यावर्षी दिनांक 9 एप्रिल 2024 पासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहेत. हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात.
चैत्र आणि शारदीय नवरात्र प्रकटपणे साजरी केली जातात आणि या कालावधीत नवदुर्गेची पूजा केली जाते. उर्वरित दोन नवरात्र सिद्धी प्राप्त करण्यासाठी गुप्तपणे साजरी केली जातात.
चैत्र नवरात्रीची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून केली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी या काळात चैत्र नवरात्र साजरी केली जाते. चैत्र नवरात्र साजरे करण्याचे उद्देश वेगवेगळे मानले जातात.
चैत्रप्रतीपदेला दुर्गादेवी प्रकट झाली होती आणि दुर्गादेवीच्या सूचनेनुसार ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली होती. या दिवशी हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा देखील साजरा केला जातो.
शारदीय नवरात्रीचा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत साजरा केला जातो. घटस्थापनेने सुरुवात होऊन शेवटचा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.
Image Source from X
विजयादशमीच्या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता. म्हणून शारदीय नवरात्रि हा पूर्णपणे शक्तीच्या उपासनेचा दिवस मानला जातो.
Image Source from X
चैत्र नवरात्रीच्या शेवटी रामनवमी येते. रामनवमीला भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता. शारदीय नवरात्रीचा शेवटचा दिवस महानवमी म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी विजयादशमी हा उत्सव असतो.
Image Source from X
चैत्र नवरात्रीमध्ये कठोर ध्यान आणि कठोर उपवासाचे महत्त्व आहे तर शारदीय नवरात्रीमध्ये सात्विक साधना, नृत्य, उत्सव इत्यादींचे आयोजन केले जाते.