लहान मुलांच्या आवडतीचा गुलाबी रंगाचा खाऊ म्हणजेच बुढ्ढी के बाल जो जत्रेत किंवा बागेत फिरायला गेल्यावर मुले हमखास खातात. यालाच Cotton Candy असे म्हणतात.
अगदी 5 रुपयापासून मिळणारा बुढ्ढी के बाल लहान मुलेच काय मोठी माणसे सुद्धा आवडीने खातात.
Cotton Candy म्हणजेच बुढ्ढी के बाल विकण्यावर पॉंडिचेरी मध्ये बंदी घालण्यात आली आहे.
पॉंडिचेरी चे उपराज्यपाल तामीलसाई साऊंड राजन यांनी बुढ्ढी के बाल मध्ये आरोग्यास घातक असलेले घटक असल्याने बंदी केल्याचे सांगितले.
अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना यामध्ये रोडामाईन बी असल्याचे निदर्शनास आले. रोडामाईन बी विषारी पदार्थ असून त्याचा शरीरातील उती आणि पेशींवर विपरीत परिणाम होतो.
अतिप्रमाणात आणि सतत बुढ्ढी के बाल खाल्ले तर कॅन्सरसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाँडिचेरी मध्ये यापुढे बुढ्ढी के बाल खाण्यास व विकण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Puducherry banned on Cotton Candy (Buddhi ke bal) because of toxic chemicals.