Umbrella Information: मित्रांनो मे महिना संपत आला की पावसाचे वेध लागण्यास सुरुवात होते. शेतकरी राजा तर पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. जून महिन्यात पाऊस सुरु झाल्यानंतर पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री व रेनकोट यांचा शोध सुरु होतो. घरातल्या कानाकोपऱ्यात किंवा कुठेतरी माळ्यावर कोंबून ठेवलेली छत्री हळूच बाहेर निघते. धुळीणे छत्रीचा चेहरा बदललेला असतो.
छत्री उघडून बघितल्यानंतर जाणवते की छत्रीच्या कपड्याला कुठेतरी छिद्र पडलेले आहेत किंवा छत्रीचे बटन चालत नाही किंवा छत्रीच्या काड्या तुटलेल्या आहेत, अशा अनेक समस्या समोर येतात. मग एक तर आपण त्या छत्रीला सुधरवतो किंवा नवीन छत्री बाजारातून घेऊन येतो. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की छत्री बनवताना कुठले कापड वापरले जाते आणि त्या कापडामुळे पाणी का गळत नाही? चला तर मग जाणून घेऊया छत्रीची संपूर्ण माहिती.

सामग्री सारणी
Umbrella Information – छत्रीचा शोध कधी लागला?
छत्री किंवा पॅरासोल हे माणसाचे पावसापासून किंवा सूर्यप्रकाशापासून वाचवण्याचे साधन आहे. छत्री हा शब्द पारंपारिक पणे पावसापासून स्वतःचे रक्षण करताना वापरला जातो, तर सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करताना पॅरासोल चा वापर केला जातो. पॅरासोल सूर्यप्रकाशापासून संरक्षण करते तर पॅराप्लुई पावसापासून संरक्षण करते.
छत्री हा शब्द लॅटिन umbra मधून विकसित झाला आहे, ज्याचा अर्थ सावली असा होतो. पॅरासोलला सनसेट किंवा बीच छत्री असे म्हणत. छत्रीला ब्रोली, पॅराप्लुई, रेनशेड, गॅम्प, बंबरशूट किंवा पॅरेनीज अश्या विविध नावाने विविध प्रांतात ओळखले जात असे.

Umbrella Information – प्राचीन इजिप्तची पहिली छत्री
इजिप्त मध्ये सुमारे 3000 वर्षांपूर्वी सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपाय करत असे. अतिशय उबदार अशा हवामानात सनबर्न समस्येने लोक त्रस्त होते. प्राचीन इजिप्त मध्ये पहिली छत्री सुमारे 3000 वर्षांपूर्वी दिसली होती आणि तिचा शोध प्रखर सूर्यप्रकाशापासून वाचण्याकरता लावण्यात आला होता. यावेळी पॅरासोल सोबत विविध प्रकारचे नैसर्गिक साधने सूर्यप्रकाशापासून वाचण्याकरता वापरले जात होते.

हेही वाचा: लाखोंचे पॅकेज देणारे पुण्यातील सर्वोत्तम इंजीनियरिंग कॉलेजेस
Umbrella Information – प्राचीन चीनची पावसाळी छत्री
पावसाच्या पाण्यापासून वाचण्याकरता पहिल्या पावसाळी छत्रीचा शोध चीनमध्ये लागला होता. पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी फॅब्रिक लेदर चा वापर करण्यात आलेला होता. त्याकाळी ही छत्री अत्यंत महाग असल्याने फक्त श्रीमंत लोकच या छत्रीचा वापर करू शकत होते. चीन नंतर प्राचीन युरोप, प्राचीन ग्रीस आणि रोम यांच्याकडे पाण्यापासून संरक्षण करणारी छत्री दिसू लागली.

Umbrella Information – छत्री सर्वत्र उपलब्ध झाली:
छत्री महाग असल्याने फक्त उच्चभ्रू लोकच छत्रीचा वापर करत होते. त्याकाळी बऱ्याच पुरुषांनी छत्रीचा वापर केला नाही कारण ते छत्रीला स्त्रीचे साधन समजत होते. 16व्या शतकात इटली, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये छत्रीचा वापर हा सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी होत होता. 18 व्या शतकात छत्रीचा वापर पुरुष आणि स्त्रिया दोघेही करू लागले.
हेही वाचा: हे आहेत नाशिक मधील सर्वोत्तम इंजीनियरिंग कॉलेजेस
Umbrella Information – छत्री बनवण्याचे साहित्य:
विविध प्रकारचे फॅब्रिक
बदलत्या काळानुसार छत्रीचा आकार, छत्रीचा प्रकार, छत्रीला लागणारे साहित्य देखील बदलत गेले. आज देखील बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडत असतो छत्रीच्या कपड्यातून पाणी का गळत नाही? त्याचे कारण म्हणजे छत्री बनवताना वापरण्यात येणारे जलविरोधी फॅब्रिक.
निरंतर झालेल्या संशोधनातून छत्रीसाठी विविध प्रकारचे फॅब्रिक वापरण्यात आले. परंतु आज छत्रीसाठी प्रामुख्याने पॉलिस्टर किंवा नायलॉन हे फॅब्रिक वापरले जाते. पूर्वीच्या काही छत्रीची डिझाईन ही अगदी साधी होती आणि छत्रीला फोल्ड करणे खूप अवघड होत असे. त्या काळी छत्र्यांचे वजन देखील खूप होते आणि त्यामुळे छत्रीला प्रवासात, कार्यालयात व इतर ठिकाणी घेऊन जायला खूप अवघड वाटत असे.
हेही वाचा: सेमी फायनल ते प्लेऑफ, जाणून घ्या 2008 ते 2023 च्या आयपीएलचा इतिहास
सर्वात सामान्य छत्रीला बनवण्यासाठी नायलॉन फॅब्रिकचा वापर होतो आहे. नायलॉन फॅब्रिक हलके आणि लवचिक असल्याने छत्री बनविताना ते सहजपणे छत्रीच्या सांगाड्यावर ताणून बसवता येते. नायलॉन फॅमिली चे वजन कमी असल्यामुळे छत्रीचे वजन देखील कमी होते आणि छत्री सहजपणे कोठेही घेऊन जाता येऊ शकते. नायलॉन फॅब्रिक चमकदार आणि लवचिक असल्यामुळे छत्रीच्या विविध प्रकारच्या डिझाईनसाठी फॅब्रिकची प्रामुख्याने शिफारस केली जाते. हे फॅब्रिक ओले झाल्यावर लवकर कोरडे होते.
सिंथेटिक पॉलिमरपासून तयार करण्यात आलेले पॉलिस्टर फॅब्रिक अत्यंत टिकाऊ असल्यामुळे त्या छत्री बनवण्यासाठी सोयीस्कर ठरते. आजचे फॅशनच्या जमान्यात फोल्डिंग छत्रीला प्रचंड मागणी आहे. टू फोल्ड, थ्री फोल्ड छत्र्या सहजपणे कोठेही नेता येतात आणि अशा फॅशनेबल डिझाईनसाठी अत्यंत टिकाऊ आणि स्ट्रेचेबल फॅब्रिकची गरज असते. पॉलिस्टर फॅब्रिक यासाठी एक सर्वोत्कृष्ट पर्याय ठरतो.
छत्री बनवताना पोंगी नावाचे फॅब्रिक देखील वापरले जाते. होगी फॅब्रिक हे चायनीज फॅब्रिक आहे जे पातळ धाग्यांपासून बनलेले असते. पोंगी फॅब्रिक नायलॉनच्या तुलनेने खूप महाग असल्याने ह्या छत्र्यांची किंमत देखील खूप जास्त असते.

छत्रीचा शाफ्ट (दांडी)
कुठल्याही छत्रीचा मुख्य भाग म्हणजे छत्रीचा शाफ्ट किंवा ज्याला आपण दांडी असे म्हणतो. हा शाफ्ट बनवताना त्याच्या वजनाकडे देखील तितकेच लक्ष दिले जाते. या शाफ्टच्या एका टोकाला हँडल असते तर दुसरा टोकावर फॅब्रिक ओढलेले असते. फोल्डिंग छत्रीमध्ये अखंड शाफ्ट नसून, गोल किंवा षटकोनी आकाराचे एका पेक्षा जास्त शाफ्ट वापरले जातात.
छत्रीचे हँडल
छत्री सहजपणे हातात पकडता यावी यासाठी छत्रीला हँडल/मुठ जोडलेली असते. सहसा हँडल हे प्लास्टिकचे किंवा लाकडाचे बनलेले असते.

सारांश:
पूर्वी छत्री ही फक्त पावसापासून बचाव करण्यासाठी किंवा सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी वापरली जात होती. त्यानंतर छत्रीचा वापर हा सोयीनुसार व गरजेनुसार करण्यात आला. बीचवर, रस्त्याच्या कडेला छोटासा स्टॉल लावण्यासाठी, हॉटेलच्या बाहेर, अनेक कारणांसाठी सावली मिळवण्याच्या हिशोबाने छत्रीचा वापर होऊ लागला. काही वृद्ध मंडळी छत्रीचा वापर चालताना आधार मिळवण्यासाठी करतात.
हिंदी वाहिनी सोनी सब वर लागणारी लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा मधील पोपटलाल हा काही छत्री घेऊन फिरत असतो, त्याच्यासाठी छत्री म्हणजे जीव की प्राण. आज प्रत्येक घरात छत्री उपलब्ध आहे. सहसा आपल्याकडे काळ्या रंगाची छत्री पुरुष मंडळी वापरतात आणि रंगबिरंगी छत्री स्त्रिया वापरतात. आजच्या काळात बाजारात विविध रंगाच्या, आकर्षक प्रिंटेड, फोल्डिंग, मल्टी कलर, ट्रान्सपरंट, पॉकेट छत्री, कार्टून छत्री, विविध प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहेत.

हेही वाचा: सावरकरांचे बलिदान आठवल्यावर आजही अंगावर काटे येतात
निष्कर्ष:
छत्रीच्या कपड्यातून पाणी गळत नाही त्याचे कारण म्हणजे छत्री बनवताना वापरण्यात येणारे जलविरोधी फॅब्रिक. छत्रीसाठी प्रामुख्याने पॉलिस्टर किंवा नायलॉन हे फॅब्रिक वापरले जाते. आजच्या काळात बाजारात विविध रंगाच्या, आकर्षक प्रिंटेड, फोल्डिंग, मल्टी कलर, ट्रान्सपरंट, पॉकेट छत्री, कार्टून छत्री, विविध प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1) छत्रीचा वापर कशासाठी होतो?
छत्रीचा वापर हा पावसाच्या पाण्यापासून व सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी होतो.
2) छत्रीसाठी कुठल्या कापडाचा वापर होतो?
छत्रीसाठी प्रामुख्याने पॉलिस्टर किंवा नायलॉन फॅब्रिकचा वापर होतो.
3) पहिल्या छत्रीचा शोध कोठे लागला?
पहिल्या पावसाळी छत्री चा शोध चीनमध्ये लागला.
हेही वाचा: 10वी नंतर पुढे काय?
माहिती पुढे शेअर करा.