दत्त भक्तांची पंढरी अर्थात श्री क्षेत्र गाणगापूर हे प्रसिद्ध देवस्थान कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आहे. निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक गाणगापूर येथे येत असतात.
Image Source: Google
गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 22 ते 23 वर्ष वास्तव्य केले होते. श्री गुरुचरित्र या ग्रंथानुसार त्यांनी वचन दिले होते की ते गाणगापुरात कायमचे राहतील.
Image Source: Google
श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्या व सांगितले या निर्गुण पादुका आहेत आणि निर्गुण असलेल्या या पादुकांमध्ये माझा सगुण रूपाने वास राहील.
Image Source: Google
श्री नृसिंह सरस्वती महाराज हे अवतार समाप्तीच्या प्रवासादरम्यान अचानक गुप्त झाले होते आणि त्यानंतर त्यांनी निर्गुण पादुका स्थळी भक्तांना दर्शन दिले होते.
Image Source: Google
या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगम स्थान, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, अष्टतीर्थ महिमा, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका यांचे दर्शन भाविक घेत असतात.
Image Source: Google
भीमा व अमरजा या दोन पवित्र नद्यांचा संगम गाणगापुरात झालेला आहे. या संगम स्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्ट तीर्थांचा अधिवास आहे.
Image Source: Google
संगमाजवळच पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षांमध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
Image Source: Google
भस्माचा डोंगर हे दिव्य स्थळ या क्षेत्रातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. असे म्हणतात की येथील भस्माने पिशाच्च बाधा, दृष्टी बाधा आणि रोगराई नाहीशी होते.
Image Source: Google