Pradeep Mishra News: भारतासह संपूर्ण जगभरातील लोकांना महादेवाच्या भक्तीचे वेड लावणारे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे.
Pradeep Mishra News: सर्व कथा रद्द!
Pradeep Mishra News: दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी मनसा, नीमच येथे पंडित प्रदीपजी मिश्रा पोहोचले. कथा मंडपात पोहोचल्यानंतर ते म्हणाले की माझी तब्येत खराब आहे, पण मी फक्त तुम्हाला भेटायला आलो आहे. दिनांक 29 मार्च 2024 रोजी आष्टा, सिहोर येथे होळी खेळताना प्रचंड गर्दीत कोणीतरी गुलाल ऐवजी नारळ फेकला आणि तो नारळ माझ्या डोक्यावर पडला.
अंतर्गत दुखापतीमुळे मेंदूला सूज आलेली आहे व मेंदूमध्ये समस्या निर्माण झालेली आहे. डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले आहे. जोपर्यंत डॉक्टर परवानगी देत नाहीत तोपर्यंत मी कथा सांगू शकत नाही असेच प्रदीप मिश्रा यांनी सांगितले.
हेही वाचा: प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले पशुपतिनाथ व्रत कसे करावे!
पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले की तुम्ही सर्वजण येथे आलात आणि तुम्हाला कथा रद्द झाल्यामुळे त्रास देखील झाला आहे. पुढील वर्षी विठ्ठल सेवा समिती मनसा येथे स्वखर्चातून कथा आयोजित करेल. प्रकृतीत सुधारणा होताच पुढील कथा करेल, अन्यथा पुढील सर्व कथा रद्द करण्यात येतील.
दरम्यान, दिनांक 1 एप्रिल ते 7 एप्रिल या कालावधीत मनसा येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले होते. रविवारी 31 मार्च रोजी शहरात कलश यात्रा देखील करण्यात आली होती. परंतु पंडित प्रदीप मिश्रा यांनी कथा रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर संपूर्ण कथा मंडपात शांतता पसरली होती आणि अनेक भाविकांच्या डोळ्यात पाणी देखील आले होते.
हेही वाचा: जाणून घ्या सोमवती आमवास्याचे महत्व!
Pradeep Mishra News – पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविषयी:
Pradeep Mishra News: कोरोना महामारीत ज्यांच्या व्हिडीओनां प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर सिहोर येथे आयोजित केलेल्या रुद्राक्ष वाटप समारंभाला ऐतिहासिक गर्दी जमा झाली ते म्हणजे पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले. आंतरराष्ट्रीय शिवमहापुराण कथा वाचक प्रदीपजी मिश्रा हे सिहोरवाले बाबा म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. त्यांची शिव महापुराण कथा जिथे आयोजित केलेले असते तिथे लाखोंच्या संख्येने भावी उपस्थित असतात.
पंडित प्रदीप मिश्रा यांचा जन्म 16 जून 1977 रोजी मध्य प्रदेश मधील सिहोर येथे हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव रामेश्वर दयाल मिश्रा आणि आईचे नाव सीता मिश्रा असे होते. त्यांना दोन भाऊ आहेत. पंडित प्रदीप मिश्रा यांचे वडील कैलासवासी रामेश्वर मिश्रा हे फार शिकलेले नव्हते. ते सुरुवातीला रस्त्यावर हरभरे विकत असे. त्यानंतर त्यांनी चहाचे दुकान उघडले. प्रदीप मिश्रा त्यांच्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करत असे.
लहानपणापासूनच प्रदीप मिश्रा यांना भक्ती भजनाची आवड होती. प्रदीप मिश्रा त्यांच्या वडिलांसोबत अध्यात्मिक कार्यक्रमाला जात असे, ज्यामुळे त्यांची अध्यात्मात आवड निर्माण झालेली होती. प्रदीप मिश्रा यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण सिहोर येथे पूर्ण केले होते आणि त्यांनी पदवी प्राप्त केली. प्रदीप मिश्रा मोठे झाल्यावर एका ब्राह्मण कुटुंबातील महिला गीताबाई पराशर नावाच्या महिलेने त्यांना कथाकार बनण्याची प्रेरणा दिली. गिताबाई पराशर यांनी त्यांना गुरु दिक्षेसाठी इंदोरला पाठवले होते.
Pradeep Mishra News: पंडित प्रदीप मिश्रा यांना इंदोर येथील श्री गोवर्धननाथ यांच्याकडून गुरु दीक्षा मिळाली. पंडित प्रदीप मिश्रा हे शिव महापुराण आणि श्रीमद् भागवत कथेच्या प्रचारासाठी ओळखले जातात. इंदोरमध्ये दीक्षा पूर्ण केल्यानंतर मिश्रा हे त्यांच्या गावी परतले. पंडित मिश्रा हे त्यांच्या गावी सुरुवातीला श्रीमद् भागवत कथेचे पठण करू लागले. त्यानंतर त्यांचे लक्ष शिव महापुराण कथेकडे वळाले. पंडित प्रदीप जी मिश्रा हे मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील चितोडिया हेमा येथील पवित्र तीर्थक्षेत्र कुब्रेश्वर धाम येथे मुख्य पुजारी आहेत.
पंडित प्रदीप मिश्रा यांनी मध्यप्रदेशातील सिहोर येथे श्री विठ्ठल सेवा समितीची स्थापना केली आहे ती लाखो महादेवाच्या भक्तांसाठी मोफत अन्न पुरविण्यासाठी समर्पित आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांचे सोशल मीडियावर जबरदस्त वर्चस्व आहे. मिश्रा यांची युट्युब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो चाहते आहेत. त्यांची कथा आस्था चैनल आणि युट्युब च्या मार्फत लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. प्रदीप मिश्रा हे शिव महापुराण कथेसोबत दैनंदिन सुखी जीवनासाठी छोटे छोटे उपाय देखील सांगत असतात.
पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेल्या काही उपायांचा लाखो लोकांना फायदा झाला आहे असे ते सांगत असतात. ज्या भाविकांना या उपायांचा फायदा झालेला असतो त्यांनी पाठवलेले पत्र पंडित मिश्रा हे कथेदरम्यान वाचत असतात. महादेवाच्या पिंडीवर एक तांब्याभर पाणी टाकणे असेल, महादेवाच्या पिंडीवर चढवलेले बेलाचे पान खाणे असेल किंवा पशुपतिनाथ व्रत हे त्यांचे प्रसिद्ध उपाय.
Pradeep Mishra News – पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे प्रसिद्ध भजन:
1) सुन भक्तों की पुकार
सुन भक्तों की पुकार होके नंदी पे सवार,
काशी नगरी से आये हैं भोले शंकर
भस्मी रमाये देखो डमरू बजाये,
कैसा निराला भोले रूप सजाये,
गले में है सर्पो का हार होके नंदी पे सवार,
काशी नगरी से आये हैं भोले शंकर.
मृग चाल पहने है जटाओ में गंगा,
चम चम चमकता है माथे पे चंदा,
गौरी मैया के श्रृंगार होके नंदी में सवार,
काशी नगरी से आये हैं भोले शंकर..
देवों के देव इनकी महिमा महान है,
भोले भक्तों के ये तो भोले भगवान है,
करने भक्तों का उद्धार होके नंदी पे सवार,
काशी नगरी से आये हैं भोले शंकर
Pradeep Mishra News: प्रसिद्ध भजन
2) भोलेनाथ दया करना मैं तेरे भरोसे हूँ
भोलेनाथ दया करना मैं तेरे भरोसे हूँ लिरिक्स
भोलेनाथ दया करना मैं तेरे भरोसे हूँ
महाकाल दया करना मैं तेरे भरोसे हूँ
ना घर के भरोसे हूँ ना परिवार के भरोसे हूँ
भोलेनाथ दया करना मैं तेरे भरोसे हूँ
ना घर की हो चिंता ना परिवार का हो बंधन
भोलेनाथ दया करना मैं तेरे भरोसे हूँ
शम्भू नाथ कृपा करना मैं तेरे भरोसे हूँ
सारे जग ने ठुकराया है तूने ही संभाला है
भोलेनाथ दया करना मैं तेरे भरोसे हूँ
ना इनके भरोसे हूँ ना उनके भरोसे हूँ
भोलेनाथ दया करना मैं तेरे भरोसे हूँ
भोलेनाथ दया करना मैं तेरे भरोसे हूँ
शम्भू नाथ दया करना मैं तेरे भरोसे हूँ
Pradeep Mishra News: प्रसिद्ध भजन
3) हरि ॐ में ॐ समाया है
हरि ॐ हरि ॐ हरि ॐ
हरि ॐ में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
मेरा भोला नगर में आया है
हरि ॐ में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
भोले की जटा में गंगा विराजे
गंगा विराजे हा गंगा विराजे
गंगा में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
हरि ॐ में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
भोले के माथे पे चंदा विराजे
चंदा विराजे हा चंदा विराजे
चंदा में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
हरि ॐ में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
भोले के गले में सर्प विराजे
सर्प विराजे हा सर्प विराजे
सर्पो में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
हरि ॐ में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
भोले के हाथो में डमरू विराजे
डमरू विराजे हा डमरू विराजे
डमरू में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
हरि ॐ में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
भोले के कमर में दुशाला विराजे
दुशाला विराजे हा दुशाला विराजे
मृगशाला में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
हरि ॐ में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
भोले के संग में गौरा विराजे
गौरा विराजे हा गौरा विराजे
गोदी में गणपत समाया है
मेरा भोला नगर में आया है
हरि ॐ में ॐ समाया है
मेरा भोला नगर में आया है
Pradeep Mishra News: प्रसिद्ध भजन
4) शंभू शरणे पड़ी मांगू घड़ी रे
शंभू शरणे पड़ी मांगू
घड़ी रे घड़ी दुख काटो,
दया करीने ने दर्शन आपो
तेरी सेवा में जल ले आई,
उसे मछली भी जूठा कराई
जल कैसे चढ़ाऊँ…
भोले कैसे रिझाउ… महादेवा !!
भोले कैसे करू तेरी सेवा।
शंभू शरणे पड़ी……
तेरी सेवा में दूध ले आई,
उसे बछड़ा भी जूठा कराई
दूध कैसे चढ़ाऊँ…
भोले कैसे रिझाउ… महादेवा !!
भोले कैसे करू तेरी सेवा।
शंभू शरणे पड़ी……
तेरी सेवा में फूल ले आई,
उसे भवरा भी जूठा कराई
फूल कैसे चढ़ाऊँ…
भोले कैसे रिझाउ… महादेवा !!
भोले कैसे करू तेरी सेवा।
शंभू शरणे पड़ी…