Surya Ghar Yojana: आज मंगळवार, दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू केली आहे. देशात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. एक कोटी घरांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
पीएम सूर्य घर योजनेची माहिती
Surya Ghar Yojana: पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया ‘एक्स’ वरून पोस्टमध्ये ही घोषणा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ” शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करत आहोत. “
सूर्यघर योजनेचा उद्देश
या प्रकल्पात 75 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज देणार असून एक कोटी घरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, योजना तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकार क्षेत्रात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
![Surya Ghar Yojana](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/02/Surya-Ghar-Yojana-1024x520.jpg)
रोजगाराला मिळेल चालना
PM Surya Ghar Yojana योजनेच्या अंमलबजावणी मुळे लोकांचे उत्पन्न वाढेल, विज बिल कमी होईल आणि रोजगार निर्मिती होईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी pmsuryaghar.gov.in वर अर्ज करून पंतप्रधानांनी सर्व निवासी ग्राहकांना खास करून तरुणांना PM Surya Ghar Yojana म्हणजेच मोफत वीज योजना बळकट करण्याचे आवाहन केले आहे.
PM सूर्यघर योजनसाठी अर्ज कसा करावा? How to apply for PM Surya Ghar Yojana?
पीएम सूर्य घर’ मोफत वीज योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तुम्ही नोंदणी करताच तुमचे स्वतःचे खाते तयार होईल. येथे लॉगिन करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल-
– तुमचे राज्य, वीज पुरवठा कंपनी, वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी व विचारलेल्या माहितीच्या आधारे रजिस्ट्रेशन करा.
_ तुमचा वीज ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर च्या साहाय्याने रूफटॉप सोलर साठी अर्ज करा.
– यानंतर तुम्हाला सरकारकडून नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी मिळेल जे तुमच्या परिसरात उपलब्ध आहेत.
– यादीतील विक्रेता निवडल्यानंतर तुमचा अर्ज मंजुरीसाठी डिस्कॉमकडे पोहोचेल.
– डिस्कॉम कडून मंजुरी मिळतातच तुम्ही सोलर प्लांट बसवू शकता. सोलर प्लांट बसविल्यानंतर तुम्हाला सोलर प्लांट चा तपशील अधिकृत वेबसाईटवर सबमिट करावा लागेल आणि नेट मीटर साठी अर्ज करावा लागेल.
– पोर्टलद्वारे बँक खात्याचा तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावे लागेल.
![Surya Ghar Yojana](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/02/Surya-Ghar-1024x520.jpg)
PM Surya Ghar Yojana पात्रता
ह्या योजनेचा लाभ फक्त भारतीयांनाच मिळणार असून योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न जास्त नसावे. अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रे बरोबर असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, विज बिल, उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रेशन कार्ड असायला हवे.
हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली सूर्योदय योजनेची घोषणा
Surya Ghar Yojana: जनजागृती मोहीम राबवण्यात येणार
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला आशा आहे की मोफत वीज योजनेद्वारे सुमारे 90% ग्राहक त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्याचा पर्याय स्वीकारतील. गृह कर्जासह सौरऊर्जा पॅनलवर सबसिडी देऊन, अधिकाधिक लोकांना छतावरील सौर पॅनलचा वापर करता येईल. बँक देखील या योजनेत सहभागी होतील आणि सौर पॅनल बसवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जागरूकता मोहीम देखील राबवतील.
Surya Ghar Yojana: पंतप्रधान मोदींनी दिली या योजनेची माहिती
भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेबद्दल त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून याबाबतची माहिती दिली आहे. या योजनेचा देशातील एक कोटी कुटुंबांना लाभ होणार असून सौर ऊर्जा वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. दरम्यान या पोस्टमध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी वेबसाईटची लिंक देखील शेअर केली आहे जेणेकरून इच्छुक नागरिक त्यात अर्ज करू शकतील.
Surya Ghar Yojana: सरकार देणार इतके अनुदान
सरकार सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देत आहे. सौर पॅनल बसवण्यासाठी 60% सबसिडी मिळणार आहे. सूर्यघर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला सबसिडीची संपूर्ण रचना देखील बघायला मिळणार आहे. अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार प्रति किलोवॅट तीस हजार रुपये सबसिडी दिली जाणार आहे. याशिवाय तुम्ही तीन किलोमीटर पेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनल विकत घेतल्यास तुम्हाला 78 हजार रुपये पर्यंत सबसिडी दिली जाईल.
जर तुम्ही दर महिन्याला दीडशे युनिट वीज वापरत असाल तर तुम्हाला एक ते दोन किलोवॅट सोलर पॅनल लागेल. आणि यासाठी तुम्हाला तीस हजार ते साठ हजार रुपये सबसिडी मिळेल. जर विजेचा वापर दीडशे ते तीनशे वीस असेल तर तुम्हाला दोन ते तीन किलोवॅट सोलर पॅनल ची आवश्यकता असेल आणि यावर 60 हजार रुपयांपासून ते 78 हजार रुपये पर्यंतचे अनुदान मिळणार आहे. जर विजेचा वापर एका महिन्यात 320 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तीन किलो वॅट पेक्षा जास्त सोलर पॅनल बसवावे लागतील.
Surya Ghar Yojana: सोलर रुफटॉप चे प्रकार
1) ऑन ग्रीड प्रणाली
ऑन ग्रिड प्रणालीमध्ये छतावरील सौर यंत्रणा मुख्य ग्रीड पुरवठ्यासह एकत्रित केली जाते. जेव्हा रुफ टॉप सोलर सिस्टिम आवश्यक वीज पुरवठा करू शकत नाही तेव्हाच ही प्रणाली ग्रीड पुरवठ्यामधून वीज वापरू शकते. या प्रणालीचा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे निर्मित झालेली अतिरिक्त वीज ग्रीडला दिली जाऊ शकते आणि त्याचे पैसे देखील मिळतात.
2) ऑफ ग्रिड प्रणाली
ऑफ ग्रिड प्रणालीमध्ये छतावरील सौर यंत्रणा मुख्य ग्रीडसोबत जोडलेली नसते. ही यंत्रणा स्वतःच्या बॅटरीने स्वतः चालू शकते. रुफ टॉप सोलर सिस्टिम मधून निर्माण होणाऱ्या विजेच्या साहाय्याने बॅटरी चार्ज होते आणि त्याच्या साह्याने ती वीज विविध उपकरणांसाठी वापरली जाऊ शकते. जेव्हा ग्रीड पुरवठा वारंवार खंडित होत असेल, अशावेळी ही प्रणाली अतिशय उपयुक्त ठरते.
3) संकरित प्रणाली
या प्रणालीमध्ये ऑन ग्रिड आणि ऑफ ग्रिड दोन्ही प्रणाली एकत्रितपणे कार्य करत असतात. या प्रकारच्या प्रणालीमध्ये जरी बॅटरी वापरली जात असली तरी येथे फायदा असा आहे की बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर उत्पन्न होणारी अतिरिक्त वीज ग्रीडला दिली जाते त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त महसूल मिळतो.
Surya Ghar Yojana – सोलर रूफटॉप वापरण्याचे फायदे:
वीज बिलाची बचत
सौर ऊर्जा ही मोफत आहे. या सौर ऊर्जेच्या सहाय्याने व सोलर रुफ टॉपचा वापर करून नियमित व दीर्घकाळासाठी वीजनिर्मिती केली जाऊ शकते. त्यामुळे वीज बिलात नक्कीच बचत होते.
सहज उपलब्ध
सौर ऊर्जा मोफत व नैसर्गिक असल्याने तिचा वापर करून भारतात कुठल्याही क्षेत्रात सहजपणे वीजनिर्मिती केली जाऊ शकते.
कमी देखभाल
सोलर रुफ टॉप बसवल्यानंतर देखभालीचा खर्च हा अत्यंत कमी आहे. त्यामुळेच दीर्घकाळासाठी वीजनिर्मिती केले जाऊ शकते.
निसर्गाला हानी होत नाही
सोलर रुफ टॉप आणि सोलर पॅनल च्या सहाय्याने निर्मित केलेल्या विजेमुळे पर्यावरणास कुठलाही धोका होत नाही आणि आरोग्यास धोका होत नाही.
छतावरील सौर ऊर्जा निर्माण करत असताना त्याच्या व्यतिरिक्त सौर ऊर्जेचे अनेक उपयोग आहेत. सौर ऊर्जा हा एक सोयीस्कर व अक्षय ऊर्जा स्त्रोत असून सोलर रुफ टॉप आणि सोलर पॅनल स्थापनेचा सुरुवातीचा खर्च जरी जास्त वाटत असला दीर्घकाळ निर्मितीने स्थापनेचा व उत्पादनाचा खर्च भरून निघू शकतो.
Surya Ghar Yojana FAQ:
1) सोलर रुफटॉप म्हणजे काय?
सोलर रुफटॉप म्हणजे नागरिक राहत असलेली घरे, निवासी इमारती, वित्तीय संस्थांच्या छतावर बसवलेल्या सोलर पॅनल व सौर ऊर्जेचा वापर करून केलेली वीज निर्मिती.
2) नेट मीटरिंग म्हणजे काय?
नेट मीटरिंग ही एक बिलिंग यंत्रणा आहे ज्याच्या सहाय्याने सौर ऊर्जेद्वारे निर्माण झालेली ऊर्जा वापरलेल्या विजेच्या युनिट मधून वजा केली जाते आणि उरलेल्या युनिटची बिल आकारले जाते. चल सौर ऊर्जेद्वारे जास्त वीज निर्मिती झाल्यास जमा केली जाते आणि त्यानंतरच्या बिलात समायोजित केली जाते. हे गिडबद्ध सौर ऊर्जा प्रणालींना लागू होते.
3) ग्रिडला वीज पुरवठा केल्यास पैसे मिळतात का?
होय. सौर ऊर्जा प्रकल्पांमधून वीज खरेदी करण्याचा दर हा राज्य वीज मंडळाद्वारे निश्चित केला जातो.
4) पुरेसा सौर प्रकाश नसल्यास वीज निर्मिती होते का?
सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सकाळी नऊ ते दुपारी तीन दरम्यान सावलीमुक्तक्षेत्र असणे आवश्यक आहे.
5) सोलर पॅनलची नियमित देखभाल आवश्यक आहे का?
होय. सोलर पॅनल्स वरील साचलेली धूळ नियमितपणे स्वच्छ करा. जि टी आय वर असलेली धूळ साफ करताना ओल्या कपड्यांचा वापर करू नका.
6) बाहेरगावी गेल्यास जीटीआय डिस्कनेक्ट आणि बंद केले पाहिजे का?
नाही. घरामध्ये जर विजेचा वापर केलेला नसेल, तर निर्माण झालेली वीज ही ग्रीडला सप्लाय केली जाते.