SSC Recruitment 2024: सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत असलेल्या असंख्य उमेदवांसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विवध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये आणि अधिनिस्त कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचारी भरती करत असते.
सामग्री सारणी
SSC Recruitment 2024 कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या अंतर्गत विविध पदांच्या एकूण 2019 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च 2024 आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 ची संपूर्ण माहिती जसे की पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, इत्यादी महत्वपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे. संबंधित माहिती काळजीपूर्वक वाचूनच ऑनलाइन अर्ज भरावा.
SSC Recruitment 2024
पदाचे नाव : विविध मंत्रालये / विभाग / संस्थांमध्ये निवड पदे फेज 12
रिक्त जागा : 2049
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024, फेज 12 अंतर्गत दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी खालील पदांसाठी भरती होणार आहे.
लॅब अटेंडंट, बाईंडर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, सीनियर प्रोजेक्शनिस्ट, फिल्ड कम लॅबोरेटरी अटेंडंट, नर्सिंग ऑर्डरली, ड्रायव्हर कम मेकॅनिक, वर्कशॉप अटेंडंट, बॉयलर अटेंडंट, टेक्निकल ऑपरेटर, फोटोग्राफर, फिल्ड कम लॅब अटेंडंट, फोटो आर्टिस्ट, कॅन्टीन अटेंडंट, इत्यादी.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024, फेज 12 अंतर्गत उच्च माध्यमिक (10+2) पास असणाऱ्या उमेदवारांसाठी खालील पदांसाठी भरती होणार आहे.
प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, वरिष्ठ सर्वेक्षक, सुतार कम कलाकार, रिसेप्शनिस्ट/ तिकीट सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक, ऑफसेट मशीन मॅन, तांत्रिक लिपिक, क्षेत्र सहाय्यक, वरिष्ठ छायाचित्रकार संरक्षण सहाय्यक, वरिष्ठ संरक्षण सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर,इत्यादी.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024, फेज 12 अंतर्गत पदवीधर आणी त्यावरील उमेदवारांसाठी खालील पदांसाठी भरती होणार आहे.
स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक, क्षेत्र सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, आहार तज्ञ, तांत्रिक अधीक्षक, वस्त्र डिजाइनर, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, गर्ल्स कॅडेट प्रशिक्षक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ प्राणीशास्त्र सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्रशिक्षक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ रेडिओ तंत्रज्ञ, इत्यादी.
SSC Recruitment 2024 (Age Limit) वयोमर्यादा:
01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25 वर्षे, 18 ते 27 वर्षे, 18 ते 30 वर्षे, 18 ते 35 वर्षे, 18 ते 37 वर्षे, 18 ते 42 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
हेही वाचा: भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 490 पदांसाठी भरती.
SSC Recruitment 2024 (Application Fees) अर्ज शुल्क:
General/OBC: ₹100/-
SC/ST/PWD/Ex Service/महिला: फी नाही
उमेदवार BHIM UPI, Net Banking यांच्याद्वारे किंवा Visa, Mastercard, रुपय डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून किंवा SBI चलन तयार करून SBI शाखांमध्ये फी ऑनलाईन भरू शकतात.
(Application Process) अर्ज पद्धती: ऑनलाईन
(Last Date of Online Application) अर्ज करण्याची शेवटची तारीख:
18 मार्च 2024 (11:00 PM)
SSC Recruitment 2024 Process, निवड प्रक्रिया:
– संगणक आधारित परीक्षा
– कागदपत्रांची पडताळणी
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024, फेज 12 अंतर्गत निवड प्रक्रियेदरम्यान तीन वेगळ्या संगणक आधारित परीक्षा आयोजित केला जातील त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रकार एकाधिक निवड प्रश्न असतील. या परीक्षा मॅट्रिक, उच्च माध्यमिक आणि पदवी आणि त्यावरील स्तरावरील किमान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांवर लागू होतात.
SSC Recruitment 2024 फेज 12 साठी अर्ज करण्याची पद्धत:
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024, फेज 12 साठी तुमचा ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या नोंदणी करण्यासाठी खालील दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्व पात्र उमेदवार यांना प्रत्यक्षणीच्या पोस्टसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल आणि प्रत्येक श्रेणीसाठी लागू असल्यास शुल्क देखील भरावा लागेल.
– पाच उमेदवारांनी प्रथम नव्याने सुरू केलेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
– क्विक लिंक्स श्रेणीतील “लागू करा” बटणावर क्लिक करा.
– निवड पोस्ट परीक्षा 2024 निवडा आणि नंतर लागू करा लिंक वर क्लिक करा.
– जर तुम्ही आधीच SSC मध्ये एक वेळ नोंदणी केलेली असेल तर तुमची क्रेडेन्शिअल्स (नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड) वापरून लॉग इन करू शकता किंवा तुमचा SSC अर्ज नोंदणी करण्यासाठी “आता नोंदणी करा” लिंकवर क्लिक करा.
– नवीन नोंदणीसाठी (एक वेळ): वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा, नवीन पासवर्ड तयार करा, अतिरिक्त तपशील प्रदान करा आणि नवीन खाते तयार करण्यासाठी घोषणा करा.
– लॉग इन केल्यानंतर थेट SSC निवड पोस्ट परीक्षा 2024 साठी अर्ज करा.
– उमेदवारांनी दिलेल्या सूचनेचे पालन करून आपली ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
– अर्ज शुल्क आणि ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी पुढील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.
– अर्ज हा न चुकता भरायचा आहे.
– अर्ज प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास टोल फ्री क्रमांक 18003092063 वर संपर्क साधावा.
SSC Recruitment 2024 महत्वपूर्ण लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | क्लिक करून फॉर्म भरा |
अधिकृत जाहिरात | Download करा |
SSC प्रदेश निहाय निवड पदे | क्लिक करा |
हेही वाचा : महाशिवरात्री का साजरी करतात?
SSC Recruitment 2024 FAQ:
1. SSC चा फुल फॉर्म काय आहे?
SSC चा फुल फॉर्म हा Staff Selection Commission (कर्मचारी निवड आयोग) आहे.
2. SSC निवड पदांसाठी अर्ज कसा करावा?
पात्र भारतीय उमेदवारांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
3. Staff Selection Commission Recruitment 2024, Phase 12 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
एसएससी निवड पोस्ट टप्पा बारावा 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे अंतिम तारीख 18 मार्च 2024 आहे.
4. SSC निवड प्रक्रिया अंतर्गत कुठल्या पदांसाठी भरती होत असते?
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये आणि अधिनिस्त कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचारी भरती करत असते जसे की सहाय्यक, लिपिक, परिचर, अभियंता, अधिकारी, इत्यादी.
5. कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांसाठी अर्ज करण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे का?
होय, कर्मचारी निवड आयोगाकडे एक वेळ नोंदणी करणे हे अनिवार्य आहे. एकदा नोंदणी पूर्ण केल्यावर उमेदवार आयोगाच्या कोणत्याही परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
6. कर्मचारी निवड आयोगाचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड ईमेलवर मिळाला नाही तर काय करावे?
उमेदवारांनी त्यांच्या ई-मेल मधील स्पॅम फोल्डर तपासून घेणे. तर स्पॅम फोल्डर मध्येही ईमेल प्राप्त झालेला नसेल तर उमेदवारांनी कधीच चुकीचा ईमेल आयडी टाकला असू शकतो. उमेदवारांनी कॉल किंवा ईमेलद्वारे संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा.
7. कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेची/सूचना जाहिरात कधी दिली जाते?
परीक्षांच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये वेगवेगळ्या परीक्षांच्या सूचना जारी करण्याच्या तात्पुरता तारखा दिल्या आहेत. त्यामुळे नवीन जाहिरातींसाठी उमेदवारांनी नियमितपणे वेबसाईटला भेट देण्याची गरज आहे.
8. कर्मचारी निवड आयोग आपले वार्षिक परीक्षा दिनदर्शिका कधी अपलोड करते?
कर्मचारी निवड आयोग आपले वार्षिक परीक्षा दिनदर्शिका सहसा सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यात त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करते.
हेही वाचा : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 490 पदांसाठी भरती.
हेही वाचा : आचारसंहिता म्हणजे काय?
उपयुक्त माहिती पुढे शेअर करा.