Powergrid Recruitment 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये GATE-2024 द्वारे प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून विविध पदांसाठी भरती होत आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा आकर्षक पगार आणि सोयी सुविधा पाहता अनेक इंजिनियर्सचे येथे नोकरी करण्याचे स्वप्न असते. पॉवर ग्रिड GATE-2024 द्वारे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयांमधील प्रशिक्षणार्थी म्हणून सामील होण्यासाठी उज्वल, वचनबद्ध आणि उत्साही अभियांत्रिकी पदवीधर शोधत आहे. चला तर मग जाणून घेऊया PGCIL GATE 2024 ची संपूर्ण अर्ज प्रक्रिया.
सामग्री सारणी
Powergrid Recruitment 2024 – भरती प्रक्रिया
कंपनीचे नाव | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) |
नोकरीचे पद | प्रशिक्षणार्थी अभियंता 2024 |
एकूण पदे | 435 |
शाखा | इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि कॉम्प्युटर |
शैक्षणिक पात्रता | BE/B.Tech/B.Sc(Engineering) |
अर्ज करण्याची तारीख | 12/06/2024 ते 04/07/2024 |
निवड प्रक्रिया | GATE 2024 स्कोअर, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
Powergrid Recruitment Through GATE 2024 – रिक्त पदे
CTUIL म्हणजेच सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये देखील विविध विषयांमध्ये अभियंता प्रशिक्षणार्थी (CTUIL Engineer Trainee Recruitment 2024) पदांची भरती होत आहे. CTUIL ही पॉवर ग्रिड च्या मालकीची उप कंपनी आहे.
1) इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग
एकूण रिक्त पदे: 331 (पॉवर ग्रिड – 293, CTUIL – 38)
2) सिव्हिल इंजीनियरिंग
एकूण रिक्त पदे: 53 (पॉवर ग्रिड – 47, CTUIL – 6)
3) इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग
एकूण रिक्त पदे: 14 (पॉवर ग्रिड – 2, CTUIL – 12)
4) कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग
एकूण रिक्त पदे: 37 (पॉवर ग्रिड – 31, CTUIL – 6)
Powergrid Recruitment 2024 – शैक्षणिक अहर्ता
1) इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग / इलेक्ट्रिकल (पॉवर) इंजीनियरिंग / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग / पॉवर सिस्टीम इंजीनियरिंग / पॉवर इंजीनियरिंग
2) सिव्हिल इंजीनियरिंग
3) इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इंजीनियरिंग / टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग
4) कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग / कॉम्प्युटर इंजीनियरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
वरील विषयांतून मान्यता प्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पूर्ण वेळ BE/ B.Tech / B. Sc Engineering चे शिक्षण पुर्ण केलेले उमेदवार.
गुणांची टक्केवारी: 60% किंवा समतुल्य CGPA.
दिनांक 14/08/2024 पर्यंत अंतिम निकाल अपेक्षित असलेले अंतिम वर्ष / सेमिस्टर मधील विद्यार्थी देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
Powergrid Recruitment 2024 – वेतन
उद्योगातील सर्वोत्कृष्ट स्थानांमध्ये आकर्षक वेतन पॅकेजसाठी पॉवर ग्रिडमधील प्रशिक्षणार्थी अभियंता पदे येत असतात. यशस्वी उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत रु.40,000/- -3%- 1,40,000 (IDA) व इतर भत्ते या वेतन श्रेणीत ठेवण्यात येईल.
प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर संस्थेच्या धोरणानुसार नियमित कर्मचाऱ्यांना पॅकेज मध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, अनुलाभ यांचा समावेश होतो. कार्यप्रदर्शन संबंधित वेतन, कंपनी क्वार्टर किंवा रहिवासी भत्ता, मासिक कन्व्हेन्स खर्च, मोबाईल सुविधा प्रतीपूर्ती, लॅपटॉप सुविधा, पीएफ, ग्रॅच्यूएटी, पेन्शन आणि रजा रोख रक्कम, गट विमा, गट वैयक्तिक अपघात विमा, इत्यादी.
PGCIL GATE 2024 – वयोमर्यादा
31 डिसेंबर 2023 रोजी कमाल 28 वर्षे. नियमानुसार वयात सूट असेल.
Powergrid Recruitment 2024 – निवड प्रक्रिया
पॉवर ग्रिड अभियंता प्रशिक्षणार्थी 2024 ची निवड पुढील चरणांवर आधारित असेल.
1) GATE 2024 स्कोअर
2) ग्रुप डिस्कशन
3) वैयक्तिक मुलाखत
Powergrid Recruitment 2024 – अर्ज शुल्क
SC/ST/PwBD/Ex-SM/विभागीय उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. UR/EWS/OBC उमेदवारांना रु.500/- इतके अर्ज शुल्क भरावे लागेल.
अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
Powergrid Recruitment 2024 – महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन पध्दतीने पॉवर ग्रिडला अर्ज सादर करणे व अर्ज शुल्क भरन्याची सुरवात | 12/06/2024 (सायंकाळी 5 वाजेपासून) |
ऑनलाइन पध्दतीने पॉवर ग्रिडला अर्ज सादर करणे व अर्ज शुल्क भरन्याची अंतिम तारीख | 04/07/2024 (रात्री 11:59 पर्यंत) |
Powergrid Recruitment 2024 – अर्ज प्रक्रिया
1) 12 जून 2024 पासून उमेदवारांना पावर ग्रीडच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांची वैयक्तिक माहिती, GATE 2024 चा नोंदणी क्रमांक व इतर माहितीसह ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागेल.
2) ऑनलाइन अर्ज 4 जुलै 2024 रोजी बंद होईल.
3) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचा GATE 2024 च्या प्रवेश पत्रावरील नोंदणी क्रमांकच प्रविष्ट करायचा आहे. उमेदवारांनी इतर कुठलाही क्रमांक प्रविष्ट करू नये.
4) उमेदवारांनी त्यांचे नाव व GATE 2024 च्या प्रवेश पत्रावरील नोंदणी क्रमांक अचूक पद्धतीने प्रविष्ट करायचे आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही तपशिलांमध्ये बदल करण्याची विनंती मान्य केली जाणार नाही.
5) अर्जातील इतर तपशील अतिशय काळजीपूर्वक भरा. उमेदवारांनी ई-मेल आयडीचा तपशील अतिशय काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे कारण की भरती प्रक्रियेची महत्त्वाची अपडेट्स ही ईमेलच्या माध्यमातूनच मिळणार आहे.
6) संपूर्ण अर्ज भरल्यानंतर उमेदवाराने सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
7) ज्या उमेदवारांना अर्ज शुल्क लागू असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. अर्ज शुल्क जमा केल्यावरच अर्ज प्रक्रिया पूर्ण मानली जाईल.
8) अपूर्ण अर्ज/ अर्ज शुल्काशिवाय अर्ज / मसुदा अर्ज नाकारले जातील.

Powergrid Recruitment 2024 – महत्त्वाच्या सूचना
1) उमेदवारांना त्यांचा नवीनतम रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो (.JPG फाईलचा आकार 50 kb पेक्षा जास्त नको), स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत (.JPG फाईलचा आकार 30 kb पेक्षा जास्त नको), जन्मतारखेचा पुरावा / जात प्रमाणपत्र / अपंगत्व प्रमाणपत्र / डिस्चार्ज प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र / अंतिम उत्तीर्ण प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.
2) उमेदवारांनी त्यांच्या जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीच्या मार्कशीट वरील नाव व जन्मतारीख चविष्ट करणे गरजेचे आहे. उमेदवारांनी त्यांच्या जातीचा तपशील अचूक पद्धतीने भरावायचा आहे व पॉवर ग्रिडला आवश्यक असल्यास मूळ कागदपत्रे मागवू शकतात.
3) उमेदवारांनी त्यांच्या शिक्षणाचा तपशील योग्यरित्या अचूक पद्धतीने भरायचा आहे.
4) भविष्यातील संदर्भासाठी उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंटआऊट घ्यावी.
अन्य महत्वाच्या सूचनांसाठी पॉवर ग्रिडच्या अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करा.
Powergrid Recruitment 2024 – महत्त्वाच्या लिंक्स
पॉवर ग्रिडच्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी | येथे क्लिक करा |
पॉवर ग्रिड प्रशिक्षणार्थी अभियंता 2024 ची अधिकृत जाहीरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
पॉवर ग्रिड कंपनिविषयी अधिक माहिती:
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पॉवरग्रिड), भारत सरकार एक शेड्यूल ‘ए’, ‘महारत्न’ सार्वजनिक क्षेत्र उद्यम आहे, कंपनी कायदा, 1956 च्या अंतर्गत 23 ऑक्टोबर 1989 कंपनी तयार झाली. पावरग्रिड कंपनीमध्ये संपूर्ण भारत सरकारची 51.34% भागीदारी आहे आणि उर्वरित भागदारी संस्था गुंतवणूकदार आणि जनतेची आहे.
पॉवर ग्रिड मुख्यत्वे त्याच्या EHVAC/HVDC ट्रांसमिशन नेटवर्कद्वारे वीज पारेषणाच्या व्यवसायात गुंतलेले आहे. ऑप्टिकल ग्राउंड वायर (OPGW) च्या स्ट्रिंगिंगद्वारे आपल्या पॅन इंडिया ट्रान्समिशन नेटवर्कचा फायदा घेऊन कंपनीने दूरसंचार व्यवसायात विविधता आणली आहे. पॉवर ग्रिडने पॉवर ट्रान्समिशनच्या क्षेत्रातील क्षमता आणि अनुभवाचा फायदा घेऊन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सल्ला सेवा प्रदान / प्रदान केली आहे. ट्रान्समिशन, वितरण व्यवस्थापन, लोड डिस्पॅच आणि कम्युनिकेशन इ.
प्रमुख वैशिष्टे:
1) भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन युटिलिटी.
2) 2007 पासून सूचीबद्ध कंपनी
3) 1993-94 पासून ऊर्जा मंत्रालयासोबतच्या सामंजस्य करारांतर्गत सातत्याने “उत्कृष्ट” रेट केले गेले.
Disclaimer: आम्ही मराठी टीव्ही पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीतील भरतीसाठी कुठल्याही प्रकारे जबाबदार नसून पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने स्वतः अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड किंवा कंपनीचे कुठलेही कर्मचारी भरतीसाठी पैशांची मागणी करत नाहीत.
निष्कर्ष:
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये GATE-2024 द्वारे प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून विविध पदांसाठी भरती होत आहे. ही सरकारी नोकरीची ( Government Jobs) उत्तम संधी आहे. उमेदवारांनी पॉवर ग्रिडच्या अधिकृत वेबसाईटवरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1) पॉवर ग्रिड ही सरकारी कंपनी आहे की खाजगी?
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पॉवरग्रिड), ही सरकारची अनुसूची ‘अ’, ‘महारत्न’ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.
2) पॉवर ग्रिडचे खाजगीकरण झाले आहे का?
नाही. कंपनी मध्ये भारत सरकारची 51.34% भागीदारी आहे.
3) पॉवर ग्रिड GATE 2024 द्वारे प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे?
दिनांक 04/07/204 रात्री 11:59 पर्यंत.
हेही वाचा: नाशिक मधील नामांकित कंपनीत विविध पदांसाठी भरती.
माहिती पुढे शेअर करा.