Suzlon Diploma Jobs 2024: डिप्लोमा फ्रेशर्ससाठी सुझलॉन मध्ये नोकरीची संधी!

Suzlon Diploma Jobs 2024: इंजीनियरिंग डिप्लोमा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते की आपल्याला नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळावी. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पास झालेल्या विद्यार्थ्यांना सुझलॉनमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. हल्ली बऱ्याच नामांकित कंपन्या नोकरीसाठी अनुभव असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देत असतात. त्यामुळे डिप्लोमा फ्रेशर्सला नोकरी मिळवण्यासाठी अनेकदा भटकंती करावी लागते. परंतु सुझलॉन सारख्या नामांकित कंपनीमध्ये चक्क फ्रेशर्ससाठी मोठी भरती निघालेली आहे. चला तर मग जाणून घेऊया सुझलॉनमध्ये नोकरी करण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया.

Suzlon Diploma Jobs 2024
Image Source: Suzlon

सामग्री सारणी

Suzlon Diploma Jobs 2024 – पद:

डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस

Suzlon Diploma Jobs 2024 – एकूण जागा:

80 रिक्त पदे

Suzlon Diploma Jobs 2024 – शैक्षणिक पात्रता:

1) मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखेतून 2022, 2023 या साली पास झालेले किंवा 2024 साली शिकत असलेले.

2) मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखेतून कमीत कमी 45% गुणांनी सर्व विषयांत उत्तीर्ण.

3) कुठलेही विषय बाकी नको (No Pending Backlog)

Suzlon Diploma Jobs 2024 – वयोमर्यादा:

24 वर्षांपेक्षा जास्त नाही.

Suzlon Diploma Jobs 2024 – शारीरिक क्षमता:

उमेदवार WTG टॉवरवर चढण्यासाठी फिट असावा, तसेच उमेदवाराचा कुठलाही वैद्यकीय इतिहास नसावा.

हेही वाचा: लाखोंचे पॅकेज देणारे पुण्यातील सर्वोत्तम इंजीनियरिंग कॉलेजेस

वेतन (पॅकेज) – CTC:

CTC 2.00 लाख प्रतिवर्ष.

कंपनीच्या प्रचलित धोरणानुसार राहण्याची सोय, कॅन्टीन,  वाहतूक सुविधा, मेडिक्लेम आणि अपघात विमा, इतर प्रोत्साहन.

Suzlon Diploma Jobs 2024 – नोकरीचा तपशील:

कंपनी: SGSL सुझलॉन ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

व्यवसाय युनिट: OMS ऑपरेशन आणि देखभाल सेवा

स्थान: जैसलमेर साईट्स राजस्थान

भूमिका श्रेणी: अभियांत्रिकी

नोकरीचा प्रकार: पूर्णवेळ, कायम

Suzlon Diploma Jobs 2024
Image Source: Suzlon

कामाचे स्वरूप (भूमिका आणि जबाबदाऱ्या):

विंड फार्म साइट्सवर ऑपरेशन आणि देखभाल क्रियाकलाप.

हेही वाचा: हे आहेत नाशिक मधील सर्वोत्तम इंजीनियरिंग कॉलेजेस

अर्ज शुल्क:

डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी कुठलेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

अर्ज प्रक्रिया:

1) उमेदवारांनी प्रत्यक्ष तांत्रिक चाचणीसाठी उपस्थित रहावे.

2) तांत्रिक चाचणी – बहुपर्यायी प्रश्न

तांत्रिक चाचणीचे स्वरूप:

1) बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित तांत्रिक चाचणी.

2) ही चाचणी मोबाईल / व्हाट्सॲप / गुगल ड्राईव्ह द्वारे घेतली जाईल.

3) सदर परीक्षेला येणाऱ्या सर्व उमेदवारांकडे त्यांचे व्हाट्सॲप, इंटरनेट आणि अँड्रॉइड सक्षम मोबाईल हँडसेट, सक्रिय मोबाईल नंबर आणि जीमेल खाते असणे आवश्यक आहे.

4) उमेदवारांनी सोबत येताना बायोडाटाची प्रत, पासपोर्ट साईज फोटो, लेखन सामग्री आणि इंटरनेटसह अँड्रॉइड मोबाइल हँडसेट आणणे आवश्यक आहे.

परीक्षेची तारीख, वेळ आणि ठिकाण:

डिप्लोमा मेकॅनिकल इंजीनियरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सुझलॉन वॉक इन ड्राइव्हसाठी उपस्थित राहण्याकरता तारीख व वेळ खालील प्रमाणे.

परीक्षेची तारीख: सोमवार, 10/06/2024

परीक्षेची वेळ: सकाळी 8.00 ते 11.30

परीक्षेचे ठिकाण: शासकीय पॉलीटेक्निक कॉलेज, जोधपुर, राजस्थान W6, रेसिडेन्सी रोड, नगर निगम जवळ.

महत्वाची सूचना:

डिप्लोमा मेकॅनिकल इंजीनियरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सुझलॉन वॉक इन ड्राइव्हसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये. सदरची नोकरी भरती प्रक्रिया ही अगदी निशुल्क असल्याने कुठल्याही व्यक्तीला नोकरीसाठी पैसे देऊ नये.

सुझलॉन डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस पदाची Naukri.Com वर अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.

Suzlon Diploma Jobs 2024
Image Source: Suzlon

कंपनी विषयी माहिती:

सुझलॉन समूह हा आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील 19 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उपस्थितीसह जगातील अग्रगण्य अक्षय ऊर्जा समाधान पुरवठादारांपैकी एक आहे. दोन दशकांहून अधिक ऑपरेशनल ट्रॅक रेकॉर्डसह, समूहाकडे अंदाजे 15GW पवन ऊर्जा क्षमता, 8,000 पेक्षा जास्त कार्यबल, कमी किमतीचा उत्पादन बेस आणि यूएसए, जर्मनी, मध्ये मजबूत इन-हाउस R&D सेटअप आहे. नेदरलँड, डेन्मार्क आणि भारत. समूहाच्या स्थापनेतील अंदाजे 9GW भारतात आहे, जे देशातील पवन प्रतिष्ठानांपैकी 37% बनवते, ज्यामुळे सुझलॉन या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीने अलीकडेच सौरऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला आहे. भारतातील पुणे येथील सुझलॉन वन अर्थ येथे मुख्यालय असलेल्या समूहामध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड आणि त्याच्या उपकंपन्यांचा समावेश आहे. सुझलॉन कॉर्पोरेट वेबसाइट: www.suzlon.com

कंपनी मुख्यालय: अनु क्रमणिका 170/1 ते 8, वन अर्थ, मगरपट्टा समोर, पुणे, महाराष्ट्र, भारत.

हेही वाचा: सेमीफायनल ते प्लेऑफ, जाणून घ्या 2008 ते 2023 च्या आयपीएलचा इतिहास

निष्कर्ष:

पवन ऊर्जा उत्पादनात जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या कंपनीमध्ये डिप्लोमा फ्रेशर्सला नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. सदर भरती प्रक्रिया ही वॉक इन ड्राइव्हच्या माध्यमातून राबवली जाणार असून उमेदवारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

हेही वाचा: ग्लेनमार्क फार्मास्युटीकल्स लिमिटेड, नाशिक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

1) जॉब फ्रॉड (नोकरी फसवणूक) म्हणजे काय?

जॉब फ्रॉड हा एक अत्याधुनिक घोटाळा आहे जो नोकरी शोधणाऱ्यांना खोटे नोकरीच्या संधी देत असतो. अशाप्रकारे नोकरीची फसवणूक ही सामान्यतः ऑनलाईन केली जाते. खोट्या जाहिराती, खोट्या वेबसाईट, खोटे ईमेल, बनावट जॉब ऑफर लेटर इत्यादींच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांची फसवणूक केली जाते.

2) सुझलॉन कंपनीचे प्रमुख उत्पादन काय आहे?

पवन ऊर्जा निर्मिती हे सुझलॉन कंपनीचे प्रमुख उत्पादन आहे.

3) सुझलॉन डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?

24 वर्षांपेक्षा जास्त नाही.

4) सुझलॉन डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस भरतीसाठी किती वेतन मिळणार?

CTC 2.00 लाख प्रतिवर्ष.

5) सुझलॉन डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कोणते आहे?

जैसलमेर, राजस्थान हे नोकरीचे ठिकाण आहे.

6) सुझलॉन डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस पदांची भरती ऑनलाइन होणार आहे की ऑफलाइन?

वॉक इन ड्राइव्हच्या माध्यमातून डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे.

7) सुझलॉन डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस पदांसाठी वॉक इन ड्राइव्ह किती तारखेला आहे?

सोमवार, दिनांक 10/06/2024 रोजी डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस पदांसाठी वॉक इन ड्राइव्ह आयोजित केलेला आहे.

8) सुझलॉन डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस पदांसाठी वॉक इन ड्राइव्ह आणि तांत्रिक परीक्षा कोठे होणार आहे?

दिनांक 10/06/2024 रोजी शासकीय पॉलीटेक्निक कॉलेज, जोधपुर, राजस्थान W6, रेसिडेन्सी रोड, नगर निगम जवळ वॉक इन ड्राइव्ह आणि तांत्रिक परीक्षा होणार आहे.

9) सुझलॉन डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

सुझलॉन डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी कुठलेही अर्ज शुल्क नाही आहे.

10) उमेदवाराने डिप्लोमाच्या तृतीय वर्षाची परीक्षा दिलेली असून त्याचे या आधीचे कुठलेही विषय बाकी नाही आहेत, तर उमेदवार डिप्लोमा ट्रेनि इंजिनियर/अप्रेंटिस पदांच्या वॉक इन ड्राइव्हसाठी उपस्थित राहू शकतो का?

होय.

11) सुझलॉन एनर्जी लिमिटेड ही खाजगी कंपनी आहे का?

होय.

शैक्षणिक, नोकरी, धार्मिक, इत्यादी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपण आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉईन व्हावे ही विनंती.

माहिती पुढे शेअर करा.

Leave a comment