श्री संत गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन 3 मार्च 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. प्रकट दिनाच्या निमित्ताने शेगांव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.
Image Source: Google
पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार महाराष्ट्रात दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो.
Image Source: Google
23 फेब्रुवारी 1878 रोजी गजानन महाराज शेगांव येथे लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले होते. त्यावेळी ते देविदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते.
Image Source: Google
असे म्हणतात की गजानन महाराज शेगांव येथे येण्याआधी बाल दिगंबर अवस्थेत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले होते. त्यांना दत्तगुरूंचे तिसरे रूप म्हणून ओळखले जाते.
Image Source: Google
गजानन महाराजांना झुणका भाकरी, शेंगा, हिरवी मिरची, पिठीसाखर अतिशय प्रिय होती. महाराजांना चहा अत्यंत प्रिय होता. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडाची भाजी करतात.
Image Source: Google
गजानन महाराजांनी कर्ममार्ग, भक्तीमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले आहे.
Image Source: Google
महाराजांच्या अनेक लीला आहेत जसे की, बेफाम घोड्याला शांत करणे, विस्तवाविना चिलीम पेटवणे, कोरड्या विहिरीत पाणी निर्माण करणे, हाताने उसाचा रस काढणे, गाईला शांत करणे, कुष्ठरोग बरा करणे, प्लेग ची साथ दूर करणे, मृत कुत्रा जिवंत करणे, इत्यादी.
Image Source: Google
गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र होता. या मंत्राचा ते अखंड जप करत असे. गजानन महाराजांच्या समक्षच शेगांव येथे गजानन महाराज संस्थान स्थापनेच्या शुभारंभ झाला होता.
Image Source: Google