जाऊ शकतो.

5) सहाय्यकाचे किमान वय 21 वर्षे ते कमाल 50 वर्षे असावे. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक शारीरिक दृष्ट निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा.

6) प्रवासी पती-पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक असेल.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana: अर्ज करण्याची प्रक्रिया

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) अर्ज पोर्टल/मोबाईल ॲप द्वारे/ सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:-

1) पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

2) ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल.

3) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.

4) अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि केवायसी करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.

  • कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
  • स्वतःचे आधार कार्ड

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) संबंधित अधिकृत शासन निर्णय (GR) आणि निर्धारित तीर्थक्षेत्रांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

निष्कर्ष

महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील, सर्व धर्मांमधील ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील निर्धारित तीर्थक्षेत्रास मोफत भेट देऊ शकतात. तीर्थक्षेत्रास भेट देण्याचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत होईल.

हेही वाचा: ॲमेझॉन कडून महाराष्ट्रात मेगा भरती!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे का?

होय.

2) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणारे सर्वधर्मातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय वर्ष 60 व त्यापेक्षा अधिक आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नाही, असे नागरिक मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हेही वाचा: देवशयनी एकादशी, खरंच देव झोपतात का?

Leave a comment